रेल्वेस्थानकावर न थांबणारी ट्रेन……


ही चायनीज लोक आपले छोटे छोटे डोळे मिचकावत डोक्यात काय विचार असतात कोण जाणे.इतर देश जी वस्तु बनवतात तीच वस्तु त्याच गुणवैशिष्ट्यांसह भले गुणवत्ता तितकी नसली तरी कितातरी कमी किमंतीत हे तयार करुन दाखवतात.जगातील मोठया मोठया कंपन्या सुदधा आता यंत्राचे सुटे भाग चीनकडूनच घ्यायला लागले आहेत.त्यांच्याकडची खेळणी व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तु मधल कमीशन वैगेरे सगळ पकडुन ज्या किमंतीला मिळतात ते पाहुन हे लोक हया वस्तु किती कमी किमंतीत बनवत असतील हयाचा अंदाज येतो,आणी हे खरच माझ्यासाठी तरी न उलगडलेल कोड आहे.दोन रुपयाला हयांचा जो बॅटरीवाला पेन येतो त्याचच उदाहरण घ्या.काय येत दोन रुपयात.?हे दोन रुपयाला इथे भारतात आपल्याला विकतात तर तिथे बनवत कितीला असतील.असो तर आजची ही पोस्ट काही हया चिनी लोकांचा उदधार करण्यासाठी नाहिये तर नुकताच एक मेल आला होता हया चायनीज लोकांच्या डोक्यातुन निघालेल्या एका नवीन संकल्पनेचा-रेल्वेस्थानकावर न थांबणारी ट्रेन…गुगलबाबाला विचारल्यास तो हयाबद्दल बरीच माहिती पुरवतो पण ती आपल्या मायभाषेत नाहिये म्हणुन ही पोस्ट…

जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या स्थानकावर थांबते तेव्हा ती थांबायला व सुरु व्हायला लागणारा वेळ पकडुन सुमारे पाच मिनट तरी वाया जातात.समजा त्या ट्रेनच्या मार्गात एकुण वीस थांबायला लागणारी स्टेशन आहेत,तर जवळपास एक तास चाळीस मिनटे हया थांबण्यातच वाया जातात.शिवाय हया थांबण्या आणि  सुरु होण्यासाठी गाडीलाही जास्त उर्जा लागते.हा वेळ आणि उर्जा दोन्ही वाचवण्यासाठी हया चिनी लोकांनी एक संकल्पना मांडली आहे ती अशी…

प्रत्येक रेल्वे स्थानकावर एक केबीन ठेवली जाईल.ज्या प्रवाश्यांना ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे  त्यांनी हया केबीनमध्ये जायचे.जेव्हा ती ट्रेन हया स्थानकावर येइल तेव्हा ती थांबणार नाही पण तीची गती थोडीशी कमी होइल व ही केबीन त्या ट्रेनच्या छपरावर जोडली जाईल.तिथुन मग प्रवाश्यांनी खाली रेल्वेच्य डब्ब्यात उतरायचे सगले प्रवासी उतरल्यावर ही केबीन ट्रेनच्या छपरावर मागच्या बाजुला नेली जाईल.तिथे मग ज्या प्रवाश्यांन पुढील स्थानकावर उतरायचे आहे त्यांना हया केबीनमध्ये शिरायचे.आता जेव्हा पुढील स्थानक येइल ते्व्हा ही केबीन त्य स्थानकावर सोडली जाईल व तिथली केबीन पुढच्या बाजुने छपरावर जोडली जाईल.अश्या पदधतीने कोणत्याही स्थानकावर न थांबता ही ट्रेन वेळ व उर्जा दोहोंची बचत करेल.खालील विडियो पाहुन तुम्हाला ही संकल्पना अजुन योग्य रीतीने कळेल…

आपल्या इथे लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी ही संकल्पना वापरता येइल का….? तुम्हाला काय वाटते…?

Advertisements

16 thoughts on “रेल्वेस्थानकावर न थांबणारी ट्रेन……

 1. मी असाच विचार आधी केला होता. विशेषतः छपरावर चढ उतार न करता, डबा फक्त सुरवातीला किंवा शेवटी लावावी.
  तसंच वेळ कमीत कमी लागावा यासाठी, गाडीचा मुख्य मार्ग सरळ आणि पोहवणार्‍या / आणणार्‍या डब्याचा मार्ग सोयीनुसार.

  यात खुप काही करावं लागेल. आणि आपल्यासारख्या घनदाट लोकसंख्येच्या देशात तर खुपच मेहनत घ्यावी लागेल अशी व्यवस्था करायला.

  • हो आपल्या येथील गर्दीमुळे हे थोड अशक्य आहे..पण लांब पल्ल्यांच्या गाडयांसाठी ज्यात केवळ आरक्षण केलेले मर्यादीत प्रवासी प्रवास करणार असतील तिथे लागु पडु शकते…

 2. चिनी माल स्वस्त का असतो, याला दोन कारणं आहेत बहुतेक..
  लोकसंख्या – कामगार स्वस्त
  सुमार दर्जा – कच्च्या मालापासुन प्रत्येक गोष्ट हलक्या दर्जाची.

  बाकी ही ट्रेन कल्पना तर छान आहे…

  • हो ते एक मह्त्वाच कारण आहे त्यांच्या कमी भावाच…
   बाकी सुमार दर्जाच्या असल्या तरी बर्याच वेळा चांगला परफ़ोर्मन्स देतात हया चायनीज वस्तु ….

 3. अरे या चीनी वस्तू एवढ्या स्वस्त मिळण्याचं कारण म्हणजे मूळ उत्पादकाला कवडीचाही भाव मिळत नाही. हे प्रकार रोखण्यासाठी Fair Trade movement आहे. पण तिचा अजून परिणामकारक वापर झाला पाहिजे.

  http://en.wikipedia.org/wiki/Fair_trade

  • मग हे लोक तयार तरी का करतात हया वस्तु….मला वाटते जगात सगळीकडे आपल मार्केट वाढवुन इतर कंपन्यांना धक्का देत आपल साम्राज्य तयार करायच आणि मग किमती वाढवायच्या अस काहिस दुरच धोरण तर नाही ना ह्यांच….

 4. i had read a book during my childhood. it was a russian book translated into marathi.
  that had a concept like this.

  the railway station will be made of concentric platforms. passangers will use a bridge and get into center part of station. this will be stationery part of platform. a slowly moving circular belt will encircle this center. and people can easily get onto that. another circular belt will encircle this first belt but will spin at little higher speed. again, passanger on circular belt 1 can get onto belt 2 or 3 easily. this is because relative speed of each belt and its next belt will be less. this way passangers can continue passing on belts till they reach the outermost belt that is rotating at high speed.
  finally the train will come and encircle whole station. the train need not stop since its speed and speed of outermost belt will be relatively same. people on outermost belt can get into fast train like they crossed belts earlier.
  similarly they can get out of station.

  • आइंस्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतावर आधारित ही संकल्पना देखील चांगली आहे, पण पुष्कळ गर्दी असलेल्या ट्रेनसाठी नक्कीच लागु पडणार नाही…

  • hahahaha
   gr8 concept!
   If I happen to make a sci-fi movie, I ‘ll surely use this concept somewhere!

   Haven’t came across anything like this before!

   • हया चिनी लोकांच्या डोक्यात येतात अश्या भन्नाट कल्पना…हो सायन्स फ़िक्शन मध्ये आरामात वापरु शकतो ही संकल्पना…

 5. lekh interesting..majhya manatahi ashi kalpana sarkhi yaychi..thodi vegali..

  I mean something like moving platform.

  Cost effective vatayachi nahi.

  Gardi madhe tar nahich nahi.

  Stampade jhale tar vaat..

  Ani laambachya pallyapeksha javal javal asalelya suburban setup madhe jaast use ahe..karan faar vela thambvavi laagate train..

  • नचिकेतजी,आपले म्हणणे पटते पण सबर्बन मधील जवळ-जवळ च्या स्टेशनवरील गर्दी पाहुन हे लागु केल्यास तिथे काय होइल हयाच चित्र डोळ्यांसमोर उभ केल्यावर ही संकल्पना तिथे लागु करणे अशक्यच आहे असे वाटते.बाकी लांब पल्ल्याच्या प्रवासी निश्चित माहित असलेल्या ट्रेनचा हया संकल्पनेने थोडा का होइना वेळ वाचु शकतो असे मला वाटते….

 6. हेरंबशी सहमत. शिवाय आपल्या इथली गर्दी दिवसेंदिवस इतकी बेफाट वाढतेयं की हे असे करणे फारच कठीण. कदाचित मुंबई-कलकत्ता वगैरेसाठी न वापरता जरा कमी गर्दीच्या शहरात अश्या स्वरूपाचे काही प्रयत्न करून पाहायला हवेत…. लेख आवडला.

  • हो कमी गर्दीच्या शहरात हयासंबधीचे प्रयोग चालु करुन बघायला हवेत…बाकी आपल्या इथे गर्दी ( लोकसंख्या )मारुतीच्या शेपटीसारखी वाढतच राहणार आहे…

 7. minute minute second second vel vachavnyaachi garaj metro ani suburbs madhech ahe.

  Karan khoop stations ani javal javal asalyane ajoonach vel jaato thaambnyaat pratyek thikani..

  kami gardichya shaharaat ani laamb route chya trains la vel vachavnyaachi itaki nikad naste na..

  Mag thoda vel vachavanyasathi kon itki investment karnaar.asa majha point hota..

  Kuthe implement karne SHAKY kinva EASY ahe yaavar project tharat nasoon kuthe GARAJ ahe tyavar te tharate..

  Punha example..tree plantation chi garaj mumbait aahe..keval mokali jaga ahe mhanoon assam chya jungle madhe plantation karoon kaay upayog? Aso..lambad lagli..

  • नचिकेतजी, यावेळी १०० % पटल आपल मत….उदाहरण तर एकदम झक्कास दिलत…सबर्बनमधील गर्दी पाहता तिथे ही संकल्पना लागु करता येणार नाही…आणि कमी गर्दीच्या स्टेशनचा किंवा लांब पल्ल्याचा विचार करता तेथे गाडी चालु-बंद न केल्याने वाचलेली उर्जा आणि वेळ यांचा या योजनेसाठी जी गुतंवणुक लागेल तिच्याशी ताळेबंद केल्यास ही संकल्पना तिथेही तेवढी उपयुक्त नाही…
   म्हणजे ऐकुणच आपल्याला लोकसंख्येचा समतोल साधल्याशिवाय हया संकल्पनेचा विचार करता येणार नाही….आपल्या विचारपुर्वक प्रतिक्रियेबद्दल खरच आपले आभार…

टिप्पण्या बंद आहेत.