’नेटभेट’ मध्ये मी……


नेटभेटचा एप्रीलचा अंक नुकताच प्रदर्शीत झाला आहे.त्यात माझी ’ आयत्या बिळात नागोबा ’ ही पोस्ट सामाविष्ट केलेली आहे.(अर्थातच माझ्या पुर्वसमंतीने) तशी नेटभेटमने यापुर्वीही या पामराची दखल घेतली होती. नोव्हेबंर आणि डिसेबंर या नेटभेटच्या अनुक्रमे दुसरया व तिसरया अंकात माझे लेख घेतले होते.नोव्हेबंर मधील हा कौन बनेगा करोडपती हा गुंतवणुक-अर्थशास्त्राशी निगडीत होता तर डिसेबंर मध्ये ‘ट्राय’ ला जेव्हा जाग येते …. हा लेख ट्रायने ग्राहकहितासाठी जी स्तुत्य  पाउले उचलली त्यावर भाष्य करणारा होता.पण यावेळी त्यांनी जो लेख निवडला तो अगदि वडापाववाल्याकडे गेल्यावर तो उकळत्या तेलातुन ’इन्स्टंट ’ गरमागरम वडे काढुन देतो (बहुतेक ब्लॉगर हे खादाडीप्रिय  असल्याने अस उदाहरण देतो आहे 🙂 ) तसा  ’इन्स्टंट ’ लिहलेला आणि मुख्य म्हणजे माझ्या स्वत:च्या संदर्भात असुन माझ दैदिप्यमान कर्तुत्व दाखवणारा 🙂  होता. नेटभेट सुमारे ४० हजार लोकांपर्यंत पोहोचवला जातो म्हणजे इतके लोक माझ्याबद्दल वाचणार म्हणजे सलील आणि प्रणव हयांनी मला स्टारच बनवले आहे. 🙂 म्हणून त्यांचे आभार मानण्य़ासाठी ही पोस्ट…

मी खरडलेल्या हया पोस्टस त्यांना  त्यांच्या मासिकात घेण्यासारख्या वाटल्या ह्याचा मला खरच खुप आनंद वाट्तो आहे. का नाही वाटणार..कोणी त्याबद्दल बोलते तर कोणी लपवते पण इथे प्रसिदधी सर्वानाच हवी असते.हयामुळे निश्चितच लिहण्याचा उत्साह वाढतो.कारण ब्लॉग न वाचणाऱ्या वाचकांपर्यंत लेख पोहोचवण्याचा नेटभेट हा एक महत्वाचा दुवा आहे असे मला वाटते.हे मासिक असेच चालु राहुन माझ्यासारख्या इतर ब्लॉगर्सनाही प्रोत्साहन मिळ्त राहयला हव अस वाटते.असो हया ई-मासिकाबरोबरच नेटभेटचे  सर्वेसर्वा सलील चौधरी आणि प्रणव जोशी इतरही अनेक उपक्रम राबवत असतात.सध्याच त्यांनी ब्लॉगर्ससाठी एक स्पर्धा आयो्जीत केली होती.ती सुदधा योग्य बक्षिसांसोबत.आपला  वटवट  करणारा सत्यवान डॉट कॉम च बिरुद मिरवतो आहे ते हया स्पर्धेमुळेच. 🙂 शिवाय मागेच त्यांनी मराठी ब्लॉगर्सच साहित्य एका ठिकाणी एकत्रीत करण्यासाठी मराठी ब्लॉग कट्टयाची स्थापना केली आहे.नेटभेटवर त्यांनी अनेक मराठी ई-बुक्सही ठेवली आहेत डाउनलोडींगसाठी.

मराठी ब्लॉगींगला जगाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा वसा घेतलेल्या  नेटभेटचे हा आणि असे आणखी उपक्रम असेच यशस्वीरीत्या चालु राहावेत असे अगदि मनापासुन वाटते.नेटभेटच्या पुढील वाटचालीसाठी सलील व प्रणव हयाना शुभेच्छा आणि मला इतक्या लोकांपर्यंत पोहोचायची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार….

[ तळ्टीप: तुम्ही तुमच्या संपर्कातील मराठीबांधवांचे ई-मेल आयडी salil@netbhet.com हया पत्त्यावर पाठवुन हया उपक्रमाला हातभार लावण्याचे काम करु शकता.]

Advertisements

12 thoughts on “’नेटभेट’ मध्ये मी……

 1. congrats boss….hevdhe lekh gelet mhanaje kai majja aahe….agdi aamras puriche jevan ani nantar sajuk tupatali biryani asa kahi tari ka?? jaude jhepat nahi aahe mala rikamya poti khau upama…:)

  • अपर्णाताई थेंकु…हो ना आनंदी आनंद गडे… बाकी मंगळवार असल्याने आज साजुक तुपातली बिर्याणी नाही खाउ शकत त्यामुळे मलाही आज उपमाच खावा लागेल तुझ्याबरोबर.. 🙂

 2. अभिनंदन त्रिवार अभिनंदन… 🙂
  तू लिहीत रहा आम्ही वाचतोय आणि सलील-प्रणव आहेतच आपल्या लेखांची दखल घ्यायला!!!

  त्या दोघांचे आभार तर नेहेमीच आहेत 🙂

  • थेंकु तन्वीताई….
   तुम्ही वाचत आहात म्हणुन तर लिहतोय… 🙂
   त्यासाठीच जाहिर आभारप्रदर्शनासाठी ही पोस्ट (वर स्वत:चीही जाहिरात होते आहे ना… 🙂 )

टिप्पण्या बंद आहेत.