आचार्य…


” उध्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मुर्ख असेल,हयाच्या हातुन अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कॄत्घन मात्र कधीही न्वहता.”

गेल्या आठवड्य़ातच वि.र.काळे हयांच  ’आचार्य अत्रे : महाराष्ट्रातील बलदंड व्यक्तीमत्व’ हे आचार्य अत्रेंवरील पुस्तक वाचल.पुस्तकाच्या पहिल्याच  पानावर अत्रेंनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी काढलेले वरील उदगार दिलेले  आहेत.ते किती समर्पक आहेत ते पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते.खरतर ही पोस्ट १ मे ला सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिनाच्या दिवशी टाकायची होती, पण नेहमीचाच कं मध्ये आला आणि ही पोस्ट प्रकाशीत होण्य़ासाठी तब्बल ८ मे उजाडाव लागल.

खर सांगतो हे पुस्तक वाचायच्या आधी आपले साहित्यातील अत्रे आणि राजकारणातील अत्रे मला दोन वेगवेगळ्या व्यक्ती वाटायच्या.असो पण अत्र्यांच्या व्यक्तीमत्वाचा आवाकाच इतका मोठा आहे की ही असली चुक आम्हा पामरांकडुन होउ शकते, त्यात काही वावग नाही.अत्र्यांचे विविध क्षेत्रातील कर्तुत्व एकुन ”एक माणूस एवढा सगळा असू शकतो? ” असे उद्गार स्वत: पंडीत नेहरुंनीही काढले होते.ते बरच काही सांगुन जातात.ज्याप्रमाणे आपल्या सचिन तेंडुलकरला देवाने प्रतिभाशाली फ़लंदाजीची देणगी दिली आहे त्याचप्रकारे अत्र्यांवर तर परमेशवराने विविध गुणांची उधळणच केली होती.त्यांनीसुदधा हया दैवी देणगीचा विविध क्षेत्रात योग्य वापर करुन तिला योग्य न्याय दिला.तर हे पुस्तक वाचुन माझ्या मनात जी काही आदर्श व्यक्तीमत्व आहेत त्यात एक नाव वाढल…

ते शिक्षणतज्ज्ञ, एक उत्कॄष्ट मराठी लेखक, एक श्रेष्ठ कवी,प्रभावी वक्ते,एक उत्तम क्रिकेटपटू, वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, राजकीय नेते,विंडबनकार,नाटककार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक होते.अष्टपैलु हे विशेषणही कमी पडाव अस त्यांच एकुण व्यक्तीमत्व होत.

अत्र्यांचे पुर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे.आचार्य  ही उपाधी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगीरीबद्दल दिली.वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी  ’महाराष्ट्र मोहरा’ ही कांदबरी लिहली. कुठेही काही चांगल आढळल की त्याला उत्स्फ़ुर्त दाद दिल्याशिवाय त्यांना राहवत नसे.तसेच ते हजरजवाबीही होते.एखाद्याची कोणती गोष्ट रुचली नाही कि ते अगदी सडॆतोड आणि आक्रमक भाषेत उत्तर देत.हयामुळेच अत्र्यांची बरयाच लोकांबरोबर भांडणही झाली.अशी भांडण असली तरी ज्याच्याबरोबर भांडायचे त्याला शिवराळ भाषेत ठणकावतांना त्याच्या चांगल्या गुणाची स्तुती करायला ते मागेपुढे पाहायचे नाही.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांनी नेहरुंचा उलैख औरंगजेब म्हणुन केला तेव्हा एका नेहरु समर्थकाने त्यांना नेहरुंचा चांगुलपणा तुम्हाला दिसत नाही का असे विचारले असता अत्रे म्हणाले  ’वाघ जोपर्यंत  आम्हाला खातो आहे तोपर्यंत त्याच्या अंगावरच्या शोभीवंत पट्ट्यांचे कौतुक कोण करणार..? ’

अत्रे कोणत्याही क्षेत्रात शिरताना अगदी बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं.नुसत नावादाखल एखाद क्षेत्र त्यांनी निवडल अस नाही तर ज्या  क्षेत्रात घुसले तिथे त्यांनी विशिष्ट उंची गाठलीच.आचार्य अत्रे यांनी प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले  हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह खूप गाजला.त्यांचा प्रेमाचा गुलकंद तर आठवत असेलच तुम्हाला.पाठ्यपुस्तकातील धडे सोप्या भाषेत असावेत असा त्यांचा आग्रह होता.चौथीच्या पुस्तकातील  दिनुचे बिल हया त्यांच्या धड्याने महाराष्ट्रातील किती पिढ्या हलवल्या ,घडवल्या. नाटकाच्या क्षेत्रात साष्टांग नमस्कार ने पदार्पण करत पुढे एकापाठोपाठ भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी , घराबाहेर, उद्याचा संसार , तो मी नव्हेच अश्या अनेक लोकप्रिय नाटके लिहण्याचा सपाटाच लावला.पुढे चित्रपट क्षेत्रात उडी घेतल्यावर तिथेसुदधा  शामची आई  या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक प्राप्त झाले.

मराठा व नवयुग हया वॄत्तपत्रांतुन ते जनसामान्यांना मार्गदर्शन करायचे.वॄत्तपत्रांकडे धंदा म्हणुन त्यांनी कधीही पाहिल नाही.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची नेतॄत्व आचार्य अत्र्यांनी अगदि समर्थपणे आपल्या खांद्यावर  पेलले . त्यांच्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.त्यांच्यासारखा निस्वार्थी नेता आज आपल्याला लाभायला हवा.अत्रे  भाषणातुन हशा व टाळ्यांसह आपले परखड विचार जनसामान्यांसमोर योग्य भाषेत मांडायचे.विनोदाचा प्रभावी वापर ते त्यांच्या भाषणात करायचे.अत्र्यांचे काही विनोदी किस्से वाचण्यासाठी इथे भेट दया. त्यांच्या वाणीने उभ्या महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे केले होते.बाळासहेब किंवा राज ठाकरे हयांच्या वक्तॄत्वावरही आचार्यांच्या वक्तॄत्वशैलीचा  प्रभाव असल्याचे सांगीतले जाते.तशीही प्रबोधन ठाकरे आणि अत्रेंची तब्बल ३५ वर्षाची मैत्री होती.स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसपक्ष अत्र्यांनीच फ़ुलविला.त्यांनी कॉंग्रेसची अगदि मनापासुन सेवा केली पण तेच जेव्हा कॉंग्रेसची मते त्यांना पटेनाशी झाली तेव्हा त्याच तिव्रतेने ’ अब हमारी दुश्मनी देख लो’ च्या तोर्यात त्यांनी कॉंग्रेसला चांगलच  फ़ैलावरही घेतले.

एकुणच अत्र्यांच्या भव्य व्यक्तीमत्वाची ओळख योग्य शब्दात केली आहे हया पुस्तकात. सुरुवातीला अत्रेंच्या कन्या शिरीष पै हयांनी लिहलेली प्रस्तावनाही वाचण्यासारखी आहे.पुस्तक घटनांनुसार न लिहता अत्र्यांच्या  व्यक्तीमत्वाचा एकेक पैलु उलगडत लिहले आहे त्यामुळे ते जास्त प्रभावी ठरले आहे.असे असले तरीही बर्याच घटनांचे संदर्भ पुस्तकात  परत परत आलेले आहेत.त्यामुळे मध्ये मध्ये थोड रिपीटेशन वाटत पण एकुणच पुस्तक वाचनीय आहे.शक्य असल्यास जरुर वाचा.  मी हे पुस्तक वाचल्यावर काही मित्र ज्यांना साहित्यात थोडाफ़ार रस आहे त्यांच्याशी अत्रेंबाबत चर्चा केली पण पुल,वपु,जीए यांबाबत चांगली माहिती असलेल्या बहुतेकांना अत्रेंबद्दल विशेष माहिती न्वहती.मला वाटते आजच्या पिढीला तरी अत्रेंबाबत जास्त माहिती नाहिये.कदाचीत हे चुकही असु शकेल कारण खुपच कमी लोकांच्या आधारावर हे विधान करतो आहे पण तरीही  जी लोकप्रियता पुलना व्यक्तीगतरीत्या आजही मिळते आहे तेवढी अत्रेंना मिळत नाहिये हे मात्र नक्की.

एकेकाळी आपल्या जादुई व्यक्तीमत्वामुळे अवघ्या महाराष्ट्राला भारावुन टाकणारया खरया अर्थाने आचार्य असलेल्या हया   अवलियाला  माझे लाख लाख सलाम…..

Advertisements

13 thoughts on “आचार्य…

 1. ’वाघ जोपर्यंत आम्हाला खातो आहे तोपर्यंत त्याच्या अंगावरच्या शोभीवंत पट्ट्यांचे कौतुक कोण करणार..? ’ किती पर्फेक्ट उपमा दिलीयं. शाळेतच ओळख झालेली…. हजरजबाबी, सडेतोड आणि जबरदस्त आक्रमक…. क्षेत्र कुठलेही असो ते मी जिंकेनच. दिग्गज व्यक्तिमत्व. त्रिवार सलाम!!!

  • हो ना आणि ते इतक इन्स्टंट डोक्यात आल त्यांच्या हे हे विशेष…मलासुदधा शाळेतच तुटक-तुटक ओळख झाली होती आचार्यांची…पण आता त्यांच एकुणच चरित्र वाचल्यावर तर मी खुपच प्रभावीत झालो त्यांच्या व्यक्तीमत्वाने…खरच ते आले, त्यांनी पाहिल, त्यांनी जिंकुन घेतल सार…

 2. उत्कृष्ट लिहिलं आहेस !! खूप आवडलं.

  अत्रे म्हणजे आमच्या घरातलं दैवत. आजी, आजोबा, बाबा हे अत्र्यांचे मोठ्ठे पंखे. माझ्या आजोबांचा कामानिमित्त अत्र्यांशी अनेक वेळा संबंध आला होता. ते अत्र्यांना अनेक वेळा भेटले होते. त्यामुळे आचार्य अत्रे ही व्यक्ती आमच्या घरात देवासारखी पुजली जायची.. आणि मी पुलंचा डाय-हार्ड पंखा. त्यामुळे एकाचं घरात दोन-दोन व्यक्तिपूजा व्हायच्या 🙂 ..

  तुझा लेख वाचून हे सगळं आठवलं. मजा आली.. आभार.

  • धन्यवाद हेरंब…
   खुपच नशीबवान म्हणायला हवे तुझ्या आजोबांना…बाकी लहानपणी मी सुदधा पुलंचा अगदि डाय-हार्ड पंखा होतो.पण पुढे वपुंनी माझ्यावर पुर्ण ताबा मिळवला… मी आता खुप उशिरा आचार्यांना ओळखल पण मलाही ते अगदि अद्वीतीय देवासारखेच वाटले…बाकी ते दोन-दोन व्यक्तीपुजेबद्दल वाचुन ’ढॅण टॅ णॅण’ च्या पार्श्वसंगीताबरोबर एक चित्र समोर आल… 🙂

   • देवेंद्र
    मस्त जमलाय लेख. आचार्य अत्रेंच्या नावावर बरेचसे पाचकळ विनोद बनवुन सांगायची आमच्या लहानपणी पध्दत होती. व्हायचं काय, असे विनोद सांगुन झाले, आणि ते अत्रेंचे आहेत म्हंट्लं की कोणी त्यावर आक्षेप घेत नसे..शाळेत सगळे अश्लिल विनोद हे अत्र्यांचे विनोद म्हणुनच सांगितले जायचे!

    आणि ब्लॉग मस्त दिसतोय आता. वर्डप्रेसने पण थिम्स आणल्यामूले बरं झालं नाही?

    • हे पुस्तक वाचुन अत्र्यांच्या एकुणच व्यक्तीमत्वाने मी खुपच इम्प्रेस झालो आणि एवढ्या दिवसाचा कंटाळा मोडून हा लेख लिहावासा वाटला…
     अत्रेंच्या नावावर खपवलेले बरेचसे अश्लिल विनोद मी सुदधा एकले आहेत…आणी हो बरयाच नव्या थीम आणल्यात त्यांनी,बदल म्हणुन बरया वाटतात…

 3. पिंगबॅक Tweets that mention आचार्य… « दवबिंदू -- Topsy.com

  • अत्र्यांच व्यक्तीमत्वच इतक भव्य आहे कि त्यांच्याबद्दल लिहतांना काय लिहु आणि काय नको करत लिहला हा लेख…
   असो दवबिंदुवर आपले स्वागत आणि वेळ काढुन प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार…

 4. एक माणूस एवढा सगळा असू शकतो?….हा प्रश्न मलाही ” मी कसा झालो ? ” वाचल्यावर पडला होता…. खरच अत्रे म्हणजे ग्रेट व्यक्तिमत्व…….

 5. Chhaan lihilays mitra… Acharya Atre saarkhe vyaktimatva varnan karnyasaathi shabdkosh apura padu shakto.. Mala aata h pustak vaachavese vaatatey!!!

  • स्वप्निल दवबिंदुवर स्वागत…आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद ….नक्की वाच रे छान आहे…बाकी अत्रेंच्या व्यक्तीमत्वाबद्दल काही वाद नाही…

टिप्पण्या बंद आहेत.