सोनियाचा दिनु…


खरतर मेळाव्यावर बरेच लोक पोस्ट टाकणार असल्याने पोस्ट टाकणार न्वहतो.पण गंभीर उचक्या-भूकंपात सापडलेल्या बादशाहे कंस वटवट सत्यवानच्या इच्छेखातर कं झटकुन पोस्ट लिहायला घेतली. तर खुप दिवसापासुन ज्या दिवसाचे वेध लागले होते,ज्या दिवसाची मी चातकाप्रमाणे वाट पाहत होतो तो कालचा दिवस, म्हणजेच आपला मुंबईतला मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावाच्या दिवस एकदाचा येउन गेला.म्हणजे नुसता येउन गेला नाही कितीतरी आनंद देउन गेला,त्याबद्दल लिहतोच पुढे.तर  पुण्याला झालेल्या मेळाव्याला ऐनवेळी काही अडचणींमुळे जाता आल नाही त्यामुळे एक हुरहुर लागली होतीच मनाला आणि ज्यांचे ब्लॉग्स नेहमी वाचत असतो त्यांना प्रत्यक्ष भेटायची इच्छा मनात होतीच  त्यात महेंद्रजींनी इथल्या ब्लॉगर्संना आल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून सक्त ताकीद दिली होती.मग काय आधीच आजच्या दिवसाची रजा टाकली होती. (रविवार असला तरी शिफ़्ट्स मध्ये काम करत असल्याने सुट्टी न्वहती मला) त्यात कालच शाळेतील मित्राचा फ़ोन आला की उद्या सकाळी शाळेत गेट-टुगेदर आहे .शाळेतुन बाहेर पडुन तब्बल दहा वर्षे झाली होती त्यमुळे तिथे जाणही भाग होत.

माझी शाळा...

तर काल सकाळी सोनियाचा दिनु उजाडल्यावर  १० वाजता शाळेत (रा.हि.सावे विद्यालय,तारापुर) गेलो.(कॉल्नीतल्या मुलांबरोबर नदिवर जायचा प्लॅन ड्रॉप करुन 😦  )शाळेत बरेच बदल झाले होते.शाळेतील एकेक आठवणींना उजाळा देत आम्ही सगळीकडे फ़िरलो.एकेक शिक्षकांची नकलांसह आठवण काढली.बरयाच जुन्या प्रसंगांची आठवण येउन हसलो खिदळलो.सुट्टी असुन सुदधा शाळेचे मुख्याधापक डॉ.नरेश सावे शाळेत आलेले होते.ते स्वत:हुन आमच्याकडे आले,थोडावेळ आमच्याशी बोलले.खुप बर वाटल त्यांना भेटुन.आम्हाला दहावीला इंग्रजी विषय शिकवायला होते ते.शाळेत मनसोक्त बागडल्यावर सगळ्यांनी डहाणुला बीचवर जायची योजना आखली पण मेळाव्यासाठी मी तो कार्यक्रम अर्धवट टाकुन सगळ्यांचा निरोप घेतला.खरतर ते सोडत न्वहते मग त्यांना मेळाव्यासाठी जायच आहे अस सांगीतल्यावर मला त्यांनी कसला ब्लॉगर्स मेळावा,खर सांग वधु-वर मेळाव्याला चालला आहेस ना, महिती आहे आम्हाला, तिथे कशाला जातोस, इथे शोधु ना अस चिडवत चिडवत एकदाच सोडल.

बोइसर स्थानकात पोहोचल्यावर पाहतो तर काय टिकिटांसाठी भली मोठी रांग.माझा ४ था क्रमांक आलेला असतांनाच ट्रेन आली.माझ टिकट हातात येइपर्यंत ट्रेन चालु झाली होती पण हया मेळाव्याला हा देव मुकणे त्या वरच्या देवाला मंजुर न्वहते.मी धावत पळत कशी गाडी पकडली ते मलाच कळले नाही.प्रवासात मजल-दरमजल करत घामाने चिकट झालेला चेहरा आणि अस्ताव्यस्त केस (मोठे असल्याने) घेउन  ०५:१० दासावाला पोहोचलो. गेल्या गेल्या सर्वप्रथम काय वाटेल ते वाल्या महेंद्रजींशी हस्तालोंदन केल. (ज्यांच्यामुळे मी हया ब्लॉगविश्वात पाउल ठेवल) त्यांनी मला आल्याची नोंदणी करुन घ्यायला सांगीतली.तिथे आपल्या ब्लॉगजगतातील खादाडी सेनापती कम इतिहासकार रोहन चौधरी आणि  उधाण वार्याच मन असलेला सुहास हयांच्याशी भेट झाली.तिथे माझा क्रमांक सांगुन माझ्या नावाची पट्टी छातीवर लावली.(मला वाटते हया पट्टीवर नावाबरोबरच ब्लॉगच नाव लिहायला हव होत कारण मी बरयाच लोकांना ब्लॉगच नाव कळल्यावर ओळखल)असो मग खास हैदराबादहुन आलेला ’सिनेमा कॅनव्हास ’ वाला आणि माझ्या पोस्टसना अगदि आवर्जुन प्रतिक्रिया देणारा आनंद पत्रे याची भेट झाली.

सर्वात छोट्य़ा ब्लॉगर आर्यनला बक्षीस...

आनंदशी काही वेळ गप्पा मारल्यावर माझीया मनावाली माझ्या शुदधलेखनातील चुका ब्लॉगवर जाहिर न करता मला  मेसेजमध्ये  कळवणारी अपर्णा ( ताई नको बोलुस…अस खडसावलय कालच आणि अजुन ती भारतातच आहे ना ..म्हणुन एकेरी नाव…ती तिथ परतल्यावर बघु काय करायच ते…  🙂  ) भेटली.तिच्याशी थोड बोलण झाल्यावर सुमारे ०५:३० ला कार्यक्रमाला सुरुवात झाली.मोगरा फ़ुललावाल्या कांचन ताइने अगदि फ़ुललेल्या सुहास्यवदनाने स्वागतपर प्रास्ताविक सांगीतल. त्या हॉलसाठी व अल्पोपहारासाठी लागलेला निधी कोणीतरी नाव न सांगण्याच्या अटीसह स्पॉन्सर केला आहे अस कांचन ताइकडुन कळल.इथे लोक काहीही न करता आपल नाव पुढे कस येइल हयाचा विचार करत असतात आणि हयांनी नाव न सांगण्याच्या अटीसह कार्यक्रम स्पॉन्सर केला..सलाम बॉस.. दरम्यान माझी सचिन ,सागर,आनंद काळे आणि  मुंबईकर हया नव्या मित्रांशी ओळख झाली.

प्रास्ताविक संपल्यावर दुसरया सत्राची सुरुवात कांचन ताईनेच मोगरा फ़ुलला बद्दल ओळख करुन दिली तसेच ब्लॉगींगसंदर्भात माहिती देणारी ’ब्लॉगवाले’ हया नव्या ब्लॉगची घोषणा ही केली आणि त्याबरोबरच अल्पोपहार (मस्त बटाटेवडे,कटलेट,चहा आणि कॉफ़ी) देण्यास सुरुवात झाली.त्यानंतर  एकेक ब्लॉगर आपली ओळख करुन देउ लागला.सर्वात छोट्या आर्यन सह अगदि साठी पार केलेले लोक मेळाव्याला हजर होते.विलेपार्ले येथील सोबती हया ज्येष्ठ नागरिकंसाठी असलेल्या संघटनेच्या बरयाच सदस्यांनी  जातीने हजर राहुन कर्यक्रमाची शोभा वाढवली होती.छॊट्या आर्यनच्या ओळखीच्या वेळी महेंद्रजींनी त्याला एक मोठी कॅडबरी बक्षीस म्हणुन दिली.( हयासाठीच मी कधी कधी म्हणत असतो लहानपण देगा देवा …   : )  )  हे सत्र चालु असतांनाच नेटभेटवाल्या सलील चौधरी आणि प्रणव जोशी हयांची भेट झाली.दोघेही खुपच दिलखुलास आणि अगदि हसमुख आहेत.त्यांच्याशी बराच वेळ बोलण झाल्यावर छोट्या आर्यनची आणि सोनालीताईची भेट घेतली.जेवढा फ़ोटोत दिसत होता त्याहुनही कितीतरी गोड दिसतो हा आर्यन प्रत्यक्षात.तब्बल ३२ ब्लॉग लिहणार्या लीना मेहंदळे हयांनी ओळखीबरोबरच ब्लॉगींगसाठी  टंकलेखन करण्यासंदर्भात माहिती पुरवली.’उनके दुश्मन है बहुत आदमी अच्छा होगा ’ अस ब्लॉगच नाव असलेल्या हरेकॄष्णाजींच दर्शन घडल.त्यांचा ब्लॉग जरी मी नियमीत वाचत नसलो तरी ते नाव  पाहिल्यावर खुप स्ट्राईक झाल होत मला. त्यानंतर भेटलेल्या आल्हाद महाबळ हयाला पाहुन मला खरच धक्का बसला.मुर्ती लहान पण किर्ती महान असा विचार पण पटकन मनात चमकुन गेला.आल्हादक प्रतिबिंबवरील लेख वाचल्यास तुमच्या लक्षात येइल मला काय म्हणायचे आहे ते.

खादाडी सेना....

मग माझी मराठी वाल्या श्रेया रत्नपारखी व स्टार माझा स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलेली निरजा पटवर्धन हयांनी स्टेजवर आपली ओळख करुन दिली. पुढे शंतनु ओक यांनी मराठी शुदधलेखनासाठी असलेल्या फायरफॉक्स प्लगीनसंदर्भात माहिती दिली.’मैथीली थिंक्स ’ वाल्या मैथीलीने ओळख करुन देतांना ब्लॉगच नाव मैथीली थिंक्स असल तरी मी विचार करत नाही अशी जाहिर कबुली दिली.(खरतर हिला मी तिथे ओळखलच नाही,तशी प्रतिक्रियाही टाकली आहे तिच्या ब्लॉगवर) शेवटी जवळपास सगळ्यांची ओळख झाल्यावर मी जाउन कशीतरी  🙂  माझीही ओळख करुन दिली.माझी ओळख करुन परततांना पुढे बसलेल्या (सुरुवातीपासुन संपुर्ण सभागॄहाचा व्हयु घेत मागेच उभा किंवा बसलेलो होतो मी)माझ्या मनावाल्या रविंद्रजींनी जवळ बोलवले व अगदि आपुलकिने माझी चौकशी केली.त्यांनीच त्यांच्या डाव्या बाजुला बसलेल्या देवकाकांशी माझ्या दोन्ही बाजुला देव बसले आहेत (अर्थातच उजव्या बाजुला मी होतो) अस म्हणत ओळख करुन दिली.त्यानंतर दुनियादारीचे गजानन साळी व लेखांकन चा प्रथमेश शिरसाट हयांच्याशी ओळख झाली.ओळख सत्र सुरु असतांना सगळीकडील व्यवस्था चोख पाहत असतानाच आयोजक रोहन चौधरी हा वड्याची चव तर बिघडली  नाहिये ना हे सुदधा वारंवार अगदि आवर्जुन  🙂  तपासत होता.  ओळख सत्र संपल्यावर सलील चौधरी यांनी लकीड्रॉ मार्फ़त तीन भाग्यवान विजेत्यांना पुस्तके बक्षीस म्हणुन दिली.योगायोग असा की त्यातील एकांचा (माफ़ करा,नाव आठवत नाहिये)  काल वाढदिवसही होता.

राजाशिवाजी.कॉम चे सर्वेसर्वा मिलींद वेर्लेकर...

त्यानंतर शिवाजींचा समग्र इतिहास अगदि लाखो छायाचित्रांसह एकाच ठिकाणी सादर करण्याचा ध्यास घेतलेले राजाशिवाजी.कॉम चे सर्वेसर्वा मिलींद वेर्लेकर हयांनी राजाशिवाजी.कॉम बद्दल बरीच माहिती पुरवली.मग ब्लॉगसंबधी असलेल्या शंका प्रश्न हयांवर चर्चा झाली.त्यामध्ये प्रामुख्याने मराठी टंकलेखनातील अडचणी तसेच ,ब्लॉगवर छायाचित्रे प्रसिदध करण्यासंदर्भातील कॉपीराईट ऍक्ट  अश्या काही मुददयांवर चर्चा करण्यात आली.स्टार माझावाल्या प्रसन्न जोशी हयांनी दिखाव्याच्या मराठीप्रेमासंदर्भात अगदि परखड शब्दात त्यांची मते मांडली.हया दरम्यानच महेंद्रजींनी मला बोलावुन ज्यो(ती)शी ( अडीज वर्षापुर्वी ऑरकुट वर ’कुठेतरी छानसे वाचलेले’ हया कम्युनीटीत महेंद्रजींशी आणि हिच्याशी एकदाच ओळख झाली होती…आम्ही तिथे तिला ज्यो च म्हणायचो म्हणुन ’ती ’ कंसात) ओळख करुन दिली.मग महेंद्रजीं आणि ज्यो हयांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच कांचनताईने कार्यक्रम औपचारिक रीत्या संपन्न झाल्याच जाहिर केल.मग यथावकाश छायाचित्रांचा कार्यक्रम पार पडला तेव्हाच साता समुद्रापलीकडे असलेल्या सर्वांच्या लाडक्या वट्वट सत्यवानाचा फ़ोन आला सागरने फ़ोन सरळ माइकसमोर धरुन त्याच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवल्य.त्यानंतर एकमेकांचा निरोप घेत आम्ही सगळे ब्लॉगर परतीच्या वाटेला लागलो…..

एकुणच मुंबईमधील पहिला्वहिला मराठी ब्लॉगर्सचा स्नेह मेळावा दादर पश्चीमेला दासावामध्ये यथासांग पार पडला. मेळाव्याच छान आयोजन केल होत महेंद्रजी,रोहन आणि कांचनताईने आणि सुहास,सचिन,भारत हयांचीही तेवढीच तोलामोलाची साथ त्यांना लाभली होती.हया सर्वांचे अगदि मनापासुन आभार…कारण हयांच्यामुळेच इतक्या ब्लॉगर्संना एकाच ठिकाणी भेटण्याचा कालचा सोनियाचा दिन मला पाहावयाला मिळाला …

(हेरंब,तन्वीताई,श्री ताई ,अनुजाताई तुम्हाला खुप मिस केल मी हया कार्यक्रमात…)

*एक सांगायच राहिल होत वरील छायाचित्रांसाठी सुहास झेले हयाचे मन:पुर्वक आभार..

Advertisements

51 thoughts on “सोनियाचा दिनु…

 1. जब्बरदस्त वर्णन बॉस.. दिल खुश झाला एकदम. छानच लिहिलं आहेस एकदम.. नेहमीप्रमाणेच.. मस्त अगदी डीटेलात.

  मी मेळाव्याला तनाने नाही पण मनाने नक्कीच हजर होतो असं माझ्या ब्लॉगवर लिहिलंय पण तू केलेलं एवढं मस्त वर्णन वाचून खरोखर तनाने पण हजर असल्यासारखं वाटलं.

  मी पण जाम मिस केलं यार तुम्हाला सगळ्यांना 😦 .. But don’t worry. There is always a ‘Next Time’ .. पुढच्या मेळाव्याला नक्कीच भेटू. 🙂

  • खर सांगतो केवळ तुझ्या आग्रहामुळेच लिहली ही पोस्ट…म्हणुन अर्ध क्रेडीट तुला.. 🙂
   पुढच्या वेळी नसलास तर…” समझ ले ना मुझसे बुरा कोइ भी नही होगा..” 🙂

 2. अरे हो एक राहिलंच.

  >> खर सांग वधु-वर मेळाव्याला चालला आहेस ना, महिती आहे आम्हाला, तिथे कशाला जातोस, इथे शोधु ना अस चिडवत चिडवत एकदाच सोडल

  सहमत…. !! शाळेचा मेळावा आणि ब्लॉगर्स मेळावा या दोघांच्यामध्ये धावत पळत तू कुठेतरी (*’कुठल्यातरी’* मेळाव्यात) जाऊन आलास अशी बातमी आम्हाला मिळाली आहे काय ते खरं सांगून टाक आता 😉

  • हरेकॄष्णाजी, दवबिंदुवर स्वागत आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार…
   ते अनमोल क्षण माझ्यातरी नेहमीच लक्षात राहणार आहेत.

 3. देवेंद्र,सर्वप्रथम तू इतक्या तत्परतेने ब्लॉगर्स मेळाव्याचा समग्र वृत्तांत टाकलास. खूप खूप थांकू.कार्यक्रम छान झाला हे तुझ्या शब्दातून पोचलेच आहे. फोटो मस्त. मीही अतिशय मिस केला रे हा सोहळा. 😦 नेक्स्ट टाईम. पुन्हा एकदा धन्सं.

  • तत्परतेने वॄत्तांत टाकला नही तर रात्री सत्यवानाने वटवट करुन टाकायला लावला.नाहीतर आळस आणि कं ने सध्या इतक ग्रासल आहे कि सांगु नकोस..त्यामुळे जवळपास १५ दिवस ब्लॉगविश्वापासुन दुरही झालो होतो…काल खरच खुप चांगल वाटल इतक्या ब्लॉगर्सना प्रत्यक्ष भेटुन…पुढच्या वेळी सर्वांना हजर होता येइल असा काहितरी मुहुर्त पाहायला हवा..

 4. अरे एकदम मस्त लिवल आहेस देवेंद्र.

  बाकी काळ शाळेच पण गेट – दुगेदर होता म्हण्त्यावर बेस्ट. काल खरच सोनियाचा दुनु होता.

  • सचिन, दवबिंदुवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार…
   हो ना म्हणुनच तर मुबंई ब्लॉगर्स स्नेहमेळावा अस नाव न देतांना हे नाव दिल शाळेतले बरेच जण तसे भेटत असले तरी ३-४ जणांना तरी दहा वर्षांनी भेटलो काल.असो कालचा तुझा उत्साहही वाखाखण्याजोगा होता…

 5. खूपच सुंदर आणि सविस्तर लिहिले आहेस…त्यामुळे खरंच जे येऊ शकले नाहीत त्यांच्यासमोर तू अख्खा समारंभ उभा केला आहेस. शाबास…देवेंद्रा….शेवटी देवांचा राजाच आहेस न तू.!

  • देवकाका आपल दवबिंदुवर स्वागत आणि आपल्या इतक्या चांगल्या प्रतिक्रियेबद्दल आभार….
   नको हो नावापुरतीच देवेंद्र ठिक…देवांवरील मालिकांत इंद्राची हालत बघवत नाही मला… 🙂

 6. देवेंद्र… मस्त लिहीलय…
  ब्लॉग तर मस्त आहेच तुझा… पर्सनालिटी पण मस्त…

 7. मस्त वर्णन.

  मला मुंबईवरून यायची इच्छा होती, पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ नाही शकलो. पण आपले वर्णन वाचून छान वाटले.

  • निरंजनजी, माझ्या नजरेतुन कार्यक्रम मांडायचा प्रयत्न केला आहे, आपल्याला हे वर्णन छान वाटले हे वाचुन आनंद झाला…आणि मला तु म्हणुन संबोधल्यास जास्त चांगले वाटेल…पुढच्या वेळी जरुर या.

 8. “त्यानंतर भेटलेल्या आल्हाद महाबळ हयाला पाहुन मला खरच धक्का बसला.मुर्ती लहान पण किर्ती महान असा विचार पण पटकन मनात चमकुन गेला.आल्हादक प्रतिबिंबवरील लेख वाचल्यास तुमच्या लक्षात येइल मला काय म्हणायचे आहे ते.”

  धन्यवाद…

  आपणा सर्वांनाच भेटून आनंद झाला.

  कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर असे संयोजन केल्याबद्दल आभार व अभिनंदन.

 9. मस्त मिहिले आहे. स्वत: हजर नसलो तरी वाचून हजर असल्यासारखेच वाटत आहे.

  • सीतारामजी आपले दवबिंदुवर स्वागत…आपल्याला हे वर्णन आवडले हे वाचुन आनंद झाला..आवर्जुन प्रतिक्रिया दिल्या बद्दल आभार…

 10. खरच खूप छान वृतांत मांडला आहे तुम्ही. आपणही तिथे असायला हवे होते असे वाटते आहे.

  • जिवनिका,प्रतिक्रियेबद्दल आभार…पुढचा मेळावा नको चुकवुस..काल रविंद्रजींशी बोलतांना तुझा आणि काकुंचा उल्लैख झाला होता…बाकी मला तु म्हंटलेल जास्त आवडेल…

  • खरंच खूप छान लिहिलंय. मी थोडा बिझी आहे, त्यामुळे पोस्ट लिहू शकलो नाही, पण तू मात्र सगळं छान कव्हर केलंय.
   आजच टिव्हीवर पण बातमी आली सह्याद्री वर दुपारी अडिचच्या बातम्यात. आता बहुतेक ५ वाजता रिपीट होईल.

   • आपल्या परीने प्रयत्न केला आहे ते सुदधा रात्री हेरंब चॅटींग करतांना म्हणाला पोस्ट टाकच म्हणुन…बरेच लोक हयावर पोस्ट टाकणार असल्याने पोस्ट टाकणार न्वहतो तस सांगीतल होत हेरंबला पण तो म्हणाला मला सर्वांच्या नजरेतुन अनुभवायचा आहे हा मेळावा..पोस्ट टाकायची नसल्याने फ़ोटो काढले न्वहते मग सुहासच्या अल्बममधुन फ़ोटो घेउन टाकली ही पोस्ट…. तरी बरयाच लोकांना आवडल वर्णन हे वाचुन कालचा आनंद द्विगुणीत झाला…खरच आपले खुप खुप आभार हा मेळावा आयोजीत केल्याबद्दल…मी घरीच आहे आज, आधी माहिती असत तर पाहिल असत तरी ठिक आहे आता सांगीतलत ते ५ वाजता बघतो….

  • दवबिंदुवर आपले स्वागत…माझ्या नजरेतुन वॄत्तांत लिहला आहे, आपल्याला तो आवडला हे वाचुन आनंद झाला…आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार…

  • हो ना खुपच… : ) पण खरच काल तिथे रेकगनाइज नाही करु शकलो मी तुला …नाहीतर तुझा ब्लॉग बरयाच वेळा वाचुन कधीतरी प्रतिक्रियाही दिली आहे मी…असो दवबिंदुवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार…

  • पंकज प्रतिक्रियेबद्दल आभार … मी सुदधा असाच मुकलो होतो पुण्यातील सोहळ्याला ..त्यामुळे तुझी परिस्थीती समजु शकतो..पुढच्या वेळी होणारया मेळाव्यात तुम्हा पुण्यातील ब्लॉगर्सना भेटायच आहे लवकर मुहुर्त जुळवुन काढा…

 11. मला वाटतं सर्वात सविस्तर वृत्तांत हाच असेल.

  कार्यक्रमाचा आँखो देखा हाल वाचायला मिळाला.

  -विवेक

  • हा तर मी अनुभवलेला मेळाव्याचा वॄत्तांत आहे..बाकी कांचन ताई आणि महेंद्रजींकडुन सविस्तर वॄत्तांत विविध छायाचित्र आणि विडिओ क्लिप्ससह येइल अशी आशा बाळगुन आहे…असो दवबिंदुवर आपल स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार…

 12. खूप छान लिहिलंय….. कालचा अनुभव पुन्हा एकदा मिळाला….

  • असच खरडल जे अनुभवल ते….बाकी काल तुला प्रत्यक्ष भेटुन आणि तुझ्याशी मनसोक्त गप्पा मारुन खुप आनंद झाला..

 13. पिंगबॅक Tweets that mention सोनियाचा दिनु… « दवबिंदु -- Topsy.com

 14. देव अरे मी कालच कमेंटले होते…कुठे हरवली माझी कमेंट 😦

  असो झकास वर्णन केलेस… आता मात्र आले की नक्की भेटणार सगळ्यांना 🙂

  • तन्वीताई,जे अनुभवल ते खरडल ग… आणि काल नाही आली ग तुझी कमेंट.मी तर वाटच बघत होतो कमेंटची.मला वाटते एवढ्या प्रतिक्रिय एकाच दिवसात झेपल्या नसतील माझ्या ब्लॉगला..
   बाकी पुढच्या वेळी अगदि नक्की भेटुयात….

 15. पिंगबॅक मराठी ब्लॉगर मेळावा: सर्व वृत्तांत एके ठिकाणी « रमलखुणा

 16. पिंगबॅक मराठी ब्लॉगर मेळावा: सर्व वृत्तांत एके ठिकाणी « रमलखुणा

 17. धन्यवाद देवेन्द्रा.. खुप मजा आली काल… ब्लॉगवर पोस्ट वाढवायच्या आहेत, हे लक्षात आहे ना ? 😉

  • दवबिंदुवर स्वागत आणि अभिप्रायाबद्दल आभार….आतापर्यंत दोनच मेळावे झाले आहेत ब्लॉगर्सचे…बर्याच ब्लॉगवर हयाची विजेटस लागलेली असतात..३-४ ब्लॉगवर हया संबधीच्या डीटेल पोस्ट येतात….

 18. मला आठवत असलेलं सर्वच लिहिलंस हे बरं केलंस म्हणजे मला पुन्हा चोथा करायला नको…:)
  ते तू केस कापतोस का हे तिथे विचारायचं राहून गेलं होतं बघ…(आणि तेही वैशाख वणव्यात तरी)

  • अपर्णा ता… अग आता वाटल वाढवायचे म्हणुन वाढवले.एकदा विचार पक्का केल्यावर हया वैशाखवणव्याला भितो कि काय मी.. 🙂

टिप्पण्या बंद आहेत.