सा रे ग म प…


तारिक...यादो कि बारात

लहानपणापासुनच अगदि मनापासुन मी प्रेम केल ती गोष्ट म्हणजे संगीत.तानसेन नाही पण अगदि जातीचा कानसेन आहे मी लहानपणापासुन म्हणजे अगदि शास्त्रीय संगीत वैगेरे एकत नसलो तरी बरयाच क्लासिकल गाण्यांचा मनसोक्त आस्वाद घेतो.ती एकुन मला आनंद मिळतो ना अजुन काय हवे.तस हे वेड मला लागल ते आमच्या काकाश्रींकडुन, ते संगीताचे चांगलेच चाहते आहेत.त्यावेळी आमच्या घरात डेक त्यांनीच आणला होता .बरोबर किशोर,रफ़ी, लता,आशा हयांसारख्या अवलियांच्या सदाबहार गाण्यांच्या विविध कॅसेटही त्यांनी आणल्या होत्या.तेव्हा एवढ्या वेळा ती गाणी एकायचो की सांगुच नका.त्यामुळेच आताही जुनी गाणी खुप दिवसांनी कधीही एकली तरी मला पुढच्या ओळी आपोआप आठवतात.माझा जमवलेला पॉकेटमनीही मी नव्या नव्या कॅसेट आणण्यामध्ये घालवायचो, तशी हया उपक्रमात नशिबाने  आमच्या ज्येष्ठ बंधुचीही तेवढीच साथ लाभायची.तेव्हा पॉकेटमनी म्हणुन ५०पैसे,रुपया-दोन रुपये असे मिळायचे ते ही नियमीत नाही, तसाच कोणी चांगला पाहुणा आला तर सरळ पाच-दहा रुपये  एकदाच मिळुन जायचे.हया मधुन जमणारा आणि काही ठिकाणांहुन वाचवलेले पैसे मी स्वत:चे इतर बालहट्ट न पुरवता त्यावेळी मिळणारया २५-३० रुपयाच्या कॅसेट (सीडी,डीवीडी,एमपी३ न्वहत्या तेव्हा) खरेदी करण्यात घालवायचो .हयातच माझ संगीतप्रेम सामावल आहे आणि संगीत क्षेत्रातील हे माझ मोठ योगदान आहे अस मला वाटते. 🙂

चित्रगीत,छायागीत,मेट्रोवर येणारा ’ सुपरहीट मुकाबला ’ अश्या त्यावेळच्या गाण्यांच्या मालिकां मी नेहमीच अगदि न चुकता पाहायचो.रविवारच्या सकाळच्या सगळ्या विधी हया  ब्लॅक ऍंड व्हाईट टीवीवरील कलरफ़ुल  ’रंगोली ’ च्या साक्षीनेच व्हायच्या.असो दुरदर्शनचा विषय निघालाच आहे तर कोणाला आठवते का मध्येच दुरदर्शनचे सिग्नल गेल्यावर स्क्रीनवर लिहुन येणार ते ’ रुकावट के लिये खेद है ’ किंवा मग कधी डीडी खराब दिसु लागल्यास घरावर चढुन तो भला मोठा ऍटेना खाली एकाला टीवी समोर उभ करुन ’ आता येत आहे का क्लीअर ’( हो क्लीअरच ..अगदि जुन्या काळापासुन मराठलेलाच शब्द आहे तो ) अस म्हणत इथे तिथे फ़िरवायचा प्रसंग.ते दिवसच वेगळे होते.

मागे  माझ्या फ़ॉर माय आइज़ ऑन्ली… पोस्टमध्ये माझ्या गिटार प्रेमाची ओळख करुन दिली होतीच मी.तर तेव्हापासुन मध्येच कधीतरी गिटार हातात घेउन टुंग टुंग करायचो.बरीच शोधाशोध केली गिटार शिकवणारयाची पण आमच्या इथे जवळपास काहीच हाती लागल नाही,विरारला दोन जणांशी संपर्क केला.पण ते नाजुक गिटार घेउन ट्रेनने विरारला जायची हिम्मत नाही झाली. (शिवाय कं चा प्रभावही होताच 🙂 )  अस असतांना हया महिन्याच्या सुरुवातीलाच आमच्याइकडच्या रोजन नावाच्या  एका  गिटारीस्टचा पत्ता लागला.लागलीच त्याची भेट घेतली.रोजन म्हणजे एक साधारण पस्तीशीतील एक ख्रीश्चन गॄहस्थ.हे सगळे गिटारीस्ट ख्रीश्चनच असतात का असा प्रश्नही मला तेव्हा पडला होता. कारण वर मी ज्या दोघांचा उल्लैख केला तेही ख्रीश्चनच होते.डीआयडी मध्येही पाहाल तर दोन परीक्षक रेमो आणि टेरेंस हे ख्रीश्चनच.इतरही अनेक ठिकाणी हीच कहाणी.मला तरी वाटते आपल्या मराठी माणसांच्या घरी नृत्य,संगीत किंवा इतर कला हया गोष्टींकडे केवळ टाइमपास किंवा छंद म्हणुनच पाहिल जाते.जरी एखाद्या कलेची खुप आवड असली तरी एक करीअर म्हणुन त्या क्षेत्राकडे कधीच पाहिले जात नाही.

असो तर जेव्हा ही रोजनबद्दल माहिती मिळाल्यावर मी त्याला भेटायलो गेलो तेव्हा मला कळल हा भलताच शिस्तप्रिय आणि रोखठोक माणुस आहे ते.त्याने पहिल्याच भेटीत अगदि सुरुवातीलाच मला ” जर अगदि मनापासुन इच्छा असेल, ’पॅशन ’ असेल आणि त्यासाठी मेहनत करायची तयारी असेल तरच शिकायला ये” अशी सक्त ताकीद दिली.सगळ बोलण झाल्यावर मी येतो अस सांगीतल्यावरही तो म्हणाला बघ परत एकदा विचार कर घरी गेल्यावर आणि नसेल येणार तर फ़ोनवर कळव.खरतर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्याकडे बरेच लोक येतात शिकायला आणि दोन-तीन क्लास मध्ये गाशा गुंडाळतात आणि तेच त्याला आवडत नाही. शिवाय आमच्या भागात इतर कोणी शिकवणार नसल्याने तो ही विधान इतक्या बिनधास्तपणे करु शकतो.(  🙂  )तर त्यानंतर आठवड्याला एक याप्रमाणे दोन क्लास झाले आहेत माझे आणि अजुन तरी गाडी रुळावर आहे.ओपन स्ट्रींग,फ़र्स्ट आणि सेकंड स्ट्रींगवर सध्या सराव सुरु आहे.

माझी संगीतवही...

लहानपणापासुन कितीतरी वेळा मी स्वप्नात स्वत:ला गिटार वाजवतांना पहिल आहे.तस मागे राजस्थानला ट्रेनिंगसाठी गेलो असतांना तेथील एकाकडुन थोडफ़ार माउथ ऑर्गन शिकुन घेतल.बरीच गाणीही वाजवली त्यावर पण गिटारवर गाणी वाजवायची भुक तशीच राहिली होती.बाकी गिटार म्हटल्यावर एक नट आठवतो तो म्हणजे तारिक(आमिर खानचा चुलत भाउ लागतो हा,पोस्टच्या सुरुवातीलाच छायाचित्र आहे त्याच ). हयाला मी गिटारशिवाय पाहिलच नाही. ’यादो कि बारात ’ आणि ’ हम किसिसे कम नही ’ हे दोनच सिनेमे पाहिलेत हयाचे दुसरे आहेत का ते माहिति नाही.हया दोन्ही चित्रपटातील मोजुन सगळीच गाणी मला आवडतात.कर्णाला ज्याप्रमाणे जन्मत:च कवच-कुंडले मिळाली होती तस तारिकला गिटार मिळाल्यासारख वाटायच सिनेमा पाहुन.काही असो तारिकला शोभायचे ते गिटार.बाकी कोणाला ते शोभले असेल तर शम्मी आणि ऋषी हया कपुरांना.हया दोघांच्या पाउलावर पाउल ठेवत रणबीरही इम्तीआज अलीच्या पुढील सिनेमासाठी गिटारचे धडे गिरवत असल्याचे एकिवात आहे.


असो तर आता संगीतातील विविध चिन्हांची  ओळख व्हायला लागली आहे.बरयाच म्युज़िक नोटेशनही वाचायला शिकत आहे.त्याबद्दल एक पोस्ट टाकेन नंतर कधीतरी.बाकी माझा हा उत्साह असाच टिकुन रहावा हयासाठी तुमच्या शुभेच्छा हव्यात मला.कारण माझे मन अगदि उधाण वार्याचे म्हणजेच अतिशय चंचल असल्याने माझ्यात धरसोड वॄत्ती अगदि ठासुन भरली आहे.बाकी सकाळपासुन बझ जिथे मी सध्याच खर्या अर्थाने पदार्पण केल आहे तिथे जात व इतर सर्व विधी उरकत सुचेल तशी ही पोस्ट खरडली आहे म्हणुन जे काही लिवल आहे ते ग्वाड मानुन घ्या हि विनंती.असो सगळ अस सुरळीत चालल तर लवकरच एखाद गाण वाजवुन विडियोसह त्याची पोस्ट इथे टाकायचा मानस आहे.बाकी मी जर गिटार आधीच वाजवायला शिकलो असतो तर खालील माझ एक आवडत  गाण अधिक ’फ़िलिंग’ सह एकता आल असत मला..

पुरानी जीन्स और गिटार,

मोहल्ले की वो छत और मेरे यार

वो रातों को जागना…

Advertisements

39 thoughts on “सा रे ग म प…

 1. पिंगबॅक Tweets that mention सा रे ग म प… « दवबिंदु -- Topsy.com

  • मस्त पोस्ट झालीय…एकदम डायरेक्ट दिल से…
   तुला शुभेच्छा, गिटारीसाठी (गटारी नाही..;) )

   • विद्याधर,तुमचे दवबिंदुवर स्वागत…हो एकदम डायरेक्ट दिल से… ; )
    गटारीला वेळ आहे अजुन तोवर गिटारीच करतो…प्रतिक्रियेबद्दल आभार..

 2. arey mee hee vajvayacho college madhe guitar. Ata malyavar padali ahe. Ekda stage var hee vajavli hoti.

  Maja yete. Enjoy..keep up..

  • माझपण स्वप्न आहे एकदा तरी स्टेजवर जाउन वाजवायची…बघु काय होते ते…मजा तर खुप येते..प्रतिक्रियेबद्दल आभार

  • हो ना तेव्हा ब्लॅक ऍंड व्हाईट टीवीच होता आमच्याकडे पण रंगोलीत असे रंग भरलेले असायचे कि….
   असच हो मनातील एक सुप्त इच्छा म्हणुन…आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..

 3. गिटार म्हटली की तारिकच येतो डोळ्यासमोर…. 🙂 देवेंद्र, अनेक शुभेच्छा! पोस्ट मस्तच.

  • हो तुमची यासंदर्भातील एक पोस्ट वाचली होती मागे… कानसेन तर कानसेन, कानसेन नसतील तर नुसत्या तानसेनांना कोण विचारतय.. 🙂

 4. अरे वा गिटारिस्ट एकदम !! सहीच.. शुभेच्छा !! लवकरच तुझ्या गाण्यासकट व्हिडिओचि पोस्ट येउदेत !!

  >> त्याच्याकडे बरेच लोक येतात शिकायला आणि दोन-तीन क्लास मध्ये गाशा गुंडाळतात.

  हे माझ्या बाबतीत खरं आहे. मी असाच मोजून ३ क्लास मध्ये गिटार शिकणं सोडून दिलं. अवघड आहे, आपल्याला नाही जमणार असं करत. आणि नंतर synthesizer शिकलो.. पण आता तो ही विसरलो 😦 ..तू चिकाटीने जात रहा. सोडू नकोस मधेच 🙂

  • आता तर सुरुवात केली आहे..बघुया काय होत ते पुढे…बाकी तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा आहेतच…आणि अस विसरु नकोस रे मध्येच त्रास दे त्या synthesizer थोडा 🙂 (आदितेयने उसंत मिळु दिल्यावर )…

 5. संगीताची भाषा सगळ्यानाच कळते, लहान मुलापासून, मुकया प्राण्याना हे संगीत ठेका धरायला लावत.
  मी पण कानसेन..मध्ये गिटार शिकायच होत राहील, बघू कधी जमतय ते..

 6. वा! देवेन्द्र.

  ग्रेटच.

  तारिक, गिटार, आणि आरडी. अफलातून कॉम्बो. या वीकएन्डला ‘हम किसी से..’ बघितलाच पाहिजे. खूप दिवसांनी आठवण करून दिलीत. ‘आ दिल क्या’ आणि ‘मिल गया हम को’ च्या मधले गिटारचे पीसेस, आणि ‘क्या हुआ तेरा वादा!’ एकदम जुने दिवस आठवले.

  -विवेक.

  • अगदि खरया अर्थाने ’ म्युझीकल ’ असा चित्रपट आहे तो… तुम्ही उल्लैख केलेल्या गाण्यांबरोबरच ’ बचना ए हसिनो’ ’हमको तो यारा ते्री ’ ’ ए लडका हाये अल्लाह’ ही सगळीच गाणी लाजवाब… यंज्वाय…प्रतिक्रियेबद्दल आभार…

 7. शिक रे पटकन आणि तुझे (आणि बहूतेक अनेक जणांचे )आवडते गाणे तू वाजवत असणारा व्हिडिओ टाक बघू इथे!!! 🙂 तुला अनेक शुभेच्छा!!! 🙂

  बाकि ते कानसेन, कॅसेट जमवणे, चांगला पाहूणा याबाबत सेम पिंच!!!

  • आता तुमच्यासारख्यांच्या शुभेच्छा असल्यावर शिकेन लवकरच… कोणत गाण ग 🙂 …ह्म्म घरोघरी कॅसेटची गाणी (त्याकाळी)…

 8. Chotu ch mhan tu mala… aawadel mala… 🙂
  Aani aparadh, maafi vaigare kaay re…?? Kahihi…!!! Laajavu nakos ugich… 😉

 9. chintu singh chi guitar aikoon tyala ideal mana.ata halli milat nahi tyachi cassette.majhyakade juni ahe.ajoonahi car madhe lavato. aikayache ani fakt mantrmugdh vhayche.dreams come tru navacha album ahe tyacha.kya baat kya baat..

  Ani neele neele ambar pe he pahile gaane mhanoon shika. Majhe hee te pahile gaane. Tya ganyaane khoop anand dila. Majhi athvan kadhal. Ideal guitar song. You will learn a lot in that song.

  • चिंटु सिंग बद्दल माहिती न्वहती.आताच तुम्ही सांगीतल्यावर युट्युबवर शोधल आणि त्याचे काही विडियो सापडले सुपर्ब…सध्या तरी नुसत्या एक एक नोटसचा सराव चालु हे..गाण वाजवण्याच्या योग्यतेला गेलो की नीले नीले च ट्राय करेन आधी..तुमच्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल आभार..अश्याच इतरही टिप्स द्या सुरुवातीसाठी…आता नाही का वाजवत तुम्ही…

 10. chords shikoon accompanyment wale vajavane hech adhi shika. Te interesting ahe. Gane mhanat chord dharoon chhaan independent kahitari kele ase vatate. Notes vagaire theeek ahe pan lead guitar tumhi kahi pudhe vajavnaar nahi.

  Mee ka vaajavat nahi? Um..lagn,porebale nahit ka ajoon tumhala?

  Jhali ki kalel ka vaajvat nahi te.

  • ह्म्म ते मला घरीच कराव लागेल गाणी लावुन…तिथे तरी सध्या c d e f असच सगळ चालु आहे थोडस रटाळ…नाहि अजुन म्हणुन तर नेहमी अस काहितरी करत असतो..झाल्यावर इथेपण दिसेन कि ते माहित नाही…. 🙂

 11. chintoo singh chi ‘a step forward’ navachi tune kuthe milale tar bagha. Ani ‘dreams come true’ suddha.

  Guitar kuthali ahe? Givson,Yamaha?

  Twelve string guitar kadhitari chords sathi try kara. Jhankaarane vede vhaal.

  Classic guitarch ghya..motha box vali.

  Pakadnyachya soyisathi f cut guitar ghyaal pan mithaas nahi yet avajat.

  • लवकरच शोधतो …. Granada ची आहे (खरतर ती मध्येच गिटार शिकण सोडलेल्या मित्राची आहे पण गेल्या ४ महिन्यापासुन माझ्याकडेच पडलेले आहे आता काहितरी काम मिळाल आहे तिला)..चांगल वाजवता आल कि घेइन स्वत:ची…तुम्ही कुठे असता…मी नविन गिटार घेइन तेव्हा मला निवडायला मदत कराल ना …बाकी इतक आवर्जुन हे सगळ सांगीतल्याबद्दल आपलए आभार…

 12. Guitar gheli asel ter U tube ver lessons ahet!
  Kahi western base kalala ter sanga Mi apla SA RE GA MA wala;sagle a b c d wale te!!!
  wajavne kahi avaghad nahi pan western base ver compose karne manje to samajnech jara zeple nahi mala.
  Tya pesha mala raagdari sadhya bari watte.

  • मंदार, दवबिंदुवर स्वागत…माझ पण सध्या a,b,c,d च चालु आहे..बघुया मला किति झेपते ते…पाह्त असतो मध्येच ते लेसन्स पण पर्सनली कोणाकडुन शिकणे वेगळेच…आवरजुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार…

 13. पिंगबॅक दिवाना ‘तुझसा’ नही …. | दवबिंदु

 14. माझे ‘अहो’ खूप छान गिटार वाजवतात. रविवारी सकाळी/संध्याकाळी बहुतेकदा त्यांचा गिटारवर नवीन गाणी बसवणे हा प्रोग्राम असतो आणि हक्काचा श्रोता म्हणजे मी…. 🙂 पण त्यामुळेच आताशा कुठलंही गाणं ऎकताना त्यातल्या गिटार पीसकडे पहिल्यांदा लक्ष जाते…

  • हे अगदी खर आहे ग जेव्हा पासून गिटार थोडफार शिकलो तेव्हापासून एकत असलेल्या प्रत्येक गाण्यातल्या गिटार पीसकडे विशेष लक्ष जाते…
   सही होत असेल ग तुमची रविवारची मैफल …. आम्हाला अजून हक्काचा श्रोता सापडलेला नाही,नाहीतर आम्हीही नवी गाणी बसवली असती … 🙂

 15. पिंगबॅक इश्क मेरा , दर्द मेरा …. « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.