काही अश्या रीतीने…


आंतरजालावरुन साभार...

काही अश्या रीतीने
तुझ्या पापण्या
माझ्या पापण्यांशी मिळु दे
अश्रु तुझे सारे
माझ्या पापण्यांवर सजु दे….

तु प्रत्येक वेळी,प्रत्येक क्षणी
माझ्याबरोबरच राहिली आहेस
हा हे शरीर कधी दुर
तर कधी जवळ राहिल असेल
तुझ्या सगळ्या दु:खांना
आता तु माझा पत्ता दे…
काही अश्या रीतीने….

मला तुझ्या चेहरयावर
हे दु:ख आवडतच नाही
तुझ दु:खाशी असलेल हे नात
मला नैतीकच वाटत नाही
ऐक माझी हि विनंती,
हयाला चेहरयावरुन झटकुन दे…
काही अश्या रीतीने…

माझा एक आवडता गायक आतिफ़ अस्लम हयाच्या ’कुछ इस तरह’ हया गाण्याचा हा मराठी अनुवाद आहे.त्याची अब तो आदत सी है मुझको, वो लम्हे वो बाते, तेरे बिन मै यु कैसे जिया,पेहली नज़र मे,तेरा होने लगा हु,तु जाने ना अशी बरीच गाणी मला खुप आवडतात.त्याची दुरी हा तर पुर्ण अल्बमच मला आवडतो.शक्य असल्यास जरुर ऐकुन पहा हा अल्बम.जेव्हा हा अल्बम आला होता तेव्हा पार झपाटलो होतो हया गाण्यांनी…दुरी,यकीन,कुछ इस तरह,हम किस गली,एहसास सगळीच एकापेक्षा एक…

Advertisements

11 thoughts on “काही अश्या रीतीने…

  1. पिंगबॅक Tweets that mention काही अश्या रीतीने… « दवबिंदु -- Topsy.com

    • त्याच संगीत आवडते… आताच्या नवीन बहुतेक सिनेमांना त्याचच (सुलेमाना हया भावासोबत) असते. सध्या इंडीयन आयडॉल मध्ये येतो तो…

  2. तुझ्या खिडकीशी रेंगाळणारा पावूस मला माझ्यासारखाच वाटतो..
    विरहाने व्याकूळ झालेल्या डोळ्यात तो ढगांसारखा दाटतो..

    @@……..are ahes kuthe mitra…….@@

टिप्पण्या बंद आहेत.