काईटस….


खुप दिवसात सिनेमागॄहात जाउन कोणता सिनेमा पाहिण्याचा योग आला न्वहता.खरतर बरयाच काळात अगदि आवर्जुन सिनेमागॄहात जाउन पहावा असा कोणता नविन सिनेमा मला जाणवलाच नाही .पण ऋतिकच्या  काईटस ची तर वाट मनापासुन पाहत होतो. खरतर मला तो पहिल्याच दिवशी पाहायचा होता.पण शुक्रवारी सेंकडशिफ़्ट असल्याने ते जमल नाही.त्यामुळे आज दोन लग्नांना हजेरी लावुन काईटस बघायचा प्लॅन केला.तसा काल काईटस बघितलेल्या मित्रांचा ’काही खास नाही’ म्हणुन अभिप्राय मिळाला होता.पण तरीही काईटस बघण्यापासुन मी स्वत:ला रोखु शकलो नाही.

आंतरजालावरुन साभार…

काईटसची कथा तशी नेहमीचीच एक प्रेमकथा आहे.सिनेमात सगळ आपण विचार करतो तसच होत जात.अस असल तरी  या सुमार कथेचे पडद्यावरील सादरीकरण मात्र चांगले झाले आहे.काईटसकडुन जितक्या अपेक्षा होत्या त्या पुर्ण करण्यात निश्चितच तो खुपच कमी पडला आहे पण तरीही  माझ्या मते ऋतिक आणि बार्बरासाठी  एकदा हा सिनेमा पहायला काहीच हरकत नाही.सिनेमात दोघांना एकमेकांची भाषा कळत नसली तरी त्यांची अबोल प्रेमकथा आपल्या ह्रदयाला भिडते. दोघांमधील जादुई रसायनशास्त्र (केमीस्ट्री 🙂  ) तर मस्तच रंगल आहे .सिनेमाचा शेवटही एकदम भावस्पर्शी आहे.चित्रपटात फ्लॅशबॅकचा वापर अगदि हॉलीवुड स्टाईलने  केला आहे.पण ऍक्शन सिक्वेन्स हॉलीवुडचे  टेक्नीशीअन्स असुन सुदधा अगदि लक्षात राहण्याजोगी झालेली नाहियेत.दोघांना एकमेकांची भाषा येत नसल्याने चित्रपटात संवाद खुप कमी आहेत.बरेचसे संवाद ईंग्लीश व स्पॅनीश मध्ये आहेत. (त्यांचे हिंदी सबटाईटल्स खाली दिले आहेत)जिंदगी दो पल की आणि दिल क्युं ये मेरा ही गाणी मस्तच जमली आहेत.सलीम-सुलेमानचे पार्श्वसंगीतही उत्तम आहे.काईटसची सिनेमॅटोग्राफ़ी तर लाजवाब .इतक सगळ चांगल असतांना एका चांगल्या कथेची साथ लाभली असती तर….

जिंदगी दो पल की इंतज़ार कब तक हम करेंगे भला

तुम्हे प्यार कब तक ना करेंगे भला….

असो सिनेमाची कथा पुढीलप्रमाणे आहे.अमेरिकेतील जे (ऋतिक)  पैशासाठी ११  मुलीशी ( ग्रीन कार्ड  हवे असणारया ) लग्न करतो. त्याचे शेवटचे म्हणजे ११ वे लग्न मेक्सिकोहून लास वेगासला आलेल्या लिंडा (बार्बरा) हिच्याशी झालेले असते. कॅसिनोचा करोडोपती मालक असलेल्या कबीर बेदीची मुलगी जिना (कंगना) हिला जे डान्स शिकवतो. जिनाचे त्याच्यावर खुप प्रेम करते आणि  जेही पैश्यासाठी तिच्याशी प्रेमाचे नाटक करतो.तसच दुसरया बाजुला नताशा (लिंडा-बार्बरा) जिनाचा भाऊ टोनी (निक ब्राऊन) हयाच्याशी लग्न करण्यास उत्सुक असते.अस असतांना जे आणि नताशा परस्परांच्या प्रेमात पडतात.टोनी आणि नताशाच्या लग्नाच्या एक दिवस अगोदर एका घटनेमुळे नताशा जे बरोबर पळून जाते.इथेच सुरु होतो अखेर पर्यंत न संपणारा पाठलाग.पतंगांच उडण जवळ येण दुर जाण.तो पाठलाग पडद्यावर अनुभवणेच उत्तम.

आंतरजालावरुन साभार…

ऋतिक आणि बार्बरा हयांची  चित्रपटातील जबरदस्त अदाकारी खरच पाहाण्यासारखी आहे. ऋतिक-बार्बरा बरोबरच निक ब्राउननेही छान काम केल आहे सिनेमात.त्याने साकारलेला खलनायक उगाचच अति वाटला नाही.बाकी कबीर बेदी-कंगना पाहुणे म्हणुनच आहेत सिनेमात.संवाद कमी असल्याने सिनेमा काहिजणांना संथ वाटु शकतो पण ते बघणार्याच्या दॄष्टीकोनावर आहे.जगभरातल्या २५०० सिनेमागॄहात प्रदर्शीत झालेल्या काईटसने आज पहिल्या दिवशी तब्बल २१ कोटींची कमाई केली आहे.पुढच्या आठवड्यात काईटसच ९० मिनटाच (हिंदी १३० मिनटाचा आहे) इंग्लीश व्हर्जन रिलीज होणार आहे.एकंदरीत सिनेमा तितका चांगला नसला तरी ऋतिक-बार्बरा जोडी प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचु शकते .वयस्कर तसेच गावा ठिकाणच्या प्रेक्षकांना तरी काईटस तितकासा मानवणारा नाहिये ….  बघुया पुढे काय होते ते.

बाकी सिनेमाला दिलेल काईटस नाव अगदि समर्पक आहे हे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते…

* सिनेमा चालु असतांना मध्ये रावणच मोठ ट्रेलर दाखवल..भारी वाटल…

Advertisements

19 thoughts on “काईटस….

 1. मी आपला पी सी वरच पाहत होतो…बोर झाला मला…पण हृतिक नेहमी प्रमाणेच जबरदस्त….मोरी काही विशेष नाही वाटली…

  • सागर,प्रतिक्रियेबद्दल आभार…सिनेमा जे काही कमवणार ते हया जे (ऋतिक) मुळेच….बार्बराच वय ऋतिकपेक्षा जास्त वाटत असल तरी तिने अभिनय चांगला केला आहे …

 2. >> इतक सगळ चांगल असतांना एका चांगल्या कथेची साथ लाभली असती तर….

  पुलं म्हणतात ना की “दुकानात सर्वात दुर्लक्ष करण्याची वस्तू म्हणजे गिर्‍हाईक”.. अगदी तसंच आहे आपल्या निर्माते/दिग्दर्शकांचं.. ज्या गोष्टीला सर्वात जास्त महत्व दिलं पाहिजे तिच्याकडेच सर्वात अधिक दुर्लक्ष करतात 😦

  बघू.. काईट्स कधी बघायला मिळतोय ते…

  • तेच ना बॉलीवुडच्या आजकालच्या जवळपास सगळ्याच बिग-बजेट सिनेमांमध्ये कथेला अगदि दुय्यम स्थान असत….बाकी बघायला मिळाला तरच बघ असा आवर्जुन बघण्यासारखा नाही …..

 3. मला रिव्यू तरी खास नाही मिळाला मित्रांकडून जे काल गेले होते सो तूर्तास बेत कॅन्सल आहे पतंग उडवायचा..सीडीवरच बघेन..

  • जितक्या अपेक्षा होत्या तेवढा भारी नसला तरी अगदीच वाईट नाहिये…याउलट जास्त अपेक्षेने गेल्यामुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे…

 4. देव आता देशात यायला १० दिवस राहिलेत माझे…. आल्यावर काईट्स पहायचा प्लॅन होता… पण तू आता विचारात टाकलेस बघ….

  तरी हृतिकसाठी बघावा का असा मुद्दा येतोय… 🙂

  • ह्रतिकची पंखी असशील तर जरुर बघ (काही वेगळ पाहायची अपेक्षा न ठेवता)….वाह म्हणजे रिवर्स काउंटडाउन सुरु झाल असेल तुझ आता…

 5. Mala suddha baghayacha aahe kites…!!! Result chya aadhi jametil tasha aani tevadhya TAVALAKYA karayachya aahet…tyamule phar apeksha gheun janarach nai mi… 😉

  • ह्म्म जास्त अपेक्षा नाही ठेवल्या तर ठिक वाटेल… 🙂
   हया आठवड्यातच आहे ना रिसल्ट…वर्तमानपत्रात रिसल्टसंबधी बातमी वाचल्यावर तुझी आठवण झाली होती…आम्हीही तुझ्याबद्दल जास्त अपेक्षा ठेवत नाहि तरी पेढ्यांची ऑर्डर मात्र देउन ठेव….. 🙂

 6. देव, मला स्वतःला सिनेमा आवडला नाही, तसंच केवळ दुसर्‍या दिवशी खच्चुन भरलेल्या हॉलमध्ये भावनिकसिनेमाला जेंव्हा प्रेक्षकाकडुन हसण्यासारखी प्रतिक्रिया येते म्हणजे कुठेतरी भट्टी फसली आहे. ऋतिक, बार्बरा आणि अप्रतिम चित्रिकरण सोडता मला तरी काही विशेष वाटले नाही. तू अचुकरित्या सांगितले आहेसचः
  >> इतक सगळ चांगल असतांना एका चांगल्या कथेची साथ लाभली असती तर….

 7. मी सिनेमा कुणासाठी पाहणार हा प्रश्नच आहे…कारण २०० रुपये खर्च करून जाण्यासाठी, ना ह्यात अक्षय कुमार आहे, ना मिथुनदा!
  पण गावाला बघेन स्वस्तात…तू लिहिलयंस छान!

  • आवर्जुन पाहण्यासारखा नक्कीच नाही त्यामुळे स्किप केला तरी चालेल…बाकी अक्षय मला आधी आवडायचा पण आतचे त्याचे पिक्चर्स रटाळ वाटायला लागलेत…मिथुनदाचा मी लहानपणी खुप मोठा पंखा होतो…

 8. पिंगबॅक काईटस…. | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 9. हेरंबची प्रतिक्रिया आवडली. खरच आहे ते. बाकी मी हा चित्रपट पहिला नाही त्यामुळे काहीही भाष्य करू शकत नाही, पण मला त्यांच्याकडून फार अपेक्षा सुद्धा नाहीत.

  • अपेक्षा न ठेवता पाहिला तर बरा वाटेल हा सिनेमा…(तेही ह्रतिकची फ़ॅन असशील तर)…कथेत काहीच दम नाही पण सादरीकरण चांगल आहे…

टिप्पण्या बंद आहेत.