पाऊस पडत असताना…(४)


पाऊस पडत असताना…
पाउसाकडे दुरून पाहायच नसत
ते बरसणारे थेंब अलगद झेलत
ओल्या निसर्गात हळूवार विरघळत
पाउस होउन चिंब भिजायच असत ….
देवेंद्र

पाऊस पडत असताना…
तु समोर आलास की नेहमी मी चिंब भिजते
तुला जरी म्हणत असले पाउसाची मजा घेते
खरतर त्या पाउसात माझे अश्रु लपवीत असते…..देवेंद्र

हया सदरातील भाग-१,भाग-२,भाग-३ ही तुम्ही  वाचु शकता….

25 thoughts on “पाऊस पडत असताना…(४)

 1. कोसळणारा पाऊस पाहून,
  मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
  माझे तर ठीक आहे,
  पण हा कोणासाठी रडतो……

  पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

 2. पाउस पडत असतांना,
  पाणी जमीन सगळी भिजवत असतं,
  पण तुझ्या आठवणीत रमलेलं मन
  आठवण काढून ’कोरडेच आवंढे’ देत असतं!.

  • धन्स रे…..कधी तरी तलप येते काहितरी काव्यात्मक लिहायची आणि मग हया चारोळ्या (कं मुळे कविता लिहायला जीवावर येते ना) जन्माला येतात… 🙂

 3. पावसाला पाहून मलाही आठवत
  कधीतरी तो माझ्या सोबत रडला होता
  माझे अश्रू झाले कोरडे दिवसागणिक
  पण त्याच्या थेंबांचा ओलावा तेवढा उरला होता

  • आभार मित्रा…हयांच्या आधारावरच ब्लॉग सुरु केला होता गेल्या वर्षी…बाकी बाबाच्या भिंतीवर सध्या काय षटकार वर षटकार ठोकतो आहेस…जबरी…

 4. tujhi translations vachali hoti. Original aajach vachtoy. Mast ch.lage raho.

  Mahendrajini jabardast lines lihoon dhakkach dilaay..navaach pailu disala tyaancha..kay vatel te var ka lihit nahit kavita?

  • दोन-अडीच वर्षापुर्वी पाउसप्रेमामुळे मी ऑरकुटमध्ये एका कम्युनीटीत पाउस पडत असतांना हे सदर चालु केल होत तिथेही महेंद्रजींनी अशीच धमाल उडवली होती.पण त्यांनी मध्येच ते ऑरकुट अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सगळ्या चारोळ्या डिलीट झाल्या..तरीही खालची एक वाचा…बाकी मी गेल्यावर्षी ब्लॉगची सुरुवात केली ती हया चारोळ्यांच्या भांडवलावरच..

   पाउस पडत असतांना
   भजी तु तळली नाहिस
   कानफाटात वाजवुन तुझ्या
   पोट माझे भरले नाही…..महेंद्र

 5. पिंगबॅक 2010 in review « दवबिंदु

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s