….लंगडी घालाया लागली.


पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट बद्दल आहे. ती थोडी आत्मकेंद्रीत वैगेरे वाटत असेल तर पचवुन घ्या कारण गेले दोन दिवस माझी जी ’घोडदौड ’ झाली आहे  तिनेच मला ही पोस्ट लिहायला प्रवॄत्त केल आहे.ही पोस्ट थोडी लांबलचक होणार हयाची जाणीव आहे मला पण झालेल तुमच्यासमोर नको मांडु तर कोणासमोर मांडु… 🙂 (ब्लॉगर्सभेटीबद्दल डिटेलात तुम्हाला पेठेकाका,सुहास,विभी इथेही वाचायला मिळेल…)तर पुढे पोस्टला शिर्षक काय देउ हा विचार मनात येताच आमच्या श्री.बिनडोक्याना ’ कोंबडी पळाली ’ हे गाण आठवल. साधारणत: विकांतात माझ्यासाठी एका तरी कोंबडीला  प्राणार्पण कराव लागत.(कुठ फ़ेडणार हे पाप भाउ… 🙂  ) अस असतांना आणि कोंबडी खायच बेत झालेला असतांनासुदधा कोंबडीविनाच मला कशी लंगडी घालावी लागली त्याबद्दल ही पोस्ट असल्याने हया शिर्षकावर शिक्कामोर्तब केल. तर  १० तारखेला सुहासचा संदेश आला कि अनुजाताई इथे आली आहे तिला फ़ोन कर .मग अनुजाताईला फ़ोन केल्यावर तिने हया २० तारखेच्या सहलीबद्दल सांगीतल आणि मी तिला नाही म्हणु शकलो नाही.मग मी लागलीच पेठेकाकांच्या ब्लॉगवर ’मी येत आहे’ म्हणुन प्रतिक्रियाही दिली.ही झाली माझ्या लंगडीची पार्श्वभुमी….

आम्ही ब्लॉगर्स...

१९ जुलैला सकाळी १०:३० च्या आसपास सुहासचा फ़ोन आला कि अडीचच्या बसची टिकिटस बुक केली आहेत.मग मी आमच्या इथली ११:५५ ची गाडी पकडायची ठरवली.तयार होवुन ११:३० च्या आसपास बाइकची चावी घेउन खाली उतरलो.पाहतो तर काय गाडीच नाही.धावत वरती गेलो तर कळल वडील गाडी घेउन बाहेर गेले आहेत.( हा पहिला धक्का…सुरुवात होती माझ्या लंगडीची ..पुढे वाचा काय काय होते ते.. : )  )  लगेच मित्रांना फ़ोन लावायला सुरुवात केली.पहिलाच फ़ोन मित्राने उचलला पण तो बाहेर होता.मग दुसरा-तिसरा दोघांनीही उचलला नाही.चौथ्या मित्राने  फ़ोन उचलला.त्याला सांगीतल असेल त्या स्थितीत ये आणि मला स्टेशनला सोड .मग त्याने पटकन येउन मला स्टेशनवर सोडले. बाइकवरुन उतरल्या उतरल्या पाहतो ते काय गाडी स्टेशनवरुन निघायला लागलेली.हया नंतर गाडी होती ती थेट १४ :१५ ला.मग काय तिकिट वैगेरे काढायच सोडुन धावत पळत गाडीच्या आत कसा शिरलो मलापण कळलच नाही.टिकिट नसल्याने उगाचच मला चोरी केल्यासारखे वाटत होते,गाडीत चढुन आत येणारी प्रत्येक व्यक्ती टी.सी सारखीच वाटायची आणि वेगळीच हुरहुर मनाला लागत होती.दंड भरा वर इतक्या लोंकासमोर पकडल जाण …बाप रे…दरम्यान दुसर्या आणि तिसरया क्रमांकाच्या मित्रांचे फ़ोन आले, काय झाल रे..फ़ोन केलेलास मघाशी…कसाबसा विरारला पोहोचलो आणि तिथे टीसींची नजर चुकवत टिकिटखिडकी गाठुन बोरिवलीचे टिकिट काढले.( आता इथे माझे जास्त काही पैसे वाचले असा विचार करु नका.टिकिटात फ़क्त ६ रुपयाचा फ़रक होता 🙂 ) आता माझ्या जीवात जीव आला होता, किती मोकळ वाटत होत सगळ.मग ताठ मानेने बोरिवली गाडी पकडुन १४:०० च्या आसपास बोरिवली गाठली.

मस्त कॉफ़ीचा आस्वाद घेउन आम्ही ( बर्थडे बॉय सुहास आणि मी ) ०२:३० ला बोरिवली सोडली.आदल्या दिवशी खुप पाउस पडला होता पण आज सकाळपासुन छोटीसी सरही आली नव्हती.त्यामुळे भयंकर उकाडा होता पण आमची बस ए.सी. असल्याने तो तितकासा जाणवला नाही.(  🙂 )वाटल चला लागलो एकदाचे मार्गाला..पण कसल काय बस  ट्रॅफ़िक आणि पिकअपच्या चक्रव्युहात अशी अडकली कि वाशीला तासभर आधीपासुन गाडीची वाट पाहणारया आनंदला (आनंद काळे-हयापुढे हयाचा उलैख आका असा होइल हयाची वाचकांनी नोंद घ्यावी.) तिने ’ इंतहा हो गयी इंतज़ार की ’ हे गाण बोलायला भाग  पाडल.वाशीला आका धावत पळतच बसमध्ये आला कारण बस वेगळ्याच थांब्यावर थांबली होती.आकाने सुहासला वाढदिवसाची भेट म्हणुन दिलेल क्रिमच्या बिस्कीटाच पॅकेट मी लगेचच फ़ोडल.क्षणापुर्वी भरलेला तो पुडा पटकन कसा खाली झाला कळल नाही.बसमध्ये ’ लगे रहो मुन्नाभाई’ हा हलकाफ़ुलका सिनेमा  लागला होता तो पाहत एकमेकांशी गप्पा मारत त्याच सिनेमातील ’पल पल पल हर पल कैसे कटेगा पल..’ हे गाण गुणगुणत (खरच खुप कंटाळा आला होता हो प्रवासाचा) सव्वाआठच्या च्या सुमारास पुणे गाठल आणि सागरच्या म्हणण्यानुसार वाकड फ़ाटयाला उतरलो.

नभ उतरु आल..

दवबिंदु

तुम्हाला काय वाटल झाल सगळ व्यवस्थीत…नाही आज नियतीचा डाव काही वेगळाच होता.त्या बसवाल्याने वाकड फ़ाट्याच्या नावाखाली आम्हाला आदिच्याच एका फ़ाटयावर उतरवले होते.मग काय सागरला संपर्क  करुन सरळ चालत त्या वाकडया फ़ाटय़ावर गेलो.तिथे सागर आमची वाट पाहत होता.थोड्याच वेळात सपापण (सचिन पाटील) आला.मग आम्हाला कळल इतर मंडळी (आनंद पत्रे(आप),विद्याधर भिसे(विभी),भारत मुंबईकर(भामु))  पुण्यातच असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती.आमची सर्वात मोठी घोडचुक ही झाली होती कि आम्ही पुणे हे एकच ठिकाण गृहीत धरल होत आणि सगळे जवळजवळ असतील अशी अपेक्षा होती. ( पुढे मागे मी कधी चेतन भगतच्या थ्री मिस्टेक्ससारख माझ्या जीवनातील ’वॅरीअस (हो खुप आहेत हो) मिस्टेक्स ऑफ़ माय लाईफ़ ’ लिहल तर हया दोन दिवसातील बर्याच चुका त्यात सामील होतील.. 🙂 ) पण इथे कोणी कर्वेनगर,कोणी हिंजवाडी,कोणी पिंपळ-गुरव तर कोणी स्वारगेटवर स्वारी केली होती .पुढे काय.. हयावर चर्चामसलत करुन मी आणि सुहासने कर्वेनगरला जाउन तिथे वाट पाहत असलेल्या पेठेकाका,अनुजा ताई,गौरी हयांना भेटायचे ठरले तर आका आणि सपा हयांनी जेवणाची सोय करावी. (मस्त चिकन तंदुरीचा वैगेरे बेत आखला होता)मग रात्री सर्वांनी सचिनच्या घरी जेवण करुन तिथेच झोपायच असा एकंदरीत कार्यक्रम ठरला होता.सुहास आणि मी दोघेही नविन असल्याने आम्हाला कर्वेनगरला पोहोचवायची जबाबदारी सागरने उचलली होती.

पण पिक्चर अजुन बाकी होता मंडळी…आम्ही बाजीरावाच्या थाटात हायवेला ट्रिपलसीट निघालो होतो. त्यात सागरने एक बॉंब टाकला.’माझ्या जवळ लायसन्स नाहिये ’..आम्ही तो हसण्यावारीच घेतला.आजुबाजुला रात्रीच्या पुण्याच दर्शन घेत मजल-दरमजल करत आम्ही जात होतो.सागर आधी पेठेकाकांकडे आला होता पण तरीही पुर्ण रस्ता त्याला नीटसा आठवत नव्हता.मग कोणाकोणाला विचारत आम्ही ९९.९९ % अंतर व्यवस्थीत कापल पण हाय रे दैवा ’ तो बघ सुर्य तो बघ जयद्रथ’ अशी परिस्थीती असतांना मामांचा एक ताफ़ाच गाडीसमोर आडवा आला.सागरने थोड्यावेळापुर्वी आमची मस्करी केली नव्हती ते आम्हाला तेव्हा कळले. ’लायसन्स नाय वर ट्रिपल’  मामांना भारीच मुद्दा मिळाला होता. १२०० च्या खाली यायलाच तयार नव्हते .मग मुबंईचे पाहुणे वैगेरे घासघीस करत २५० वर त्याला ’ सेटल ’ केल. त्याची उद्याच्या रविवारच्या  दोन्ही वेळच्या कोंबडीची सोय झाली होती.मग तिथे पेठेकाका,अनुजा ताई,गौरी हयांना भेटलो.तिथे त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या, अजुन कोण कोण येणार,कुठे किती वाजता भेटायच हयावर चर्चा झाली. पेठेकाका आणि अनुजा ताई हया दोघांचा मीटबद्दलचा उत्साह खरच खुप दांडगा होता.गौरी काही खाजगी कारणामुळे  उद्या येउ शकणार नव्हती.पण तिच्या हसरया चेहरयावर त्याबद्दलची खंत स्पष्ट दिसत होती.हया तिघांच्या भेटीने थोड-फ़ार का होइना रिलॅक्स वाटत होत.आम्हाला परत पोहोचायला खुप उशीरहोणार असल्याने आकाला फ़ोन करुन  तंदुरी-बिर्याणी परस्परच चेपायला सांगीतली.मग आम्ही सहाजणांनी तिथेच पावभाजीवर ताव मारला.

मग अनुजाताईचा तिथेच राहायचा आग्रह मोडुन आम्ही कर्वेनगर सोडल.अनुजाताई आम्हाला एका ठिकाणापर्यंत सोडायला आली.मध्ये आम्हाला दोनदा पोलिस लागले पण ताय होती ना बरोबर.त्यातल्या एका ठिकाणी तर ताईने थांबुन पोलिसालाच पुढचा रस्ता विचारला होता…. 🙂 मग त्या एका ठिकाणी अनुजा ताईला अलविदा करुन आम्ही परत एकदा ट्रिपलसीट झालो.माझ्याकडे लायसन्स नाही पण त्याची एक छापील प्रत होती.त्यामुळे गाडी हाकण्याच काम आता माझ्या कडे सोपवल गेल होत. आमच दुर्दैव हे कि विकांत असल्याने कि कसल्या कारणाने ठाउक नाही पण जिकडे- तिकडे भयंकर चेकिंग चालु होती.मग लांबुनच मामा दिसले होते कि सुहासची ट्रेकिंग सुरु व्हायची.( मागे बसलेला असल्याने )”सो गया हे जहा (पोलिस सोडुन 🙂 ), सो गया आसमा ” हे गाण अनुभवत आमच्या नजरा दुरवर पोलिसांनाच शोधत होत्या हळू हळु आम्हाला जरा कुठे पांढरा रंग दिसला कि पोलिस असल्याचाच भास होत होता.तरीही एका ठिकाणी आम्ही त्यांच्या तावडीत सापडलोच मग काय अजुन १०० रुपये ढिले करावे लागले.हयांची भाषा भारी एकदम.. काही नाही उद्या पोलिसस्टेशनला येउन गाडी घेउन जा.जास्त दंड होणार नाही वैगेरे वैगेरे.खरतर आम्हाला भुकही लागली होती पण रस्त्यात अगदि आधीपासुन कुठेच काही खायच दिसल नाही.मग पुढे असाच पुण्यातल्या गल्लीबोळात फ़िरतांना एका ठिकाणी औंधला जायचा रस्ता सापडला आणि सागरची ट्युब पेटली.मग आम्ही व्हाया औंध पिंपळे-गुरव इथे सचिनच्या घरी रात्री दोनच्या सुमारास पोहोचलो.सागर ची २३ ला परिक्षा असल्याने तो उद्या येणार नव्हता.आमच्यामुळे त्याला खुप त्रास झाला होता.सागरला निरोप देउन  मग गच्चीवर मी, भामु,सपा आणि सुहासनी थोडावेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही निद्रादेवीला शरण गेलो.

शनिवारवाडा

दुसर्या दिवशी नउ-सव्वानउला आम्ही बसने पुणेदर्शन करत (इतक्या ठिकाणी बस फ़िरली कि काय सांगु)  शनिवारवाडा गाठला.सुहास खुपच कमी झोपला होता पण त्याच्या सुहास्य वदनामुळे त्याचा थकवा दिसत नव्हता.सुहास त्याचा कालचा वाढदिवस आता कधीही विसरणार नव्हता.आज आपल्या मोगराफ़ुललावाल्या कांचनतायचा वाढदिवस असल्याने तिला शुभेच्छांचा समस पाठवला.मला वाटते वाढदिवस नसता तर तीसुदधा आली असती.असो तिथे मग आम्ही कांदापोहे (हे पेशल सपामुळे,सध्या कांदेपोहे खात फ़िरतो आहे ना तो सगळीकडे म्हणुन इथेही त्यानी तिच ऑर्डर दिली)  ,इडली,उपमा हयावर मस्त ताव मारला आणि बसस्टॉपजवळ गेलो तिथे काका आणि अनुजा ताई आमची वाट बघत होतेच.तिथे भामु (हा सचिनच्या घरुन सकाळीच कोणाला तरी भेटायला गेला होता… 🙂  ) आणि सध्या हटकुन ज्याच्या पोस्टसची वाट बघत असतो तो बाबाची भिंत वाला विभी हे दोघेही भेटले.गाडीला सुमारे ४० मिनटे होती (किती लवकर आलो होतो ना आम्ही..हा हा हा… आधीची बस आम्ही सगळ्यांनी चुकवली होती..  🙂 ) मग आम्ही सर्वांनी शनिवार वाड्याचे दर्शन घेतले.गेल्या वर्षीच पेशवाईवरच्या बरयाच पुस्तकांच पारायण झालेल असल्याने बर्याच आठवणींसह शनिवार वाडा जवळचाच वाटला.मग १०:५० च्या आसपास बस आली आणि आम्ही सिंहगडाच्या दिशेला निघालो.सचिन आमच्या बरोबर येणार नव्हता कारण त्याला मित्राबरोबर कांदेपोहे (  🙂 ) खायला जायचे होते पण आमच्या साठी त्याने कांद्यापोहयांची आहुती दिली. बसमध्ये आमच्या गप्पा एकदम जबरी  रंगल्या कारण एव्हाना सगळे जाम रंगात आले होते.गप्पांच्या ओघातच आम्ही सिंहगडाचा पायथा गाठला.बराच उशिर झाला असल्याने तिथेच असलेल्या घाटगे फ़ार्महाउसात जायचे ठरले.

गौरी आणि इशान...

थोड्याच वेळात नाशिकहुन दरमजल करीत आलेली तन्वीताई सहजच आमच्यासमोर अवतरली, ती अगदि बोनस पॅकेजसह (इशान,गौरी आणि अमीतसह).तीच बोलण-वागण खरच सहजच होत.तीला पहिल्यांदाच भेटतोय अस जाणवलच नाही.इशान भलताच खुश होता.तो लगेचच मामालोकात (हे आम्ही..ते कालचे मामा नाही बर का ..  🙂 ) मिसळुन गेला.गौराबाईचा मुड मात्र  उखडलेला होता.तिला पाहताच आपला लगेच त्या वॉशींगमशीन आणि केळ्याच्या सालीची आठवण झाली.अमीत खुपच शांत अन सहनशील वाटत होता.गौरा बाई त्याला अशी पिडत होती कि मला ते बघुन  ’दमलेल्या बाबाची कहाणी ’ आठवली.पेठेकाका फ़ार्महाउसच्या काउंटरवर टिकिटे काढत असतांनाच अचानक एवढा वेळ फ़ोनवर बोलत असलेल्या आकाने सिंहगर्जना केली..”असल आर्टिफ़िशीअल काही बघायला मला अजिबात आवडत नाही वैगेरे…” विजा कडाडत होत्या ,ढगांचा गडगडाट सुरु झाला अन आम्ही सगळे निमुटपणे (ताया तर शांतच झाल्या होत्या आकाचा आवेश बघुन) पायपीट करत मागे फ़िरलो आणि सिंहगडाकडे वर जाणारया रस्त्याजवळ आलो.दरम्यान पुण्याचा अभिजीत वैद्य आमच्यात सामील झाला.तिथे ते जीपवाले शेंहगड-शेंहगड ओरडत होते.गाडीत जनावरांसारख माणसांना कोंबत होते.आम्हीही सिंहगड्भेटीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्या कळपात शिरलो.तन्वी ताईने आणलेली गाडी पुढे गेली ते बर झाल कारण पार्किंगच्या कारणामुळे खाजगी गाड्या वर सोडण आता बंद केल होत.विभीपण अभिजीतबरोबर बाईकवर पुढे गेला होता.कशीतरी आमची गाडी एकदाची सुरु झाली.

खादाडी...

वरती खुपच ट्रॅफ़िक जाम असल्याने आम्ही थोड आधीच उतरुन पायपीट करत पार्किंगजवळ पोहोचलो.तायांना शोधत असतांना पाहतो तर काय  (रिलायंस सोडुन सगळी नेटवर्क गुल झाली होती..त्यामुळे संपर्क करता येत नव्हता) एका छोट्याश्या हॉटेलात ताया भजीवर हल्लाबोल करत असलेल्या दिसल्या.आम्हीही त्या लढाईत सामील होवुन हर हर महादेव म्हणत भजीचा आणि सोबत ताक-दहीचा चांगलाच समाचार घेतला.अनुजा ताईचा बहुतेक लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यानिमीत्ताने ती केक घेउन आली होती.मग सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारत त्याच नाव-निशाण नाहिस केल.आमच्या भजी आणि ताक खादाडीच बिल किती झाल माहित आहे…बरोबर ४२० .. 🙂 मग हळुहळु आम्ही सिंहगड सर करायला सुरुवात गेली सोबत फ़ोटोग्राफ़र होतेच आका आणि छोटुकला इशान.तिथे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होत वर आम्हा सगळ्यांचा आपापसातला जिव्हाळ्याचा ओलावाही  होताच  त्यामुळे आतापर्यंतचा थकवा कुठच्या कुठे निघुन गेला होता.चहुबाजुला पसरलेले धुक्यांचे ढग, आपल्याच मस्तीत वाहत असलेला थंडगार वारा हयांच्या सोबतीत तो गड आता गड राहिला नव्हता तर एखाध मस्त ’ हिलस्टेशन ’ बनुन गेला होता.ज्याच्यामुळे आम्ही वर आलो त्या आकावर आता कौतुकाचा वर्षाव होत होता.इथे पेठेकाका आणि अनुजा ताईचा उत्साह वाखाखण्याजोगा होता.दोघ मध्ये मध्ये बसुन वि्श्रांती घेत होते पण शेवटपर्यंत आमच्याबरोबर फ़िरले.तास-दिड तास तिथे छानपैकी भटकंती करत आम्ही परतायला निघालो तेव्हा आका म्हणाला तुम्ही चला मी येतो दहा मिनटातच.मग आम्ही पार्किंगजवळ जाउन आकाची वाट पाहु लागलो.दरम्यान ज्यांना घरी जायची घाई होते ते ” अरे देवेंद्रला कुठे जायच आहे माहित आहे बोइसरला ” तर ज्यांना घाई नव्हती ते “अरे कसली घाई करतोस  देवेंद्रला कुठे जायच आहे माहित आहे बोइसरला,तो काही बोलतो का बघ” अस बोलत माझ्याच नावाची ढाल वापरत होते.मी दोन्ही पक्षांना मंद स्मीत करुन दाखवत होतो, कारण मला घाईही होती आणि त्या सर्वांना लवकर सोडावसदेखील वाटत नव्हत.

धुक्यात हरवलेला सिंहगड...

बाबाची स्टाईल तर बघा...

आकाची वाट पाहत असतांनाच अनुजा ताईने चहा घेउया असे सुचवले.अहाहा… त्या वातावरणात चहा  एकदम अमृतासारखाच भासला. (तसा साधाच होता) मग तन्वीताईने मघाशी काही वेळापुर्वी घेतलेल्या गरम-गरम शेंगदाण्याच्या बाफ़लेल्या शेंगा मी नको नको म्हणत चांगल्याच चेपल्या.परत तिथे गप्पांचा फ़ड रंगला.सुमारे ४० मिनटे झाली पण आकाचा पत्ता नव्हता. मग मी ’गड झाला पण आका गेला’ अशी कोटी केली.त्याला सगळ्यांनीच मुक्तहास्याने दाद दिली.थोड्याच वेळात धुक्यात हरवलेला (आम्हाला तरी हेच कारण सांगीतले खर-खोट त्या परमेश्वराला ठाउक…  : )  )  आका परत आला.मग आकाने घेतलेल्या कैरी्च्या आंबड-गोड स्वादाची लज्जत चाखत आम्ही दोनच्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागलो.पण आजचा दिवस काही वेगळाच होता उतरतांना रस्त्यांच्या दुतर्फ़ा लावलेल्या गाड्यांमुळे ट्रॅफ़िक इतकी झाली होती कि गाडी मुंगीच्या पाउलांनी पुढे सरकत होती.मग अनुजा ताई,तन्वीताई,आका,भामु,इशान आणि मी चालतच गाडीपुढे निघालो.काही वेळाने ट्रॅफ़िक थोडी सावरल्याने आम्ही परत गाडीत विराजमान झालो.पण पुढे परत तीच कहाणी.अस करत करत तब्बल तीन तास लागले आम्हाला खाली उतरायला.  😦  मग तिथुन स्वारगेटसाठी रिक्षा केली पण त्या रिक्षाचा काहितरी प्रॉब्लेम असल्याने त्याने रिक्षा पुणे शहरात घुसवली नाही व तुम्हाला दुसर्या गाडीत बसवुन देतो म्हणत तो इथे तिथे भटकत होता.

कैरीचा लज्जत चाखतांना...

शेवटी आम्ही कंटाळुन त्याला अर्धे पैसे दिले आणि तिथुन मीटरवाली रिक्षा करुन स्वार गेट गाठल.तिथे आका ठाण्याच्या गाडीत गेला तर सुहास,विभी आणि मी ७ वाजताची बोरिवलीगाडी पकडली.त्यातही थोडीशी पुण्याई कुठेतरी बाकी असल्याने गर्दीतही आम्हाला सीट मिळाल्या.मुंबईच्या वाटेवर खोपोलीला आम्ही उतरुन मस्त वडापाव,वेफ़र्स,चकली (विकत आणि विद्याधरच्या घरच्यापण) अशी खादाडी केली.त्या गाडीने ११:३५ ला आम्हाला बोरिवलीला पोहोचवल.विभी मालाडलाच उतरला होता.११:३५ ही माझ्या शेवटच्या गाडीची वेळ होती.खाली उतरल्यावर पाहतो तो काय बसवाल्याने बस डेपोत न नेता दुसरीकडेच उतरवल होत.मग काय सुहासने लगबगीने रिक्षा केली आणि ११:४० ला स्टेशन गाठल.सुहास रिक्षाचे पैसे भरत असतांनाच माझी गाडी प्लॅटफ़ॉर्म सोडत होती…वर अनांउसमेंट होत होती..अहमदाबाद जानेवाली.. मला काही सुचत नव्हते मग विचार न करता एकदम धावत धावत गाडी पकडली आणि गाडीत बसलो.एक लांब सुस्कारा टाकला.जब वी मेट मधे एकलेला  ’ बाबाजी, अब इस रातमे और कोइ एक्साईटमेंट मत देना,बोरिंग बना दोजी इस रात को ‘ असा काहिसा धावा देवाकडे करत होतो.

पण तेवढ्यातच… ढॅण टॅ णॅण….बाजुच्या प्रवाश्याकडुन कळल ही एक्सप्रेस आहे माझी गाडी हयाच्या मागे येणार होती आणि ही गाडी थेट थांबणार होती बलसाडला…म्हणजे रात्रभर प्रवास करुन परत सकाळी बलसाड वरुन परतायच वर टीसीच टेन्शन… माझा आवाजच बंद झाला होता..पण लगेचच स्वत:ला सावरल आणि ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभा राहिलो.आणि गाडी कुठे स्लो होते का हयाची वाट पाहु लागलो.दहिसर स्टेशनच्या थोड आधी गाडी थोडी स्लो झाली पण हाय रे दैवा ..स्टेशन जवळ येताच असला वेग धरला गाडीने काय सांगु…परत एकदा गाडी स्लो व्हायची वाट बघत देवाच नाव घेत ताटकळत  उभा राहिलो.गाडी भन्नाट वेगात पळत होती भाइंदर,वसई,नालासोपारा..इतक्यात विरार स्टेशनच्या दिड ते दोन किमी आधी गाडी एकदम मंद झाली..देवाने माझ एकल होत मग लगेच उतरुन ट्रॅकच्या बाजुने चालायला लागलो.मी उतरल्यावर ती गाडी परत सुसाट निघुन गेली…मला थोडीफ़ार का होइना देवाच्या अस्तीत्वाची जाणीव झाली..पण आता परत माझ्या गाडीची विरारची वेळ जवळ येत होती मग धावत पळतच टिकिट-खिडकी गाठली आणि टिकिट काढले.तोच माझी गाडी (विरमगाम पॅसेंजर) प्लॅटफ़ॉर्मवर हजर.मग गाडीत मस्त जाउन बसलो.

तेव्हा सुहासचा आणि मग विभीचा फ़ोन आला त्यांना सांगीतल पोहोचेन लवकरच अस.पण इथेही माझ दुर्दैव माझा पिच्छा सोडायला तयार नव्हत.केळवा हया स्थानकावर तब्बल २० मिनटे गाडी सायडिंगला काढली..(एकस्प्रेसना वाट करुन देण्यासाठी) ..रडत पळत (मध्ये मध्ये तर अस वाटल गाडीतुन उतरुन सरळ धावत निघाव…  🙂  )०२:१५ (तब्बल पाउण तास उशिरा) ला बोइसर गाठल.मला आता तिथे काहीच रिस्क घ्यायची नसल्याने वडिलांनाच स्टेशनवर बोलावल होत.मग एकदाच घर गाठल आणि फ़्रेश होवुन चिकनवर मस्त ताव मारला.गेले दोन दिवस हया कोंबडीने मला हुलकावणी दिली होती…  🙂  तसही दोन दिवस बरीच खादाडी झाली असली तरी जेवण असे झालेच नव्हते माझे आणि सुहासचे…असो खरच सगळ्यांना भेटुन खुप आनंद झाला होता आणि का नाही होणार दोन दोन आनंद आमच्या बरोबर होते…  🙂  हया पुणेरी मिशनचे  कॅप्टन पेठेकाका आणि वाईस-कॅप्टन अनुजाताई आणि हयांचे खुप खुप आभार ही भेट घडवुन दिल्याबद्दल…

….कोण कुठले ब्लॉगर्स…भेटायची काय गरज… पण तरीही आपण एकत्र आलो, का..तर ते एकमेकांशी हळुवार जोडलेल्या ऋणानुबंधामुळे्च… नशिबाच आणि माझ हे दोन दिवस एकदम वाकड असतांना एवढ्या संकटांना तोंड देत मी ही लंगडी सहन केली ती केवळ तुम्हा सर्वांना भेटायच्या ओढीनेच….

” वो कहते है ना किसि चिज को अगर दिलसे चाहो तो पुरी कायानात तुम्हे उसे मिलानेमे जुड जाती है..”   🙂

Advertisements

46 thoughts on “….लंगडी घालाया लागली.

 1. are mast lihilas ki deven. kombadi che nav pan bhannat avadale.aso hya pudhe ajun neet tharavun bhetuya. ashi hi n visarta yenari trip pan mastach. punha train madhun khali utarnyacha vedepana karu nakos. tech vachun dhass zal. kalji ghe ghai ghai kamachi nahi. tumchya doghanchya halapeshtana paravar nahi pan mhantatat na dostit he chalaychech.

  • थांकु अनुजाताई…हे चालायचच ग…त्यामुळेच तर अगदि अविस्मरणीय झाली ही भेट..शिवाय हया असल्या घटनातुन बोध घेउन अनुभवाची समॄद्धता वाढत असते ना…..तसही कधी कधी मलापण ऍडवेंचर करायला आवडते ग… 🙂

 2. पिंगबॅक Twitted by memarathi

 3. देवेन्द्रा पोस्ट मस्तच झालिये रे.

  पण काय रे शेंह्गड उतरताना आपल्याला जीपमध्ये मस्त कंपनी मिळाली ते कुणीच कस लिहल नाही. त्यामुऴे जरा अतोनात ट्राफीक असताना सुध्दा सुसह्म् वाटल नाही का ?

  • हं… तो मुद्दा मुद्दामुन ठेवला होता..पाहायच होत कोण त्याबाबत बोलते ते आणि अपेक्षेप्रमाणे तुच तो विषय छेडलास…त्यांच्यापैकीही कोणाकडे कांदेपोहे खायला जायच होत का तुला… 🙂

 4. बाब्बो !!!! काय लंगड्या घातल्या आहेस बाबा !! मानला तुला.. एकदम झक्कास लिहिलं आहेस. जाम आवडलं. जबरी धम्माल केलीत तर एकंदरीत.. 🙂

 5. झक्कास सहल आणि त्याचे तितकेच झक्कास वर्णन. सहीच रे देवेंद्र. ….कोण कुठले ब्लॉगर्स…भेटायची काय गरज… पण तरीही आपण एकत्र आलो, का..तर ते एकमेकांशी हळुवार जोडलेल्या ऋणानुबंधामुळे्च… there u go. 🙂

  • श्री ताई खरच खुप अविस्मरणीय झाली ग सहल… मस्कतच्या दोन्ही ताया एकत्र भेटण्याचा योग छान जुळुन आला होता…कसल्या विषयावर चर्चा-वाद वैगेरे काही नाही रंगल्या त्या फ़क्त गप्पा सोबत ते धुंद वातावरण…एकदम भारी..एकही क्षण पहिल्यांदा भेटतोय अस वाटत नव्हत…. ऋणानुबंधच ग दुसर काय म्हणु मी आता… 🙂

 6. तुझ्या लंगडीचे पुराण वाचून माझेच पाय दुखायला लागलेत देवेन ! तुम्ही अनुभवलेला थरार व सगळ्यांची पुण्यात येऊन एकमेकांना भेटण्याची तळमळ हाच आपल्यातील एकुलता एक समान धागा आहे जेणे करून एव्हढ्या हालअपेष्ठातूनही आपण निखळ आनंद मिळवू शकलो.

  • पेठे काका खरच तुमचे मनापासुन आभार हया कार्यक्रम जुळवुन आणल्याबद्दल…तुमचा उत्साह खरतर आम्हाला्ही लाजवणारा आहे..तन्वी ताईच्या ब्लॉगमधुन जेव्हा सर्वप्रथम तुमची ओळख झाली तेव्हाच तुमच्या त्या वर्षभर अखंड चालवुन पुर्ण केलेल्या संकल्पाबद्दल वैगेरे वाचुन मी भारावुन गेलो होतो आणि तुम्हाला एकदा तरी भेटायच अस मनाशी ठरवल होत…खरच त्या समान धाग्यामुळेच तर आपण एकत्र आलो..आणि हालअपेष्टा वैगेरे काही नाही हो थोडस थ्रिल आणि ऍडवेंचर….तुमच्यामुळेच हि अविस्मरणीय आठवण मला मिळाली..परत एकदा धन्यवाद….

 7. पुण्यानं तुम्हाला चांगलंच एन्जॉय केलं रे….
  २.३० हे फारच जास्त होतं…खरंच…बाबाजी, अब इस रात को बोरिंग बना दो म्हणायचीच पाळी आली असणार…
  पण खूपच बरं वाटलं रे सर्वांना भेटून…खूप म्हणजे खूपच…आता सहा महिने तुम्हा सर्वांना खूप मिस करणार आहे…अगदी जीटॉकनेही समाधान होणार नाही!

  • खुपच एन्जॉय केल रे पुण्याने..सारख वाकुल्या दाखवत होत येणार पुण्याला परत हं…मलाही खुप बर वाटल रे सर्वांना भेटुन…म्हणुनच तर इतक्या त्राग्यानंतरही एकदम व्यवस्थीत आहे मी…डिसेंबरला येशील तेव्हा भेटुच रे मस्त गुलाबी थंडीत….तोवर हया आठवणी आहेतच सोबत…

 8. मस्त..मलापण माझीच पोस्ट वाचतोय की काय असा वाटला…
  एक शंका तुला कांदिवली स्टेशन कस लागल, आपण तर बोरीवलीला चढलो ना..हे हे 🙂 आवडली रे पोस्ट आणि खरच त्या रात्री मी काय दाबून जेवलोय 🙂

  • काल काल घाईघाईत पोस्ट टाकतांना झाली रे चुक… 🙂 सुधारतो आताच…थेंकु रे…तसाही हॅंग झाला होतो ना तेव्हा..मग कांदीवली काय अन दहिसर काय… 🙂 दोन दिवसाचा उपवास सोडायचा होता ना रे मग काय दाबुनच… 🙂

 9. किती रे धावपळ… एकतर तू फोरेनला राहणारा.. (हा शब्द प्रयोग आपल्यालाच कळणारा) तिकडे घरी जायला गाडी मिळाली हेच नशीब… खरच ग्रेट आहेस… 🙂 आणि हो ट्रेकच्या वेळी कसे करणार आहेस??? सकाळी सकाळी कसा पोचणार आहेस???

  • विरमगाम शेवटची होती नाहितर ’फ़ोरेनेला’ जायला सकाळीच होती गाडी… 🙂
   ट्रेकसाठी जमवेन रे सगळ…शेवटची ओळ वाचलिस ना…”किसि चिज़ को अगर…”
   तुझी डिटेलात पोस्ट आली कि प्लॅन करतो..इतक्या महान भटक्यांना एकाच ठिकाणी भेटायचा योग चुकवतो कि काय…

 10. झक्कास….मस्त धमाल केली आहे!!!

  चांगलीच धावपळ झाली रे!!

  पोस्ट पण भन्नाट झाली आहे.

 11. तु तिकडे लंगडी घालत होतास आणि मी एकटाच तंगडी हाणत होतो .. 😉

  चांगलंच ऍडवेंचर केलस की गड्या..

  मस्त मजा आली यार… बाकी हे पटलं…

  कोण कुठले ब्लॉगर्स…भेटायची काय गरज… पण तरीही आपण एकत्र आलो, का..तर ते एकमेकांशी हळुवार जोडलेल्या ऋणानुबंधामुळे्च… नशिबाच आणि माझ हे दोन दिवस एकदम वाकड असतांना एवढ्या संकटांना तोंड देत मी ही लंगडी सहन केली ती केवळ तुम्हा सर्वांना भेटायच्या ओढीनेच….

  • लंगडी-तंगडी भारीच… 🙂
   खरच खुप मजा आली यार…धन्स रे…तुझ्यामुळेच तर सिंहगड सर केला आम्ही…बाकी ओढ होती म्हणूनच तर भेटलो ना रे…

 12. मस्त पुणेदर्शन घडवलास तू मला बसल्या बसल्या. एक महिना होऊन गेला पुणं सोडून, 😦
  बाकी तुला पुण्यानी मस्त घुमवल असलं, तरी पुणेकरांना पुण्यापासून लांब राहता येत नाही हेच खर.

  • पुण्यान घुमवल ते खर..पण आता ते सर्व आठवुन मस्त मजा येत आहे..खरतर एखादा दिवस येतो असा जेव्हा सगळी समीकरण चुकत असतात…१०० % खर…माझ्याही मनात पुण्याबद्दल लहानपणापासुन आत्मीयता आहे आणि यापुढेही राहणारच…

 13. सही,
  सुरवातीपासूनच खूप धमाल केलेली (झालेली) दिसतेय!
  आणि
  >>ट्रिपल सीट त्यात सागरने एक बॉंब टाकला.’माझ्या जवळ लायसन्स नाहिये
  :))

 14. पिंगबॅक 2010 in review « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.