कधी वाटल नव्हतं…


तुला पहिल्या वेळी पाहिल्यावर
पुढे असं काही होईल, कधी वाटल नव्हतं
तू मला भेटण्याआधी खरंतर
प्रेम म्हणजे काय कधी कळलंच नव्हतं…
.
.
गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं…
.
.
तुझ्या प्रत्येक गोष्टीत
मी असा गुंतेन, कधी वाटलं नव्हतं
तुझ्या त्या अथांग नजरेत हरवून
कसा तुझाच होत होतो हे समजतच नव्हतं…
.
.
तुझा सहवास, तुझा तो स्पर्श
असं वेड लावेल, कधी वाटलं नव्हतं
तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं…
.
.
व्याकुळ होऊन तुझी वाट पाहतांना
कोणासाठी असा झुरेन, कधी वाटल नव्हतं
आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं…
.
.
माझ्या जीवनात कोणी अस हळुवार येऊन
माझ जीवनच बनून जाईल, कधी वाटल नव्हतं
अन माझ्या जीवनातील वाळवंटाची अशी बाग होतांना
अचानक मला जाग येईल असंही कधी वाटल नव्हतं…..

-देवेंद्र चुरी

 

24 thoughts on “कधी वाटल नव्हतं…

 1. पहिल्या प्रेमाची प्रेमळ कविता..
  एक एक भाव गुंफून लिहिलेली
  अप्रतिम झालीये..

 2. “गर्दीत एकटा दिवस पुढे ढकलतांना
  जीवनात अशी बहार येईल, कधी वाटल नव्हतं
  खरंच तुझ्या भेटीनंतर जाणवलं
  आजवरचं जगण हे तर जगंणच नव्हतं”.. …….

  हे सगळ्यात जास्त आवडेश…….

  मस्त…मस्त…मस्त!!!

 3. Khoop sunder…!!!
  >>>तुफ़ान पावसांतही कोरडा राहणारा मी
  हलक्या सरीतही कसा भिजत होतो उमगतच नव्हतं… Mastach… 🙂

 4. मस्त!
  मी ऋहि अजून वाचला नाहीय नीट…इथेच पहिल्यांदा वाचली…
  आवडली!
  आता ह्या विकांताला ऋहि अख्खा वाचायचाय!

 5. मस्त आहे कविता, खूपच आवडली … 🙂
  आपल्या दुराव्याचा तो एक एक क्षण
  असा मरणासारखा छ्ळेल हे खरंतर पटतंच नव्हतं…… फारच छान

 6. आहा रे देवा ….सुंदर कविता…. उगाच बोलतोस कविता
  तुझा प्रांत नाही म्हणून…….मस्तच लिहिलेस……. 🙂

  • धन्स ग ज्यो…अग खरच प्रांत नाही तो माझा कधी तरी जमवतो असच….
   ही कविता इतक्या लोकांना आवडेल,कधी वाटल नव्हत …. 🙂

Comments are closed.