दवबिंदु…


दवबिंदु…ज्याला स्वत:च अस अस्तीत्व नसते…जीवन मिळते तेही क्षणभंगुर…तरीही तो असेपर्यंत चैतन्याची उधळणच करत असतो…आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक क्षणाला तो आनंद वाटत असतो…आकाशातील इंद्रधनुला साद घालतानाही आपली मातीची ओढ कायम ठेवतो…आणि म्हणुनच आपल्या अल्पश्या आयुष्यातही तो खुप जगतो आणि आपली आल्हाददायक छाप मागे सोडतो…हं आता तुम्ही म्हणाल हे सगळ दवबिंदुपुराण मांडण्याच कारण काय …तर तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की  गेल्या वर्षी ३ जुलैला असाच एक ’ दवबिंदु ’ हया ब्लॉगविश्वात अवतरला होता.कधी हसला,कधी रडला, कधी सुस्तावला-कंटाळला पण अपेक्षा नसतानाही वर्षभर जगला.हया दवबिंदुनेही नेहमीच आनंद वाटण्याचा प्रयत्न केला.एकाला (मला) तरी त्याने खुप खुप आनंद दिला.(बाकी तुम्हा समस्त वाचकांवर किती अत्याचार झाले हयाची जाणीव आहे मला.. 🙂 )

तर त्यावेळी  टाइमपास किंवा तसच काहीतरी वेगळ म्हणुन सुरु केलेला हा ब्लॉग कधी माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला कळले सुद्धा नाही.एक वेगळ जीवन इथे जगलो.एक एक करत बरयाच नव्या ओळखी झाल्या…और कारवा बनता गया…खरच इथल्या हया बिनभिंतीच्या घरात  खुप रमलो.खरतर ब्लॉगींगशी काही संबध नव्हता माझा, म्हणजे काही माहिती गूगलतांना एखाद्या ब्लॉगला भेट व्हायची पण त्या ब्लॉगबद्दल काही देणे घेणे नसायचे हव ते वाचायला मिळाल की झाल, पर्सनल अटैचमेंट नव्हती.महेंद्रजींच्या ’काय वाटेल ते ’ मुळे ब्लॉगची खरी ओळख झाली.त्यानंतर सुमारे पाच महिने ब्लॉगजगतात वाचक म्हणुन वावरतांना नेहमी अस वाटायच आपणही काही लिहाव.हे ब्लॉगिंगच जग हळुहळु मला आकर्षित करत होत.पण आपण लिहलेल कोणी वाचेल कि नाही असा प्रश्न पडला पण लगेच सावरल स्वत:ला आणि कोणी नाही वाचल तर आपणच वाचु आपल मन हया ब्लॉगमधुन अशी स्वत:ची समजुत घालुन ब्रम्हदेवाने जशी सॄष्टीची उत्पत्ती केली होती त्या थाटात ३ जुलै २००९ ला हया दवबिंदु ची निर्मीती केली.

सुरुवातीला ऑरकुटवर असलेल्या स्वत:च्या चारोळ्या इथे पोस्ट केल्या,मग हळुहळु माझे विचार,मनातील भावना आणि अनुभव इथे मांडु लागलो.कविता,चारोळ्या,वाचलेली पुस्तक,बघितलेला सिनेमा,माझी भटकंती,तसेच सभोवताली घडणारया काही घटना हयांबद्दल इथे खरडत राहिलो. अस करता करता गेल्या वर्षभरातली ही ८३ वी पोस्ट आहे.काही पोस्ट प्रकाशीत केल्यावर टुकार वाटल्याने  उगाच टाकली असेही झाले.तर कधी खरच मी हे लिहल का अस सुदधा झाल.माझी हया दवबिंदुवरील सर्वात आवडती पोस्ट म्हणजे फ़ॉर माय आइज़ ऑन्ली… सुरवातीला बरयाच अडचणी येत होत्या मग ‘काय वाटेल ते’ मधील  ‘गप्पाटप्पा‘ सदरात महेंद्रजींकडून सोडवून घेतल्या.काही प्रयोग स्वत: ही केले.दवबिंदुच्या विजेटसाठी भुंगा हयांना ट्वीट केल तर त्यांनी दुसरयाच दिवशी एक सोडुन तीन सुंदर विजेट बनवुन दिले आणि त्यातल्याच दोघांच मिश्रण करुन दवबिंदुच हे विजेट तयार केल.’कोणी वाचेल कि नाही’हया माझ्या प्रश्नाला आतापर्यंत मिळालेल्या ३३,७३७ भेटींनी चोख उत्तर दिल पण त्याबरोबर एवढे लोक भेट देतात तेव्हा काहीही लिहुन चालणार नाही हयाची जाणीव झाल्याने जबाबदारीही वाढली.( जाणीव तेवढ्या पुरतीच झाली  कारण मी आपल वाटेल तेच खरडत राहिलो इथे…  🙂 )

ब्लॉग तयार केला तेव्हा स्वप्नात ही कधी एवढ्या हिट्स मिळतील अस वाटल न्वहत.दवबिंदुला सर्वाधिक वाचक मिळवुन दिले ते मराठी ब्लॉग विश्वने.त्याबद्दल खरच त्यांचे आभार.मला हजारो लोकांपर्यत पोहोचवणारया सलील-प्रणव हयांच्या नेटभेटचीही दवबिंदुला हया वाटचालीत मोलाची साथ मिळाली आहे असे मला वाटते. दवबिंदुच्या हिट्स नी जेव्हा १०,००० चा  पल्ला गाठला होता तेव्हा ३४ पोस्टसमधुन दवबिंदुला मिळालेल्या प्रतिक्रिया होत्या फक्त १०१… 😦  पण आता तब्बल ८०४ प्रतिक्रियांनी हा दवबिंदु समॄद्ध झाला आहे.  : )  खरच हया आवर्जुन प्रतिक्रिया देणारयांनीच हया दवबिंदुसाठी प्राणवायुच काम केल.हया प्रतिक्रिया वाचूनच पुढच्या लिखाणासाठी  हुरूप येत गेला आणि हा दवबिंदु आजवर इथे जिवंत राहिला. माझ्या या ब्लॉग ला भेट देणारया सर्व वाचकांचे मी अगदी मनापासुन आभार मानतो.हया दवबिंदुवर असाच लोभ असू दया…

Months and Years

Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec एकूण
2009 3,990 1,982 3,016 2,770 2,753 1,571 16,082
2010 3,453 2,345 2,668 2,323 2,584 3,933 341 17,647

* हा दवबिंदुला गेल्या वर्षभरात मिळालेल्या भेटींचा लेखाजोखा…तुमच्या प्रेमामुळे हया दवबिंदुची वाटचाल अशीच चालु राहील हयाची खात्री आहे मला…

Advertisements

45 thoughts on “दवबिंदु…

 1. अभिनंदन!अभिनंदन!अभिनंदन!

  ब्लॉगच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा….!!!!

  • तुझ्यासारख्यांच्या हया शुभेच्छांमुळेच आजवर लिहत आलो आहे.सुरुवातीला जेव्हा मोजक्याच प्रतिक्रिया यायच्या त्यात काही तुझ्याही असायच्या..थेंकु ग..

 2. Dear Devendra

  Kupchan chhan aahet tuzya kavita aani charoli, tuzasarkhya sundar aahet
  asach kup lihi, mala tuza ya davbindu duniyet kupch nisrgramya vatat

  वाढदिवसाच्या शुभेच्छा.!!!!

  Tuzi friend
  Nisha

 3. Hiii…dada…!!! ABHINANDAN…!!!
  >>>त्यावेळी टाइमपास किंवा तसच काहीतरी वेगळ म्हणुन सुरु केलेला हा ब्लॉग कधी माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला कळले सुद्धा नाही…
  🙂

 4. अभिनंदन आणि हजारो शुभेच्छा!
  दवबिंदूचे दोन फायदे माझ्यासाठी… उत्कृष्ट वाचायला मिळालं आणि तुझ्यासारखा मित्र मिळाला.. जियो मेरे लाल….

  लिहित रहा……

  • आनंद,तुझ्या प्रतिक्रिया नेहमीच माझ मनोबल वाढवत आल्या आहेत…धन्स रे…तु सांगीतलेला दुसरा फ़ायदा मला पण मिळाला…जरुर लिहतो रे असच सोडतो कि काय तुम्हाला… 🙂

 5. ड्यू(दव)ड!
  सही रे..एक वर्षं झालं…अल्टिमेट..
  मला तसा उशीरच झाल तुझा ब्लॉग वाचायला सुरूवात करायला…पण देर आये दुरूस्त आये…
  अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

 6. देवेन, सहीच !!! दवबिंदुला वादिहाहाशु… !! मनाच्या पूर्वक अभि आणि नंदन 😉

  मलाही तुझा “फ़ॉर माय आइज़ ऑन्ली” खूप आवडला होता. आधी मला वाटलं जेम्स बॉंडवर काही आहे की काय 😉 .. हा लेख आणि चेतन भगतवर लिहिलेला लेख हे दोन माझे सगळ्यांत आवडते. हे दोन लेख वाचूनच मी तुझा ब्लॉग फॉलो करायला लागलो.
  असाच मस्त लिहीत रहा आणि उत्तरोतर अनेक वादि साजरे करत रहा.

  • हेरंबा, अगदी मनापासुन धन्यवाद रे….हे अभि आणि नंदन कोण बर… 🙂
   तु नेहमीच प्रतिक्रिया देउन माझा ब्लॉगवर काहीतरी खरडण्याचा उत्साह कायम ठेवलास.तसेच माझ्या पोस्टमधील चुका मला मेलने कळवुन त्या सुधारण्यासही मदत केलीस…धन्स अगेन

 7. देवेन….खूप खूप शुभेच्छा!!!!

  असाच लिहीत रहा….पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!!

  आता केक अन् पार्टी कधी ते सांग???

  • योगेश आभार्स…
   तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे असच लिहत राहण्य़ाचा नक्की प्रयत्न करीन…
   पार्टी जेव्हा भेटु तेव्हा…बाकी वर्चुअल पार्टीसाठी वर आहेच केकचा फ़ोटो..आणि हो तुझ्याकडुनही मोठी पार्टी घ्यायची बाकी आहे… 🙂

 8. अभिनंदन !! लिखाण वाचून वाटत नाही की एकाच वर्षापूर्वी ब्लॉग सुरू केलायस. मस्तच ! आणि तुझ्या विजेट चा HTML कोड काय आहे ?

 9. देवेन,
  ब्लॉगच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा…
  हल्लीच तुमचे काही पोस्ट वाचले…. छान लिहिता.
  पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा

 10. अभिनंदन देवेन्द्रजी… 🙂
  मला पण केक हवा बरं का!!!!! आणि माझ्या प्रत्येक पोस्टला तुम्ही दिलेल्या comment मुळे माझा लिहिण्याचा उत्साह अजूनच वाढतो….

  • धन्यवाद प्रीती…
   तुलाही नक्कीच मिळेल ग केक … 🙂
   (एक विनंती: ’जी’ नको लावु ग पुढे , उगाच म्हातारा झाल्यासारख वाटते…)

 11. पिंगबॅक दोन वर्ष – तीन पावसाळे … | दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.