केल्याने रक्तदान…


आजच्या काळात विज्ञानाने बरेच चमत्कार आपल्याला दाखवले आहेत.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन विज्ञान नेहमीच आपल्याला थक्क करत आले आहे.डोळ्याला न दिसणारया अणुरेणुंपासुन,समुद्राच्या तळापासुन,आकाशगंगेतील नवीन ग्रहांपासुन ते पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गो्ष्टींचा  उलगडा आपल्याला हया विज्ञानाने करुन दिला पण आपल्या अगदी जवळच्या आणि  अविरत कार्य करणारया एका यंत्राचे-मानवी शरीराचे गुढ अजुन विज्ञानाला पुरेसे उलगडता आलेले नाही. आजवर आपण कृत्रीम रक्ताची निर्मिती करु शकलेलो नाही हे एक सत्य आहे आणि हे सत्य जगभरातील वैज्ञानिकांना नेहमीच आव्हान देत राहील आहे.हयामुळेच अपघातामुळे , आजारामुळे किंवा छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया करतांना कोणाला रक्ताची गरज भासल्यास ते दुसरया कोण्या व्यक्तीकडुनच घ्याव लागते,आणि हया गोष्टीचा थेट संबध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणुनच तर  रक्तदानाला विशेष महत्व आहे आणि ते आजच्या युगात ते सर्वश्रेष्ठ दान मानले जात आहे.

मला तरी रक्तदानाचे महत्व पुर्ण पटले आहे म्हणुनच गेल्या चार वर्षापासुन वर्षाला किमान दोनदा तरी मी रक्तदान करत आलो आहे.इथे मी काही स्वत:चा मोठेपणा सांगत नाहीये तर मला हया गोष्टीचा खरच खुप अभिमान वाटतो.तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचण्यास मदत होते आहे ही भावना खरच खुप सुखावणारी आहे.रक्तदान केल्यावर  एक सुट्टी तर मिळतेच शिवाय  चित्रगुप्ताकडील आपल्या खात्यातील पुण्यांची बाकी वाढण्यासही मदत होते… 🙂 ज्या समाजाच आपण राहतो त्याच ऋण फ़ेडायचही एक संधी रक्तदान आपल्याला मिळवुन देते.खर तर हया दानामुळे आपल काहीच कमी होत नाही कारण आपल्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्‍त वहात असते. रक्‍तदानाच्या वेळी त्यातील ३५० मि. ली. एवढेच रक्‍त घेतले जाते. पुढील २४ ते ४८ तासात त्याचीही भरपाई शरीरात होते.रक्तदानामुळे आपल्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते त्यामुळे बरेचसे आजार (रक्‍तदात्याच्या रक्‍तावर व्ही. डी. आर. एच. आय. व्ही. हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया इत्यादी चाचण्या करुनच ते रुग्णाला दिले जाते.) पहिल्याच पायरीवर कळण्यास मदत होते.

अस असल तरी मी कधीही रक्तदान शिबिरात रक्तदान करत नाही कारण मलातरी ही शिबीर विश्वासकारक वाटत नाहीत.  मागे अश्याच एका शिबीरात काम केलेल्या  एका ओळखीच्या व्यक्तीने सांगीतल की रक्तदानाचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांना थ्री स्टार हॉटेलमध्ये पार्टी देण्यात आली होती.असो शिबिराच्या नावाखाली रक्ताचा बिजनेस काही प्रमाणात का होइना चालु आहे असे मला वाटते.आपण तिथे रक्त देतो पण  गरजू व्यक्तिला ते नंतर विकत घ्याव लागत.मी आजपर्यंत एकदाच शिबीरात रक्तदान केल आहे .बाकी सगळ्या वेळी बदली म्हणुनच रक्तदान केल आहे.माझ्या जीवनशैलीप्रमणे माझा रक्तगटही बी + आहे. 🙂 गेल्याच महिन्यात रक्तदान केलेले असल्याने ८ सप्टेंबर नंतरच मी उपलब्ध होणार आहे.तेव्हा कोणाला गरज असल्यास मला जरुर संपर्क साधावा.(bcoolnjoy@gmail.com)खरतर केलेल्या दानाबद्दल कुठे वाच्यता करायची नसते पण तरीही मी इथे हे लिहल आहे कारण हे वाचुन कोणा एकालाही रक्तदान करावेसे वाटले तर हया लेखाचे सार्थक होइल असे मला वाटते.माझ्या मते रक्तदानाबरोबरच लोकांमध्ये नेत्रदान,त्वचादान,देहदान यासंबधीही जागृती व्हायला हवी.कारण आपल हे नश्वर शरीराचा काही भाग आपण मेल्यावर कोणाच्या कामी येत असेल तर चांगलच आहे ना…


रक्तादानासाठी आवश्यक पात्रता:

– १८ ते ६० वयोगटातील कोणतीही स्वस्थ्य व्यक्ती रक्तदान करू शकते.
– वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे.
-हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम टक्क्यांपेक्षा जास्त असावे.
– रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे.
– उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्‍तदान करु नये.
-तसेच मागील १६ वर्षात कावीळ, गेल्या वर्षभरात मलेरिया,कांजण्या किंवा एखादी शस्त्रक्रिया झालेली नसावी.हयाबरोबरच इतरही अनेक आजारांची शहानिशा करावी लागते.


खरतर काल बझवर खालील संदेश आला आणि मला हे लिहावेसे वाटले.त्या मुलीला कालच अनुजा सावे महेंद्र कुलकर्णी हयांनी रक्तदान केल आहे.तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही तिथे संपर्क करुन जरुर रक्तदान करा.

प्राची पाटकर या तरुण मुलीला लहान वयातच एका दुर्धर
आजाराशी लढा द्यावा लागत आहे .आतापर्यंत १७७ बाटल्या
रक्त देण्यात आले आहे;पण अजूनही ओ+ या रक्तगटाच्या
रक्ताची नितांत गरज आहे.जे कोणी रक्तदान करण्यास
इच्छुक असतील ,त्यांनी कृपया ९८२०१ ०९१६७ या क्रमांकावर
…स्मृती पाटकर यांच्याशी संपर्क साधावा

Advertisements

34 thoughts on “केल्याने रक्तदान…

  • त्या क्रमांकावर फ़ोन करुन विचारा …तुमच्या इथल्या कोणत्या हॉस्पीटलमध्ये रक्तदान करुन जर त्या मुलीला मदत करणे शक्य होणार असेल तर जरुर करा…

  • अग हे जगजाहीर असल तरी बरेच लोक अशक्तपणा येइल,काहीतरी आजार होइल किंवा इतर काही गैरसमजामुळे आजही रक्त द्यायला कचरतात…मी स्वत: आजवर अश्या तीन-चार जणांना रक्तदानास प्रवॄत्त केल आहे…म्हणुनच हे लिहावस वाटल…

 1. देव या पोस्टसाठी तुझे मनापासून आभार….

  माझ्या जीवनशैलीप्रमणे माझा रक्तगटही बी + आहे. … माझाही!!!! 🙂

  महेंद्रजी आणि अनुजाचे मनापासून कौतूक!!!

  • अग रक्तदान हया एकुण विषयाबद्दल मला नेहमीच एक जिव्हाळा वाटत आला आहे…आपण कोणाचे तरी प्राण वाचवतो आहे हा विचारच खुप सुखावुन जातो मला..म्हणुन हया पोस्टचा प्रपंच…आणि हो मला कधी रक्त लागल तर मस्कतहुन एक बाटली येइल हयाची खात्री झाली… 🙂

 2. फारच छान विषयावर पोस्ट लिहिलीयस देवेन. आणि तू एव्हढ्या नियमितपणे रक्तदान करतोस, तुझं कौतुकच आहे!
  असाच लिहित राहा!

  • तु प्रयत्न तर केलास ना बस…आता स्वत:च्या तब्येतीकडे थोड लक्ष दे म्हणजे पुढच्या वेळी हे सत्कार्य करतांना तुला काही अडचण येणार नाही…

 3. उत्तम पोस्ट.. रक्तदान हे खरंच एक खूप मोठं कार्य आहे. तू एवढं नियमितपणे रक्तदान करतोस हे ऐकून खुपच छान वाटलं. भारतात असेपर्यंत मीही दरवर्षी नेमाने करायचो रक्तदान…
  अजून एक.. रक्तदान शिबिराबद्दल तुला वाईट अनुभव आला हे ऐकून खूप वाईट वाटलं. असं व्हायला नको. हे फार चुकीचं आहे. पण एका पैश्याचीही अपेक्षा न ठेवता असं काम करणाऱ्याही अनेक संस्था आहेत. आमची डोंबिवलीतली संस्था गेली चौदा वर्षं नेमाने रक्तदान शिबीर आयोजित करते आहे. सुरुवातीला आम्हालाही अशाच शंकांना/प्रश्नांना तोंड द्यावं लागलं होतं. चालायचंच..

  • खुप बर वाटते रे मला रक्तदान करायला…सगळीच शिबीर दुर्व्यवहार करत असतील असे नाही पण मला अस गरजेच्या वेळी देणच जास्त योग्य वाटते…

 4. आपण रक्तदान करता हे तसेच रक्तदानावरही लिहिलेले वाचून आनंद वाटला. गरजेएवढे रक्तदाते अद्याप पुढे येत नाहीत. शिबिरांतून मी सुद्धा रक्तदान करीत नाही कारण काही ठिकाणी योग्य हाताळणी , संवर्धन होत नाही. गरजेनुसार देतो.आता मी साठीला आलो असून आतापर्यंत ३६ वेळा रक्तदान केले आहे. १९८१पासून मी नेत्रदान प्रचार -प्रसार विविध प्रकारे वैयक्तिक पातळीवर करतो. या विषयावर एक एकांकिका , १४ कविताही लिहिल्या असून ही मराठीतील एकमेव अशी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. श्री लंकेसारख्या छोट्या देशावरील आपले लाजिरवाणे परावलंबन नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नेत्रदाने होणे अत्यावश्यक आहे. मी ई मेलने इच्छुकांना ३ भाषांतून सविस्तर माहितीपत्रके पाठवू शकतो. सविस्तर माहिती माझ्या ब्लॉगवरही मिळू शकते.
  श्री.वि. आगाशे, ठाणे.
  माझा ई मेल : shreepad.agashe@gmail.com
  माझा ब्लॉग : http://www.netradaan.blogspot.com

 5. पिंगबॅक जाणीव… « दवबिंदु

 6. KHUP CHAN,KALJALA BHIDNYARYA VISHAYAVAR LIHILAT ANI TEHI
  SAVISTARITYA, DHANYWAD.,TUMHALA ALELA SHIBIRANCHA ANUBHAV KUPACH VAIT VATNYA SARKHA AHE,. PAN ASHIHI KAHI SHIBIR AHET JI KHUP CHANGLYA RIRITIN ANI MOTHYA PRAMANAT KARYA KARTAT SHRI SDGURU ANIRUDHH SAMARPAN PATHKA DWARE AMCHYA KALINA UPASNA KENDRAVAR 5DEC 2010, ROJI, RAKTDAN SHIBIR YOJILE AHE TYA NIMITANE MI KAHI SLOGAN SHODHAT HOTO,KHUP CHAN MAHITI MILALI, DHANYWAD.

 7. धन्यवाद मित्रा…
  माझा मित्र श्री.गजानन देवचके यांचे आग्रहावरून मी जून २०११ मध्ये सर्व प्रथम रक्तदान केले ..आता दर तीन महिन्यांनी नियमित रक्तदान करणार आहे…
  माझा मित्र गजानन देवचके वय-३५ नाशिक याने आता पर्यंत ४० वेळा रक्तदान केले आहे आणि नेहमीच मित्रांना रकड दानासाठी प्रवृत्त करत असतात.. त्याने आज पर्यंत अशा प्रकारे २५-३० मित्रांना रक्तदानाला प्रवृत्त करून ११० चे वर रक्तदान घडवून आणले आहे..

 8. raktadana sarkhe dusare shreshth dan nahi, shree sadguru anirudha samarpan pathaka dware geilych mahinyat megha shibira dware bandra mumbai ithe 4366 bottle rakta jama kel, medicine chalu aslya mule me devu shaklo nahi, hats of to them,

 9. Hi Devendra, This is Nilesh Nagwekar. Firstly, I must say very good drafting.
  Are you aware of “Toastmaster Club” Its a non profit organisation. A Club where one can enhance his/her public speaking & leadership skill. I have completed Project 1 & 2 based on Competent comunication manual. Now I have to give Porject 3 which is ” Get to the point”. I think blood donation will be the right subject for this project. My humble request to you is, can I use this article for my Project 3? where I can pesuade person to donate blood.
  If you give me your ok, May I request you to share the said article in english? if you readily have?

टिप्पण्या बंद आहेत.