कोण्या एके काळी….


कोण्या एके काळी मी नवीन येणारा जवळजवळ प्रत्येक सिनेमा सिनेंमागॄहात जाउन बघायचो.असो काही गोष्टी काळानुरुप बदलाव्या लागतात ना.तर काईटस नंतर बर्याच दिवसांनी गेल्या शुक्रवारी सिनेंमागॄहात जाण्याचा योग आला.सिनेमाचे नाव होते  ’वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’.सुमंत नावाच्या माझ्यासारख्याच  एका फ़िल्मवेड्या मित्राच्या सांगण्यानुसारच ही ’रिस्क’ घेतली होती.तसही माझ सिनेमागॄहात जाण कमी होण्यामागे मोठे मोठे अपेक्षाभंग हे सुदधा एक कारण राहिले आहे.पण वन्स अपॉन.. ने मात्र माझी निराशा केली नाही.

७०-८० च्या दशकात असलेली गुन्हेगारी आणि त्यात कालांतराने होणारे बदल हया चित्रपटात दाखवलेले आहेत. दिग्दर्शकानी कितीही नाही म्हटल तरी हाजी मस्तान आणि दाउद हयांच्या जीवनावरच चित्रपटाची कथा आधारलेली आहे.दाउद आणि त्याचा गॉडफ़ादर हाजी मस्तान हयांच्या भुमिका चित्रपटात शोएब खान आणि सुलतान मिर्झा हया व्यक्तीरेखांतुन अनुक्रमे इ्मरान हाश्मी आणि अजय देवगणने साकारल्या आहेत.चित्रपटाच्या सुरुवातीला १९९३ ची पार्शवभुमी दाखवली आहे आणि  ऍग्नेल नावाचा एक पोलिस ( रणदीप हुडा) आत्महत्या करायचा प्रयत्न करतांना दाखवला आहे.त्याच्याच नजरेतुन मग फ़्लॅशबॅकमध्ये चित्रपटाची कथा उलगडत जाते.सुलतान मिर्झाच बालपण आणि तस्करीच्या जगात प्रवेश हया घटनांतुन त्याच्या व्यक्तीरेखेची ओळख करुन दिली जाते.तो जरी हया गुन्हेगारीच्या जगात असला तरी त्याच्या व्यक्तीमत्वाला चांगल्या विचाराची किनार असते.त्यासाठीच तो ड्रगच्या तस्करी न करता त्याच कारण सांगतो..” सरकार ज्याची परवानगी देत नाही ती काम मी करतो,पण माझ अंत:करण ज्या कामाची परवानगी देत नाहीत ती काम मी करत नाही”.पुढे तो बर्याच लोकांना मदत करत असल्याने त्यांचा मसीहा बनतो.त्याला मुंबईबद्दल विशेष प्रेम असते.त्यासाठीचतो मुंबईतील सर्व गुन्हेगारांना एकत्र बोलवुन आपापसात न लढता जागा वाटुन घेण्याबाबत सांगतो.अश्या प्रकारे हळुहळु तो मुंबईचा अनभिषिक्त सम्राटच बनतो.

तिथे दुसर्या बाजुला शोएब खान नावाचा एका पोलिसाचा मुलगा गुन्हे्गारीजगतातील  ’पॉवर’  बघुन गुन्हेगारीकडे आकर्षीत होतो.तो लहानमोठे गुन्हे करत सुलतान मिर्झाचा आदर्श डोळ्यासमोर ठेउनच तो मोठा होत असतो.दरम्यान सुलतान रेहाना नावाच्या एका सिनेनटीच्या प्रेमात पडतो.तीही त्याची प्रेमाचा स्वीकार करते. इन्सपेक्टर ऍग्नेलला मुंबईतुन गुन्हेगारीतुन मुक्त करायच असते त्यासाठी तो सुलतानची प्रेयसी रेहानावर दबावही आणतो पण ती त्याला चांगलाच गुंगारा देते. दुसर्या बाजुला मोठ्या झालेल्या शोएबचीही मुमताज हया ज्वेलरीच्या दुकानात काम करणार्या एका तरुणीशी प्रेमकथा खुलत असते.ह्यानंतर सुलतान आणि शोएब ह्यांची होणारी भेट दोघांच्याही आयुष्यातील ’टर्नींग पॉंईट’ ठरते.शोएब त्याच्या गुन्हेगारीतील कर्तबगारीमुळे हळुहळु सुलतानचा उजवा हात बनतो.पुढे सुलतान राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतो आणि त्यासाठी दिल्लीला जातांना सर्व कारभार शोएबवर सोपवतो.सुलतानच्या अनुपस्थीतीत शोएब बेलगाम होवुन गुन्हेगारीच्या साम्राज्याला वेगळच वळण देतो.अतिउत्साहाने तो ज्या ज्या वाईट गोष्टी सुलतानने आजवर टाळलेल्या असतात त्या सगळ्या करतो.साहजिकच सुलतान परतल्यावर भर पार्टीत त्याच्या कानाखाली मारुन ह्याबाबत त्याला सुनावतो.इथुनच पुढे शोएबच्या मनात  मुंबई शहराचे दोन राजे होवु शकत नाहीत हा विचार येतो आणि तो सुलतानच्या समोर उभा राहतो.शेवटी मुंबईचा एकच डॉन उरतो, कोण ते तुम्हाला माहिती आहेच.

गँगवॉर असुनही जास्त भडक दॄश्य चित्रपटात नाहीत हे विशेष.तसच चित्रपट एकदम फ़िल्मी असुनसुद्धा कुठेही उगीच लाउड होत नाही. ७०-८० चे दशक सेटवरुन,कलाकारांच्या कपड्यातून,हेअरस्टाईल वैगेरे लहान लहान गोष्टीतुन छान उभ केल आहे.मोजकीच पण श्रवणीय गाणी चित्रपटात आहेत.  ’पि लु तेरे नीले नीले…’ आणि ’ तुम जो आए ’ ही  माझ्या प्लेलिस्टमध्ये सध्या वरती आहेत.अजय देवगणच्या अभिनयाबाबत तर काही बोलायलाच नको.त्याचा वन ऑफ़ दी बेस्ट परफ़ॉर्मन्स आहे.त्याने हया आधी कंपनी मध्ये असल्या प्रकारची भुमिका केलेली असली तरी त्याने उभा केलेला सुलतान मिर्झा आपल्या चांगलाच लक्षात राहतो.इम्रान ,रणदीप,कंगना (खुप भाग्यवान आहे हो ही …का माहीत आहे याआधी मी थेटरात पाहिलेल्या काई्टस मध्येही ती होती.. 🙂 )   आणि प्राची हयांनीही अजयला चांगलीच साथ दिली आहे.अशी सगळी भट्टी छान जमलेली असली तरी सिनेमाची सर्वात मजबुत बाजु आहे ती चित्रपटातील चुरचुरीत संवाद.सिनेमाचा बराच भाग हया संवा्दफ़ेकीलाच वाहला आहे.त्यामुळे एकदम सलीम जावेदची आणि दीवार,जंजीरची आठवण आल्याशिवाय राहत नाही.एकता कपूरने हा चित्रपट काढलेला असला तरी स्त्री प्रेक्षकांना तितकासा आवडणार नाही.मेलोड्रामा आवडणारया आजच्या तरुण पिढीला आणि जुन्या पिढीलाही (हयांनी असे बरेचसे चित्रपट त्यांच्या काळात डोक्यावर घेतले होते ) तो आवडु शकतो. तसा एकदम भारी नाही पण वन्स अपॉन ए टाईम…  वन टाईम वॉच नक्कीच आहे.आम्ही तर चित्रपट पाहुन आल्यावर एकदम शांत राहुन (वातावरण निर्मीतीसाठी) एकमेकांवर  एक एक डॉयलॉग झाडत होतो….

हिमंत बताई नही दिखाई जाती है…..

मैने अपना तरीका बदला है तेवर नही….

दुनिया राख कि तरह निचे और खुद धुए कि तरह उपर…

Advertisements

22 thoughts on “कोण्या एके काळी….

 1. छान परीक्षण.. देवगणचा चित्रपट म्हंटल्यावर वाईट असणं शक्य आहे का? आणि त्यात पुन्हा गुन्हेगारी विश्वातला.. कंपनीवाला देवगण उभा राहिला माझं डोळ्यासमोर.. नक्की बघणार हा चित्रपट !! 🙂

  • अजय देवगणचा अभिनय खरच मस्त झाला आहे हया चित्रपटात….कंपनीतल्या देवगणला हा देवगण नक्कीच खातोय…बाकी मित्रमंडळींबरोबर गेला तरच हा पिक्चर जास्त यंज्वाय करु शकशील अस मला वाटते…

 2. आहा मस्त परीक्षण..
  मी पण गेले काही महिने चित्रपट्गृहापासून दूरच आहे..बघुया कधी जमतय हा बघायला

 3. बघायचा आहे.. आता घरी आलो की बघतो… तो पर्यंत थेटरात राहिला तर नशीब..

 4. बरेच दिवस झालेत सिनेमा पाहिलेला नाही. आता हा नक्की पहाणार . उद्या जातोय अहमदाबादला. रात्रीचा शो नक्की पहाणार.. 🙂

 5. हेरंब +१..

  देवगण आहे आणि उगाच त्या बिचाऱ्याला नाचायला बिचायला लागणार नाहीये असा जरा गंभीर सिनेमा म्हणजे पहायला हवा!!

  पण हेरंब आणि एक आहे तू ’राजनिती’ पाहिला आहेस का?? त्यात तर देवगणच नाही तर नसिरूद्दीन शहा, नाना पण होते ..तरिही खूपसा नाही आवडला तो सिनेमा!!!

  • हो मलाही विनोदी चित्रपटात वैगेरे नाही आवडत अजय देवगण…मात्र गंभीर चित्रपटात तो डोळ्यानेच खुप काही बोलुन जातो…राजनिती त्याला करायचा नव्हता…राजनीतीच्या वेळी झा हयांना त्याने दोन वेळा विचारले खरच माझी गरज आहे का तुम्हाला हया चित्रपटात पुढे झांनी हो म्हटल्यावर तो पटत नसुन सुदधा राजनीतीच्या सेटवर हजर झाला होता….

 6. तू सुरूवातीला मस्त लिहिलं आहेस.. मी सिनेमा पाहीला नाही म्हणुन संपुर्ण वाचलं नाही… सिनेमा पाहिल्यावर पुर्ण वाचेन रे… पण जेव्हडं काही वाचलं त्यावरून सिनेमा पाहणं आवश्यक आहे हे कळलं 😉

 7. मी पाहिला…आणि आवडला सुद्धा…
  आमच्या ऑफीसमध्ये रोज डायलौगबाजी चालू असते…

  कश्तीया लहरोंसे टकराती है, तो ही किनारे नसीब होते है!
  किंवा…
  एक बार सुपारी दे है, तो चुना नही लगाऊँगा!!

टिप्पण्या बंद आहेत.