नागपंचमी…आमच्या घरची.


आज श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नाग पंचमी.आपल्या हिंदु धर्मातील बहुतेक सण हे ह्या काळात येतात त्यांची सुरुवात हया नागपंचमीनेच होते.तर आज सकाळी मला सुट्टी असल्याने घरीच होतो आणि त्यात बाहेर मस्त रिमझिम पाउस पडत होता त्यामुळे आधीच आळसावलेला मी अजुनच सुस्तावुन गेलो होतो.पण तेवढ्यात घरुन आजीचा फ़ोन आला नागपंचमी आहे तेव्हा घरी येउन जा , कंटाळा आलेला असल्याने मी पाउसाचा लटका बहाणा केला पण पाउस थांबल्यावर ये पण येउन जा अस फ़र्मान आजीन सोडल.त्यात आमच्या तिर्थरुपांनीही दबाव आणत मला जायचा आदेश दिला.मग मी आणि माझ्या बहिणीने आजीकडे जायच ठरवल. आमच घर  तस आम्ही राहत असलेल्या कॉल्नीपासुन खुप दुर आहे.म्हणजे अंतरात बोलायच तर तब्बल १२००० मीटर.  🙂  (आमच अहोभाग्य )हया दुर  अंतरामुळे नेहमीच घरी जाण येण असल तरी पाउसाळ्यात ते थोड कमी होत. ते गावाला जायला असलेल्या खड्ड्यातील रस्त्यामुळे.(खड्ड्यांचे आकार बघुन मी त्यांना रस्त्यावरील खड्डे निश्चीतच म्ह्णु शकत नाही ..) गावाला जातांना दोन टेकड्या लागतात त्यामुळे युनिकोर्न नामक घोड दामटत त्यावर रोलरकोस्टर राइड करत सभोवतालच्या डोंगर आणि हिरवळीचा आस्वाद घेत आम्ही आजीकडे गेलो.

तर आमच्या कडे दर नागपंचमीला आमच्या वाडातच असलेल्या बेलाच्या झाडाखाली नागाची पुजा केली जाते.त्यासाठी एका पाटावर तांदुळाने नाग काढला जातो. त्याला पळसाच्या पानाच्या पाच द्रोणात दुध आणि पाच कडधान्यांचा नैवेध्य दाखवुन पुजा केली जाते.त्याचबरोबर तेरड्याची आणि एका वेलीची (नाव विसरलो.. 🙂 ) पण पुजा केली जाते.आजच्या दिवसाला काही चिरायच नाही, कापायच नाही,तळायच नाही,जमीन खणायची नाही ह्यासारखे रीती-रिवाज पाळले जातात.नागपंचमीला एक दिवस आधी आमच्याकडे एक पदार्थ बनवला जातो.त्याला आम्ही भुज्याच पीठ अस म्हणतो.रीतीप्रमाणे आज बहिण आपल्या भावासाठी उपवास ठेवते आणि भावाकडुन बहिणेकडे हे भुज्याच पीठ पाठवल जाते.हे मला खुप आवडते.ते नुसत किंवा दुधात टाकुन खाल जाते.त्याची कृती खाली देतो आहे.

१) रात्री तांदुळ भिजत ठेवायचे.

२) सकाळी ते  भाजुन दळायचे.

३) त्यात गुळ (अगदि लहान करुन) आणि तुप टाकुन परत चुलीवर गरम करुन घ्यायचे.

आजी नागाची पुजा करत असतांना काही बोलत होती त्यात कौरव पांडवांच पण नाव घेतल तिने त्याबद्दल आणि वरील काही रीतींबद्दल तिला विचारल असता ” शास्त्र आहे ” अस  उत्तर तिने मला दिल .तसच तिने माझ्या बहिणीला ही पुजा समजावुन सांगीतली आणि अशीच चालु ठेवण्याची ताकिदही दिली.

साप,नाग ह्यांना आपण कितीही माणसाचे मित्र बोलत  असलो मानत असलो तरी दिसला साप कि  मारा त्याला असच चित्र सगळीकडे आपल्याला पाहावयास मिळते.हयाच कारण विविध गैरसमजांमुळे सापांबद्दल आपल्या मनात असलेली दहशत आहे.हे नागदेवता, लोकांचे तुझ्याबाबतचे गैरसमज दुर होवुन त्यांनी तुला फ़क्त ह्या एका दिवसासाठी नाहीतर वर्षभरासाठी खराखुरा मित्र मानावा ….. एवढीच आजच्या या दिवशी प्रार्थना …

Advertisements

18 thoughts on “नागपंचमी…आमच्या घरची.

  • झंप्या, दवबिंदुवर स्वागत….आज नशीब चांगल होत म्हणुन हा अनुभव पण उद्या स्वातंत्र्यदिनी मात्र कामावर जायला लागणार आहे… 😦

 1. वाह सही यार..मागल्यावर्षी कोल्हापूरला बघितली होती अशी पूजा..
  खरच आमच्या इथल्या शहरीकरणाने असे सण साजरे करताच येत नाहीत..तू नशीबवान आहेस 🙂

  • प्रॉडक्शन युनीट (तारापुर अणुउर्जा प्रकल्प ) आहे ना आमचा त्यामुळे मी नाही तर दुसर्या कोणाला यावच लागेल… तसही हे पारतंत्र्य स्वत:हुनच घेतल आहे ना हया पापी पोटासाठी…आणि बिछान्यावर का हो स्वातंत्र्यदिन साजरा करणार लोक…? हया वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही सह्याद्री रांगात ट्रेकिंगच्या निमीत्ताने भटकत होतो तरी तिथेही आम्ही सकाळी झेंडावंदन केल होत…

 2. मस्तच आहेत रे फोटो…. खरयं रे आजकाल असे सण साजरे करणं दुर्मिळ होत चाललेय…लहानपणी साजऱ्या केलेली नागपंचमी आठवली बघ…. 🙂

  • धन्स ग ताई…. मुलींची तर खुप मजा असायची पुर्वी नागपंचमीला …झोका,फ़ुगडी वैगेरे बरेच खेळ रंगायचे…ती पारंपारिक गाणी…गेले ते दिवस…

 3. 🙂 मातीचे साप करतात आमच्या घरी आणि त्याची पुजा केली जाते . आणि अजून बरेच नियम असतात- चिरायचं नाही, तवा वापरायचा नाही वगैरे … मला वाटत की प्रत्येकच भागात वेगवेगळ्या प्रथा असाव्या.

  • आमच्या इथेही काही घरी केले जातात मातीचे साप..कोणी रांगोळीने काढतात तर कोणी हळदीकुंकवाने…नेटवर मघाशी वाचतांना कोणत्या तरी गावात आजच्या दिवसाला एकमेकांना शिव्या देतात असेही वाचण्यात आले आता बोला….इथे पहा

 4. या वर्षी नागपंचमी विसरले…सगळं कापा,चिरा,तवा काही म्हणून काही सोडलं नाही…असो….या पोस्टच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या…

 5. पूर्वी हे न् कापण्या, चिरण्याचे नियम कटाक्षाने पाळायचो आम्ही. हल्ली काहीच केलं जात नाही 😦

  छान झालीये पोस्ट.. !

 6. देवेन,
  बरेच दिवसांत इथे आलो नव्हतो… आज बघतो तर खूप सार्‍या पोस्ट्स!
  ही पोस्ट बेस्टच झालीय…
  मी कधी नागपंचमीचा सोहळा पाहिलाच नाहीये… तुझ्यामुळे अनुभवायला मिळाला!

टिप्पण्या बंद आहेत.