इमोसनल अत्याचार कंटीन्युज….


तुम्हाला माहित असेलच सध्या ब्लॉगजगतातील खोखो मध्ये काय चालु आहे ते.सध्या नेटची थोडी अडचण असल्याने मी आंतरजालावर जास्त वेळ उपलब्ध नव्हतो त्यामुळे तसा हया खोखो पासुन दुर होतो.पण आपल्या  ब्लॉगजगतातील न्यायाधीश श्री.हेरंब ओक हयांनी मी याआधी वाचकांवर केलेल्या अश्याच इमोसनल अत्याचाराची ( दुरावा,आनंदाचा ऋतु वैगेरे (पुर्वीच्या अत्याचाराचे प्रमोशन… 🙂 )) शिक्षा म्ह्णुन कि काय मला  तोच परत करुन लोकांच्या शिव्याशाप खाण्याची कठोर शिक्षा हया खो च्या स्वरुपात  ठोठावली. 🙂  मग काय आलिया भोगासी म्हणत कामाला लागलो.इंग्लीशवाली मावशी थोडी लांबची म्हणुन हिंदीच निवडली.पण मला नेहमी आवडत असलेली ही मावशी अचानक मा्झ्यावर का रुसली माहित नाही.कोणतही गाण घेतल कि त्यातले काही हिंदी-उर्दु शब्द मला वाकुल्या दाखवत नाचायचे.ते तर सोडाच  सोपे सोपे मराठी श्ब्द पण सुचेनासे झाले होते.कर्णाला परशुरामांनी जसा शाप दिला होता ना ’ जेव्हा तुला हया अस्त्रांची खरी गरज पडेल तेव्हा तुला ह्यांचा विसर पडॆल’ तसा मला तर कोणी दिला नाही ना ते आठवत दिवस काढले.मग बरयाच गाण्यांची चिरफ़ाड केल्यावर शेवटी हया इमोसनल अत्याचारासाठी एक ईमोसनलच गाण निवडल. ’बागबान’  चित्रपटातील गुलजारने लिहलेल्या अमिताभने गायलेल्या “मै यहा तु वहा ” हया विरहगीताचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.खालील अनुवाद वाचकांनी स्वत:च्या ’रिस्क’ वर वाचावा ही नम्र विनंती.चक्कर ,डोकेदुखी वैगेरे सुरु झाल्यास त्याला हा दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  🙂

मी इथे, तु तिथे

जीवन आहे कुठे

तु आणि तुच आहेस

पाह्तो मी जिथे

झोप येत नाही

आठवण जात नाही

तुझ्याविना आता जगताच येत नाही…

.

तुझा चेहरा आता एकही क्षण

का नजरेसमोरुन हटत नाही

रात्र-दिवस तर निघुन जातात

वय हे एकट सरत नाही

सांगायच असुन सुद्धा

सांगु शकत नाही तुला

ही वेदना व्यक्त करु कशी….

.

जेव्हा कधी कोणाची चाहुल लागते

मला वाटते कि तुच आलीस

सुगंधाच्या झोतासारखी

माझ्या श्वासात दरवळुन गेलीस

एक तो काळ होता

आपण नेहमी जवळ होतो

आता फ़क्त हा विरह आणि दुरावा…..

.

त्या क्षणांची आठवण येते

जेव्हा एकटा असतो ग मी

बोलते ही शांतता

लपुन एकटा रडतो ग मी

किती काळ लोटला मला हसुन

अश्रुत लोटलेली ही कहाणी…

तर मी खो देत आहे ते मैथीली (थिंक करुन काहीतरी चांगल लिहेल ही) आणि सेनापती रोहन ह्यांना… ( हया धुरंधरांना एका नवीन क्षेत्रात टॅलेन्ट दाखवायला संधी  🙂 )

आणि एक खास खो प्रमोद देव हयांना… ( आ्म्हाला विविध अंकासाठी लिहायला लावता त्याचा बदला… 🙂  )

आता इथवर आलाच आहात तर लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल हा अत्याचार करुन मी गप्प राहीन तर ते कदापी शक्य नाही.तसाही इथे दोन गाण्यांचे अनुवाद लिहणार होतो पण एकदाच तुम्हाला मारायचे नव्हते.अस अर्धमेल करुन सोडण्यात जास्त मजा आहे ना.  🙂

Advertisements

38 thoughts on “इमोसनल अत्याचार कंटीन्युज….

 1. अरे देव्या.. काय तू…. च्यायला… ह्यो माझा प्रांत नव्हे राजा… 😀 बराय ठीक आहे… बघू काय करता येईल ते.. 🙂

 2. म्या बी नाय त्यातली..माझ नाव मला इचारल्या बिगर का टाकलायसा???ह्ये बर न्हाय…डीलिटुन टाक रे…मला नाय जमायचे ह्ये..

 3. देव माझे अत्यंत आवडते गाणे आहे हे..
  आणि तू योग्य न्याय दिलेला आहेस…. लगे रहो!! 🙂

  • मलाही आवडते म्हणुनच निवडल…न्यायाधीशांचा खो असल्याने योग्य न्याय द्यावाच लागला… 🙂
   ऑफ़ कोर्स ऐसेही लगे रहेंगे… 🙂

 4. mi kavita wachanat tashi shunyach aahe pan mala hya post madhe aalelya saglya itar gosthi aawadlya….for example, कर्णाला परशुरामांनी जसा शाप दिला, बरयाच गाण्यांची चिरफ़ाड 🙂 मैथीली (थिंक करुन….. ani best mhanaje finally tu Senapatila pan guntwale…..lage hato kiti gosthi jhalyat anuwad dharun kalalay ka tula…:)
  karun taak ajun ek anuwad mhorlya weli net suru jhala ki….:)

  • अग बर्याच गाण्यांची चिरफ़ाड खरच करावी लागली …बस क्या.. आपल्या महापराक्रमी सेनापतींना एक नवीन क्षेत्र पादाक्रांत करण्याची वाट दाखवायचीच होती… 🙂
   ते तर येतच राहणार…हे असले अनुवाद टाकुन तुमच्या शिव्या खायचाही शाप मला गेल्या एखाद्या जन्मात मिळालेला आहे अस वाटते… 🙂

  • धन्स महेंद्रजी…कसला हातखंडा हो, मोजुन चार-पाच कविता लिहल्यात हो आतापर्यंत स्वत:च्या (तश्या चारोळ्या खुप पाडल्यात ) …अनुवाद करायचा हातखंडा मात्र आहे… 🙂

 5. हा..हा..ही कविता नुसतीच लिहिली असती तरी ती अनुवादित आहे हे कळले नसते…
  गवय्याचा पोर रडला तरी सुरात रडतो म्हणतात….

 6. सही रे देवेन.. मस्तचं झालाय अनुवाद.. नेहमीप्रमाणेच…
  खो ला मान देऊन आवर्जून अनुवाद करण्याचे केल्याबद्दल मंडळ आभारी आहे..

 7. वाह भारी चालू आहे हा खो खो चा खेळ.. 🙂
  तू तर कविता करतोसच आणि खो मिळायाच्या आधी पण तू मस्त मस्त भाषांतर केली आहेस…हे पण आवडला मस्त..

टिप्पण्या बंद आहेत.