आठवण…


छायाचित्र आंतरजालावरुन साभार...

आठवण तुझी आठवण…

कधी अमॄतासारखी तर कधी एकदम जहरी

जरी असली ती पाउसासारखी  लहरी

तरी वाटते तुझ्यापेक्षा तीच बरी

कारण हवी असते तेव्हा ती येते तरी….

कधी गायला लावते ती सुखद गाणी

कधी डोळ्यात अचानक आणते पाणी

आकाशातले तारे पाहिले कि मला तुझी आठवण येते

खळखळणारे झरे पाहिले कि मला तुझी आठवण येते

फ़ेसाळणारया लाटा पाहिल्या कि मला तुझी आठवण येते

नागमोड्या वाटा  पाहिल्या कि मला तुझी आठवण येते

खोल दरी पाहुन थिजतांना मला तुझी आठवण येते

पाउसाच्या सरीत भिजतांना मला तुझी आठवण येते

बहरलेली फ़ुल पाहिली कि मला तुझी आठवण येते

जरा कोणाची  चाहुल लागली कि मला तुझी आठवण येते

कातरवेळ आली कि मला तुझी आठवण येते

शीतल चांदण पसरल कि मला तुझी आठवण येते

कधी एकांताच्या तंद्रीत  मला तुझी आठवण येते

कधी दाट गर्दीत हरवलो कि मला तुझी आठवण येते

तर कधी कारण नसतानाही अचानक तुझी आठवण येते

मग ठरवल आता तुझ्या आठवणीलाही आठवायच नाही

पण  आज खरच  तुझी खुप आठवण येत आहे

आणी एकदा तुझी आठवण आली…

कि श्वास घ्यायचीही आठवण मला राहत नाही….

-देवेंद्र चुरी

Advertisements

20 thoughts on “आठवण…

 1. वाह सही….आवडली. अशीच असते रे आठवण…

  प्रत्येक अश्रूचा अर्थ दु:ख होत नाही,
  विरहाने कधी नाती कमी होत नाही,
  वेळी अवेळी होतात डोळे ओले,
  आठवणींचा कोणताही ऋतू होत नाही…. 🙂

 2. आठवण खुप छान आहे, आपल्या डोळ्यातले अश्रु त्याचे दगिने बनतात , हेच दगिने त्याची हि आठ्वण बनतात,
  Nice Khup chana aahe, Pan kare sang yevdi aathvan konachi yete

टिप्पण्या बंद आहेत.