एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा


काल रात्री जेवतांना नेहमीप्रमाणे इडीयट बॉक्ससमोर बसलो होतो.कारण त्याच्याशी बहुतांशी जेवतांनाच संबध येतो.तर सोनी वर एंटरटेंमेंट के लिये कुछ भी करेगा लागल होत.अधुन मधुन पाहत असतो मी हा कार्यक्रम,तसा छान आहे.काल फ़रहाच्या जागी सिद्धु आला होता.म्हणजेच भारताच्या इतिहासातील दोन महान (? ) पकाउ शायर परीक्षणासाठी एकत्र बसले होते.तर झाल अस काल एक नवरा बायको त्यात आले होते.त्यात बायको कॉमेंट्री करत होती व नवरा त्याप्रमाणे वेगवेगळ्या हालचाली करत होता.म्हणजे  आता परत मी विडियोत पाहिल्यावर कळल त्या किती कठिण हालचाली होत्या ते.तर हया परफ़ोर्मन्सला अनु मलिकने मध्येच उभ राहुन फ़ुल स्टॉप करुन टाकल.तेव्हा त्या बाइने समजावल कि हे खरच सोप नाहिये,माइंड पॉवर कंट्रोल लागते हे करायला.पण मलिक साहेब आणि सिद्धु साहेब काही ऐकायला तयार होइनात.

(हयात ०२:२० पासुन पुढे बघा.नीट बघितल्यावर कळते त्याने केलेल खरच खुप कठिण आहे …)

मग त्या बाईने अनु मलिक आणि तिथल्या जनतेला पाय एकाच दिशेला फ़िरवत हाताने हवेत आठचा आकडा काढुन दाखवा असे चॅलेंज दिले .तिच्या पतिने तेव्हा तसे करुनही दाखवले.बघा तुम्ही प्रयत्न करुन खरच आपल्यासाठी अशक्य आहे ते.तिच्या हया चॅलेंजवर मलिक साहेबांनी उभ राहुन पाय फ़िरवत दोन्ही हातांनी हवेत पोहायची स्टाईल करुन त्या दांपत्याची खिल्ली उडवली.अनु मलिकच्या हया माकडचाळ्यांवर जनता ही खदखदुन हसली. अरे ते तुमचे अकरा हजार एकशे बारा रुपये नाही द्यायचे कोणाला तर ठिक पण त्यांच्या भावनांचा आदर तरी ठेवा. तिथे हे लोक फ़क्त त्या तुटपुंज्या रकमेसाठी येतात अस मला वाटत नाही ,ते येतात त्यांच टॅलेंट दाखवायला. ते थोड समजुन घ्यायला हव ना.त्यावेळी त्या दोघांचा झालेला तो अपमान पाहुन खरच खुप वाईट वाटत होत.हयात कधी कधी नुसत्या विचित्रपणाला किंवा प्रादेशिकतेच्या नावावर उगाच खुप वाहवा दिली जाते .याआधीचाच एक पंजाबी गाण्यावरचा नाच मला उगाच खुप डोक्यावर घेतल्यासारखा वाटला होता.असो मी नेहमी बघत नाही, पण काल तरी असच चित्र मला दिसल.आणि मला ते बिलकुल आवडल नाही, तेच मांडण्यासाठी ही छोटेखानी पोस्ट…तुम्हाला काय वाटते…

Advertisements

24 thoughts on “एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा

 1. बरं झालं लिहिलंस… मला तर कुठलाही (हो कुठलाही) रियालिटी शो बघायला कंटाळाच येतो.. उठसुठ ती परीक्षकांची भांडणं, नाटकं आणि होतकरू कलाकारांचे अपमान करायचा जाहीर अधिकार !!!

  • हो रे बहुतेक ठिकाणी हेच चालत… मी असले कार्यक्रम नेहमी टाळतोच पण हया कार्यक्रमात काही प्रतिस्पर्धी खरच मस्त कला सादर करतात म्ह्णुन जेवतांना पाहत होतो…बाकी गेल्या वर्षीच्या मराठीतल्या लिटल चॅंम्प्स मध्ये वैशाली आणि अवधुतच परीक्षण मला आवडल होत…

 2. अरे तो अनु मलिक नालायक आहे.अन तो कार्यक्रम मी आधी पहायचो आता मात्र नाही पाहत.
  तुझ्या मताशी मी सहमत आहे.

 3. देवा मी पण पाहिलाय तो भाग…. तरी बरं ती बया नव्हती परवा…. सगळे मिळून उच्छाद मांडतात अगदी…..
  अजूनही बराच स्कोप आहे लिहायला या विषयावर… लिही अजून!!!

  • हो ग लिहता येइल बरच ह्यावर…माझी ही इन्स्टंट पोस्ट…बाकी विषय तुमच्यासारख्या मात्तबर लोकांसाठी खुला आहेच….ती बया असती तर अजुन उच्छाद पण सिद्धु पण काही कमी नव्हता….

 4. मी पण नाही बघत तो शो । मला अनु मलिक चा काय अन् कुठला ही रियलिटी शो बघायला आवडत नाही . पण लोकांना बोलावून त्यांचा अपमान करायचा हे स्वीकार्य असूच सकत नाही . मला असं ही वाटतं कि रियलिटी शो करायचाच तर बाहू बळ , प्रसंगावधान, शोर्य ह्याची कसोटी असावी आतंकवादा शी दोन हात करायला त्याचा उपयोग तरी होईल . तुम्हां तरुण मंडळींना काय वाटतं ?

  • अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरतर मी रियलिटी शो काय टीवीच बघत नाही जास्त..मोस्टली पाहिला तर जेवायच्या वेळी.. त्यातल्या त्यात ’ फ़ु बाई फ़ु’ हा कार्यक्रम बघतो अधुनमधुन…हयासंदर्भात आम्हाला काय वाटणार तसेही रियलिटी शो आहेतच खतरो के खिलाडी सारखे….बाकी हयातुन कोणाचा काही उपयोग होइल कि नाही हा विचार कोणी करत नाही..टीआरपी वाढवायचा आणि गल्ला भरायचा बस्स…

 5. अनु मलीक नाम ही काफी है, महा मुर्ख आहे तो.. इंडियन आयडॉल मध्ये सगळ्यात जास्त पकवतो तो… असो.. बाकी सर्वांचं मत तेच आहे ना…

 6. इंडियन आयडॉल मध्ये अनू मलिकच्या (श्रवणीय??) आवाजात ‘उंची है बिल्डींग’ ऐकायला काय सॉल्लिड मजा यायची ! ‘इंडियन आयडॉल’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ एकाचवेळी चालू आहेत असं वाटायचं ! 😀 😀

टिप्पण्या बंद आहेत.