प्रेमात पडलो आहे मी…


आजकाल मी एकटा आहे कुठे

सोबत चालते आहे कोणी

तीची मला सवय होण्याची सवय आता झाली आहे

हे जे मिळाल आहे जेव्हापासुन तिची भेट झाली आहे

एक थोडया निरागसतेने हॄद्यावर हे संकट आल आहे

ऐक ना जरा…ऐक ना जरा…

हृद्याने सांगीतल आहे,तेवढच मला माहित ,

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना आता

हे काय मला झाल आहे…..

.

.

दवबिंदुच्या थेंबात तु आहेस

मिटलेल्या डोळ्यात  तु आहेस

दहाही दिशात तु आहेस

तु आहेस फ़क्त तुच आहेस

.

हृद्याच शहर तु आहेस

चांगली बातमी तु आहेस

मोकळेपणातल हसण तु आहेस

आयुष्यात कमी होती ती तु आहेस

.

तु आहेस माझी

तु आहेस माझी

काही माहित नाही मला

हेच फ़क्त ठाउक आहे मला

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना

हे काय मला झाल आहे…..

.

.

ढगांवर चालतो आहे मी

पडतो-सांभाळतो आहे मी

खुप इच्छा करतो आहे मी

हरवण्यापासुन घाबरतो आहे मी

.

जागलो ना झोपलो आहे मी

प्रवासी हरवलेला आहे मी

जरा डोक फ़िरलेला आहे मी

बुद्धु थोडासा आहे मी

.

हृद्याने काय करावे

हृद्याने काय करावे

तुझ्या विना…

एवढच मला माहित

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना आता

हे काय मला झाल आहे…..

.

.

हा आहे ’वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सिनेमातल्या ’आय एम इन लव’ हया गाण्याचा अनुवाद.हे गाण चित्रपटात नाहीये.निदान मी बघीतला त्यात तरी नाही.शिवाय प्रोमोजमध्येही कधी ते दिसलेल नाही.पण गाण एकदम अव्वल आहे.ते तुम्हा सर्वांपर्यत पोहोचवाचा हा माझा प्रयत्न,तर जरुर एका.सीडीत ते केकेच्या आवाजात आहे आणि कार्तिकच्या आवाजातही आहे.दोघांनीही गाण्याला योग्य न्याय दिला आहे.कार्तिकचा आवाज खुप प्रॉमीसिंग वाटतो आहे. परत एकदा सांगतो हया गाण्याला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गाण खुप श्रवणीय आहे तेव्हा एकदा तरी ऐकाच…

(हा विडियो खरच एकदा तरी पहा…सुंदर आहे एकदम गाण्यासारखाच..मुबंइतल्याच विनीता दास नावाच्या १९ वर्षाच्या मुलीने तो तयार केलेला आहे.)

Advertisements

30 thoughts on “प्रेमात पडलो आहे मी…

 1. मस्त रे देवेन………… 🙂 अनुवादही जमलाय एकदम आणि एक वेगळे गाणे /माहित नसलेले समोर आणलेस त्याबद्दल आभार राजे!!

  पुढच्यावेळेस कोणी खो दिला तर बिन्धास्त सामोरा जा!! 🙂

  • अग खुप आवडत गाण आहे हे माझ अगदी पहिल्यांदा एकल तेव्हापासुन,ते लोकांसमोर आणायला नको… 🙂
   खरतर काल भुंग्याने हया चित्रपटाबद्दल बझ टाकला तेव्हापासुन वाजत होत डोक्यात मग रात्री उतरवल इथे.
   आणि हे अस सुचते ग..पण खो च्या वेळी उगाच गाडी अडते…

 2. >>>>हे जे मिळाल आहे जेव्हापासुन तिची भेट झाली आहे..हे “हे” म्हणजे काय..तुला डोळे आले ते “ते ” का??????? हे हे हे….म्हणजे आम्ही बरोबर ओळखलं तर !!!!लाली रंग लायी….
  वेल….j/ks aprt…

  खुप क्युट विडीओ आहे…गाणे माझे फेवरेट…

 3. देचु पोस्ट पाहून मला तर वाटलं की तुला प्रेम ज्वर चढला…… 😉

  • पोस्टच शिर्षक अस आकर्षकच टाकायला लागत रे नाहीतर कोण फ़िरकणार इथे… 🙂
   आणि काय चालणार मित्रा, आज चौथा दिवस आहे घरी बसुन राहायचा…. 😦

 4. आयला!! सही अनुवाद केलाय रावसाहेब!!!! मला आधी वाटले की ही कविताच आहे तुम्ही लिहीलेली…… आता कळले की हा तर अनुवाद आहे… जबरदस्त अनुवाद!!!

  • एवढी पण वाईट नाहीये रे… 🙂
   बाकी हा चित्रपट माझ्या सांगण्यानुसार बघितलेल्या काही जणांनी पिडल मला…काय आवड आहे रे तुझी म्ह्णुन… 🙂
   अनुवाद बरोबर नसेल पण गाण एकदम उत्तम..ऐकल नसेल तर ऐकच…

 5. प्रेमात पडलो आहे मी……. buzzvar post ch naav vachun tuza kamandurg ani naina athvali …..mhantal he kay ahe jara vachun baghav……. kho partavayacha prayatna chan jamalay……. anuwad hi chan ahe ani gaan hi chan ahe….. churi saheb lage raho …..

 6. धन्स ग… तुमच्या सगळ्यांच्या मनात तसच चालु होत ना हे डोळे आल्यापासुन म्ह्णुन तसच शिर्षक टाकल… 🙂
  मग काय खो परतवायलाच लागतात,उगाच भार कशाला ठेवायचा….

 7. देवेन, सही गाणं आणि सही अनुवाद.. मस्तच..

  रच्याक, खरंच काय चालू आहे????? 😉

  (वरती उत्तर दिलं आहे असं लिहू नकोस.. मला खरं उत्तर हवंय ;))

  • धन्स रे……
   चल तुला सांगुनच टाकतो…तुला नाही सांगायच तर कोणाला रे सांगायच हेरंबा… 🙂
   तर एक सॉरी वाच…श्वास चालु आहे,स्पंदन चालु आहेत……पण मी चालु नाहीये हं…. 😉

 8. प्रेम कविता म्हणजे आपला वीकपॉईंट रे..
  बाकी ज्यांना हे गाणे माहीत नाही त्यांना गाण्याची आवड नाही हेच खरे…सुंदर गाणे आहे एकदम
  आणि शीर्षक तर मस्तच टाकलेस…मला वाटले तुझी लवस्टोरी पोस्ट करतोस की काय?

टिप्पण्या बंद आहेत.