रोबोटावतार…


ll श्री रजनीकांताय नम: ll

गेल्याच महिन्यात मी स्वामी संकेतानंदांकडुन अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळाच सदस्यत्व घेतल.त्यानंतर महिन्याभरातच देवाजींच्या रोबोटावताराचे याची देहा याची डोळा दर्शन घडल्याने अगदी कॄत्यकॄत्य झालो. तसा मी अनेक देवांचा भक्त पण देवाजींची बातच निराळी. पहिला मी खुप उदास राहायचो,निराश राहायचो,आपल्याला हे जमणार नाही ,ते जमणार नाही अस वाटत राहायच पण जेव्हापासुन देवाजींचे व्रत आचरणात आणले, देवाजींचे चमत्कार पाहिले तेव्हा माझ्यात असा सकारात्मक बदल झाला की अशक्य हा शब्दच मी माझ्या डिक्शनरीतुन काढुन टाकला.(हे टीवीवरील ई-शॉपींगच्या जाहीरातीतील व्यक्ती बोलतात त्या पद्धतीनेच वाचणे.MIND IT…) आता आजचच उदाहरण पहा बरयाच दिवसापासुन ब्लॉगवर काहीही लिहण्यासाठी प्रचंड कंटाळा करणारा मी,काल देवाजीचे रोबोटावतारातील दर्शन घेउन मनातल्या मनात MIND IT असा मंत्र म्ह्णत लागलीच ही पोस्ट लिहायला बसलो.खरच देवाजीचा महिमा अपंरपार आहे.MIND IT मंत्राचा नुसता उच्चार करुन संकटापासुन मुक्ती मिळाल्याची अनुभुती मिळालेले असंख्य लोक आहेत तेव्हा त्याचा महिमा शब्दात काय वर्णावा…

तर काल संध्याकाळी व्यायामशाळेत बजरंग हनुमान आणि दबंग सलमान हया देवांची आराधना करत असतांनाच (चार दिवस झाले हे व्रत सुरु करुन,असाच अधुनमधुन झटका येत असतो आम्हास हे व्रत आचरण्याचा) आमच्या एका परममित्राचा संदेश आला, ’जाम बोर झालोय,पिक्चर बघायला जाउया का’ .आधी असा संदेश आला कि आम्ही सर्वदेवसमभाव तत्वावर जो कोणी देव पडदयावर असेल त्याचे दर्शन घ्यायला जायचो पण आता तसे जमत नाही.पण हयावेळी देवाजीचा रोबोटावतार तर पाहायचाच होता मग लागलीच त्याला होकार कळविला.इकडुन तिकडुन चार टाळकी जमा झाली.दोघांनी रणबीर देवाच्या प्रणयलीला पाहावयास जावु असे सुचविले.पण मी न्युट्रल असलेल्या एकाला हाताशी धरत खिंड लढवली आणि रोबोटावतार का पाहायचा हे त्यांना पटवुन दिले, आणि आमचे ’रोबोट’ पाहणे पक्के झाले.आमच्या हया कार्याची योग्य ती दखल अखिल वैश्विक MIND IT मित्र मंडळाने घ्यावी असे मी इथे नमुद करतो.

फ़ार फ़ार वर्षापुर्वी रजनीयुगात देवाजींनी वसीकरण नामक मानवाच्या रुपात अवतार घेतला होता.वसीकरण अतिशय तल्लख बुद्धीचा शास्त्रज्ञ होता आणि त्याचे सना (ऐश्वर्या ) नामक वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणारया एका कन्येवर प्रेम होते.तर हा वसीकरण दहा वर्षाच्या घोर तपस्येनंतर चिट्टी नामक एका यंत्रमानवाची उत्पत्ती करतो.हा चिट्टी म्हणजे देवाजींचाच दुसरा अवतार.पाश्चात्य देशात अर्नॉल्ड नामक देवाने मागे असाच अवतार घेतला होता.युद्धकुशल, सर्वविध्यापारंगत, अतिशय वेगवान-ताकद्वान आणि तल्लख बुद्धीच्या चिट्टीची उत्पत्ती वशीकरणाने त्याचा आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी वापर व्हावा हयासाठी केलेली असते.चिट्टीही अतिशय आज्ञधारक असतो.मानवात मिसळण्यासाठी वसीकरण चिट्टीला जनमानसात घेउन जातात तिथे वसी सांगेल तेवढच करायच हया तत्वावर चिट्टी वागत असल्याने तो समाजात वावरताना तिथे अनेक विनोद निर्माण होतात.पुढे सना आपल्या अभ्यासात मदत व्हावी म्ह्णुन चिट्टीला आपल्या बरोबर घेउन जाते.तेव्हा तिथे तो नानाप्रकारे तीची मदत करतो.तेथील विविध प्रसंगात देवाजींचे अनेक चमत्कार आपल्याला पाहावयास मिळतात.ते प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे,त्यामुळे त्याबद्दल इथे लिहणे नाही.

राज्याच्या संरक्षणासाठी चिट्टी समर्थ असतांनाही वसीकरणाचेच गुरु (डॅनी) असुयेमुळे त्याला भावना नसल्याने तो कधीही आपल्यावरच फ़िरु शकतो हया सबबीवरुन हया कार्यासाठी त्याला अपात्र ठरवतात.त्यातच चिट्टीमुळेच लज्जीत होवुन एक युवती आत्महत्या करते.मग निराश झालेला वसीकरण सनाच्या सोबतीने चिट्टीमध्ये मानवी भावना टाकण्याचा ठरवतो.प्राचीन युगात ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गीतेमार्फ़त अर्जुनास युद्धासाठी तयार केले होते तसच वसीकरणही चिट्टीमध्ये मानवी भाव रुजवण्यात यशस्वी होतो.मानवी भावना मिळाल्यावर चिट्टी सनाच्या प्रेमात पडतो.सना आणि वसीकरण चिट्टीला खुप समजावु पाहतात,पण चिट्टी सनाच्या प्रेमात इतका आकंठ बुडालेला असतो कि तो त्यांचे काहीही एकण्यापलिकडॆ गेलेला असतो.

अशातच वसीकरण त्याला देशाला समर्पीत करण्यासाठी राज्याच्या संरक्षण दलाकडे घेउन जातो तिथे चिट्टी त्यांना लढाई सोडा प्रेम करा असे म्हणत प्रेमाचीच शिकवण देतो, आणि परत एकदा देशसंरक्षणासाठी अपात्र ठरतो.हया सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेला वसी चिट्टीला संपवायचा निर्णय घेतो.चिट्टी अगदी काकुळतीला येउन मला जगायचय,मी सनावर प्रेम करतो ,मला जगु दे  असे वारंवार म्हणत असुनही वशी एक एक करत त्याच संपुर्ण शरीर उध्वस्त करतो.शेवटच्या क्षणापर्यंत मी सनावर प्रेम करतो म्ह्णत विव्हळणारया रुपात देवाजींना पाहुन अंगावर काटा येतो.चिट्टीला संपवल्यावर वसी त्याच्या शरीराचे अवशेष कचरयात फ़ेकुन देतो.हे अवशेष वशी च्या गुरुंच्या हाती लागतात.

ते आपल्याकडील शक्तीने चिट्टीला परत जिवंत करतात पण त्याबरोबरच त्याला नवीन विध्वसंक शक्तीही प्रदान करतात.हा देवाजींचा तिसरा अवतार.धनाच्या लोभासाठी चिट्टीला बाहेरील राज्यांना विकायचे वसीच्या गुरुंचे स्वप्न असते.पण चिट्टीच्या डोक्यात सनाच्या प्रेमाव्यतिरिक्त काहीच नसते.तो तडक वसी-सनाच्या लग्नसंभारंभात जाउन सनाचे अपहरण करतो.मग चिट्टी वसीच्या गुरुंकडुन यंत्रमानव तयार करायच्या शास्त्राची दीक्षा घेतो आणि त्यांचाच खुन करतो.त्यानंतर एकमागे एक असे असंख्य चिट्टी निर्माण करतो.विष्णु आणि कमल हसन हया देवांच्या द्शावताराने भारावलेलो आपण देवाजींचे असंख्य अवतार पाहुन निशब्दच होवुन जातो.पुढे हे चिट्टीचे सर्व अवतार त्यांच्याकडील विध्वसंक शक्तीमुळे समस्त राज्यात हाहाकार माजवतात.हया असंख्य चिट्टींचा बंदोबस्त करण्यासाठी वसीकरण त्यांचच रुप घेउन त्यांच्यात सामील होतो.पुढे देवाजींचा हा एक चांगला अवतार देवाजीच्या असंख्य वाईट प्रवॄत्तीच्या देवाजींच्या अवतारांबरोबर कसा लढा देतो ते पडदयावर पाहणेच उत्तम…

तब्बल १७० कोटी खर्च करुन तयार केलेला हा चित्रपट ’सबकुछ रजनी’ असा आहे. अभिनेता, सहअभिनेता, खलनायक असे यत्र-सर्वत्र प्रत्येक फ़्रेममध्ये रजनीचे दर्शन घडते.त्यामुळे रजनी भक्तांसाठी तर हा चित्रपट पाहाणे ही एक पवर्णीच आहे.रजनी रोबोटच्या रुपात असल्याने रजनीभक्तांच्या बरयाच आशा तो लिलया पुर्ण करतो. मेकअपचा प्रभाव धरुनही हया वयातला रजनीचा उत्साह आणि अभिनय वाखाखण्याजोगाच आहे.त्यामुळेच त्याच्या नेहमीच्या स्टाईलशिवायही तो आपल्याला भारावुन टाकतो.ऐशवर्या फ़क्त नावासाठी आहे.मला तरी तिचा अभिनय एकदम नवख्या अभिनेत्रीसारखा वाटला.बाकी डॅनीने त्याच्या वाटेला आलेला रोल यथावकाश पार पाडला आहे.रेहमानच संगीत असुनही हया चित्रपटातील एकही गाण मला आवडल नाही.गाण्यांच चित्रीकरण मात्र मस्त झालय.चित्रपटात वापरलेल्या तंत्रज्ञानाचा शेवटी थोडा अतिरेक झालेला असला तरी इतर वेळी ते छान वापरल आहे.

चिट्टीचे देवळातील,मच्छरांबरोबरील तसेच शेवटी स्वत:ला संपवितांनाची प्रसंगदृश्य छान जमुन आली आहेत. चित्रपटातील शेवटी म्युझिअममध्ये ’इतका जबरदस्त असुनही हयाला का तोडल’ हया एका मुलीच्या प्रश्नाला चिट्टी्ने दिलेले ” मै सोचने लग गया था” हे उत्तर खुप काही सांगुन जाते. आमच्यातलाच एक चित्रपट संपल्यावर रोबोटमधील चुका काढुन हॉलीवुडचे गुणगान करत होता. तेव्हा मी त्याला चांगलच खडसावल.अरे हॉलीवुडमध्ये आहेत चांगले पिक्चर्स आपण तिथुन कॉपीही करतो पण म्ह्णुन काय नेहमी आपल्या इकडच्या चित्रपटांना नाव ठेवायची का.हाच रोबोट हॉलीवुडमध्ये बनला असता तर तुमच्यासारखया हयातील चुका काढणारयांनी त्याला डोक्यावर घेउन नाचवल असत.साम मराठी वर नाव माहीत नाही पण एक कार्यक्रम येतो त्यात हॉलीवुडमधील मोठ्यामोठ्या नावाजलेल्या चित्रपटातील चुका शोधुन दाखवल्या जातात तो कार्यक्रम एकदा पहा.असो तामीळनाडूतील जवळपास सर्वच चित्रपटगृहांत हा प्रदर्शित झाला असून पुढील अडीच महिन्यांचे ‘शो’ ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत.मुंबईतही ’अंजाना-अंजानी’कडे पाठ फ़िरवत तरुण मंडळी रोबोट ला स्विकारत असल्याच चित्र बरच काही सांगुन जाते.

रजनीकांतएवढी रसिकप्रियता आजतागायत कोणालाही मिळालेली नाही.सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये त्याची नोंद केली गेली आहे.टाईम्स मॅगझीन ने रजनीकांतला जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे ते नुसते नाही.त्याच्या हवेत सिगरेट उंच फेकून तोंडात पकडणं, शिलगावणं,वेगवेगळ्या स्टाईलने गॉगल घालणं,जोरदार डॉयलॉगबाजी पाहतांना प्रेक्षक वेडेच होवुन जातात.एकट्या तामिळनाडूतील त्याच्या फ़ॅन्सची नाही तर फॅन्स क्लब्जची संख्या ३५ हजारांहून अधिक आहे.

चित्रपट सेटवर गेला नाही म्ह्णुन पैसे परत करणारा,चित्रपट पडल्यावर वितरकाला नुकसान होवु नये म्ह्णुन जबरदस्तीने त्याला स्वत:कडील रक्कम देणारा,आपल्या उत्पादनातील जवळपास अर्धा भाग चॅरिटीसाठी वापरणारा, आपल्या चाहत्यांमध्ये आहे त्या स्वरुपात मिसळणारा,स्वत:च्या प्रतिमेचा वापर करुन पैश्यासाठी जाहिराती करुन लोकांना न भुलवणारा असा दुसरा कोणी अभिनेता आहे का,आणि मला वाटते हेच त्याच्या लोकप्रियतेच कारण आहे.तर असा हा खरया अर्थाने सुपरस्टार आणि बॉस असलेला रजनी म्हणजेच शिवाजीराव गायकवाड हा मूळचा एक मराठी माणुस आहे.त्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा.मुळ महाराष्ट्रीय असुनसुद्धा ज्या लोकांनी ज्या जागेने त्याला मोठ केल त्या लोकांना तो कधीच विसरला नाही त्यांच्याबरोबर त्यांच्यातलाच बनुन राहीला, आणि म्ह्णुनच तिथल्या जनतेनेही त्याला देवत्व बहाल केले आहे.

देवाजींचा रोबोटावतार पाहुन घरी आल्यावर बझावर गेलो तर पाह्तो काय तिथे भुंग्याच्या (भुणभुणणारा नाही) रुपात भुवई उडवुन देवाजींनी मला परत दर्शन दिल.नंतर पाहिल तर भुंग्याचा तो बझ देवाजींबद्दलच होता.देवाजींच्या अगणीत लिलांमधील ९९ लिला तिथे सादर केल्या होत्या पण कोणी समाजकंटकाने त्याला उगाच ’जोक्स’ अस शिर्षक दिल होत.असो काय फ़रक पडतो त्या ९९ लिला देवाजींच माहात्म्य सांगण्यात समर्थ आहेत.

तेव्हा बोला, ” रजनीदेवाच्या नावान MIND IT अण्णा…!!!”

Advertisements

49 thoughts on “रोबोटावतार…

 1. देवाजींचा महिमा अपरंपार आहे.
  जय रजनी भव:

  देवाजी चा रोबो थेटरात स्टाल मध्ये बसून पाहिला. …….. आहाहा…. पब्लिक शिट्यांवर शिट्या वाजवत होत रे…….

  • योगेशा, आमच कार्य तर काहीच नाही ,देवाजींसाठी असंख्य लोक काहीही करायला तयार आहेत.
   बाकी आमचा सत्कार होवो न होवो,त्या मंडळाचा प्रसार आम्ही असाच करत राहणार…Mind It … 🙂

 2. पिंगबॅक Tweets that mention रोबोटावतार… « दवबिंदु -- Topsy.com

  • संजयजी संकेतानंद्स्वामींच्या संकेतस्थळावर देवाजींची पुर्ण आरतीच दिलेली आहे…जरुर भेट द्यावी…आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार….

 3. अरे इथे बंगलोरमध्ये “रोबोट” प्रदर्शित झाला त्या दिवशी थेटरबाहेर देवाच्या भल्या मोठ्या कटआउटवर दूधाचा अभिषेक केलांनी.

  • धन्स रे सागरा….
   देवाजींचा हात होता ना डोक्यावर…बाकी आपल्या गुंडा गॅंगमधल्या सगळ्यांनी बघायचा हा चित्रपट,लवकरच फ़तवा काढु या… 🙂

 4. ll श्री रजनीकांताय नम: ll
  रजनीभक्ताने त्यांची केलीली सर्वात उत्तम भक्ती आहे 🙂
  असेच त्यांच्या भक्तीत लीन रहा

  MIND IT
  MIND IT
  MIND IT

  • आभार मित्रा…आमच काय आहे हयात सर्व त्यानेच करवुन घेतल आहे हे आमच्याकडुन…रजनीदेवाय नम:
   ते तीनदा MIND IT वाचुन तीन वेळा मान फ़िरवत हातवारे करणारया विक्रमाचे रुप समोर आले… 🙂

 5. mind it… मस्त आवडला लेख. खुपंच छान. तुमची भक्ती पाहून गदगदून आले..

 6. रोबोट-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर ग्रेट्भेट….आणि मराठी फिल्लम ही म्हणे करणार…..आपला तर दिल अगदी खुश झाला.

 7. हा हा हा… मी आता गुंडा, दबंग आणि ……….. रोबोट बघणार नाही यावर शिक्कामोर्तब झालं.. माईंड इट 😉

  रच्याक, सगळ्या प्रतिक्रिया बघून ब्लॉगर आणि प्रतिक्रिया लिहिणारे हे सगळे मुंबईचे चेन्नईचे आहेत असा आमच्या मनी दाट संशय आहे !!! 😛

   • हेरंबा,कर्ता -करविता तो आहे…तुझ्यासारख्या अनेक नास्तिकांना त्याने योग्य वेळी योग्य मार्ग दाखविला आहे…तुझ्यावरही होइल देवाजींची कृपा…MIND IT…. 🙂

   • देवाजींचे भक्तगण यत्र-सर्वत्र पसरलेले आहेत …जपान ,जर्मनी अशा अनेक देशात देवाजींना खुप मानले जाते..तेव्हा तेथील सर्व भक्तजनांना चेन्नाईचे असे म्हणायचे का…असो चेन्नाईकर म्हणा किंवा मुंबैकर आमची श्रद्धा काही कमी होत नाही…. 🙂

 8. ॥ श्री रजनीकांत प्रसन्न ॥

  श्री .देवेन्द्र चुरी यांस ,
  स. न. वि.वि .
  पत्र लिहीणेस कारण की अस्मादिकांस आपल्या रजनीभक्तीप्रसाराची तळमळ दिसून आली.आपण देवाजींच्या अवतारकार्याचे साक्षीदार होण्याचे पुण्य प्राप्त केले हे कारणविशेष . तसेच रजनीव्रताचे पालन व प्रसार करणे हे देखील आम्हांस संतोषी करून गेलेत.
  आपल्या या रजनीभक्तीला सन्मानित करण्याहेतूने “MIND IT मित्र मंडळाने ” आगामी सार्वजनिक रजनीकांतोत्सवात आपले जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. रजनीभक्तीचा प्रसार करणेसाठी “MIND IT मित्र मंडळ” आपले आभारी आहे.
  कळावे. लोभ असावा.
  आपला स्नेहाकांक्षी ,
  ——————
  (सचिव, MIND IT मित्र मंडळ)

  “एक मुखाने रजनी नामाचा गजर करा…….बोला………….
  रजनीकांतजींच्या नावाने………. MIND IT अण्णा !!!!! “

  • ॥ श्री रजनीकांत प्रसन्न ॥
   योगेशा, तुझी वाणी खरी ठरली रे…बघ “MIND IT मित्र मंडळाने ” आगामी सार्वजनिक रजनीकांतोत्सवात माझा जाहीर सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे…हया बहुमानाबद्दल “MIND IT मित्र मंडळाचे ” मी अगदी मनापासुन आभार मानतो…हा आनंद मी इथे शब्दात काय लिहु…असो मी मंडळाला रजनीव्रताचे पालन आणि प्रसार असाच चालु ठेवेन हे वचन देतो …बोला रजनीकांतजींच्या नावाने………. MIND IT अण्णा !!!!!

  • देविदासजी दवबिंदुवर स्वागत….आपण सिनेमागॄहात मनोरंजनासाठी जातो आणि देवाजी ते करतात बस्स…लोक कितीही बोलले तरी रजनीउत्सवापासुन दुर राहणे त्यांना जमत नाही हेच प्रत्येक रजनीउत्सवाच्या वेळी दिसुन येते…

 9. (यथावकाश ऐवजी यथाशक्ती म्हणायचं होतं का आपल्याला).
  परीक्षण झकास. मी कालच पाहून आलो तो पण तमिळ मध्ये. मच्छरांचा संवाद अजिबात आवडला नाही.

  • होय..दुरुस्ती करतो…चिट्टीने तेच मच्छर पकडण्यासाठी केलेला खटाटोप आवडला..हिंदीत त्यावेळचे संवाद इतके अजिबात न आवडण्यासारखे नक्कीच नाहीत….

   दवबिंदुवर आपल स्वागत आणि आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार…

 10. सध्या आमचा कुठलाही उत्सव नसल्याने आम्ही बंधुसंप्रदायाचे उत्सव तितक्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. कारण आमचा संप्रदाय खूपच सहिष्णू आहे!
  त्यामुळे लवकरच आम्ही रजनीसंप्रदायाचा हा नवा उत्सव लॅपटॉपवरच (नाईलाजाने) साजरा करणार आहोत!
  पोस्ट मस्त जमली आहे!

  • धन्स रे बाबा…आमच्या देव्हारयात प्रभुजींची मुर्तीही आहे…तुझ्या टेस्टी मध्ये त्याबद्दल लिहल आहे मी…प्रभुजींचा गोलमाल-३ येतोय…त्या उत्सवाचीही आम्ही अशीच मजा घेणार…

 11. पिंगबॅक दोन वर्ष – तीन पावसाळे … | दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.