एमएलएम…


गेल्या आठवड्यात एका मित्राचा फ़ोन आला,म्हणाला ’तुझ्याकडॆ एक काम होत १५-२० मिनटे मिळतील का तुझी ? ’ नेहमी सहज मला येउन भेटणारया त्याने हयावेळी इतका फ़ोन करुन माझा वेळ मागीतला हा विचार करतच त्याला होकार कळवला आणि त्याची भेट घेतली.हा मित्र आमच्याच ऑफ़िसमधला माझ्या दीड वर्ष आधी त्याने ही कंपनी जॉइन केली आहे.हाय-हेल्लो औपचारिकता झाल्यावर तो मला अपेक्षीत असलेल्या मुद्द्यावर आला,म्ह्णाला ’माझ्याकडे एक स्किम आहे..’ त्याच्या डोळ्यात मला माझ्या डोक्यावर बकरयाची शिंग असलेली माझी छवी दिसल्याने मी हसतच म्हटल चल सांग लवकर. ’….कंपनी आहे,अमुक-तमुक….१० हजार टाकलेस कि वर्षभरात ४६००० मिळतील.कंपनी पोस्ट डेटेड चेक पण देत आहे. ’ मी त्याला म्हटल खरच ’तुला वाटते ही कंपनी इतके पैसे देइल ? ’ तो म्ह्णाला ’हो १००% गॅरंटी आहे यार’ मग त्याला म्हटल मग एक काम कर मी तुला पैसे देतो तु तुझ्या नावाने चेक दे मला,माझा त्या कंपनीवर विश्वास नाहीये.हयावर अरे ती कंपनीची स्किम आहे मी कसा देवु तुला चेक मी त्याला म्ह्टल तुला १०० % विश्वास आहे ना कंपनी वर म्ह्णुन चल मग मला फ़क्त २५००० दे वरचे तुझ्याकडेच ठेव.मग आमच्यात बरीच चर्चा झाली.आपणच एक एमएलएम सुरु करु इथपर्यंत त्याला घेवुन गेलो.त्यानंतर त्याने मला नमस्कार केला आणि गेले चार-पाच दिवस माझ्या आसपासही तो फ़िरकलेला नाही. 🙂

खरतर मी सुद्धा एमएलच्या हया चक्रव्युहात मागे अडकलो होतोच.तीन वर्षापुर्वी मी आरएमपी नावाची एक एमएलएम जॉइन केली होती.म्हणजे मला बचतीसाठी काही पैसे गुंतवायचे होतेच त्यात हया एमएलएमची हवा चालु होती,आणि ती जॉइनिंग म्हणुन बजाज अलायंजची पॉलीसी पर्याय म्ह्णुन देत होती.बाकी आमीष समोरच्याने दाखवली होतीच तेव्हा चला इथुनच काढुया पॉलीसी म्हणत जॉइन झालो.पण जेव्हा त्या पॉलिसीची कागदपत्र मला मिळाली तेव्हा मला धक्काच बसला माझ्या दहा हजारातील फ़क्त साडेतीन हजाराचे युनीटस मला मिळाले होते.मार्केटिंग तर कधी जमलच नाही पण इतर आकर्षणांना भुलुन दोन ठिकाणी हात शेकल्यावर मात्र मी हया एमएलएमचा थोडाफ़ार अभ्यास केला.एमएलएमच्या अश्या अनुभव आणि निरीक्षणानंतर मला कळलेले काही मुद्दे खाली लिहतो आहे.

-असाच एखादया दिवशी तुमचा मित्र किंवा नातेवाईक ’तुझा थोडासा वेळ हवा आहे’ किंवा ’एक बिजनेस/स्कीम आहे माझ्याकडॆ’ अस फ़ोनवर किंवा प्रत्यक्ष येवुन बोलतो.

-कधी कधी तर ही मंडळी आपल्याला त्या एमएलएमच्या सेमीनारलाच घेवुन जातात.नाहीतर एखाद्या हॉटेलात घेउन जातात.(जास्त खुश होवु नका, इथुन निघतांना बिल झालेल असत फ़क्त दोन चहाच 🙂 )

-तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल तुमच्या स्वप्नांबद्दल चर्चा होते.जन्माला गरीब/मध्यमवर्गीय आहे्स ह्यात तुमचा काही दोष नाही पण मरतांना पण तुम्ही तसेच राहिलात तर तो सर्वस्वी तुमचाच दोष आहे. ह्या प्रकारचे ’फ़ंडे’ देवुन इथेच तुम्हाला पटवुन दिले जाते कि तुमच्या हया नोकरीतुन तुम्ही तुमची स्वप्न पुर्ण नाही करु शकत त्यासाठी काहीतरी वेगळ करण्याची एखाद्या साईड बिजनेसची  खरच गरज आहे.

-मग पुढे सुरु होतो खरा खेळ,हयात सुरुवातीला तुम्हाला एखाद उत्पादन कारखान्यातुन तुमच्या हातात येइपर्यंत त्याची किमंत कशी वाढत जाते ते सांगीतल जात,बहुतेकवेळा १ रुपयाच कोल्ड्रिंक तुम्हाला १० रुपयाला कस विकल जाते त्याच उदाहरण देवुन हाच पैसा ही कंपनी तुम्हाला देते अस म्हणत सुरु होते कंपनीच प्रेजेंटॆशन.. बिजनेस प्लॅन… अमुक अमुक कंपनी आहे,सहामहिन्यात/वर्षात डबल,भारत सरकारच रेजिसट्रेशन, कित्येक लोक लखपती झालीत,ही सुरुवात आहे पुढे बघ,खाली दोन लोक आणली तर अमुक अमुक बोनस,डायरेक्ट रेफ़रल बोनस,पेअर/मॅच बोनस,स्टॅम्प पेपरवर करारनामा, पोस्ट डेटेड चेक्स,तु दोन लोकांना नाही सांगु शकत हे ते ही त्यांच्य चांगल्यासाठीच,नाहीतर मी आहेच ना तु फ़क्त जॉइन कर,तीन चार लोक तयार आहेतच ती लगेच टाकतो तुझ्याखाली…..अस पुराण सांगीतल जात.वेगवेगळी पेजेंटेशन्स दाखवली जातात. पण कंपनीच्या उत्पादनाबद्दल, बॅलेन्सशीट बद्दल काहीही सांगीतल जात नाही.

-त्या क्षणाला तुमच्यावर त्याच्या बोलण्याचा जबरदस्त प्रभाव पडलेला असतो,बस हीच आपल्या साठी एक संधी आहे वर यायची असे वाटुन तुम्ही त्याला लागलीच हो कळवता.त्याच्याकडॆ फ़ॉर्म तयार असतोच तो मासा गळा लागला हया आनंदात लगेच तो फ़ॉर्म तुमच्याकडून भरुन घेतो.

-बरीच लोक हया पेजेंटेशनच्या प्रभावाने लगेच ’देर ना हो जाये कही’ म्हणत जॉइनिंग करतात आणि काही तासातच त्यांची चुक त्यांच्या लक्षात येते.त्यातले काही मग तिथेच थंड पडतात तर काही स्वत:चे पैसे तरी वसुल करायला हवेत म्हणुन दोन बकरयांच्या शोध घ्यायला सुरुवात करतात.

-ह्यांच्या सेमीनारमध्ये गेलात तर तुमच कल्याण झाल अस समझाच,स्टेजवरच मोठ्या मोठ्या गाड्या (भाड्याने आणतात कि काय ठाउक नाही ) सुटाबुटात अनेक जण असतात.सगळे एक एक करुन मी हया कंपनीमुळे कसा यशस्वी झालो ते सांगतात,मला इतक्या लाखांचा फ़ायदा झाला,ठरवलेल्या प्रचंड टाळ्या(बहुतेक नवीन बकरे लवकरच कापले जातील हया खुशीत),तिथला एकुण थाटमाट,वातावरण बघुन त्यांची व्यक्तव्य ऐकुन भारावलेल्या तुमचा लगेच धुममधील उदय चोप्रा होतो. 🙂

-कितीही नाही म्हटल तरी प्रत्येकाच्या मनात कुठेना कुठे कमी जास्त प्रमाणात आहे त्यापेक्षा वर जायचा, झटपट पैसे मिळवण्याचा हव्यास असतो.तुमच्या हया लोभाचच रुपांतर हया कंपन्या त्यांच्या लाभात करत असतात.एकुणच एमएलएमचा बिजनेस माणसाच्या हया  नैसर्गिक प्रवॄत्तीवर,मानसिकतेवर आधारलेला आहे.

-सर्वात महत्वाच म्हणजे एमएलएमच्या फ़सवणुकीच्या अनेक बातम्या सातत्याने येउन सुद्धा नवीन एमएलएम आली की ती बातमी  वाचलेली तशीच आधी फ़सलेलेही काही लोक परत एकदम उत्साहात ती नवी एमएलएम जॉइन करतात.

-बहुतेक वेळा हया एमएलएम मधील अनेक ’कंडीशन्स’ तुम्हाला जॉइनिंग केल्यावर सांगीतल्या जातात.

-बरयाच कंपन्या सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी पदरचे पैसे घालुन काही महिने लोकांना नियमीत चेक पाठवतात.बरेच लोक ते चेक्स बघुन टॉप अप मारतात.स्वत:च्या नावाने परत एंट्री करतात.

-गुगलबाबांना विचारल तर तुम्हाला कळेलच भारतात किती एमएलएम म्हणजेच मल्टीलेवल मार्केटिग कंपन्या कार्यरत आहेत ते.सरासरी शेकड्यांनी अश्या कंपन्या आहेत.हयात नेहमी काही कंपन्या लुप्त होतात आणि काही नव्या येतात.मला तर वाटते.आधी डूबलेल्या एमएलएमचेच प्रमोटर्स ही नवी कंपनी घेवुन असावेत.

-अपवाद म्हणून ऍमवे सारख्या उत्पादनावर आधारित कंपन्या वर्षोनुवर्षे चालु आहेत,पण त्याच्या उत्पादनाच्या किमंती खरच परवडण्यासारख्या निश्चितच नाहीत.

-खरच उत्पादकांच्या प्रसारासाठी सुरु झालेल्या नगण्य कंपन्या सोडल्या तर बहुतेक एमएलएम हया लोकांच्या ईजी-मनी मिळवण्याच्या मानसिकतेचा फ़ायदा घेण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात.त्यांनी दाखवलेल प्रॉडक्ट फ़क्त  नावापुरती असते.

-हयांना दुसरया एमएलएमसबंधी विचारल असता आमची एमएलएम वेगळी आणि उत्कृष्ट आहे अस त्यांच म्हणण असत.

-बरयाच एमएलएम कंपन्यांमध्ये त्यात स्वदेशी,ग्लोबल वार्मींग किंवा काहीतरी देशसेवेसंबधीत उत्पादन असल्याचा आव आणुन तिला उगाच समाजसेवेच सोंगही दिल जात.

-परदेशात अश्या एमएलएम यश्स्वीरीत्या चालु आहेत कारण त्यासंबधी काही कायदे तिथे बनलेले आहेत.

-सर्वसाधारण आकडेमोडीनुसार हया एमएलएमच्या साखळीतील शेवटच्या दोन पातळीवरील लोकांची संख्या एकुण संख्येच्या ७५ %  असते.म्हणजे कोणत्याही क्षणी कंपनी डुबली की त्यातील ७५ %  लोकांच्या हातात एकही चेक आलेला नसतो.

-बरयाच कंपन्या अगदी दोन-तीन हजाराच्या योजनाही आणतात.लोक मग एक चान्स तर घेउन बघु गेले तर गेले म्हणत अश्या योजनात पैसे गुंतवतात.मार्केटमध्ये भाजी किंवा सामानखरेदीत एक-दोन रुपयांसाठी घासाघीस करणारी लोक हया कंपन्यांच्या प्रलोभनामुळे आंधळी होवुन दोन हजार रुपये चक्क जाउ दे म्हणतात.

-एमएलएम मध्ये अडकलेली लोक ही एमएलएमची पट्टी डोळ्यावर बांधुन जेव्हा काही लोक आपल्या नातेवाईकांच/मित्रांच भल करायला जातात 🙂 , तेव्हा त्यांच्याकडुन नकार  ऐकुन उगाच हयांना वाईट वाटते.’तुला एवढ फ़ायद्याच सांगतो आणि तु…’ अस म्हणत कधी कधी भांडणही होतात.कधी हयाच्यामुळे माझे पैसे बुडले हया भावनेनेही वाद उदभवतात.एकुण हया एमएलएम मुळे नात्याचे/मित्रांचे सबंध बिघडु शकतात.काही लोक हया एमएलएम वाल्यांना दुरुनच टाळतात तसेच सार्वजनिक गप्पांमध्ये ह्यांचे किस्से ऐकुन चांगलाच हशा पिकतो.एकुणच आपल्या लोकातील, समाजातील  आपली प्रतिमा बदलुन जाते.

-आपले पैसे वसुल करण्यासाठी नवीन जॉइनिंग व्हाव्या म्हणुन लोकांना लोभ दाखववण्यासाठी  आपल्याला हयातुन खुप लाभ होत आहे असे खोटही बोलाव लागते.

-हया एमएलएम कडे भाड्याची ऑफ़िसेस आणि वेबसाइट सोडुन इतर काहीही ऍसेट नसतात,म्हणजे कधीही गाशा गुंडाळालायला हयांना रान मोकळे असते.

-खरच हया एमएलएमच उत्पादन एवढच जर चांगल आहे तर पारंपारिक मार्गाने किंवा एखाद्या चांगल्या कंपनीशी करार करुन किंवा एखाद्या वित्तीय संस्थेला आपले मुद्दे पटवुन त्यांच्याकडुन सहाय्य घेउन ते ही उत्पादनांची विक्री का करत नाहीत.

-गुंतवणुकीवर आधारित असलेल्या कंपन्या ज्या वर्षभरात दुप्पट,तिप्पट पैसे करुन द्यायचे आत्मविश्वासाने सांगतात त्यांनी माझ्या मते त्यांचा जो चमत्कारिक प्लॅन आहे त्याबाबत टाटा-अंबानी किंवा आरबीआय लाच विश्वासात घेवुन त्यांचा पैसा दुप्पट-तिप्पट करावा.तुमच्याआमच्याकडुन  पाच-दहा हजार रुपये घेवुन ही लोक स्वत:च टँलेंट वाया घालवताहेत. 🙂

-हया एमएलएमच्या पिरॅमीडसदॄश्य संरचनेमुळे जेव्हा ती बंद पडते तेव्हा जास्तीत जास्त लोकांचा पैसा त्यात गुंतलेला असतो.एखादी बोलबच्चन व्यक्ती दहा-वीस लोकांना पटवुन दहावीस हजार कमीशन कमवतेही,पण त्यासाठी ओळखीच्या लोकांची किती रक्कम त्यांच्यामुळे असल्या फ़ुटकळ कंपनीकडे गुंतवली गेली आहे हे त्यांना समजत नाही.

-बहुतांशी सर्वच एमएलएम ह्या नवीन बकरयांच्या साखळीवर अवलंबुन असतात,उत्पादनाच त्यात काही देणघेण नसत.फ़क्त वितरकांची संख्या वाढवत जायच बस मग त्यांच्याच रकमेतील काही भाग त्यांच्या वरच्यांना देवुन उरलेला भाग कंपनीकडे पोहोचला जातो.नव्या जॉइनिंग बंद,कंपनी बंद.आमच्या इथे हया एमएलएमचे वारे खुप वाहत असतात.प्रत्येक दोनतीन महिन्यांनी नवी एमएलएम येत असते.जो ती घेउन येतो त्याला त्याच्या खालच्या  दोघातिघांना सोडुन कोणालाच त्यात फ़ायदा होत नाही.फ़ायदा तिघांचा,तोटा शेकडो लोकांचा आणि महिन्याभरातच कंपनीच नाव गुंतवलेल्या पैश्यासगट गुल.बाकी हया एमएलएम करणारया अनेक लोंकाच्या मोटीवेशनल स्कील्स बघुन मला तर अस वाटते,जिहाद वैगेरे सारख्या संघटना ब्रेनवॉशींगसाठी हया एमएलएममधलीच माणस रिक्रुट करत असावीत.

– सर्वसाधारणपणे गुंतवणुकदार कंपनीत पैसा गुंतवतो,कंपनीमालक कामगारांच्या साहाय्याने उत्पादन करुन ग्राहकांना वस्तु पुरवतात.हयात गुंतवणुकदारांना कंपनीच्या कामगिरीप्रमाणे रीटर्न्स मिळतात.कामगारांना रोजगार मिळतो,ग्राहकांना त्यांच्या वस्तु मिळतात.हे सर्व सांभाळुन कंपन्या नफ़ा कमावत असतात. याउलट एमएलएममध्ये आपण पैसे गुंतवतो.(गुंतवणूक)कंपनीच प्रॉडक्टस़च प्रमोशन करतो. (कामगार)प्रॉडक्टही विनापर्याय घ्याव लागत. (ग्राहक) पण हाती काहीच लागत नाही.

खरच पैसे मिळविण्यासाठी कोणताच झटपट मार्ग नाही.उगाच मेहनतीने कमवलेले पैसे हया लबाड लोकांच्या घशात का म्ह्णुन घालायचे.पैश्यांची रिस्कच घ्यायची असेल तर मार्केट खाली पडायची वाट बघुन दोन-चार ब्लूचिप कंपन्यात गुंतवणुक करावी.हया ब्लुचिप कंपन्या कधी ना कधी चांगले रिटर्न्स देतातच .संदर्भासाठी हे वाचुन पहा.नाहीतर मग करोडपती होण्यासाठी मी मागे एकदा माझ्या हया ब्लॉगवरच सांगीतलेली ही स्कीम जॉइन करा. 🙂

Advertisements

36 thoughts on “एमएलएम…

 1. डोक्याला त्रास असतो हे MLM … मी २ वेळा वेगवेगळ्या मित्रांबरोबर जाऊन पकून आलेलो आहे… 🙂 अजिबात नादाला लागू नकोस हा…

 2. हे हे नाव ऐकूनच माझ्या मित्राबरोबर घडलेला प्रसंग आठवला..असाच अनुभव. एमलएम ऐवजी एलएमएन घे…म्हणजे थंडा रे 😉

 3. एकदम कैच्याकै परफेक्ट आणि सगळे मुद्दे कव्हर होणारं लिहिलं आहेस. आता कोणी एमएलएम वाला माझ्याकडे आला तर त्याला ही लिंक देईन आणि सांगेन की सगळ्या यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं असल्याशिवाय पुन्हा तोंड दाखवायला येऊ नकोस.

  मला हे प्रकरण काय असतं ते उत्सुकता म्हणून बघायचं होतं. म्हणून काही वर्षांपूर्वी अशा एका सेमिनारला गेलो होतो. असला वैताग आला ना. आणि नन्तर जो मला तिथे घेऊन गेला होता त्याला असला धुतला ना की बहुतेक त्यानेही अ‍ॅमवे सोडलं असेल.. 😉

  >> -परदेशात अश्या एमएलएम यश्स्वीरीत्या चालु आहेत कारण त्यासंबधी काही कायदे तिथे बनलेले आहेत.

  अजिबात नाही.. इथेही त्या बुडीतखात्यातच आहेत. इथे तर पिरॅमिड स्कीम्स चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे !! त्यामुळे ते लोकं वेगवेगळी नावं वापरून ते पिरॅमिड वाले कसे नाहीत हे दाखवत असतात.. आणि इथे तर त्यांचा यथेच्छ सुळसुळाट असतो. मॉल्स, ट्रेन स्टेशन वगैरे वगैरे सगळीकडे..

  जाम मोठी झाली प्रतिक्रिया.. मलाही किती दिवसांपासून या वर लिहायचं होतं.. पण तू सगळं कव्हर केलंयस त्यामुळे नव्याने लिहायची गरज नाही.. म्हणून मग माझी पोस्ट लिहिण्याची उर्मी या प्रतिक्रियेतच भागवून घेतली असं समज 😉

  • हेरंबा खुप दिवसापासुन लिहायच होतच रे हया विषयावर…तुझी उर्मी इथे भागवलीस चांगल आहे.. 🙂 आमच्या इथे आताही असे वारे वाहत आहेत ना हया एमएलएमचे काय सांगु तुला.मी शक्य तितक्या लोकांना सांगायला बघतो कि दोन महिन्या आधी त्या एका एमएलएमच नाव कस जोरात होत आता काही ऐकतोयस का तिच्याबद्दल..हे आणि अस बरच पटवुन पण लोक मुर्ख बनतातच.परदेशात एमएलएम खुप चालतात हे त्यांनी त्यांच्या प्रेजेंटेशन्समध्येच दाखवल होत आकडॆवारीनुसार(बहुतेक फ़ेकच असावी).बाकी भारतात पिरॅमिड स्कीम्स वर अजुन बंदी आलेली नाहीये.FTC ने तिथे एमएलएम संबधी काही कायदे करुन ठेवले आहेत त्यामुळे थोडा तरी अंकुश असेल ना..इथे रान मोकळ आहे…

   The FTC states “Steer clear of multilevel marketing plans that pay commissions for recruiting new distributors. They’re actually illegal pyramid schemes. Why is pyramiding dangerous? Because plans that pay commissions for recruiting new distributors inevitably collapse when no new distributors can be recruited. And when a plan collapses, most people – except perhaps those at the very top of the pyramid – end up empty-handed.”

 4. देवेंद्र, इथे अमेरिकेत पण अशी लोक भेटत. ओरेगावात आल्यापासून भेटली नाही म्हणून मी लिहिणार होते बर झाल तू लिहिलस ते….मस्त झालीय पोस्ट….बाकी ह्या लोकांबद्दल काय सांगायच काही काही एकदम गेंडा कातडी असतात….

  • अग खरच..मागे एकदा एक जवळचा मित्र अशे स्कीम सांगायला आला होता त्याला समजावुन एकदम त्याच्या अंतरात्म्याला साद घातली होती कि स्वत:लाच विचारुन बघ तु कमीशन कमावतोयस पण तुझ्या ओळखीच्यांचे किती पैसे गुंतवतो आहेस तुला कळतेय का..उद्या कंपनी बंद पडली तर तोंडावर नाही पण मनातुन त्यांचे शिव्याशाप मिळतील ना तुला…वैगेरे वैगेरे सांगीतल्यावर तो एकदम भावुक होवुन रडायला आला होता.माझ्यासमोर त्याने त्याच्याकडे भरलेले दोन फ़ॉर्म फ़ाडून त्या दोन व्यक्तींना तस कळवल होत.पण नंतर त्याच कोणी कस परत ब्रेनवॉश केल ठाउक नाही पण तो परत हे धंदे करतांना दिसला.म्हणजे गेंडा कातडीचे हे लोक दुसरयांनाही ती कातडी देत असतात… 😦

 5. Hello Devendra,
  I am reading first time your blog..
  Its very informative
  Me too have same Experience..
  I lost my good friend and 10,000rs for this
  Sometime we say yes to these schemes for sake of relations
  People emotionally blackmail you.
  The person who told me these scheme was ICICI manager
  who quit his 8 yr job. He was saying that Shahrukh’s Wife is also following the scheme 🙂
  Hmmm..big response..thanks 4 reading

  • प्रसाद, दवबिंदुवर आपल स्वागत…आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार..
   तुमचा मित्र भारीच आहे आयसीआयसीआयच मॅनेजर पद सोडल एमएलएम साठी..खरच किव येते अश्या लोकांची..शाहरुखची बायको पण ही स्कीम फ़ॉलो करते…काहीही फ़ेकतात हे,त्यांना माहित असत आपण थोडीच जाउन डिटेलात चौकशी करणार आहेत त्याबद्दल..बाकी हया स्कीम्समुळे चांगले सबंध बिघडतात हे मात्र नक्की…

   • No No.. Actually my friend was ONGC employee who was frnd of that guy (ICICI) and he was under his spell…Tumchya post pramane mala eka mall madhye neun presentation denyat aale..agadi same way as you described..some gold coins or Travel vouchers..but bottom-line is same…if we oppose it then Response is like this : “you wont have big dreams in life” , “I was also unsure abt scheme but I excelled in it later”, “You can communicate with ppl if u try hard which in turn make you successful businessman”.. “Some abc guy has made 1 Cr in two yr”..Some happy face photos and good reviews abt scheme…
    I just remembered that day when I read your post and gave this big comment once again.. 🙂

    • एमएलएम एमएलएम म्हणजे एमएलएम असत
     जिकडे तिकडॆ सेम असत…. 🙂

     थोड्याफ़ार प्रमाणात असच असते सगळीकडॆ वातावरण एमएलएम सेमिनारच…
     त्यांचा अजुन एक डायलोग एक डायरी घ्या..तुमच्या जवळच्या लोकांची नाव आणि फ़ोन न. लिहा…तुमच्यावर विश्वास असणार कोणीतरी असेलच ना त्यात..नाहीच जमत असेल तुम्हाला बोलायला तर डायरेक्ट आमच्याकडॆच घेउन या पण त्यांना एमएलएमच नाव सांगु नका… 🙂
     थॅक्स परत एकदा मोठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙂

 6. excellent..

  Ideal muddesood lihile ahes.

  Majhi ashi ichchaa aahe kee jastit jast lokanni he vachaave.

  Mee poorvee struggle period madhe MLM company kadoon paise kamavale hote..

  Aschry vatoon gheu nakos..tyancha member houn paise khaddyat ghalayachaa vicharhee mee karu shakalo naahi. mee paise kamavale te phakt asha company sathi online member manage karnyache software banavoon.

  Mag anek companys te software maagayala alya. 2 3 jananna dilehee.

  Payment matr eka company che milale. Bakichya tar adheech dead jhalyaa. Arthaat sarv companyaanche life kahi mahine suddha navhate.

  Sudaivaane he online software pratyaksh vaparale gele naahi ani bicharya lokaanchya lubadnukit nakalat sahbhag honyapasoon mee vachalo.

  To code nantar konalahi dila nahi.

  10 varshapoorvivhee gosht aahe. MLM madhoon kahi paise milavnyache he rare example..:-)

  software banvtana tya companys chya logic madhla moorkhpana aani profit chi imposibility mala jitaki detail madhe samajali tyache varnan karayachi garaj nahi.

  Ha dhanda fraud ahe he shabdaat patavane avghad. pan te tu itakya perfect shabdaat mandles ki kya kehne. Lajavaab.
  ha lekh me khoop jananna refer kareen.

  • मी इथे लिहल आहे खर पण खुप जणांना हे मी प्रत्यक्ष सांगुनही काही फ़ायदा झाला नाही.खरच शब्दात हे पटवण ते ही जवळच्या व्यक्तीला कठिण आहे 😦
   मलाही वाटते जास्तीत जास्त लोकांनी हे वाचाव.तुम्ही ह्यात मदत करणार आहेत त्याबद्दल धन्स…
   बाकी तुम्ही कमालच केलीत..चक्क ह्यांच्याकडुन पैसे काढले ..सहिये… 🙂

 7. >>>>ऍन्टी एमएलएम ऍजंट हे मस्त आहे 🙂

  पोस्ट उत्तम देवा… सगळे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेस!!

  मला या असल्या प्रकाराचा कायम वीट येतो, कसले लोचटपणा करतात हे MLM वाले लोक!!! तरिही एकदा नव्हे तर चक्क दोन वेळा असे बुडीत खाती पैसे घालावे लागलेत कारण एजंट होणारे महाभाग माझे दिर होते, त्यामूळे बळीचा बकरा आम्ही ठरलेलो, बरं आम्हि असल्या लिंक्स कधिही वाढवणार नसलो तरी निदान मेंबर व्हा ही गळ!! तिसऱ्या वेळेस मात्र स्पष्ट नकार दिला….

  एका हॉटेलमधले सेमिनार मात्र अटॆंड केलेय मी दिराबरोबर…. गमतीशीर अनूभव असतो पण नव्याने करियर करणारे मुलं जेव्हा या भुलाव्यांच्या मागे धावताना दिसतात तेव्हा वाईट वाटते!!!

  • तन्वीताई, मला पण ते लिहतांना एकदम जेम्स बॉंड वैगेरे झाल्यासारख वाटत होत.. 🙂
   बाकी हया स्कीम पटत नसल्या तरी जवळच्यांना नाही सांगुन दुखवण (कारण तेव्हा ते समजण्याच्या स्थितीत नसतातच ) खरच जड जाते.मी माझ्या जवळच्या मित्रामुळेच ह्यात पडलो होतो.
   >>नव्याने करियर करणारे मुलं जेव्हा या भुलाव्यांच्या मागे धावताना दिसतात तेव्हा वाईट वाटते!!!
   हो ग खुप वाईट वाटते त्यांच्याबद्दल…

 8. बहुतेक एमएलएम कंपन्यांचा पिरामिड ढासळतो आणि हे मला चांगलच ठाऊक आहे. म्हणून मी कधीही यांच्या मागे लागत नाही आणि त्यांनासुद्धा मागे लागू देत नाही.

  • भारत,मला पण हे तेव्हाही जाणवल होत पण स्वत:ला आवरु शकलो नाही,खर म्हणजे समोरच्या त्या व्यक्तीला नाही म्हणू शकलो नाही…पण आता नाही जुमानत कोणालाच…एमएलएम करणारे आणि मला ओळखणारे आता माझ्या नादी लागत नाहीत उलट दुरच पळतात… 🙂

 9. MAHODAY,TUMCHA ABHIPRAY SAMAJALA.CHANGALA NAAD ,BISUNESS AAHE.JYALA OOPCHARIK PANA YET NAHI TYANE NAKKICHA HA BUSINESS KARAVA..CHURI SIR,AAPLYA VEDANA SAMAJATAT.

  KALAVE. AAAPALA VACHAK. ………SANJAY MANE.

  • मानेसाहेब प्रतिक्रियेबद्दल आभार…कोणता बिजनेस करावा अस म्हणायच आहे आपल्याला…मात्र मी सांगीतलेली करोडपतीवाली स्कीम एकदम पक्की आहे..माझ्या कडे हया एमएलएम जॉइनिंगच्या बदल्यात बजाज अलायंन्सचा तीन लखाचा विमा तरी आहे..मला वेदना होतात ते बरेच लोक सर्रास हया जाळ्यात फ़सत आहेत ते पाहुन…माझ्या एका मित्राने गेल्या महिन्यात युनिपे नावाच्या एमएलएम मध्ये १ लाख रुपये गुंतवले आहेत.उद्या कंपनी बंद झाली तर…ही काही छोटी-मोठी रक्कम नाही किंवा दोन नंबरचा फ़ुकटचा पैसा नाही…खरच वाईट वाटते हे सर्व पाहुन म्ह्णुन हि पोस्ट लिहायचा खटाटोप…

 10. हे लोक एकदम भारी असतात…पण एकदा माझा एक अत्यंत गरजू असा मित्र सुद्धा हे सांगायला मला आला होता, तेव्हा त्याला कटवताना मला खूप वाईट वाटलं होतं.
  एकदम मुद्देसूद लिहिलं आहेस…भारी!

  • धन्स रे विद्याधर,खरच जवळच्यांना नाही सांगुन दुखवण (कारण तेव्हा ते समजण्याच्या स्थितीत नसतातच ) खुप जड जाते.त्यांची अगतिकता पाहुन वाईट वाटते पण काय करणार…

 11. देवेंद्र,
  खुप छान झाली आहे पोस्ट.
  मी एकदाच अनिच्छेने एका MLM चा सभासद झालो, कारण माझ्या मागे लागलेला माझा जवळचा नातेवाईक होता ! मला माहित होत माझे पैसे बुडणार पण फार नव्हते त्यामुळे वाईट वाटले नाही. वाईट याचे वाटले कि तो नातेवाईक माझे न ऎकता या अशा स्किम मध्ये बराच बुडला.
  एकदा मला असेच बोलावणे आले होते सेमिनार साठी, मी नाही म्हटल्यावर म्हणाला फक्त सेमिनारला आलात तर एक गिफ्ट मिळेल. संध्याकाळी जायचे होते त्यामुळे फिरत फिरत गेलो. मी व माझा परिवार सर्वच गेलो. तिथे गेल्यावर नेहमी प्रमाणे त्यांची पोपट पंची सुरु झाली. मी माझ्या मुलींना अगोदरच शिकवले होते मी तिथे बोलत असताना भूक लागली असे म्हणा. उद्देश होता त्या कारणाने बाहेर पडणे सोपे व्हावे. त्यांनी त्या प्रमाणे खायचा हट्ट केल्यावर त्या कंपनीच्या माणसांनी काय हवय खायला हे विचारल. मुली “पिझ्झा” म्हणाल्या. बिचार्‍याने पिझ्झा आणुन दिला. थोड्या वेळाने माझ्या साठी चहा आणल्यावर मुलींनी “कोल्ड कॉफी” मागितली. सर्व खाणे-पिणे झाल्यावर आम्ही निघालो, तर मुली म्हणाल्या आमची गिफ्ट द्या. गिफ्ट मिळाल्यावर (जवळपास रु. ३००/ची) आम्ही निघालो !
  अशा प्रकारे आम्ही पण या बदमाषांना धडा शिकवला .

  • अजयजी, दवबिंदुवर आपल स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार…
   मला वाटते अर्ध्यापेक्षा जास्त लोक जवळच्या लोकांना न दुखवण्यासाठीच ह्यात सहभागी होतात.बाकी तुम्ही मस्त धडा शिकवला ह्यांना… 🙂

 12. पिंगबॅक एमएलएम… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

 13. खूप खूप छान हे असे लोक आले होते माझ्या कडे पण, मी नाही म्हणून दूर झाले खरच खूप छान लिहिले आहे, मुद्दा पण खूप छान आणि current affairs मधला आहे

  • स्नेहल,बर झाल नाही म्हटलस त्यांना वाचलीस,खरच हया लोकांपासुन पिच्छा सोडवण कठिण असत कारण हे लोक तुमच्या कोणत्या तरी जवळच्या माणसाला ढाल बनवुनच आलेले असतात.प्रतिक्रियेबद्दल धन्स ग… 🙂

 14. आता कुणी मला अशा स्कीमबद्दल सांगेल तर मी त्याला तुझ्या लेखाची लिंक देणार. अतिशय मुद्देसूद लेख झालाय!!.
  मी हा सगळा अनुभव घेतला आहे. पण कधीच फसलो नाही. कारण या स्कीम्सचे मुलभूत फंडे मला माहित होते फार आधीपासूनच. अशा स्कीम्सची माहिती ऐकतांना माझे कान पोकळ नळी बनतात. एका बाजूने माहिती येते,दुसऱ्या बाजूने जाते.मी माझ्या एका मित्रालापण या भानगडीत पडण्यापासून वाचवलंय.दुसऱ्याला हात पोळून घेतल्यावर अक्कल आली. अजूनही लोक फसतात म्हणजे कमालच आहे!!

 15. पिंगबॅक दोन वर्ष – तीन पावसाळे … | दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.