मिस.मुंबई आणि मिस्टर पुणे…


हया पोस्टच शिर्षक पाहुन तुम्हाला वाटल असेल कि मी इथे एखादया सौंदर्यस्पर्धेविषयी लिहतोय पण तस नाहीये. बरयाच दिवसापासुन ब्लॉगवर (नेहमीच्याच कंटाळ्यामुळे ) काही लिहल जात नव्हत.ड्राफ़्टसची संख्या मात्र वाढत चालली होती.अस असतांना नुकताच सतीश राजवाडेंचा ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट पाहण्यात आला,आणि दहापंधरा दिवसापासुन लिहायला आलेल्या जडत्वावर मात करुन छोटेखानी का होइना ही पोस्ट टाकण्याची उर्मी मला मिळाली.तस दीड वर्ष प्रेमाने वाढवलेल्या ह्या दवबिंदुला जिवंत ठेवण्यासाठी, नेहमीच येणारया ह्या माझ्या कंटाळ्याला झटकण्यासाठी, मला नेहमी अशी कुठुन तरी प्रेरणा घ्यावी लागते.

ती (म्हणजे आपली मिस.मुंबई) आईच्या सांगण्यानुसार मुंबईहुन पुण्याला लग्नासाठी मुलगा पाहायला येते.ती दिलेला पत्ता शोधतांनाच गल्ली क्रिकेट खेळणारया मुलांमधील फ़लंदाजी करत असलेल्या त्याला (हा आपला मिस्टर पुणे) पत्त्याबाबत विचारते आणि क्लीन बोल्ड होवुन त्याची विकेट जाते.ही त्या दोघांची पहिली भेट.त्याने सांगातलेल्या पत्त्यावर ती जाते पण त्या घराला कुलुप असते.त्यात तिच्या मोबाईलची बॅटरी लो झाल्यामुळे ती मैत्रीणीला ह्याबाबत सांगण्यासाठी एका दुकानात जाते.दरम्यान तिला पुणेरी बाण्याचा चांगलाच अनुभव येतो.तिथे परत तिला तो भेटतो.हि त्यांची दुसरी भेट.मग तिच परतीच तिकिट संध्याकाळच असल्याने ’अनोळखी शहरात मुलीला अस एकट सोडण्याचे संस्कार नाहीत आपल्यावर’ म्हणत तो तिला मदत करायच्या निमित्ताने दिवसभर तिच्याबरोबर पुण्यात फ़िरतो.

आंतरजालावरुन साभार.

इथेच चित्रपटाला खरी सुरुवात होते.(हे वाक्य असायलाच हव नाही का सिनेमाच्या पोस्टीत. 🙂 ) दोघांनाही आपापल्या शहराबद्दल म्हणजे मुंबई आणि पुण्याबद्दल सार्थ अभिमान असतो.त्यातुनच दोघांची तु तु मै मै सुरु होते.मुंबई-पुण्यातील बरयाच बाबींचा उहापोह करत दोघांच आपल्या खाजगी जिवनातील गोष्टींबद्दल, पुर्वायुष्यातील प्रेमप्रकरणाबद्दलही बोलण होत.संवाद,वादविवाद वैगेरे करत करत, खुलत जात ते हळूवार एकमेकात गुंतत जातात.तिच अर्णव प्रकरण आणि त्याच सुंचि प्रकरण,त्यांचा मुंबई-पुणे वाद,त्याने ती बघायला आलेल्या मुलाच्या पत्त्यावरुन त्या मुलाचा उल्लै्ख हॄद्यदयमर्द्यम असा करण,ती ने त्याला विचारलेला प्रश्न ’आर यु अ वर्जिन’ आणि त्यावरच त्याच उत्तर,’किती बोलतुस तु ,दम नाही लागत तुला’ ह्यावर च्याक करत त्याच ’मेड इन पुणे’ बोलण असा चित्रपट रंगत जातो आणि शेवटी ती ज्या मुलाला बघायला आलेली असते त्यालाच पसंत करते.खरतर हया चित्रपटाबद्दल लिहण्यासारख काही नाही,एका ओळीत सगळ सांगुन होइल,पण चित्रपटात जे काही आहे ते प्रत्यक्ष पाहुन अनुभवाल तेव्हांच त्याची लज्जत तुम्हाला कळेल.

चित्रपटाच्या प्रत्येक फ़्रेममध्ये फ़क्त तो, ती आणि त्यांची बडबड बस.नाही म्हणायला सोबतीला सिंहगड,सारस बाग,दगडुशेठ गणपती,तुळशी बाग अश्या पुण्यातील ठिकाणांच दर्शन होते.इतर फ़ाफ़टपसारा नसल्याने चित्रपटाची खरी मदार त्यातील खुसखुशीत-चुरचुरीत संवादावरच आहे.स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे दोघांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने पात्रात एकदम जान टाकली आहे.दोघांव्यतिरिक्त इतर पात्रच नसल्याने दोघांना त्यांची अभिनयक्षमता दाखवण्यास पुर्ण वाव आणि त्यासोबत थोडस दडपणही होतच पण ते त्यांनी सहज पेलुन हया संधीच सोन करत सहज,सशक्त अभिनयाची चुणुक चित्रपटात दाखवली आहे.चित्रपटाच्या सुरुवातीला असलेले ’ का कळेना कोणत्या क्षणी’ आणि मध्यांतरी असलेल ’ कधी तु’ ही दोन्ही गाणी सुंसर आणि श्रवणीय आहेत.चित्रपट संपेपर्यंत ते कधीच एकमेकांना आपल नाव सांगत नाहीत.नाव विचारल्यावर ते दोघे ’मुंबई’ ,’पुणे’ असच सांगतात.सतीश राजवाडेंनी खलनायक किंवा इतर अडथळे नसलेली ही वेगळी प्रेमकथा खरच सुरेख पद्धतीने हाताळली आणि सादर केली आहे.सुरुवातीपासुन शेवटपर्यंत चित्रपटाचा’फ़्लो’छान ठेवला आहे, त्यामुळे तो कधीच कंटाळवाणा वाटत नाही.चित्रपटाचाशेवटही अगदी मस्त केला आहे.एकंदरीत हल्काफ़ुल्का, मुड एकदम ताजातवाना करणारा  असा आहे हा चित्रपट.

तर मिस. मुंबई आणि मिस्टर पुणे ह्यांच्या प्रेमळ रोमँटिक जुगलबंदीत रंगण्यासाठी एकदा तरी हा चित्रपट पहाच…!

Advertisements

35 thoughts on “मिस.मुंबई आणि मिस्टर पुणे…

 1. मस्त लिहिलंय देवेंद्र… 🙂 चित्रपट अजून पहिला नाही पण हे वाचून बघायची इच्छा होतेय….

 2. पिंगबॅक Tweets that mention मिस.मुंबई आणि मिस्टर पुणे… « दवबिंदु -- Topsy.com

 3. चांगली पोस्ट झालीय.

  रिचर्ड लिंकलेटरच्या “बीफोर सनराईज” ची ही मराठी आवृती आहे. त्याचाच सिक्वेल बीफोर सनसेट सुद्धा एक अप्रतिम चित्रपट आहे. जमल्यास नक्की पहा.

  • दीपक, आपल दवबिंदुवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार्स…!
   हे माहिती नव्हत मला,मुळ सिनेमा पाहिलेला नाही पण इथे राजवाडेंनी त्याला चांगलाच न्याय दिला आहे असे जाणवते…तुम्ही सांगीतलेले चित्रपट पाहायला आवडेल,लवकरच लागतो त्या कामाला…

 4. झक्कास झालीये पोस्ट.. मी गेल्या महिन्यात बघितला हा.. कित्येक महिन्यांनी एखादा मराठी (रादर नॉन-विंग्रजी) चित्रपट बघितला.. जाम आवडला.. वेगळा आहे एकदम..

  दीपकने म्हटल्याप्रमाणे ‘बिफोर सनराईज’ आणि ‘बिफोर सनसेट’ ही बघ जमले तर.. मस्त आहेत एकदम..

 5. हा सिनेमा दिवाळीच्या दिवशीच पहिला दुपारी आणि खरच खूप आवडला. मी सुद्धा यावर एक पोस्ट लिहिणार होते. ड्राफ्ट करून तयार आहे पण पूर्ण झाली नाही पोस्ट अजून. मलाही मधून मधून ब्लॉगवर लिहायचा खूप कंटाळा येतो. ड्राफ्ट पूर्ण न होता तसेच पडून राहतात.
  सिनेमा खरच खूप छान आहे. वर उल्लेखलेले movie बघावे लागतील पण सध्या परीक्षा चालू आहे म्हणून जमणार नाही. छान झाली आहे पोस्ट.

 6. मी मागच्या आठवड्यातच पाहिला..चांगला बनलाय पण स्वप्नील जोशी नाय आवडला आपल्याला..मला थोडा पुणेदर्शन-टाईप वाटला… माझी रेटींग – ३/५

 7. मी बघितला आहे. मस्त रोमँटिक आणि हलकाफुलका चित्रपट आहे. डोक्याला ताप नाही बघताना. छान वाटतं बघताना. पण स्वप्नील जोशी मलाही नाही आवडला. एक तर तो तरुण वाटत नाही आजकाल. वय दिसतं त्याचं चेहर्‍यावर. आणि दुसरं म्हणजे त्याने अतिरेकी अभिनय केला आहे. बर्‍याच वेळा तो स्वच्छंदी, मनस्वी न वाटता थोडा वेडसर वाटतो. पण तेवढी एक गोष्ट सोडली तर बाकी सगळं मस्तच. गाणी तर खूपच छान आहेत. एकदम रिफ्रेशिंग. 🙂

 8. देवा मस्त वर्णन केले आहेस…. बघायला हवा आता चित्रपट…

  बाकि ब्लॉग लय पिंक होऊ लागलाय … काय हं??? 🙂

  • तन्वी ताई,बघ ग नक्की.मस्त हल्काफ़ुल्का आहे.
   तो रंग जरा बदल म्हणुन…अग येवढ्या तायांच्या तिक्ष्ण नजरेतुन सुटुन काही करु शकतो का आम्ही.
   तरी अनवधनाने काही तसच असल्यास आपणा सर्वांना इथे कळवल जाइल चिंता नसावी… 🙂

 9. सिनेमा खूपच छान आहे. मला फार आवडला. मी ऑगस्ट मधेच बघितला. दोघेच असून देखील कलाकारांची उणीव भासत नाही. ज्या पात्रांची नावे कळतात ती पात्रे पडद्यावर येत नाहीत आणि जी पडद्यावर दिसतात त्यांची नावे शेवटपर्यंत कळत नाहीत. सिनेमा मस्तच. मी सिनेमा बद्दल एक ब्लॉग लिहिते, त्याची लिंक इथे देते आहे. मुंबई-पुणे-मुंबई बद्दल लिहिले आहे.
  http://cinema-baghu-ya.blogspot.com/2010/08/mumbai-pune-mumbai.html

  • नारायणीजी, आपल दवबिंदुवर स्वागत आणि आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार..
   आपला ब्लॉग पाहिला, खुप छान आहे! निवांत होवुन वा्चल्यावर योग्य ती प्रतिक्रिया देइनच..बाकी आता मराठी सिनेमा पाहायच्या आधी तुमच्या ब्लॉगला नक्कीच भेट द्यावी लागणार… 🙂

 10. काही म्हण पण तुला मुंबई…पुणे ….मुंबई पुन्हा पुन्हा आठवते, हा चित्रपट मी पहिला खूप छान आहे. आता १९ डिसेंबर ला झी वर आहे. बघ पुन्हा.. पुन्हा पुन्हा ये पुण्याला… ..

 11. अरे! सही आहे पिक्चर..
  मला जाम आवडला.तिचे क्रॉस क्वेश्चनिंग, त्याचे गोंधळून जाणे.. भार्री 🙂

टिप्पण्या बंद आहेत.