थंडी …हिवाळ्यात वातावरण कसं असतं
मस्त गाऽऽर ,अगदी थंड
वाटतं त्या दिवसात कधी
करूच नये निद्रादेवीशी बंड ॥

सूर्यदेवही जांभया देत
जरा उशिराच उठतो गारठून
गुलाबी थंडीत आपल्या
सोनेरी किरणांची नक्षी पसरून ॥

थंडीचं माहात्म्य पहाटे
जरा जास्तच कळते
एका छोट्याश्या फटीतूनही
रात्री थंडी किती छळते ॥

रात्री झोपताना अंगावर मी
घेत नाही माझीच चादर
सकाळी माझ्याच अंगावर
असते भावाचीही चादर ॥

कसंबसं उठल्यावर मग
शेकोटीच्या उबेची हवी-हवीशी साथ
अन ते वाफाळलेल्या चहाचे घुटके
त्या स्वर्गीय आनंदाची काय बात ॥

मध्येच हसणारा दवबिंदू
मनाला प्रसन्न करतो
धुक्यांचा गालिचाही मग
त्यात आपले रंग भरतो ॥

पोटापाण्यासाठी कामावर गेल्यावर
कामाचा ढीग जरी दिसतो मोठा
तरी एक मानसिक आधार असतो
थंडीचा दिवस आहे हा छोटा ॥

रात्री जेवायच्या आधी जर
प्यायला मिळाले गरमागरम सूप
तर मग त्या गुलाबी थंडीत
जेवणाचीही लज्जत वाढते खूप ॥

कधी उग्र रूप धारण करून
जरी आणते अंगावर शहारे
तरी ऊन-पावसाची दगदग नसते
अन्‌ सृष्टीचेही रंगरूप असते न्यारे ॥

ऊन डोक्यावर आलं तरी
हवेत सुखद गारवा असतो
कोणी काहीही म्हटलं तरी
हाच ऋतू सर्वांना हवा असतो ॥

– देवेंद्र चुरी

(सदर कविता ह्या आधी शब्द गारवा 2010 ह्या ई अंकात प्रसिद्ध झालेली आहे.)

Advertisements

18 thoughts on “थंडी …

 1. >>>कामाचा ढीग जरी दिसतो मोठा
  तरी एक मानसिक आधार असतो
  थंडीचा दिवस आहे हा छोटा ॥

  हे सगळ्यात महत्वाच 😉

  वाह…लय भारी…

 2. मस्तच.. छान गारगार वाटलं 🙂

  >>वाटतं त्या दिवसात कधी
  करूच नये निद्रादेवीशी बंड ॥

  मला तर कधीच निद्रादेवीशी बंड करायला आवडत नाही 😉

  • धन्स हेरंबा ….
   मला पण कधीच नाही आवडत रे ,ह्या थंडीच्या दिवसात तर जरा जास्तच…पण काय करणार ते पापी श्री. ढेरपोटे आहेत ना त्यांसाठी हे बंड कराव लागते…. 😉

 3. आम्ही इकडे थंडीने हैरान आहोत. ५ डीग्रीच्या आसपास पारा खेळतोय.
  आणि त्यात अजून थंडी घेऊन ही कविता आली. गारठलोच की राव.

  सुंदर कविता. 🙂

  • तिकडच्या बातम्या वाचल्या खरच जबरदस्त थंडी आहे तिथे…काळजी घ्या …इथे साधारण १३-१४ च्या आसपास आहे तापमान …

   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार …

टिप्पण्या बंद आहेत.