दक्षिणायन…


सलग सात रात्र आणि दिवस जंगलाच्या कुशीत…सभोवतालच दाट अरण्य…रात्रीची ती शांतता …त्यात मध्येच येणारा पशुपक्ष्यांचा आवाज…जंगलातील रात्रीची  ती थंडी…दिवसा आग ओकणारा सूर्यदेव..त्यापासून वाचवणारी मोठी मोठी झाडे…फोन नाही ,वर्तमानपत्र नाही,धावत गाडी पकडायची गरज नाही,काही काम नाही….बाहेरील जगाशी काही संबध नाही…त्यामुळेच निसर्गाशी थेट संवाद…  किती मस्त ना…गेल्या वर्षी आपल्या इथल्या  चांदोली परिसरातील  जंगलात चार जिल्ह्यांच्या सीमा भेद करीत,डोंगरदर्यात वरील अनुभव घेतला होता.त्यातील दोन दिवसांवर ब्लॉग वर खरडलं होत पण नंतर कंटाळ्यामुळे  पुढील दिवसांवर काही लिहिले नाही.आम्ही तेव्हा जो प्रदेश  पायाखाली घातला होता  त्य्तातील बहुतेक भागात आता व्याघ्रप्रकल्पामुळे प्रवेश निषिद्ध केला आहे.असाच अनुभव घेण्यासाठी आज मी कर्नाटक प्रांती निघतो  आहे.आजवर उत्तरेत खूप खूप  फिरलो आहे. अगदी बारा दिवसापूर्वीच आग्रा,दिल्ली,मथुरा, वृंदावन,हृषीकेश हरिद्वार असा मोठा दौरा करून परतलोय.असे असले तरी आजवर दक्षिणेत जाण्याचा मुहूर्त कधी निघाला नव्हता…पण बरोबर  आज जेव्हा सूर्य जेव्हा दक्षिणायन संपवून उत्तरायण सुरु करणार आहे ,तेव्हा मी माझ  दक्षिणांयन सुरु करणार आहे.

खरतर ह्या दौऱ्यासाठी नोव्हेंबरलाच अप्लाय केल होत.पण दरवर्षी ‘फर्स्ट कम  फर्स्ट सर्व ‘तत्वावर चालणार नियम बदलून ह्यावेली नवीन लोकांना प्राधान्य दिल गेल.एका दृष्टीने हे चांगलाच होत.पण त्यामुळे पहिल्या दिवशी फोरम भरुनही मी प्रतीक्षायादीत  चांगला  शंभराच्या वर जाऊन बसलो आणि मी कर्नाटक प्रांती माझे घोडे उधळायची आशा सोडून दिली.त्यातच वर उल्लैख केलेला उत्तर दौर्यातुनही भावाच्या लग्नाच्या कामामुळे आणि तिकडच्या थंडीच्या बातम्यांमुळे माघार घेतली होती.म्हणजे डिसेंबर महिन्यात वातावरण एकदम थंड होत.पण शेवटी माझ्या आणि माझ्या भावाच्या प्रोत्साहनामुळे जायच्या आदल्या दिवशी  घरचे तयार झाले आणि थंडी अगदी  भरात असूनही आमचा  तो दौरा अगदी सुखरूप पार पडला. तिथून परतल्यावर भावाच्या लग्नाची लहान मोठी काम सुरु झाल्याने त्या दौर्यावर काही लिहायला जमल नाही.(थोडासा कं ही ह्यात सामील होताच )

त्यातच तीन दिवसापूर्वी हेमंत नावाच्या मित्राचा फोन आला कि काही लोक कैन्सल करत आहेत तेव्हा फोन करून बघ. फोन कऋण बघायला  काय हरकत आहे म्हणत त्यांना फोन केला आणि देवाच्या कृपेने नुकताच दोन जणांनी जाण रद्द केल असल्याने त्यांनी मला एक सीट  दिली.पण खरी अडचण आता होती कारण माझ्या उत्तराभ्रमणांच्या वेळी ही सुट्टी मिळणार नाही अस साहेबाने सांगितलं होत आणि नंबरच लागला नसल्याने मी सुद्धा तेव्हा मान डोलावली होती.पण ट्रेकिंगसाठी सलग ९ दिवस सरकारी सुट्टी अशी नामी संधी अशी कशी दवडायची म्हणून सायबाकड गेलो   आणि काय त्याने जास्त आढेवेढे न घेता माझी सुट्टी मंजूर करत मला आश्चर्याचा धक्का दिला …(कदाचित कटकट सुट्टीवर आहे तेवढ बर ,हा विचार केला असेल त्यानी … 🙂 ) परवा सकाळी तत्काल मध्ये रेल्वेतली सीटही कन्फर्म मिळाली. तीन दिवसापूर्वी कशात काही नसलेलो मी आता ह्या कार्यक्रमासाठी निघतो आहे .

ह्या दौर्यात आम्ही दोराईकट्टा हे उत्तर कर्नाटकातल सर्वात उंच शिखर पादाक्रांत करणार असून याना रॉक फोर्मेशन ,विभूती फॉल वैगेरे रस्त्यात लागणार आहे.तिथल जंगल खुपच घनदाट असून  बिबळ्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.भोवतालचा सुंदर  निसर्ग आहेच सोबतीला ह्या दौऱ्यासाठी आपल्या बिनभिंतीच्या ह्या घरातील लोकांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईत  लिहिलेली ही  पोस्ट तिळगुळासारखी  गोड मानून घ्या.मकरसंक्रांतीच्या सर्वाना हार्दीक  शुभेच्छा…

आल्यावर तुम्हालाही ब्लॉग मधून ही सफर घडवायचा प्रयत्न करेन.चला तर मग निघतो मी उंदरांच्या शर्यतेतून थोडा बाहेर , वेगळा आणि  भन्नाट  अनुभव घ्यायला….. निसर्गाशी थेट संवाद साधायला …तुमच्या शुभेच्छा आहेतच….

Advertisements

14 thoughts on “दक्षिणायन…

  1. पिंगबॅक दक्षिणायन… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

  2. पठ्ठ्या काय चालवलंयस काय तू? आत्ताच तर उत्तर पादाक्रांत केलीस… मला वाटलं त्याचाच वृत्तांत लिहिला असशील (त्यामुळेच मला दक्षिणायन असं का नाव दिलंय असा रास्त प्रश्न पडला होता 🙂 ) … तर थेट तू दक्षिणेला चाललोय सांगायला पोस्ट टाकलीस.. खरंच यार.. मजा आहे !! अपर्णा + १.. I too envy you.. मजा आहे राजे.. धमाल करून घ्या.. यंज्वाय !!! 😀

  3. वाह! जाण्याआधीच एवढे रसभरीत वर्णन तर नंतर कर्नाटकी वांग्याचे झक्कास भरीतच मिळणार म्हणायचे !

    १० – १२ वर्षांपूर्वी मी असेच २ गिरीसंचार भिरा,ताम्हिणी,लोणावळा,मुळशी परिसरात केले होते. त्या आठवणी , निसर्गाची विविध रूपे अजून ताजीच आहेत.
    – श्री.वि.आगाशे

  4. पिंगबॅक सदाशिवगड … « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.