रात्रोळ्या…


 

छायाचित्र गुगलबाबाकडून साभार...

त्या आपल्या भेटीनंतर

डोळा लागलाच नाही रात्री

तुलाही झोप आली नसेल

ह्याची मला  आहे खात्री

.

.

.

माझ तुझ्यावरील प्रेम

तुला कधी ग कळणार

अजून किती रात्री

मला अश्या छळणार

.

.

.

वर बघ ग जरा

ते लुकलुकणारे तारे

आपल्याच  प्रेमाचे गीत

गात आहेत ते सारे

.

.

.

निळ्या आकाशाचा  पदर डोक्यावर घेऊन

ही रात्र नववधूसारखी लाजत आहे शांत

चंद्र-तारे मंद स्मित करत  आहेत मध्येच चमकून

मला मात्र आहे तुझ्या मिलनाची भ्रांत

.

.

प्रकाशाच्या  भेटीसाठी

काळी रात्र जोरात सरत आहे

मिलन अशक्य हे जाणूनही

वेडा प्रयत्न करत आहे

.

.

.

तू  अगदी शांत झोप

ही रात्र आपोआप सरेलच

काळाच्या ह्या ओघात

तुझी जखम हळूहळू भरेलच

.

.

.

अमावास्येच्या ह्या काळ्या रात्री

चंद्र कुठेतरी  हरवला आहे

चांदण्यांनी मात्र आपला

दरबार चांगलाच भरवला आहे

.

.

.

तुझ्या इच्छेसाठी

तुटलाय ग तो तारा

तुझ्या सोयीसाठी

सुटलाय ग हा वारा

तुझ्या आनंदासाठी

चांदण्याचा हा पिसारा

तुझ्या झोपेसाठी

चंद्र जागतो आहे बिचारा

तुझ्याचसाठी

खेळ मांडला हा सारा

फक्त तुझ्यासाठी …

 

 

(बर्याच दिवसात ब्लॉग वर काही लिहल नव्हत  तेव्हा काल रात्री काहीतरी लिहायचच ठरवल्यावर जमलेल्या ह्या काही ओळी…)

Advertisements

32 thoughts on “रात्रोळ्या…

 1. काय चाललेय देवा ??? 🙂

  दादाचे झालेय ना लग्न आता तुझाच नंबर की… 🙂

  बाकि जमल्याहेत रे रात्रोळ्या 🙂

  • काही नाही ग …ब्लॉगवर न लिहण्याच जे जडत्व आल होत ते घालवण्यासाठी काल रात्री स्वत:ला आव्हान केल आणि रात्रीच्या सोबतीने शब्दांचा खेळ सुरु केला ….तोच इथे मांडलाय …. 🙂

 2. काही लिहिले नाही म्हणत
  कविता तयार होते,
  एका रात्रीतच
  चांगली (भट्टी) जमते!
  रात्रौळ्या हे चपखल
  नावही सुचते,
  मनातील उलघाल
  नावेसारखी उसळते!
  एक एक रात्रौळी
  स्फुरत जाते,
  प्रत्येकीबरोबर मन
  झुरत जाते!
  रात्रौल्यांची नकळत
  ळ्या
  रांगच लागते,
  स्वतःवरच जळत
  रात्रही सरते !

  – श्री.वि.आगाशे

 3. कवीदेव खुप दिवसानी प्रकट झाले ….. मस्त झाल्यात रात्रोळ्या …. 🙂 🙂

 4. मस्तच रे ! अप्रतिम !! खूप सुंदर !!
  जाम आवडल्या या रात्रोळ्या!! 🙂

 5. >> दादाचे झालेय ना लग्न आता तुझाच नंबर की…

  +१

  सिग्नल क्लिअर झाल्यामुळेच रात्रोळ्यांना छान बहर आलाय वाटतं 😉

  • हेरंब, सिग्नल आधीही क्लीअरच होत,पण मला तिथे आता गाडी न्यायचीच नव्हती ना म्हणून यु टर्न घेतला …. असो कशा ने कां होईना बहर आला हे महत्वाचे … 😉

 6. सिग्नल….प्यार का सिग्नल… 🙂 🙂

  रात्रोळ्या फ़क्कड जमल्या आहेत.

  बदव दादाच लग्न झाल्यापासुन तुझी झोप उडालेली दिसते आहे 😉

 7. त्या आपल्या भेटीनंतर

  डोळा लागलाच नाही रात्री

  कसा लागेल डोळा, रात्री? काळोखामुळे नेम चुकला असेल. 😉
  देपोळ्या…आपलं….रात्रोळ्या आवडल्या.

टिप्पण्या बंद आहेत.