महायुद्ध….


आज भारतातील कोट्यावधी लोकांच्या नजरा खिळलेल्या असणार आहेत त्या  मोहालीतील रनभूमीवर जिथे आज होणार आहे, महायुद्ध,महामुकाबला,महासंग्राम…..तस आज द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं असत तुला काय दिसते तर त्यानेही ‘मोहालीच मैदान’ हेच उत्तर दिल असत. त्यादिवशी आपण कांगारूंची शिकार केल्यापासून सगळे मोहालीचाच जप करत आहेत आणि जेवढी वाट चातकानीही  कधी पाहिली नसेल तेवढ्या उत्सुकतेने आजच्या दिवसाची लोक पाहत होते.कट्ट्यांवर,ऑफिसात ,प्रवासात,नेटकरांच्या बझावर-ट्विटरवर, जिथे तिथे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे लोकांचा बोलण्याचा प्रमुख विषय ‘मोहालीचे महायुद्ध  ‘.त्यात कॉंग्रेसने ‘डिप्लोमसी’ च्या नावाने  ह्या मोहाली युद्धात अजून रंग भरले आहेत.

ह्या  मोहाली युद्धामुळेच काँग्रेसवाल्यांना थोडा मोकळा श्वास घ्यायला मिळाला आहे.नाहीतर गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची बाहेर येणारी विविध प्रकरणे आणि त्यावर विरोधक आणि मिडीयाचा हल्लाबोल ह्यात त्यांचा चांगलाच कोंडमारा झाला होता. पण कांगारुंच्या शिकारीनंतर अवघी मिडीया ‘मोहालीमय’ होवून गेली.देशातील इतर कोणत्याही बातमीला दुय्यम स्थानही दिल गेल नाही .कोणतही बातम्यांच चैनल    लावा तिथे आपल ‘ दे घुमाके ‘, ‘चक दे इंडिया’ अस काहीस चालू .त्यातल्या त्यात ह्यामुळे जुन्या खेळाडूंना थोडा रोजगारही मिळाला.कारण प्रत्येक चैनल दोन चार नव्या- जुन्या खेळाडूना पकडून मोहालीच्या युद्धाबाबत ‘गहन चर्चा ‘  करत बसायचे .बाप रे ,कसले कसले संदर्भ,कसले कसले आकडे . अश्याच एका चर्चेत त्यादिवशी विनोद कांबळीने एक मोठा विनोद केला ,”मला युसुफइतके चान्स मिळाले असते तर मी आज भारताचा कर्णधार असतो ”  …काय म्हणायचं ह्याला ..असो.

तसा भारत पाकिस्तानचा एखादा साधा सामना असला तरी तो कधीच साधा नसतो ,त्यात हा सामना तर विश्वचषकाचा  उपांत्य सामना …मग काय राव ,काय करू आणि काय नको अस अनेकांना झालाय.फायनलपेक्षाही कितीतरी जास्त टीआरपी ह्या सामन्याला आहे हे कोणी तज्ञांने वेगळ सांगायची गरज नाही.सोनिया ,मनमोहनसिंग,गिलानी  ह्यांच्या सोबतच कित्येक मंत्री- संत्री,बिझनेसमन,खेळाडू ,नट आज स्टेडियम मध्ये आवर्जून हजर  असणार ह्याची गणती नाही.अनेक वि.आय.पी  ना ही ह्या सामन्याचे तिकीट मिळाले नसल्याच्या बातम्या येत आहेत.तरीही लोक रोज तिथे वेड्या आशेने तिकिटासाठी रांगा लावून असतात.आजच्या सामन्यावर सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागल्याच सांगितलं जात आहे.त्याच गालबोट ह्या सामन्याला लागायला नको,एक दर्जेदार सामना व्हायला हवा हा….

आज जर देवाने शंभराव शतक केल तर इन्शा  अल्लाह काय मजा येईल, आणि आपला वाघ तर पाकड्यांसमोर नेहमीच डरकाळ्या फोडत आलेला आहे. बाकी मागे युवराजने थोड गंभीर होवून विराट रूप धारण करून रनांचा ‘रैना’ पाडावा.मग झहीर आपला जहरी मार्याने भजन करत ‘अस विन ‘ मिळवून देईल कि दिवाळीची रात्र फिक्की पडेल इतकी आतिषबाजी करायची  संधी आपल्याला मिळेल.आता दोन तासातच भारत बंद असणार आहे.कित्येकांच्या हृदयाचे  ठोके तर आताच वाढायला सुरुवात झाली असेल, तेव्हा ‘दिल ठाम के बैठीये भाईयो और बेहनो …’. याची देही याची डोळा हे युद्ध पाहायला सज्ज रहा . बाकी आज घरी टीवी वर हा सामना पाहणार असाल तर आवाज म्युट केला तरी चालेल कुठूनतरी आवाज येईलच…आणि एक सांगू आज मला सुट्टी आहे … 🙂

भारत पाकिस्तान सामान्यात नेहमीच एक वेगळी चुरस आणि खेळाडूत एक ‘टशन’ नेहमी पाहायला मिळते.मग ती ‘मोरे-मियादाद’ असो ‘वकार-जडेजा ‘ असो ‘आमीर -प्रसाद’ असो वा ‘सचिन-अख्तर’ असो …मजा देवून जाते …तेव्हा टशन दे… टशन दे….आणि दे घुमाके ….!!!

Advertisements

13 thoughts on “महायुद्ध….

 1. आज सबंध युद्ध याची देहा याची डोळा अनुभवले….मजा आ गया बॉस…..महायुद्ध जिंकलो….हिप हिप हुर्रे…….
  जिओ खिलाडी वाहे वाहे

  जुटा हौसला बदल फैसला
  बढा ले तू बिंदास काफिला
  खेल जमा ले कसम उठा ले
  बजा के चुटकी धूल चटा दे

  दे घुमा के …..

 2. क्रिकेटचे या देशात अति कौतुक होत आहे. लोकांना चक्क मूर्ख बनवले जात असून लोक मूर्ख बनत आहेत.देशाचा अफाट पैसा ,कामाचे तास व्यर्थ जात असून लोकांची अक्कल कुठे जात आहे?महत्वाचे प्रश्न, समस्या मागे राहून क्रिकेटचा उदो,उदो चालू आहे.महागाईच्या नावाने बोम्बलणारे महागडी तिकिटे काळ्या बाजारातही घेत आहेत.मुलांच्या परीक्षांचे भान नाही,१५-१६ तासांचे विजेचे भारनियमन खेडोपाडी असतांना शहरांतून निर्लज्ज रोषणाई होत आहे.क्रिकेटवीर आणि इतर काही मंडळी गब्बर होत असून लोकांना मामा बनवीत आहेत. सचिनसारखा अब्जाधीश परदेशातून फुक्कट मिळालेल्या कारवर आयात मूल्य देण्यासही टाळाटाळ करतो,जकात कर वाचवण्यासाठी एक कार नव्या मुंबईतल्या बोगस पत्यावर नोंदवतो आणि लोक असल्या माणसाचा उदो उदो करीत त्याला भारतरत्न द्यावे म्हणून बोम्बलतात. याला जिमसाठी बंगल्यात वाढीव FSI सुद्धा हवा आहे.सगळीकडून उपटेगिरी! गावस्करसारखा महाभाग क्रिकेटसाठी प्लॉट लाटून पुढे काहीच करीत नाही,कुठल्या तरी खणात ( बहुतेक वानखेडे)६५ लाख पडून असलेले त्याच्या गावीही नसते.पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीय संघ मार खात असतांना याला ज्येष्ठतेनुसार मानधन हवे होते. लिहावे तेवढे थोडेच आहे.
  धनराशी ओतून सामने हवे तसे निकाली काढले जाऊ लागलेले पाहून सुमारे १८ वर्षांपूर्वी मी क्रिकेटवर पूर्णच फुली मारली आणि ते बघणेच बंद केले.वेळ मिळाल्यास गल्लीतले क्रिकेट बघणे बरे वाटते.अर्थात तिथेही समाजकंटकांचा पैसा धुमाकूळ घालू लागलेला आहेच.
  – श्री. वि. आगाशे

टिप्पण्या बंद आहेत.