वर्ल्डकप येई घरा,तोची दिवाळी दसरा ….


भारतातील बहुसंख्य लोकांच्या रक्तात पाण्याबरोबरच अजून दोन महत्वाचे घटक मिसळलेले आहेत.ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा. कोणाच्या रक्तात एकाच कमी दुसऱ्याच जास्त प्रमाण असत ,तर कित्येकांच्या रक्तात दोन्ही गोष्टी अश्या ठासून भिनलेल्या असतात कि त्या तहानभूकही विसरायला भाग पाडतात.त्यातल्या त्यात सिनेमापेक्षा क्रिकेटच पारड नेहमी जास्त जड झाल्याच आपल्याला दिसून येत.तस बघायला गेल तर जवळ जवळ प्रत्येक भारतीयाचा ह्या ना त्या कारणाने ह्या खेळाशी कधीतरी संबध येतोच.क्रिकेटवेड्यांसाठी वयाची,धर्माची,जातीची ,पैश्याची कसलीही अट नाही,जो तो आपापल्या परीने ह्याची मजा घेत असतो.कोणी क्रिकेटला शिव्या देत बघत ,कोणी फिक्स आहे म्हणत बघत ,कोणी ऑफिस,शाळा-कॉलेजांना दांडी मारून बघत ,कोणी मैदानात जावून,कोणी घरात तर कोणी गल्लीतल्या इलेक्ट्रोनिक्स्च्या दुकानासमोर गर्दी करून बघत, तर कोणी अगदी दिलखुलास होवून प्रत्येक चेंडूचा आनंद घेत बघत.पण मध्येच असे काही क्षण येतात जे ह्या सगळ्यांनाच श्वास रोखायला भाग पाडतात आणि त्यांच क्रिक्रेटप्रेम आपोआप बाहेर येत.

तर अश्या ह्या क्रिकेटवेड्या भारतात दरवर्षी येणारया सणांबरोबरच प्रत्येक चार वर्षांनी एक महासण येतो,तो म्हणजे क्रिकेटचा विश्वचषक.सुमारे दीड महिना हा उत्सव चालतो, आणि ह्या दिवसात अवघ वातावरण क्रिकेटमय होवून जात .शाळा-कॉलेजात,कट्ट्यांवर,ऑफिसात ,प्रवासात,नेटकरांच्या बझावर-ट्विटरवर क्रिकेटच्याच चर्चा रंगतात.तर असा हा उत्सव ह्यावर्षीही होता,आणि काल त्याच्या अंतिम सामन्यात भारतातील तब्बल ३००० विआयपींच्या साक्षीने आपण लंकादहन करत श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय मिळवून विश्वचषक घरी आणला.१२० करोड भारतीयांची हृद्य ज्या क्षणासाठी अनियमित स्पंदत होती ,ज्या क्षणाची आशेने स्वप्न पाहत होती ते काल आपल्या संघाने साकार केले.क्रिकेटवर सर्वाधिक प्रेम आणि पैसा पुरवणारया ह्या भारत देशात ह्यापूर्वी १९८३ ला म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी हा बहुमान मिळवता आला होता.२८ वर्ष भारतीयांनी ज्या ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो स्वप्नवत क्षण काल प्रत्यक्षात घडला.माझ्यासगट अगणित भारतीय लोकांना ह्या क्षणाने अक्षरशः वेड लावले. अगदी काय करू अन काय नको अस झाल होत.कोणी रडत होत ,कोंणी हसत होत ,कोणी वेड्यासारख ओरडत होत ,कोणी नाचत होत सगळे बेभान झाले होते .चारही दिशा फटाक्यांच्या रोषणाईने चमकत होत्या ,त्यांच्या आवाजाने दुमदुमत होत्या .लोकांच्या आनंदाला काही पारावार उरला नव्हता ,त्यांचा उत्साह सीमारेषा ओलांडून ओसंडून वाहत होता.सगळीकडे जल्लोषाच जल्लोष होता…

अश्या ह्या क्रिकेट जगतात एका व्यक्तीने तब्बल २१ वर्षाच्या घोर तपश्चर्येनंतर देवत्व मिळवलं आहे.ती व्यक्ती म्हणजे सचिन रमेश तेंडूलकर .आपल्या २१ वर्षाच्या कारकीर्दीत अगणित नवे नवे रेकॉर्ड्स बनवत दैदिप्यमान यश त्याने मिळवलं.पण त्याच्या ह्या कारकीर्दीत त्याला कधीच विश्वचषक जीकायाला मिळाला नव्हता.आणि हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता,त्यामुळे जर काल आपण हरलो असतो तर त्याच्या कारकीर्दीत एक कधीही न भरू शकणारी पोकळी निर्माण झाली असती ,पण काल आपण विश्वचषक जिंकल्यामुळे खर्या अर्थाने त्याची कारकीर्द परिपूर्ण झाली.आणि काल जेव्हा त्याच्या हातात विश्वचषक आणि तेव्हाचे त्याच्या चेहरयावरचे भाव पाहिले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही.अगदी अगदी भरून आल होत.ह्यावेळी भारतापेक्षा त्याच्यासाठी हा कप हवा होता मला,आणि तो आपण मिळवला.ह्या स्पर्धेत आपल्यातर्फे सर्वाधिक धावाही सचिन देवानेच केल्या.युवी,रैना ,विराट ह्या यंग ब्रिगेडनेही ‘ गेली २१ वर्ष या देशाच्या क्रिकेटचं ओझं उचलतोय, म्हणून आज आम्ही त्याला खांद्यावर घेतलंय’  अस म्हणत त्याला खांद्यावर उचलून फिरत   हा कप त्यालाच डेडीकेट केला.   तरी सचिनच महाशतक तसेच १ ल्या षटकापासून ४२ व्या षटकापर्यंत भारताचा डाव सांभाळणाऱ्या गंभीरच शतक काल होवू शकल नाही ही सल राहिलीच.आणी मुरलीसारख्या खेळाडूचा शेवटचा सामना होता त्याच थोड कौतुक व्हायला हव होत शेवटी … असो बाकी नशीबाच्या बाबतीत धोणीला खरच मानायला हव पूर्ण मालिका अपयशी ठरलेला असतांना अश्या सामन्यात तो क्लीक्ड झाला कि त्याची ती खेळी कोणीही विसरू शकणार नाही .असो आपल्या सचिनच स्वप्न पूर्ण झाल ना बस ….ध्येय्यपूर्ती जाहली…स्वप्नपूर्ती जाहली ….

बाकी काल आपण हरण शक्यच नव्हत कारण काल सामना पाहायला साक्षात रजनी देव स्टेडियमध्ये अवतरला  होता …. 🙂

रजनी देवाय नाम: !!! सचिन देवाय नाम: !!!

माझ्याकडून भारतीय संघ आणि तमाम भारतीयांचे मनापासून अभिनंदन….बाकी आता चार दिवसातच एक नवी साथ येणार आहे आयपीएल फिवरची…त्यासाठी सज्ज व्हायचं आहे आपल्याला आता…
जियो खिलाडी वाहे वाहे …दे घुमाके….

Advertisements

12 thoughts on “वर्ल्डकप येई घरा,तोची दिवाळी दसरा ….

 1. देवेन….परवाच्या विजयाची अशी काही झिंग आली आहे की बस्स अजुन पण त्या विजयाची नशा उतरत नाही आहे….आयुष्यातील सर्वात अमुल्य असा क्षण आहे….

  धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…धतड…

  बस्स बाकी काही नको… 🙂 🙂 🙂

 2. पाउणपट जनतेला
  एक वेळचेही खायला नाही
  त्यांची काहीच नाही चाड,

  मुठभरांच्या खाजेला
  कसलाच धरबंद नाही
  क्रिकेटचे किती हे लाड ?

  • क्रिकेटचे आपल्या देशात अतिलाड होतात हे खरे आहे,त्यामुळे मी सुद्धा आधी जितका होतो तितका क्रिकेटचा पंखा राहिलेलो नाही आता …पण सध्या ह्या क्षणाला तरी हे थोडा वेळ विसरावस वाटते….

टिप्पण्या बंद आहेत.