हे भलते अवघड रस्ते….


आपण आपल्या जीवनाच्या वाटेवर सरळ चालत असताना अनेक छोटे-मोठे संकटरुपी खड्डे मध्ये येत असतात.आपण मात्र न डगमगता आनंदाने त्यांना तोंड देत वाटचाल करत राहतो.पण मग कधीतरी असे काही क्षण येतात की अचानक समोरील रस्ताच दिसेनासा होऊन जातो, आणि आपल्या हातात काही उरत नाही.आतापर्यंत हवाहवासा वाटत असलेला प्रवास मग नकोसा होऊन जातो.प्रवास तिथे काही काळ थांबतो.प्रवासातले हेच क्षण खूप मोठे असतात.हे आपली परीक्षा घेणारे क्षण त्रास देणारे तर असतातच पण ते तितकेच आपल्याला प्रगल्भ बनवत असतात.पण त्यांना सामोर जाण नुसत बोलण्याइतक सोप नसत.कारण संकट कधी एकटी येत नसतात. काहीजण इथेच आपला प्रवास संपवतात किंवा दुसरी एखादी चोरवाट शोधून नको त्या मुक्कामाला पोहोचतात .खरतर हा ‘बॅड पॅच’ सरायची वाट बघून नव्या उमेदीने पुढील प्रवास सुरु करायचा असतो.

गेले दोन महिने हा दवबिंदू ब्लॉगविश्वातून गायब झाला होता.त्याला असच एक वैयक्तिक कारण होत.आजवरच्या आयुष्यात मला सर्वाधिक मानसिक त्रास देणारी एक गोष्ट ह्या काळात घडून गेली .वर्षोनुवर्षे जपलेल्या नात्यांतील पोकळपणाची जाणीव करून देणारी ….  खर तर  दु:ख आपलेच लोक देत असतात , बाहेरच्या लोकांत तितकी ताकद नसतेच.ते काय म्हणतात ना ‘हमे तो अपनोने लुटा गैरोमे कहा दम था… ‘ , कारण जवळच्या माणसाकडून आपल्याला तस अपेक्षितच नसते.एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या आप्ताची एखादी गोष्ट तुम्हाला खटकत असेल/पटत नसेल  तर वेळीच त्याला तसे सांगायला हवे.आपण ‘जाऊन दे’ त्या व्यक्तीला वाईट वाटेल,होईल सुधारणा वैगेरे  म्हणून बोलत नाही आणि मग गोष्ट हाताबाहेर गेल्यावर जो संवाद घडतो तो दोघानांही जास्तच दुखावणारा असतो किंबहुना ते नातच तोडणारा ठरतो.

गेल्या काही दिवसात बर्याच ठिकाणी हसत खेळत वावरत होतो पण आतून मनाला सतत काहीतरी टोचत होत.जेवढी जवळची माणस जास्त तेवढ दु:ख मिळण्याची शक्यता जास्त अस काहीस मनात घर करून राहील होत आणि  जास्त कोणाशी बोलावसच वाटत नव्हत. त्यामुळे मी अनेकांच्या कॉल्सना,मेल्सना व एसएमएसना प्रत्युत्तर ही देण्याच टाळल.नंतर मला  जाणवल मी अस करून त्यांना दुखावल आहे.आणि माझ्या मुळ स्वभावामुळे मी जास्त दिवस असा लोकांपासून दूर राहू शकणार नाही,हे सुद्धा हळूहळू समजायला लागल. आजही जवळचे अनेक मित्र ‘तुला नक्की झालय काय’ म्हणून विचारणा करतात,त्यानांही ‘काही नाही रे’ अस सांगून आता कंटाळा आलाय ,म्हणूनच ही पोस्ट लिहायला घेतली.नक्की काय झाल ते मला सध्यातरी  कोणाला सांगायची इच्छा नाही.तेव्हा मला त्याबद्दल न विचारलेलच बर.तरी ह्या काळात माझ्यामुळे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जे कोणी दुखावले गेलेत अश्या त्या सर्वांची मी इथे जाहीर माफी मागतो.तसेच इथे ब्लॉगवर मी स्वत: हजर नसूनही दिवसाला  १०० पेक्षा अधिक भेटी मिळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या त्या वाचकांचे मी मनपूर्वक आभार मानतो.

तसही उन्हाळ्याच्या दिवसात दवबिंदू  दिसेनासेच होतात, पण  पावसाळ्यात पाऊसाच्या निमित्ताने का होईना दवबिंदू  आपल्या  अस्तित्वाची वेळोवेळी जाणीव करून देत असतो .आणि आता पावसाळा आलाय ….

Advertisements

24 thoughts on “हे भलते अवघड रस्ते….

 1. ह्म्म्म्म… काळजी घे रे, काही गोष्टी घडतात. आपली इच्छा असो वा नसो 🙂

  आता परीक्षा संपली असेल तर, आपल्या कट्ट्यावर येत जा भावा. तुला खुप मिसलो होतो, सगळे तुझी चौकशी करायचे. देव्याला झालंय काय वैगैरे प्रश्नांचा मारा व्हायचा. आता तू पोस्टचा मारा सुरु करावा अशी इच्छा 🙂

  स्वागत देवेंद्रनाथा स्वागत 🙂 🙂

  • परीक्षा तर संपली रे पण निकाल चांगला नाही लागला …असो … एकदम मारा केला तर तुम्हीच मला पकडून माराल म्हणून हळूहळू येतोच…. 🙂

 2. आयुष्यात काही वेळा भयानक प्रसंगांना सामोरे जावे लागते.अपघातासारख्या प्रसंगांना माणूस हसतमुखाने तोंड देऊ शकतो परंतु आपल्याच किंवा जवळच्या माणसांकडून झालेली फसगत,अन्याय,लुबाडणूक,लुटमार,वचनभंग वगैरे अनुभवाने माणूस हादरतो,कोलमडतोही.अशा वेळी मानसिक संतुलन बिघडू न देणे महत्वाचे असते.हा तोल सांभाळला नाही तर विविध आजारांना आमंत्रण आणि डॉक्टरांची धन करणे मागे लागून पूर्ण वाताहात होऊ शकते.
  So do face everthing with a smiling face.या अर्थाची ‘ face ‘ नावाची एक इंग्रजी कविता मी ३५ वर्षांपूर्वी केली होती.
  आपण कोणाचे वाकडे ,बुरे केले नसेल ,कोणावर अन्याय केला नसेल तर बिनधास्त राहावे, मस्त फिरावे. दवबिंदुच काय आयुष्यातील सुखाच्या धबधब्यांचाही मोकळेपणाने आस्वाद घ्यावा.

  • श्रीपादजी ,इतक्या सुंदर प्रतिक्रीयेबद्दल आपले आभार…. मी बिनधास्तच असतो नेहमी पण जवळच्या माणसाने दुखावल्यामुळे मनाला लागून राहिलाय ….असो …ही वेळही जाईल निघून…

 3. भावा वेलकम बॅक आणि
  भावा पार्टी 🙂

  जे काही असेल ते, तुला पुन्हा ब्लॉगवर बघून बरं वाटलं !

 4. भावा, भेलकम बॅक !! 😀
  आता मस्त पोस्ट येऊ देत नियमित.मिसत होतो रे तुला. आता कट्ट्यावर पण येत जा..

  झाले गेले गंगेला मिळाले. परीक्षा घेत असतो रे देव कधीकधी. आपण परीक्षा द्यायची..छान मार्कांनी उत्तीर्ण व्हायचे; आणि मग मित्रांना पार्टी द्यायची. 😉

 5. देवेन, जे काय झालं असेल ते तुला नक्कीच त्रास देणारं होतं यात शंकाच नाही. कारण त्याशिवाय तू इतके दिवस गायब राहणार नाहीस. असो. सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर.

  भावा शुभेच्छा…. :))

 6. तसही उन्हाळ्याच्या दिवसात दवबिंदू दिसेनासेच होतात, पण पावसाळ्यात पाऊसाच्या निमित्ताने का होईना दवबिंदू आपल्या अस्तित्वाची वेळोवेळी जाणीव करून देत असतो .आणि आता पावसाळा आलाय ….

  🙂
  गेला तो उन्हाळा आणि येणारा तो(च) पावसाळा…

 7. देवेन काय झालं होतं ते विचारात नाही..आता सर्व आलबेल आहे न?? चला पटापट दवबिंदू चमकू द्या….:)

 8. देवा… तू परत आलास खूप बरं वाटलं…
  >> आपली परीक्षा घेणारे क्षण त्रास देणारे तर असतातच पण ते तितकेच आपल्याला प्रगल्भ बनवत असतात.

  अगदी खरंय… हा त्रासाचा काळ विसरून आता परत फिनिक्स पक्ष्यासारखे पंख पसार..

  खूप खूप शुभेच्छा!!

 9. तसही उन्हाळ्याच्या दिवसात दवबिंदू दिसेनासेच होतात, पण पावसाळ्यात पाऊसाच्या निमित्ताने का होईना दवबिंदू आपल्या अस्तित्वाची वेळोवेळी जाणीव करून देत असतो .आणि आता पावसाळा आलाय….हे खुप सुंदर !!!!!
  देव,नातेसंबंधात ह्या गोष्टी व्हायच्यातच रे…झालं गेलं..सगळं..विसरुन नव्याने सुरुवात कर…तुला खुप खुप शुभे्च्छा !!!!

टिप्पण्या बंद आहेत.