पाऊस आणि मी


तुझ्या  स्वागतासाठी
हिरवाईने नटते अवघी सृष्टी
आम्ही आलो काय, गेलो काय
दिसतात तेच चेहरे दु:खी कष्टी
.
तू आपल्या मर्जीचा मालक
पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
आम्ही मात्र अजाण बालक
आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
.
तू कसाही कोसळलास तरी
कोणीतरी पाहतच असते  तुझी  वाट
कोणासाठी कितीही केलं तरी
आमची नेहमी लागत असते वाट
.
पण तू सोबतीला असलास की मला
उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
तुझी  साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही
.
मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
तू वेड्यासारखा  कुठेही पडत असतोस
आणि माझे अश्रू सुकले तरी
तू मात्र नेहमीच रडत असतोस…..
.
-देवेंद्र चुरी
(हि कविता आधी जालरंग प्रकाशनाच्या  ऋतू हिरवा -२०११  ह्या  वर्षा विशेषांकात प्रकाशित झाली आहे. )
Advertisements

42 thoughts on “पाऊस आणि मी

 1. waah…sundar kavita…..

  मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
  तू वेड्यासारखा कुठेही पडत असतोस

  hya don oali…. bass ….sahich…!!

 2. तू आपल्या मर्जीचा मालक
  पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
  आम्ही मात्र अजाण बालक
  आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
  .
  खरंचच सुंदर,

  माझ्या ब्लॉग वर आलात, वाचलंत, खूप आभार.

 3. मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
  तू वेड्यासारखा कुठेही पडत असतोस
  आणि माझे अश्रू सुकले तरी
  तू मात्र नेहमीच रडत असतोस…..

  जबरदस्त !! खुप आवडली !!

 4. >>पण तू सोबतीला असलास की मला
  उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
  तुझी साथ मग हवीशी वाटते, कारण
  तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही

  अप्रतिम….

 5. तू आपल्या मर्जीचा मालक

  पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो

  आम्ही मात्र अजाण बालक

  आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो

  very nice lines for our regular routin life.

 6. तू कसाही कोसळलास तरी
  कोणीतरी पाहतच असते तुझी वाट
  कोणासाठी कितीही केलं तरी
  आमची नेहमी लागत असते वा

टिप्पण्या बंद आहेत.