जय श्री कृष्ण…


देवकीच तान्ह बाळ तू
कंस-शिशुपालाचा काळ तू

यशोदेला लागलेला लळा तू
श्यामवर्णी मेघ सावळा तू

गोपिकांची फोडलेली घागर तू
त्यांच्या प्रेमाचा सागर तू

गोवर्धनाचा करंगळीवरील भार तू
तूच सांगीतलेल्या गीतेच सार तू

गायीगुरानांही मोहवणारा गोपाल तू
कालियामर्दन करणारा नंदलाल तू

रासलीलेतील मग्न गवळण तू
प्रेमाची दिलेली नवी शिकवण तू

सुदाम्याचा पाठीराखा तू
उद्धवाचा परम सखा तू

द्रौपदीचा निस्सीम विश्वास तू
राधेचा हर एक श्वास तू

मीरेची वेडी भक्ती तू
पांडवांची खरी शक्ती तू

महाभारताचा खरा सूत्रधार तू
कुलांताच्या शापातही निर्विकार तू

पांचालीच अखंड वस्त्र तू
भीष्मप्रतिज्ञेसाठी हाती घेतलेलं शस्त्र तू

दुर्जनांचा विध्वसंक सुदर्शन चक्रधर तू
युगातीत असा युगंधर तू

मुरलीचा मधुर नाद तू
हृदयाला दिलेली साद तू

माझ तन-मन, जीवन तू
कान्हा मजहूनि  का आहेस भिन्न तू

-देवेंद्र चुरी

गेल्या डिसेंबर महिन्यात मथुरेच्या पावन भूमीला भेट दिली होती तेव्हाचा हा फोटो...इथेच मध्ये ते वसुदेव-देवकीला ठेवण्यात आलेल कारागृह तसेच कृष्णाच सुंदर मंदिर आहे...

Advertisements

6 thoughts on “जय श्री कृष्ण…

    • धन्स भावा …. युगंधर वाचल्यापासून मनाला कृष्ण आधी होता त्यापेक्षा अधिक पटीने भावला … तोच थोडा पद्यातून व्यक्त करायचा प्रयत्न केला… 🙂

टिप्पण्या बंद आहेत.