इश्क मेरा , दर्द मेरा ….


त्याच  तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम होत.त्याने तिला तस सांगीतलही होत, पण तिला त्याच्यात काही विशेष रस नव्हता.त्याला मात्र कधी ना कधी ती आपल्याला हो म्हणेल अस वाटत होत .त्याच नाव रोहन राठोड आणि ती सुप्रिया , तसा तो ही काही वाया गेलेला रस्त्यावरचा मवाली  मुलगा वैगेरे  नव्हता तर  तो आयआयटी गुवाहाटी सारख्या नामांकित शिक्षणसंस्थेत अभियांत्रिकीच शिक्षण घेत होता.पण काय असते ना ह्या जगात प्रत्येकाच्या नशिबात प्रेम लिहलेलच असेल अस नाही ना.त्यात ह्याच दुर्दैव अस कि त्याला कर्करोग झालेला आहे  आणि तो आता उपचाराच्या बाहेर गेलाय हे त्याला कळते.त्याला मरणाची काही वाटत नाही पण आता आपण तिच्यापासून दूर होणार ही गोष्ट त्याला खूप हेलावून टाकते.त्यातच तो तिच्यासाठी एक गाण लिहतो आणि ते गाण जेव्हा तो गाऊन रेकॉर्ड करतो त्याच्या पंधरा दिवसांनी तो हे दुष्ट जग सोडून जातो.प्रेमाच्या शोधात…एका वेगळ्याच जगात….कधीही परत न् येण्यासाठी…मागे राहते ते फक्त त्याच गाण….तिच्यासाठी लिहलेल …

ते गाण…….

‘एम्प्टीनेस’

Ho love of mine..
with a song and a whine..
You’re harsh and divine..
like truths and a lie..

but the tale end’s not here..
I’ve nothing to fear..
for my love is yell of giving an hold on…
in the bright emptiness..
in the room full of it..
is a cruel mistress ho ho o…

I feel the sunrise..
that nest all hollowness..
for i have nowhere to go and im cold..

And i feel so lonely yea..
There’s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..
There’s a better place from this emptiness..

yeiyeiyeiya….
Aa..aa.. aa…..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा …..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा ….

आशिक तेरा ..
भीडमे खोया रेहता है
जाने जहा …
पुछो तो इतना केहता है..

And i feel so lonely yea..

There s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..

*******##***********##****************##***************##**********************##******************##****************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.त्याआधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्याने काही लोकांना ती गाणी पाठवली होती. पण त्याने अल्बम काढायच्या आधीच इंटरनेटवर त्यातील एक गाण एका वेगळ्याच हृदयस्पर्शी कथेसह अवतरल.ते तिथे कस आल ते त्याला कळत नव्हत आणि नेटवर ते दुसर्याच्या नावाने इतक प्रसिद्ध झाल होत कि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हत .तेव्हा त्याने लवकरात लवकर  तो अल्बम प्रदर्शित करायचं ठरवलं…

त्या अल्बममधील दुसर एक गाण ….

(खूप सुंदर आहे हे ‘एम्प्टीनेस’ सारखच ,विडीयो ह्या गाण्याचा नसला तरी चांगला ‘सिंक्रोनाइज’ झालाय ..जरूर पहा,ऐका … )

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , (वाचा ,वाचा ..बाय मिस्टेक दुसऱ्यांदा   नाहीये हे .. 🙂  )त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.गाणी तर छान होतीच पण खरच अल्बम काढला तर त्याची कोणी एवढी दखल घेईल का..शिवाय येणारा आर्थिक खर्च …आणि  कित्येक अल्बम असेच येऊन जातात… मग आता काय करायचं हा विचार करताना त्याच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली …….

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

काहीही असो , हे गाण खूप खूप सुंदर आहे आणि म्हणूनच  ते मला न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.मी ५-६  महिन्यापूर्वी परत  एकदा काही दिवस   गिटार  क्लासला गेलो होतो तेव्हा तिथे मी सर्वात पहिल्यांदा हे गाण ऐकल आणि ‘लव अॅट फर्स्ट साईट’ म्हणतात तस ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो .खरतर बरीच  गाणी काही वेळा ऐकल्यावर चांगली वाटायला लागतात पण ह्यासारखी काही गाणी असतात कि जी ऐकताक्षणीच आपल्याला आवडतात.त्यादिवशी घरी आल्यावर लगेच ते  गाण नेटवर मिळते का हे  बघण्यासाठी गुगलबाबाला विचारले असता ती वरील हृदयस्पर्शी आणि गाण्याचा ‘इम्पॅक्ट’ कितीतरी  अधिक पटीने वाढवणारी माहिती मिळाली.पण काही अजून लिंक्स पडताळल्यावर सत्य परिस्थिती समजली ,लाखो लोकांच्या हृदयाला हात घालणारा ‘रोहन राठोड’ कधीच अस्तित्वात नव्हता.

आयआयटी गुवाहाटीने असा कोणीही ‘रोहन राठोड’ त्यांच्या इथे कधीही नव्हता आणि वरील प्रसंग दुसर्या कोणाही मुलाबरोबर तिथे घडलेला नाही असे स्पष्ट केलेले असतांना देखील अजूनही  लाखो  लोक जाणूबुजून असो कि कसेही पण रोहन राठोडच्या अस्तीत्वाबाबतचे हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. कितीतरी लोकांनी त्याला समर्पित करून ह्या गाण्यांच पूर्ण हिंदी गाणही काढल आहे. तर रोहन गेल्यावर सुप्रियाची मनोव्यथा मांडणारीही कित्येक गाणी युट्युबवर सापडतात.त्यातील मला आवडलेल्या विडियो खाली जोडतो आहे.तो ही जरूर पहा,गाण तर सुंदर आहेच पण विडीयोही छान तयार केला आहे.

आजकाल चित्रपटाबाहेरील गाणी तितकीशी ऐकली जात नाहीत कारण अनेक हिंदी गाण्याचे अल्बम्स आजकाल नुसते येऊन जातात.जास्तीत जास्त थोडे रीमिक्स्चे अल्बम चालतात पण एक काळ होता , म्हणजेच माझ्या  लहानपणाचा 🙂 जेव्हा अनेक गायकांच्या चित्रपटातील गाण्यांबरोबरच त्यांच्या नवीन अल्बम्सचीही अगदी आतुरतेने वाट पाहिली जायची.तसेच इतरही नवीन गायकांचे अल्बम्स चांगले असल्यावर ठीकठाक खपत होते.पण आता अल्बम काढण बरचस सोप असल तरी ( पैसा बोलता है… 🙂 ) तरी त्याला लोकप्रियता मिळण खूप कठीण होऊन बसल आहे .ह्या गोष्टीचा ह्या प्रकरणावर  बराचसा प्रभाव असावा असे मला तरी वाटते .

हे गाण खर तर अजून सर्वासमोर आलेल नाहीये पण इंटरनेटशी ‘कनेक्ट’ असलेल्या लोकांमध्ये मात्र हे गाण भलतच लोकप्रिय आहे.फेसबुकवर ह्या गाण्याची जवळपास दोन लाख लोक असणारे एक आणि  तसेच अजून एक लाखावर लोक असणारे एक ‘फॅनपेज ‘ आहे. ह्या गाण्याच्या हजारो लोक असलेल्या ‘फॅनपेज ‘ चा तर खुपच सुळसुळाट आहे.नेटवरील माहितीनुसार सुमारे १५ लाखाहून जास्त दर्शक ह्या गाण्याला आतापर्यत मिळालेले आहेत.वेगवेगळ्या सिनेमातील दृश्ये ,छायाचित्रांचे स्लाईड शो वापरून तयार केलेले  ह्या गाण्याचे तब्बल ३०० हुन अधिक विडीयोज युट्युबवर आपल्याला पाहायला मिळतात.ह्या प्रकरणाची दखल हिंदुस्थान टाईम्समध्येही मागे घेतली गेली होती. मी सुद्धा ह्या गाण्याचा चांगलाच प्रसार करतो आहे , आतापर्यंत अनेक लोकांना मी हे गाण ऐकवलं आहे आणि  ज्यांना ज्यांना हे गाण ऐकवल आहे त्यातील कोणीच अजून ते आवडलं नाही अस म्हटलेलं नाही… 🙂

कधी अस्तीत्वात नसूनही अमर झालेल्या रोहन राठोडचा ‘एम्प्टीनेस’ तुमच्या आवडत्या गाण्याच्या यादीतील  एखादी जागा भरतो  का ते आता तुम्हीच बघा…

Advertisements

26 thoughts on “इश्क मेरा , दर्द मेरा ….

  • मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे ग ती….. 🙂 अशी शीर्षक असली कि लोक चटकन भेट देतात ना … 🙂
   आमच्याबद्दल कोणालातरी काळजी आहे हे वाचून बर वाटलं…. 🙂

 1. खरंच अप्रतिम आहे हे गाणं… आणि त्याची इतर वर्जंस! यात “तुने मेरे जाना” (HeartBeat Version) चा उल्लेख नाहीये… ऐकलं नसेल तर जरूर ऐका…! गाण्यामागे कथा कितीही असोत, गाणी सुंदर बनवलीयेत एवढं नक्की!!!

 2. ओह्ह्ह!
  गाण्याच्या माहितीबद्दल धन्यवाद !
  माझंही अत्यंत आवडतं गाणं आहे ! माझ्या एका मैत्रीणीने जबरदस्तीने मला ऐकवलं होतं.

 3. च्यायला मला मी केव्हमन असल्यासारखं वाटतंय… इतिहास सोड यातलं एकही गाणंही साधं माहित नव्हतं :((

  आभार्स रे.

  • अरेरे किती हे अज्ञान… 🙂
   मला तर भरपूर बाबतीत अस वाटते रे केव्ह्मन झाल्यासारख…. 🙂 तुम्ही त्या वेगवेगळया सिरीयल्स वैगेरेबाबत बोलता ना तेव्हापण .. 🙂

 4. हाहाहा !! 🙂
  मलापण हे गाणे त्या “दर्दभरी दास्ताँ” सह कळले होते. माझा तेव्हा विश्वास बसला नव्हता. कारण ह्याआधी अशा “सहानुभूती”च्या तंत्राशी सामना झाला होता. 🙂 पण गाणे आवडले होते. मग जेव्हा सार्‍यांकडून हीच कथा ऐकत गेलो आणि ज्याच्या-त्याच्या मोबाईलवर हे गाणे वाजू लागले तेव्हा “गोबेल्स”च्या सिद्धांताप्रमाणे मला पण ही कथा खरी वाटू लागली. पण मी कधीच हे गाणे मोबाईलवर टाकले नाही,कारण ऐकले की कॅन्सरने तिळ-तिळ मरत गाणे गाणारा एक मुलगा डोळ्यांसमोर यायचा.. 😀 पण इथे हपिसात एकाची रिंगटोन आहे आणि “जाना तू नहीं जाना…” वाजत असते. 😦
  च्यायला मी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाच नाही. इच्छा झाली होती २-३ दा 🙂 आमचे काम सोपे केल्याबद्दल धन्स रे 🙂 मस्त लेख , आवडला.. ” अंधारातून प्रकाशाकडे ” नेणारा आहे 🙂 बाकी हा गजेंद्र वर्मा मेधावी निघाला रे 😛

 5. ऐकावं ते नवलच…बाकी हेराम्ब्शी पूर्णपणे सहमत….बाकी तू अशा माहित्या शोधून आमचा इतिहास, वर्तमान पक्का करतोयस..देव देवेनच भलं करो…:)

 6. >>>>च्यायला मला मी केव्हमन असल्यासारखं वाटतंय… इतिहास सोड यातलं एकही गाणंही साधं माहित नव्हतं 😦 (

  आभार्स रे.
  +१ (केव्हमनला केव्हवूमन कर फक्त 🙂 )
  आणि
  >>>>अरेरे किती हे अज्ञान… 🙂
  मला तर भरपूर बाबतीत अस वाटते रे केव्ह्मन झाल्यासारख…. 🙂 तुम्ही त्या वेगवेगळया सिरीयल्स वैगेरेबाबत बोलता ना तेव्हापण .. 🙂
  + पण १ (केव्हमनला केव्हवूमन कर फक्त 🙂 )

  आता बघ तुम्ही केव्हमन वगैरे तर मला शोधायला तर दाट जंगलातच जायला हवे 😉 अजिबात कल्पना नाही या गाण्यांबद्दल 🙂 … आभार देवा!!
  पोस्टचं नाव वाचून मात्र क्षणभर समजेचना काही 🙂

  • हा हा हा …. मला वाटते आपण सगळेच कसल्या न कसल्या बाबतीत केव्हमन / केव्हवूमन आहोत….. 🙂
   त्या पोस्टच्या नावातील ओळी गाण्यात आहेत मध्ये , वाचकांच लक्ष पटकन ओढून घेणारया असल्याने वापरल्यात … 🙂

 7. @ तन्वी….मला देखील हि गाणी माहित नव्हती….तू एकटी नाहीस हि गाणी माहित नसलेली.. हम साथ हैं आपके 😛 :P..पण दोघींना कळली हि गाणी….आभार देवेन.!!..पोस्ट पण छान आणि गाणी पण…..:)

 8. अजून एक केव्हवूमन वाढव.. मला पण माहित नाही हे गान पण आज ऑफिस मधून घरी जाताच शोधून एकतेच.. भलतीच interesting पोस्ट 🙂

टिप्पण्या बंद आहेत.