पाऊस पडत असताना…(5)पाऊस पडत असताना…
चमकणाऱ्या विजा अन ते सळसळणारे वारे
मातीचा सुगंध अन थेंबांचे मंद नाद न्यारे
मला भिजायला बोलवायचे तुझे इशारे हे सारे


छायाचित्र नेटवरून साभार…

पाऊस पडत असताना…
अजून हव तरी काय
खमंग तळलेली भजी
अन एक कटिंग चाय

हया सदरातील भाग-१,भाग-२,भाग-३  भाग-४ ही तुम्ही वाचु शकता….

Advertisements

34 thoughts on “पाऊस पडत असताना…(5)

 1. व्वा पावसाबरोबर, देवेंद्रराजे सुद्धा बरसायला लागलेत.

  अजून चारोळी येऊ देत 🙂 🙂

  • >>>व्वा पावसाबरोबर, देवेंद्रराजे सुद्धा बरसायला लागलेत….

   अगदी साहजिकच आहे रे ते… 🙂

   >>>अजून चारोळी येऊ देत
   प्रयत्नांची पराकाष्ठा करेन..बाकी पाउस समर्थ आहेच… 🙂

   काय इन्स्टन्ट प्रतिक्रिया रे ,एक क्षण वाटलं आधीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिलीस कि काय … 🙂

  • अगदी पटलंय सुहास! देवेंद्रराजे फूल टू बरसायला लागलेत! एका बाजूला प्रिया आणि एका बाजूला चहा, कांदाभजी! आहाहाहा.. खरंच आवडलं देवेंद्र! मन प्रसन्न झालं! खरंच अजून येऊ देत चारोळी! 🙂

   • विनायकजी,प्रिया,चहा झाला पण अजूनही बर्याच गोष्टी आहेत पावसात आवडणाऱ्या … मस्त पुस्तक ,छान संगीत ,ट्रेक आणि बरच काही … खरतर माझ्यासारख्या पाउसवेड्याला पाउसाबरोबर अनेक गोष्टी आपोआपच आवडू लागतात ….

 2. पावसाबरोबर आपले ही स्वागत महाराजा..
  मायला बझ बंद झाला रे नायतर अजुन पाउस पडला असता नाय .. असो..
  Keep it up… 🙂

 3. पवसची मजा काही न्यारीच. कोणत्याही वयात आनंद घ्र्ता येतो. बाकीचे काही सत्यात आणि बरेच काही कल्पनेत! पण व! तुम्ही आनंद दिलत.

 4. ते तुमचे शेवटचे कडवे आमच्या दुखर्या भागावर आघात करून गेले पहा.
  एक गरम चाय की प्याली हो
  कोई उसको पिलाने वाली हो
  असे अन्नू आणि सलमान साठी भसाड्या आवाजात गाऊन गेलाय पण त्यातील मर्म मी अनुभवले आहे.
  आमच्या देशात चहा महात्म्य नाही तर कॉफी ची अधिराज्य चालते.
  तेव्हा हातात येथील राष्ट्रीय पेय बियर मिळेल पण चहा आणि भज्या मिळत नाहीत.

 5. पाऊस पडत असतांना, हळूच तू साद देतेस,
  पावसाच्या आवाजात मात्र ती विरून जाते.
  पावसाकडे मी एकटाच पहात बसलो असतो,
  चहाचा कप मात्र समोरच टेबलवर गार होत असतो..

 6. पाऊस पडत असतांना, शरीर माझं भिजत असतं,
  विसरलेल्या आठवणी मधे, मन मात्र कोरडं असतं.

 7. मी तुला मेसेज टाकणारच होतो…एवढे दिवस ब्लॉगवर धूळ साचली होती आता पावसामुळे ब्लॉगला नवा रंग चढला पहा…

टिप्पण्या बंद आहेत.