एक था टायगर …


पाडव्याच्या दिवशी जेव्हा त्या अफवा ऐकल्या तेव्हा वाटलं लवकरच मातोश्रीतून रुद्राक्षांची माळ परिधान केलेला हात उंचावेल आणि ……पण …. 😦 😦 😦


राजकारण आवडत नसल तरी मला इतका भावलेला,मला इतक आकर्षित करणारा आजच्या घडीचा एकमेव राजकीय नेता म्हणजे आपले साहेब…. साहेबांच एकूण व्यक्तिमत्वच अस आहे कि ‘लव इट ऑर हेट इट बट यु कांट इग्नोर इट’, म्हणूनच त्याना निस्सीम प्रेम-श्रद्धा अनुभवायला मिळाली आणि बरोबरच प्रखर विरोधही सहन करावा लागला.”हम खुशनसीब है हमे दुश्मन भी मिला तो सिवा जैसा” अस औरंगजेबाने म्हटलेलं तसच त्यांचा राजकीय शत्रुनांही आता नक्कीच वाटलं असेल.तर अश्या प्रकारे साहेब एकतर कोणाच्या हृदयात असायचे नाहीतर मग डोक्यात तरी, आणि मी शिवसैनिकही नसतानाही लहानपणापासूनच त्यांच्या ‘डॅशिंग’ पणामुळे त्यांना माझ्या हृदयात जागा दिली होती.आणि अश्या प्रकारे माझ्यासारख्या अश्याच लाखो लोकांच्या हृदयात विराजमान होऊन ते ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले होते, आजही आहेत आणि निरंतर राहतील.

गेल्या दोन-तीन दिवसात बाळासाहेबांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल वर्तमानपत्रात खूप काही लिहून आलेल आहेच आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कितीही लिहल तरी कमीच असल तरी मला त्याबद्दल इथे काही लिहायची काही गरज नाहीये.पण ही पोस्ट टाकावीशी वाटली ती सोशल मीडियावर वाघ गेल्यानंतर चालू असलेल्या माकडचाळयांमुळे…साहेबांबद्दल काडीचीही माहिती नसलेली शेबंडी पोर साहेबांबद्दल काहीही बरळताहेत.मी बाळासाहेबांबद्दल वाचलेल्या काही इंग्लिश लेखांवरील प्रतिक्रिया तर वाचवत नाहीत इतक्या ओंगळ आहेत.(इथे जाणीवपूर्वक त्या लिंक्स देत नाहीये) ठीक आहे एखाद्याची मत मान्य नाही पण काळ-वेळच काही भान नको.इतर वेळी कोणी अस काहीस बरळल तर कदाचित इतक लक्ष कोणी दिल नसत.व्यक्तीस्वातंत्र्य असल तरी आपण कधी आणि काय बोलतोय त्याचा आता काय परिणाम होईल ह्याचा थोडाही विचार करायला नको का…

तर नको तिथे आपली अक्कल पाजाळणाऱ्यांनी जरा इथे लक्ष द्या,
हा इतका जनसमुदाय आणि सर्वच क्षेत्रातले दिग्गज फक्त भीतीने तिथे आले होते का .. आणि तेसुद्धा ते गेल्यावर …एखाद विधान करून क्षणात ‘मी हे वाक्य कधी बोललोच नाही’ अस म्हणणाऱ्या नेत्यांच्या गोतावळ्यात साहेबांसारखा धनुष्यातून निघालेल्या बाणासारखा ठाम,परखड आणि सडेतोड बोलणारा आणि बोलून नंतर पलटणारा एक तरी नेता आहे काय …आणि साहेब भाषणही कधी लिहून आणायचे नाही जे बोलायचे ते अगदी उत्स्फूर्त…तब्बल साडे चार दशक शिवाजी पार्कात ते आपल्या अमोघ वक्तृत्वाने अवघ्या जनमानसाची मने जिंकत राहिले,इतक्या प्रदीर्घ काळ अशी परंपरा राखणारा दुसरा कोणी नेता आहे का …सत्ता हातात आलेली असतानाही तिचा लोभ न धरता ती कार्यकर्त्यात वाटणारा नेता आहे का दुसरा कोणी …९३ च्या दंगलीत मुंबईकरांना सावरणारे हात होते ते साहेबांचेच…गुंड प्रवृत्तींवरही साहेबांचा वचक असल्यामुळेच मराठी आणि हिंदू नाही इतर धर्मीय लोकही निर्धास्तपणे घराबाहेर पडत आहेत …आजकाल नेता मेल्या वर लोकांना आनंदच जास्त होतो पण बाळासाहेब ह्याला अपवाद ठरले ते नुसतेच का …..जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची कला शिवाजी महाराज आणि पहिल्या बाजीरावानंतर कोणाला जमली तर ती साहेबांना …आज ते गेल्यावर लाखो लोकांच्या घरात घरातलं कोणी गेल्याची जी भावना निर्माण झाली आहे ती उगाच आहे का …खर आहे इतर वेळी आपली जीवनगाडी हाकण्यात मग्न असलेल्या आमच्यासारख्यांच्या ध्यानीमनी नव्हते साहेब पण ती बातमी एकताच लाखो लोकांच्या मनात एक पोकळी का निर्माण झाली, एक हलकीशी का होईना असुरक्षिततेची कल्पना त्यांच्या मनात का आली…ते नुसते असण्याचाही मोठा आधार होता …

तर लक्षात घ्या त्यांच नाव ‘बाळ’ असल तरी अवघ्या महाराष्ट्राचे ते ‘बाप’ होते …

हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख,तडफदार नेता,एक थोर व्यंगचित्रकार,निर्भय आणि खंदा व्यक्ता,एक भगव वादळ,एक झंझावात,एकटा टायगर -ढाण्या वाघ,मराठी अस्मितेचा बुलंद आवाज,ज्वलंत हिंदुत्वाचा एकमेव खुला पुरस्कर्ता

अश्या मा. बाळासाहेब ठाकरेंना ह्या दवबिंदूकडून मानाचा मुजरा आणि भावपुर्ण श्रध्दांजली…

झालेत बहु
होतील बहु
परंतु या सम हाच…

एक पर्व संपले….एक वादळ शांत झाले …

पण त्यांनी आपल्यात निर्माण केलेला स्वाभिमान जपून आपण त्यांना निरंतर जिवंत ठेऊया …जय महाराष्ट्र !!!

Advertisements

16 thoughts on “एक था टायगर …

 1. संपुर्ण पोस्ट + १ !!
  जय महाराष्ट्र !!!

  (देवा पोस्टचं नाव वाचून घाबरले होते क्षणभर म्हटलं बाबा त्या भयावह सिनेमाबद्दल काही लिहीलेस की काय ?? )

  • बघ ना ताई ,उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अस चाललाय ह्यांच …नाही कळणार ह्यांना साहेब…असो… जय महाराष्ट्र !!!

   (तो भयावह सिनेमा नक्कीच आवडला नाही पण दबंग-२ ची वाट बघतोय )

 2. सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.
  अश्या नाठाळाच्‍या माथी आपले शाब्दिक बाण सेनेच्या ह्या ढाण्या वाघाने मारले.
  हिंदूच्या बाजूने बोलणारा व त्यांच्या कैवार जाहीररीत्या घेणारा नेता म्हणून साहेबांचा उल्लेख होतो.
  त्यांना विनम्र प्रणाम

  • >>>सर्व हिंदू हे विचारवंत नसतात पण सर्व विचारवंत हे हिंदू द्वेष्टे असतात.
   ५० % जास्त तरी विचारवंत हिंदू द्वेष्टे आहेत नक्कीच …नक्की काय साध्य करतात हे लोक ते कळत नाही ,किंबहुना स्वत:ला विचारवंत म्हणवून घेण्यासाठी हिंदुद्वेष्टी विधान करण्याइतका सोपा मार्ग दुसरा नाहीये हे ह्यांना चांगल कळत असाव ….

   असो,आपल्याला स्वाभिमानाने मान ताठ करून जगायला शिकवलं ते साहेबांनीच …जय महाराष्ट्र !!!

 3. काय बोलू? प्रत्येकाचा देव वेगळा, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी… !!!

  अवांतर – लिखाण सुरु केल्याबद्दल धन्स रे भावा 🙂 🙂

 4. हार्दिक अभिनंदन.. आपल्या लेखनाने प्रभावित होऊन आम्ही आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर केला आहे.
  अधिक माहितीसाठी भेट द्या.

  http://www.Facebook.com/MarathiWvishv
  http://www.MWvishv.Tk
  http://www.Twitter.com/MarathiWvishv

  धन्यवाद..!!
  मराठी वेब विश्व – मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
  आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल समस्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

  टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!

टिप्पण्या बंद आहेत.