जगबुडी


आज १२/१२/१२ …आता तो दिवस जवळ येतोय …. हो तोच तो महाप्रलयाचा दिवस…कयामतका दिन…डूम्स-डे….दि जजमेंट डे…२१ डिसेंबर २०१२….

तर प्राचीन माया संस्कृतीच्या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ हा दिवस शेवटचा दिवस आहे. हजारो वर्षांच्या या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ नंतरची कालगणना दाखविलेली नाही.हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन अश्या जगातल्या जवळपास सर्वच धर्मात जगाचा अंत निश्चित मानलेला आहे.वैज्ञानिकदृष्ट्याही पृथ्वीवरील उष्णता आणि शीतलता ‘एक्स्ट्रीम’ वाढून पृथ्वीचा अंत निश्चित आहे.त्सुनामी आणि तत्सम नैसर्गिक आपत्त्याही अधून मधून तोंड बाहेर काढत आहेत.म्हणूनच ‘ ग्लोबल सीड वॉल्ट‘ सारखा आतिशय मोठा प्रकल्प नॉर्वे येथे राबवला जात आहे,ज्यात बिल गेटस सारख्या लोकांचा सहभाग आहे. तरी जगाचा अंत इतक्या लवकर होईल अस वाटत नाही.पण येत्या काही दिवसात मिडिया जड जड शब्द वापरून मोठ्या मोठ्या विशेषणांसह जगबुडी हा विषय चांगलाच चघळणार आहे.मला वाटते जगाला खरा धोका कसला आहे तर तो प्रचंड प्रमाणात केलेल्या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या असमतोल पर्यावरणाचा ,प्रदूषणाचा ,होऊ घातलेल्या अणुबॉम्बयुक्त महायुद्धाचा…

तर ही पोस्ट टाकण्यास कारण म्हणजे पन्हाळगडाच्या निमित्ताने कोल्हापूरला केलेला पहिलावहिला आणि झटपट एकदिवसीय दौरा.तुम्ही म्हणाल माझ्या कोल्हापूर दौऱ्याचा आणि जगबुडीचा काय संबध ?तर संबध आहे.मलाही हे रहस्य तिथे गेल्यावरच उलगडल.ते आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी हा लेखप्रपंच.तर भक्तजनहो नीट लक्ष देऊन वाचा, ही जगबुडी कधी होणार त्याची कहाणी.कोणत्याही शिवमंदिरात आपण जातो तर तिथे शिवलिंग मुख्य गाभार्यात व बाहेरील भागात नंदी पाहावयास मिळतो.पण कोल्हापुरातील रंकाळा तलावा किनारी असलेल्या मंदिरात नंदीची साधारण पाच ते  सहा  फूट उंचीची  मूर्ती मुख्य गाभार्यात आहे व शिवलिंग बाहेरील भागात आहे. तिथल्या एका व्यक्तीला ह्याबाबत विचारले असता त्याने सांगितले ,(…ढॅण टॅ णॅण… )कि हा नंदी  दरवर्षी गहूभर पुढे व तिळभर मागे सरकतो आणि हा सरकत सरकत जेव्हा रंकाळा तलावापर्यंत पोहोचेल तेव्हा जगबुडी होईल…युरेका …आहे कि नाही ‘तलाश’ सिनेमातील रहस्याहून जास्त धक्का देणार  रहस्य… 🙂 आणि आता निर्धास्त रहा कारण मी पाहीलय अजून तो नंदी तलावापर्यंत पोहोचण्यास बरच ‘मार्जिन ‘  आहे.

23

हेच ते मंदिर ….

तर काही कारणांनी कधी  जगबुडी झालीच तर ज्यांनी पन्हाळगडाला आजवर  भेट दिली नाहीये आणि समजा पुढेही तसा योग जुळून येणार नसेल  पण  त्यांनी इथे भेट दिली आहे त्यांना काही छायाचित्रांद्वारे पन्हाळगडासह कोल्हापूरची थोडक्यात सहल घडवण्याच्या प्रयत्न खाली करतोय…….

तर कोल्हापूर  शहराच्या वायव्येस सुमारे १८ किमी वर  समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर असणारा   पन्हाळा हा किल्ला म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनांचा जिवंत साक्षीदार.तसेच शिवाजी महाराज  आणि संभाजी  ह्यांचा आवडता किल्ला.दोन वेळा मराठ्यांची राजधानी म्हणून मान मिळालेला हा किल्ला.सलग चार महिने सिद्दी जोहारच्या वेढ्यात महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला.शिवाजी आणि संभाजी महाराजांबरोबरच बाजीप्रभू देशपांडे ,वीर शिवा काशीद,ताराराणी,कवी मोरोपंत,रामचंद्रपंत अमात्य अश्या अनेकांच्या आयुष्यातील  महत्वाच्या घटनांशी जुडलेला हा किल्ला. हा किल्ला शिलाहार वंशी राजा भोज दुसरा याने बांधला.पुढे अनेक राजसत्तांनी इथे राज्य केले हे तेथील दरवाज्यावर कोरलेल्या राजचिन्हातून दिसून येते.

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा…

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे ...

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे …

तटबंदी

तटबंदी

4

दरवाजावर कोरलेली काही राजचिन्हे…

5

6 7

आजच एक चिन्ह .. 😦

9

10

11

8

14

अंबरखाना

13

कोठाराचा आतील भाग …

30

सज्जा कोठी : शिवाजी व संभाजी महाराजांची शेवटची भेट ह्याच ठिकाणी झाली होती .

15

सज्जा कोठीतून …

16

सज्जा कोठीतील नक्षी …

17

सज्जकोठीची गच्ची …

26

धनाजीराव वाकडे (धुमधडाका ) घर … 🙂

18

19

महालक्ष्मीआईच्या नावान चांगभल …

25

ज्योतिबाच्या नावान चांगभल …

21

येथे आत भिंतीवरील चित्र पाहण्यासारखी आहेत .अजिबात चुकवू नका.

24

22

कुस्तीच मैदान

20

न्यू पॅलेस व म्युझियम: अनमोल ऐतिहासिक वास्तूंबरोबरच आतील त्याकाळच्या दरबाराची मांडणी बघण्यासारखी आहे…

27

शालिनी पॅलेस…

28

रंकाळा

29

गुंग झालात ना पन्हाळा आणि कोल्हापूरची थोडीशी झलक पाहण्यात तर खरच आवर्जून आणि जास्त वेळ काढून भेट देण्यासारख हे ठिकाण आहे .तर आपण कुठे होतो … हा जगबुडी …भ्रष्टाचार आणि महागाईचा भस्मासुर कित्येकांना रोजच मरायला भाग पाडत आहे. त्या रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच सर्वजण गेले तर बरच होईल,अस भारतातील बहुसंख्य लोकांच मत असेल.आणि समजा झालीच जगबुडी, तर काय बिघडणार आहे? आपण सगळेच नसणार तर चिंता कसली? तेव्हा जगबुडीला घाबरलेल्या किंवा मुळत:च उदासीन असलेल्या चिंतातुर जंतूनो किंवा स्वतःचा अकार्यक्षमतेपणा लपवण्यासाठी ह्या संकल्पनेच्या कुबड्यां घेणार्यांनो वेळेवर जागे व्हा.ह्या आणि असल्या संकल्पनांवर स्वत:चा फायदा करून घेणारेही आहेत.मी सुद्धा कं मुळे इतके दिवस बंद असलेल्या ‘दवबिंदू’वर पोस्ट टाकण्यासाठी ह्या संकल्पनेचा कसा वापर केला आहे ते बघा.तेव्हा   जगबुडी नाही झाली तर काय होईल हा विचार करा आणि आपापल्या कामाला लागा… 🙂

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ, जीभर जियो
जो है  समा, कल हो न  हो….

Advertisements

34 thoughts on “जगबुडी

 1. मी म्हटलं शास्त्रोक्त माहिती वगैरे देतोयस कि काय जगबुडीची 😀

  पन्हाळा नितांत सुंदर आहे… फोटो मस्त आहेत आणि आता कंटाळा झटक काही जगबुडी होत नाही :p 😀

  • शास्त्रोक्त आणि मी … 🙂
   खरच पन्हाळा नितांत सुंदर आहे…कधी काळी जगबुडी झाली तरी कंटाळा काही बुडणार नाही त्यात इतका पॉवरफुल कंटाळा आहे माझा ..त्यामुळे झात्काय्ला खूप त्रास होतो रे… 🙂

 2. माझी काळजी मिटवलीस बघ 🙂 . मी अमितला म्हणत होते की मी नाही जात भारतात, त्यापेक्षा २१ डिसें. झालीच जगबूडी तर सोबत बुडू :). आता येते निर्धास्त भारतात 🙂
  फोटो खूप खूप सुंदर आहेत देवा… प्रसन्न अगदी!!

 3. एवढ सगळ एका दिवसात! काय सुपरम्यान भाड्याने घेतला होता का?
  शिवा काशिदांचा पुतळा अप्रतिम आहे! आणि बाजींच्या हातातातील तलवारी (की दांडपट्टा) आणि त्यावरील हार पाहून भरून आल…
  ती बाटली फारच खटकली… ज्या इतिहासाने पायाला बळ दिल त्या इतिहासाला विकायला काढलाय राव लोकांनी 😦
  ते “येथे आत भिंतीवरील चित्र पाहण्यासारखी आहेत .अजिबात चुकवू नका.” … ते नक्की काय आहे? नाव जुळल नाही… थोडे दवबिंदू आलेत का लेन्स वर! 🙂

  • मी काय सुपरम्यानपेक्षा कमी आहे का … 🙂
   अरे ज्योतिबा आणि पन्हाळा दूर आहेत म्हणजे ते ही जास्त नाही १८ किलोमीटर सकाळीच निघून ह्या दोन ठिकाणी नीट पाहिली मग कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीच मंदीर तिथेच थोडी पेटपूजा केली.तिथे रिक्षा मिळतात त्या राजवाडा,कुस्त्यांच मैदान,चंद्रकांत मांढरे ह्यांच्या घरी असलेल त्यांच्या चित्रांच ( हे ही अगदी आवर्जून पाहाव अस आहे,अभिनयाबरोबरच चंद्रकांत ह्यांची चित्रकलाही अव्वल दर्जाची होती) ),कैलासगडची स्वारी ,नंदीच मंदीर(हे ठरलं नव्हत त्या रिक्षावाल्या काकांनी स्वत:हून दाखवलं ) ,शालिनी पैलेस अशी ठिकाण दाखवतात. मग संध्याकाळी मार्केटमध्ये फिरून रात्रीची गाडी …थोडीफार धावपळ तर झालीच पण असा नजारा मिळाला आणि थकवा कुठच्या कुठे पळाला …
   खरच यार खूप वाईट वाटल मलाही ती बाटली तिथे पाहून … 😦
   कैलासगडची स्वारी म्हणून शंकराच मंदीर आहे ते ,तिथे आत भिंतीवरील चित्र अगदी सुरेख आणि जिवंत आहेत.एक आपल यदा यदा ही धर्मस्य वाल कृष्ण आणि अर्जुनाच मोठ चित्र आहे पण त्यात रथाचे जे घोडे आहेत ते आपण ज्या बाजूला जातो तिथून आपल्या बाजूला येताना दिसतात.आणि तश्याच प्रकारच दुसर चित्र आहे ते सिक्रेट आता … 🙂

 4. जगबुडी होणार नाही ह्याचे वाईट वाटले.
  कितीतरी दिवस हॉलीवूड सिनेमात पाहत होतो ,वाटले प्रत्यक्ष पहायला मिळेल.
  पण कसले काय

  पन्हाळा गड उत्कृष्टरीत्या टिपला आहे.
  शिवा काशीद चा पुतळा पाहून निःस्तब्ध झालो.
  जोहर ला जेव्हा कळले असेल हा शिवाजी नाही आहे , तेव्हा त्याने त्याच्या भवतालच्या सैनिकांनी ह्या वीर पुरुषाचे काय हाल केले असतील आणि आपली ही नियती माहीत असून तो महाराजांच्या साठी हे दिव्य करायला तयार झाला.,

  सरफरोशों ने लहूं देके जिससे सींचा है
  ऐसे गुलशन को उजाड़ने से बचा लो यारों
  ह्या गायच्या ओळी आपसूकच तोंडावर आल्या.

  • निनाद , आपण निसर्गाची अशीच वाट लावत राहील तर तो दिवस दूर नाही ,प्रत्यक्ष पहायला काय अनुभवायलाही मिळेल सगळ… 🙂
   अश्या वीरपुरुषांत महाराजांबद्दल जी निष्ठा होती तीच तर आपल्या स्वराज्याची सर्वात मोठी ताकद होती…
   अगदी समर्पक ओळी आहेत यार …
   प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार…!

 5. आता दवबिंदूच म्हणतोय जगबुडी होणार नाही मग निश्चित होणार नाही. सध्या दव पडणं पण कठीण झालय तर जग बुडवायला पानी कुठे मिळणार;)
  लेख नेहेमी प्रमाणे मस्त.

 6. देवेंद्र अप्रतिम लेख … एका दिवसात बरीच रपेट केलीस… !!
  फोटोही अप्रतिम आहेत…. कोल्हापूरची छान तोंड ओळख घडवलीस … धन्यवाद !!
  त्या गहूभर पुढे व तिळभर मागे सरकणा-या नंदीच्या दर्शनाने जगबुडीचे बुडबुडे कायमचे फुटतील अशी अपेक्षा आहे…!! 😉 😛

 7. हुश्श …आता शांतपणे बुड टेकवता येईल जगबुडी नाही म्हणून (ये ले ल्लो और एक ज्योक जगबुडीपे… 😉 )

  बाकी फोटोंमुळे मस्त सफर घडली हे बोलणे न लगे… मस्त मस्त मस्त…!! 🙂

 8. खूपच छान! खरेच अगदी गुंग होऊन गेलो पन्हाळा आणि कोल्हापूरची झलक पाहताना!
  आभार आणि शुभेच्छ्या!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s