फँटाब्युलस फॅबलेट: नथिंग लाईक एनिथिंग ….


 

झटपट बदलाच्या आणि सतत नवीन अपडेटेड आणि फ्रेश तंत्रज्ञानाच्या मागणीच्या अश्या आजच्या काळात गुगल नेहमीच  ‘क्रिएटिव’ अस काहीतरी  करत आलेली आहे.त्यापैकीच गुगलचा सध्याचा सर्वात मोठा हुकुमाचा पत्ता आहे तो म्हणजे  अँड्रॉइड…  अँड्रॉइड ही  लिनक्स या मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली वर चालणारी एक मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम  आहे. महागड्या आयफोनला स्पर्धा म्हणून गूगलने खास मोबाईल फोनसाठी ती विकसित केली. पण आता मोबाईल फोन आणि टॅब्लेट्‌स बरोबरच  टीव्ही, म्युझिक प्लेअर्स, कॅमेरा यासारख्या अनेक उपकरणात  गुगल अँड्रॉइड वापरण्याच्या प्रयत्नात आहे.२००५ मध्ये अँड्रॉइड कंपनी विकत घेऊन ३१ ऑक्टोबर २००८ रोजी गूगलने अँड्रॉइडची प्रथम आवृत्ती संपूर्ण जगासमोर आणली आणि बघता बघता अल्पावधीतच  ती  प्रचंड लोकप्रिय झाली.ओपनसोर्स असल्यामुळे आज अनेकांनी तयार केलेल्या लाखो अॅप्स ‘अँड्रॉईड मार्केट’ मध्ये चकटफू उपलब्ध आहेत.अँड्रॉइडला इतक लोकप्रिय करण्यात  ‘गुगल प्ले’ ह्या ऑनलाईन अँड्रॉईड मार्केटचा मोठा वाटा आहे.बदलत्या काळाबरोबर सतत बदलत गुगलने  अँड्रॉइडच्या नवनव्या आवृत्त्या काढल्या.तांत्रिक आकड्यांबरोबरच  इक्‍लेअर, जिंजरब्रेड, आइस्क्रीम सॅंडविच अशी  आकर्षक नावे ह्या आवृत्त्यांना देण्यात आली आहेत.  सध्याची नवीन आवृत्ती अँड्रॉइड ४.२ आहे जी “जेली बीन” या नावाने ओळखली जाते.अँड्रॉइडच्या आगामी आवृत्तीला इंग्रजी ‘के’ आद्याक्षरावरून नाव द्यायच आहे आणि ते ‘काजूकतली’ व्हावं ह्यासाठी सध्या मोठ अभियान सुरु आहे.जमल तर ह्या अभियानात तुम्हीही जरूर सहभागी व्हा.

kajukatli-banner

तर ह्या अँड्रॉइडचा  प्रसार व खप प्रचंड भारतात प्रामुख्याने वाढला तो गेल्या दोन वर्षात आणि अँड्रॉइड,अॅप्स असे शब्द कानावर नित्याने पडू लागले.मलाही ह्या साऱ्याच कुतूहल वाटत होतच पण मी मात्र माझ्या नोकीयाशी प्रामाणिक राहिलो.पण ‘इंतजार कब तक हम करेंगे भला’प्रमाणे किती काळ दूर राहू शकतो अश्या आकर्षक आणि लोकप्रिय तंत्रज्ञानापासून ,मग काय ३-४ महिन्याआधी   अँड्रॉइड जगतात प्रवेश करण्याच निश्चित केल.ऑफिसमध्ये तर  मोबाईल वापराला परवानगी नाही, आणि घरी संगणक आणि  लॅपटॉप आहेच तेव्हा मोबाईलचा वापर सुरुवातीला जास्त केला तरी नंतर तो पडूनच राहणार आहे .आणि सर्वात मह्त्वाच म्हणजे  घेतलेला मोबाईल खिशालाही परवडायला हवा .मग त्या दृष्टीने ‘ऑप्टीमम’ असा मोबाईल शोधण्याची मोहीम हाती घेतली.सुरुवातीला सॅमसंगचा गैलेक्सी वाय जवळपास निश्चित केला होता पण तेव्हाच  टीवीवर मायक्रोमॅक्सने ‘व्हाय वाय’ अशी विचारणा केल्यावर मी मायक्रोमॅक्सकडे मोर्चा वळवला.

नेटवर मोबाईलशी संबधीत अनेक फोरम्सवर पाहणी केली तर मायक्रोमॅक्सचे रिव्ह्यू चांगले होते.गुगल्याने  मायक्रोमॅक्स ही गुडगाव येथील भारतीय मोबाईल कंपनी मोबाईल उत्पादनात जगात १२ व्या क्रमांकाला व भारतात तिसऱ्या क्रमांकाला आहे ही माहिती पुरवली.तसेच ह्या गेल्या तिमाहीत भारतात  टॅबलेटच्या विक्रीत मायक्रोमॅक्सने सॅमसंग,ऍपल  ह्यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे,हे सुद्धा सांगीतलं.भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत अव्वल क्रमांकावर येण म्हणजे खरच साधी गोष्ट नाहीये.कारण एका ठराविक मर्यादेपर्यंत चांगली कामगिरी करण थोड्या प्रयत्नांनी शक्य असत पण ती उंची टिकवून पुढची म्हणजे अजून वरची छोटी छोटी वाटचाल करण्यात खरी दमछाक होत असते ,परीक्षेत कस सरासरी अभ्यास करून ६० ते ८० % आरामात मिळवता येतात.पण त्यावरील एक एक टक्क्यासाठीही खोलवर मेहनत घ्यावी लागते तसच काहीस हे आहे.जगामध्ये विकल्या जाणा-या एकूण मोबाईल हँडसेटपैकी तब्बल १२ टक्के हँडसेट भारतातच विकले जातात.म्हणजेच जगातल्या  प्रत्येक आठव्या मोबाईलचा ग्राहक भारतीय आहे.हे आकडे बघता  मायक्रोमॅक्सने खरच मोठी झेप घेतलेली आहे.आता कसोटी आहे ती ही उंची सांभाळत अजून वर वर जायची.

वरील सगळी माहिती कळल्यावर मायक्रोमॅक्सचे हँडसेट पाहून त्यातून १ गिगाहर्टझ प्रोसेसर असलेला निन्जा-३ हा हँडसेट निवडला.आमच्या बोईसरमध्ये सर्वाधिक दुकान आहेत ती मोबाईलची .पण त्यातली जवळपास सर्वच दुकान पालथी घातल्यावर केवळ एका दुकानात निन्जा-३ उपलब्ध मिळाला.पण तिथे त्या विक्रेत्याने त्याची किंमत नेटवरील किंमतीपेक्षा ४०० रुपयांनी जास्त सांगितली.मायक्रोमॅक्समध्ये ‘मार्जिन’ खूप कमी असल्याच त्यान सांगीतलं. ह्यामुळेच मायक्रोमॅक्स रिटेल दुकानात जास्त उपलब्ध दिसत नाही  आणि दुकानदारही त्याबद्दल चांगल बोलत नाही .रिटेलवाल्यांना थोडस ‘बायपास’ करत  सध्याच्या ऑनलाईन शॉपिंगच्या मार्गाचा वापर मायक्रोमॅक्सने अतिशय चांगल्या प्रकारे केल्याच दिसून येत .मला जास्त घाई नसल्याने ऑनलाईन ऑर्डर करू अस ठरवूत घरी परतलो.मग निन्जा-३ ची ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी विविध शॉपिंग साईटसवर भरकटतांना आधी दुर्लक्ष केलेल्या मायक्रोमॅक्स ए-१०० वर पडली आणि त्याच कन्फिगरेशन आवडल.त्याची किंमत निन्जाच्या दुप्पट म्हणजे १०के होती पण ‘बडा है तो बेहतर है’ म्हणत तो घ्यायचं ठरवलं.पण ऑर्डर टाकायला जातो तर काय कोणत्याच साईटवर तो उपलब्ध नव्हता.फ्लीपकार्ट,साहोलिक,स्नॅपडील ह्यांसारख्या साईटवर ‘टेल मी व्हेन अवेलेबल’ साठी माझा मेल आयडी जोडला.एक दोनदा तिथून नोटीफिकेशन आल पण मी ऑर्डर टाकतांना ‘आउट ऑफ स्टॉक’ असच पाहायला मिळत होत.

महिन्याहून काही अधिक दिवस ए-१०० ची वाट पाहिली आणि एक दिवशी त्याबद्दलच स्नॅपडीलवर पाहतांना एनरिकच्या फोटोसह मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास-२ ए-११० च्या प्रीबुकिंगची जाहिरात नजरेस पडली.त्याच कन्फिगरेशन ए १०० पेक्षा अगदी अव्वल होत आणि मायक्रोमॅक्सने त्याची किंमत जाहीर केली नसली तरी  फ्लिपकार्ट व ईबे वर त्याची किंमत ११,५०० व १२,००० अशी होती.ए-१०० ची वाट बघून तसाही कंटाळलेलो असल्याने आणि ह्याच कन्फिगरेशन खुपच चांगल असल्याने मग मनोमन बजेट अजून थोड वाढवायचा निर्णय घेऊन लागलीच कॅनव्हास-२ ए-११० प्रीबुक केला.अँड्रॉइड जगतात प्रवेश करायचा निर्णय घेतल्यापासून खूप दिवस झाले होते त्यामुळे मी बराच अधीर झालो होतो.मग रोज मायक्रोमॅक्सच्या साईटवर व त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन ए-११० कधी मार्केटमध्ये येतोय हे पाहण्याचा खेळ सुरु झाला.दरम्यान दिल्ली,पुणे,बँगलोर इथे कॅनव्हास-२ च्या प्रमोशनसाठी एनरिकचे शो चालू होते.अश्यातच २८ ऑक्टोबरला स्नॅपडीलवरून प्रीबुकिंग कोड सह स्नॅपडील मायक्रोमॅक्स ए-११० च्या उपलब्धतेबद्दल एसेमेस मोबाईलवर येऊन धडकला.लागलीच ऑर्डर करायला गेल्यावर पाहतो तर काय ए-११० ची किंमत ११के किंवा १२ के नव्हती तर ती होती फक्त ९९९९ रुपये … माझ्यासाठी हा सुखद धक्का होता कारण मी १२.००० पर्यंत किंमत पकडून चाललो होतो.पण मायक्रोमॅक्सने प्रत्येक बाबतीत ए-१०० पेक्षा अव्वल असूनही तो तितक्याच किंमतीत देऊन मला एकदम खुश केल होत.ए -१०० आधी मिळत नाही म्हणून चिडणारा मी आता त्यामुळेच जास्त खुश होतो.जे होते ते चांगल्यासाठीच होते हो न … 🙂

अश्या प्रकारे २ नोव्हेंबर २०१२ ला मायक्रोमॅक्स ए-११० म्हणजेच कॅनव्हास-२ हा फॅबलेट (५ ते सात इंच आकाराच्या टच स्क्रिन मोबाईल उपकरणांना फोन+टॅबलेट= फॅबलेट अस संबोधल जात) अस्मादिकांच्या हाती पडला आणि अस्मादिकांनी अधिकृतरित्या अँड्रॉइड जगतात प्रवेश केला.कॅनव्हास-२ हातात पडल्यापासूनच मला प्रचंड आवडला.आता जवळपास अडीच महिन्याहून अधिक काळ झाला तरी मला तो तितकाच आवडतो,कारण अजून एकदाही त्याने मला काहीही त्रास दिला नाही.एकदम मक्खन पर्फोमंस.कॅनव्हास-२ घेतला तेव्हाच बरेच जण पाहिल्यावर स्वत:हून त्याबद्दल विचारपूस करत होते ,तेव्हा ह्याबद्दल ब्लॉगवर लिह अस माझ्या मित्र राम ने सांगितलं होत.तेव्हाच ही पोस्ट लिहायला घेतली होती.पण नंतर म्हटलं ५-६ दिवसाच्या वापरावर उगाच काही लिहण बरोबर नाही म्हणून लिहण टाळल होत.पण आता  माझा मित्र समीर ह्याला कॅनव्हास-२ घ्यायचा असल्याने आणि  गेल्या चार दिवसापासून सर्व ऑनलाईन साईटसवर कॅनव्हास-२ शोधतोय (कारण दुकानात त्याला त्याची किंमत १२,००० रुपये सांगितली होती ) , पण सगळीकडे ‘आउट ऑफ स्टॉक’ असच पाहायला मिळतेय.म्हणजे एकूण कॅनव्हास-२ च्या टीवीवरील नव्या जाहिरातीचा मायक्रोमॅक्सला चांगलाच फायदा होतोय कारण मधल्या काळात कॅनव्हास-२ नेटवर बऱ्यापैकी उपलब्ध होता.आणि ती जाहिरात आल्यापासून गेल्या काही दिवसात इतक्या लोकांनी मला ह्याबद्दल विचारलं कि मी ही पोस्ट लिहण्यास उद्युक्त झालो आणि ह्यावेळी जवळपास तीन महिन्याचा प्रत्यक्ष अनुभवही गाठीशी होताच.

आता जरा ह्या कॅनव्हास-२ ची स्पेसिफिकेशन आणि फिचर्स ( वैशिष्ट्ये) पाहूया.

प्रोसेसर:
प्रोसेसर म्हणजे मोबाईलचा मेंदू आणि कॅनव्हास-२ मध्ये १ गिगाहर्टझ ड्युअल कोर असा मजबूत मेंदू बसवलेला आहे.ह्या प्रोसेसरमुळे फोन अगदी जलद आणि ‘स्मूथ’ कार्य करतो.तसेच ह्यात मोठ्या मोठ्या अप्लिकेशनस सहज चालू करता येतात व सहज डाउनलोड करता येतात.

ऑपरेटिंग सिस्टिम:
कॅनव्हास-२ मध्ये अँड्रॉइड ४.०.४ (आइस्क्रीम सॅंडविच) ह्या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमचा (कार्यप्रणाली) वापर केला आहे.ह्या कार्यप्रणालीची संरचना सुंदर आणि आकर्षक आहे.

डिस्प्ले:
पाच इंचाचा ८५४ x४८० पिक्सेल रिसोल्युशन असलेला आईपीएस कॅपासीटीव, ५ पॉइंट मल्टीटचस्क्रीन डिस्प्ले (१६ मिलियन कलर्स) कॅनव्हास-२ मध्ये आहे. सध्याच्या अन्य स्मार्टफोन्सच्या तुलनेत ‘कॅनव्हास-२’ची स्क्रीन मोठी आहे.त्यामुळे ह्यात व्हिडिओ पहायची व गेम्स खेळायची मजाच वेगळी आहे.ह्या मोठ्या स्क्रीनमुळेच कॅनव्हास-२ फॅबलेट ह्या प्रकारात मोडला जातो.या फोनचे टचस्क्रीन खूप स्मूथही आहे.तसेच ह्यातल्या  एजीसी सोडालाईन प्रोटेक्शनमुळे  स्क्रिन स्क्रॅच रेसिस्टंट आहे व त्यामुळे  स्क्रॅचगार्डची बसवायची गरज पडत नाही.

रॅम:
कॅनव्हास-२ मध्ये ५१२ एमबीची रॅम देण्यात आली आहे.जास्त ग्राफिक्स असलेले गेम्स खेळण्यासाठी व मल्टीटास्किंग साठी म्हणजे एकाच वेळी अनेक काम अजून सहज करण्यासाठी जास्त म्हणजे १ जीबी रॅम हवा होता पण या फोनची किंमत पाहता त्यात आपण नक्कीच तडजोड करू शकतो.

मेमरी:
‘कॅनव्हास’मध्ये ४ GB ची इंटरनल मेमरी आहे. ह्यापैकी २.५ GB आपल्याला वापरायला उपलब्ध असते याशिवाय तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून  ३२ GB पर्यंत मेमरी वाढवू शकतात.

कॅमेरा:
मायक्रोमॅक्स कॅनव्हासमध्ये ८ मेगापिक्सलचा ऑटोफोकस,ड्युअल एलईडी फ्लॅश असलेला
कॅमेरा आहे.सेकंडरी  कॅमेरा ०.३ मेगापिक्सलचा आहे.फ्रंट  कॅमेरयाचा दर्जा चांगला असल्याने तुम्ही चांगले फोटो काढू  शकता.मी नुकताच केलेल्या सात दिवसाच्या ट्रेकमधील एक दिवस माझ्या कॅमेरयाच्या बॅटरीने दगा दिल्यावर ह्या कॅनव्हासच्या कॅमेरयाने मला बर्यापैकी साथ दिली.ह्यात बर्स्ट (४,८,१६ शॉटस) , फेस डिटेक्शन,नाईटमोड ,जिओटॅगिंग सारखे अनेक फिचर्स दिलेली आहेत तसेच  ४x डी जीटल झूमही दिलेला आहे.  ह्याने ७२० पी रिसोल्युशनचे एचडी विडियो शूट करता येतात.विडियो शुटींग पॉझ करून परत चालू करायचं एक चांगल फिचर ह्यात आहे.एकुणात नॉर्मल फोटोग्राफीसाठी हा कॅमेरा आपल्याला निराश करत नाही.

IMG_20130116_072129अहुपे येथील सूर्योदयापूर्वीचा निसर्गाचा कॅनव्हास… कॅनव्हास-२ ने टिपलेला

बॅटरी:

कॅनव्हासमध्ये २००० mAh ची लिथियम बॅटरी दिलेली आहे.ही बॅटरी ५ तासाचा टॉकटाइम व १८० तासाचा स्टँडबाय टाईम  पुरवते. मला तरी माझ्या सरासरी वापरानंतर (गाणी ,विडियो ,नेट,गेम ) साधारण अडीच दिवस ही बॅटरी पुरते. अँड्रॉइड मार्केटमध्ये अनेक बॅटरी वाचवणारी अॅप्स उपलब्ध आहेत .खरतर बॅटरीच योग्य कॅलीब्रेशन करण गरजेच आहे.तुम्ही मोबाईल घेतल्यावर आपोआप बंद होईपर्यंत तो वापरा आणि पूर्ण १००% पर्यंत चार्ज करा .परत आपोआप बंद होईपर्यंत वापरा.पहिली ४-५ चार्जिंग ह्याच पद्धतीने करा. बॅटरीच्या चांगल्या परफोर्मन्ससाठी पुढेही  चार्जिंग साठी शक्य तेव्हा  हीच पद्धत वापरा .एकूण कॅनव्हासची बॅटरीलाईफ चांगलीच आहे.

खेळ:

मी स्वत: टेम्पल रन ,व्हेर इस माय वॉटर,अँग्री बर्ड ह्यासारखेच खेळ कॅनव्हासवर खेळत असलो तरी Asphalt ,Modern Combat-3 ,NFS ह्यासारखे वजनी खेळ कॅनव्हासवर सहजपणे खेळता येतात हे  नेटवरील विविध फोरम्समध्ये युजर्सनी  लिहलेल आहे.बाकी मोठ्या स्क्रीनवर खेळायची मजा वेगळीच आहे.

कनेक्टीव्हिटी:

कॅनव्हास हा  ड्युअल सीम विथ ड्युअल  स्टँडबाय जीएसएम मोबाईल आहे ,म्हणजे ह्यात  दोन्ही सीम एकाच वेळी सक्रिय असतात. ह्यात एक ३जी आणि एक २ जी किंवा दोन २ जी सीम तुम्ही वापरू शकता.बाकी कनेक्टीव्हिटीसाठी कॅनव्हास  ३जी ,वायफाय,जीपीआरएस,एज,ब्लूटूथ,युएसबी  ह्या सगळ्यांनी सुसज्ज आहे.

डिसाईन-बिल्ड क्वालिटी (संरचना):

ह्या फोनची डायमेन्शन  ७६.५ x १४७ x ९.७ एमएम  असे असून हा पांढरा व काळा ह्या दोन रंगात उपलब्ध आहे.मी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा मोबाईल घ्यायचं ठरवलं पण ऑर्डर केल्यावर  चूकचुकल्या सारख झाल होत काळा रंग द्यायला हवा होता अस वाटत होत. मी तस स्नॅपडीलवाल्यांना फोन करून काळ्या रंगाचा मिळेल का  म्हणून विचारणाही केली होती पण ते म्हणाले त्यासाठी नवीन ऑर्डर टाकावी लागेल.ए- १०० च्या आउट ऑफ स्टॉकचा चांगला अनुभव असल्याने प्रिबुकिंगमधला मोबाईल सोडायचा नाही म्हणून मी नवीन ऑर्डर केली नाही .पण जेव्हा हा पांढऱ्या रंगाचा मोबाईल हातात आला तेव्हा    कळल मी किती मोठी चूक करायला चाललो होतो ते . पांढऱ्या रंगाच्या कॅनव्हासचा  लुक खरच खूप प्रीमियम वाटतो.पांढऱ्या मोबाईलच्या बॉक्समध्ये येणार चार्जर ,हेडफोन सगळ एकदम शुभ्र सफेद असत.आता तर काही साईटवर तर पांढऱ्याचे ५०० रुपये अधिक दाखवले जात आहेत.पुढे आणि मागे असलेल्या पांढऱ्या रंगाबरोबर मधल्या भागात ह्यात चंदेरी लाइनिंग दिलेली आहे.फोनच्या वरच्या बाजूला मायक्रो युएसबी  आणि ३.५ एमएम ऑडिओ जॅक,उजव्या बाजूला वर पॉवर बटण व डाव्या बाजूला व्हॉल्युम रॉकर्स दिलेले आहेत.पुढे खालच्या बाजूला तीन टच सेन्सिटिव्ह बटण दिलेली आहेत.मागच कवर प्लास्टिकच व ग्लॉसी आहे व त्यावर  वरच्या बाजूला  कॅमेरा व  खाली स्पीकर  दिलेला आहे.कॅमेरा थोडा बाहेर आलेला वाटतो पण फोनची एकूण संरचना सुंदर आहे.

2

1

कॅनव्हास-२ च्या अनबॉक्सिंग आणि  विडीयो रिव्यू साठी इथे भेट द्या .

तुम्ही नेटवर पाहायला गेलात तर टॅबलेटच्या किंमत अडीच हजारापासून सुरु झालेली दिसते पण तरीही लोक मायक्रोमॅक्सचे ६ ते १० हजार किंमतीचे टॅबलेट घेत आहेत.कारण मायक्रोमॅक्सने सध्यातरी एक विश्वास निर्माण केला आहे.मायक्रोमॅक्स हे ‘ब्रांड’ आता  चांगल सुस्थापित व्हायला लागल  आहे.आणि म्हणूनच स्पाइस,कार्बन ,लावा ह्या बरोबरच्या कंपन्यांना फार मागे सोडून ते नोकिया ,सॅमसंग ह्या अग्रगण्य कंपन्याशी स्पर्धा करू लागल आहे.स्पर्धा म्हणजे नुसती स्पर्धाच नाही तर मायक्रोमॅक्स ह्या अग्रगण्य ब्रांडसना चांगलीच टक्कर देत आहे. सॅमसंगने नुकताच जाहीर केलेला गॅलेक्सी नोटचा लाईट व्हर्जन ‘सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड’ (रु.२१,५००) हा तर मायक्रोमॅक्सशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना काढावा लागला अस सांगितलं जाते.पण तेव्हाच मायक्रोमॅक्सनेही लगेच अतिजलद १.२ गिगाहर्टझ क्वाड कोअर प्रोसेसर (४ कोअर),१ जीबी रॅम, १२८० x ७२० रिसोल्युशन सह ५ इंच एचडी डिस्प्ले,एलईडी फ्लॅशसह ८ मेगापिक्सल कॅमेरा , जेली बीन कार्यप्रणालीयुक्त असा कॅनव्हास-३ (ए -११६ ) तो ही पंधरा हजाराच्या आत जाहीर करून सॅमसंगला जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.भारताच्या तीन क्रिकेट मालिका आणि नुकताच पार पडलेले स्क्रिन अवार्डस ह्यांच्या प्रायोजकत्व स्वीकारण्याबरोबरच मायक्रोमॅक्सने एनरिक आणि स्नूप डॉगच्या कॉन्सर्ट,मायक्रोमॅक्स दिवाली जॅकपॉट,सनबर्न गोवा -२०१२ आणि सध्या जोरात चालू असलेली मायक्रोमॅक्स युजीएफ (अल्टीमेट गेमिंग फोर्स ) असे विविध कार्यक्रम नियमित चालू ठेवत स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करणाऱ्या तरुण वर्गात चांगलीच जागा मिळवली आहे.पण अस सगळ गोड गोड असल तरी मायक्रोमॅक्सच्या आफ्टरसेल सर्विसच्या अनेक तक्रारी आहेत.म्हणजे त्यांच्या हँडसेटमध्ये काही प्रॉब्लेम असला आणि तुम्ही तो सर्विससेंटरमध्ये दिलात तर तो दुरुस्त किंवा बदली करून देण्यासाठी खूप दिवस लागतात.अश्या फॉल्टी हँडसेटची संख्या निश्चितच कमी असेल पण अश्या प्रकारच्या सर्विसमुळे कंपनीवरील एकूण विश्वासावर परिणाम होतो ह्याचा विचार मायक्रोमॅक्सने करणे खूप गरजेचे आहे.

काही फोरम्सवर मायक्रोमॅक्स चीनमधील पार्टस वापरून मोबाईल रिब्रांड करते असेही वाचण्यात आल पण तुम्ही नीट पाहिलं तर बहुतांश सगळ्याच कंपनीच्या  हँडसेट्समधील भाग  चीन मध्ये तयार होतात.हव तर तुमचे तुमच्या मित्रांचे मोबाईल उघडून आत पहा.आणि तस्करीच्या मार्गाने आलेल्या स्वस्त,कामचलाऊ चिनी मोबाईलपेक्षा तरी हे मोबाईल कधीही चांगलेच.तुम्हाला वॉरंटी (लेखी हमी) मिळतेय, सरकारला कर मिळतोय,वर आपले पैसे आपल्याच देशात राहत आहेत.अजून काय हव.सॅमसंग,ऍपल ह्यांचा फिनिशिंग-क्लास  निश्चितच चांगला आहे ह्यात वाद नाही पण त्यांच्या किंमतीमुळे ते  घेता येत नसले तर त्याचा गुणगान गाऊन फायदा काय.आणि तोकड्या खिशामुळे  ते घेता येत नाहीत  म्हणून हिरमुसण्याची आता गरज नाही.मायक्रोमॅक्ससारखे  पर्याय आता समोर आहेत. तुम्ही मायक्रोमॅक्स आणि इतर अग्रगण्य मोबाईल कंपन्यांचे हँडसेट्स बाजूबाजूला ठेऊन परीक्षा करा.मायक्रोमॅक्सचा लूक, फीचर्स, ट्रेंडिनेस आणि एकूण क्लास अगदीच त्यांच्यासारखा नसला तरी त्यांच्या तोडीस तोड नक्कीच आहे आणि किंमत त्यांच्यापेक्षा अर्धी …तेव्हा निर्णय तुम्हाला घ्यायचाय …कारण नथिंग लाईक एनिथिंग… 🙂

Capture

Advertisements

14 thoughts on “फँटाब्युलस फॅबलेट: नथिंग लाईक एनिथिंग ….

 1. माझ्याकडे पण हाच फोन आहे… ९ जानेवारीला घेतलाय. अंकित वेंगुर्लेकर (टेक गुरु) याने रेकमेंड केला असल्याने अंशत: डोळे झाकूनच घेतला… 😀 थोड्या दिवसांनी प्रोब्लेम देतो असे ऐकले होते… पण माझा फोन अगदी व्यवस्थित चालतोय. एक तास सरसकट टेम्पल रन खेळूनही एका सेकंदाचाही लॅग नाही! बेस्ट आहे फोन! ५ इंचाची स्क्रीन पाहून तर सगळे वेडे होतात! १०००० एवढे हाय स्पेसिफिकेशन देणारा एकमेव फोन आहे हा! अतिउत्तम! आणि एका देसी कंपनीचा असल्याने एक वेगळाच अभिमान! 😀

  • हो माझा पण अजूनतरी एकदम मक्खन चालतोय…मला पण किती लोकांनी विचारलं आणि किंमत सांगितल्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता …रच्याकने टेम्पल रन-२ खेळलीस का ,ग्राफिक्स छान आहे … 🙂

 2. Interesting… नवीन मोबाईल घ्यायचा विचार चालू आहे… Samsung च होता डोक्यात… पण Micromax चा विचार करायला हरकत नाही असं वाटतंय आता… 🙂

  • छान आहे ग हा मोबाईल म्हणजे मला तरी अजून काही प्रॉब्लेम आला नाहीये.बाकी Samsung चा ह्यासारख्या फिचर्सचा घ्यायचा तर दुपटीहून जास्त पैसे घालावे लागतील …बघ विचार करून आणि तुझ्या सोयीने निर्णय घे… 🙂

  • माझा अनुभव मांडला रे आणि खरच इम्प्रेस झालो ह्या मोबाईलने म्हणून हा लेखप्रपंच …किमंतीप्रमाणे चांगलाच आहे हा मोबाईल…बाकी विचार करून निर्णय तुम्हाला घ्यायचाय …

 3. मस्त… मी पण ऐकून आहे ह्या फोनबद्दल. आधी कल्पना असती तर घेतला असता, पण आता म्या Samsung Galaxy SII वर खुश आणि पूर्णपणे समाधानी आहे 😉 🙂

  • पहिलाय रे तुझा Samsung Galaxy SII, छानच आहे … तू आधी घेतला आहेस, तेव्हा मायक्रोमॅक्स इतक फार्मात नव्हत … तसाही फार्म कितीवेळ टिकतो सांगता येत नाही ,पण आपल तर काम झालय…बाकी Samsung चा क्लासच वेगळा आहे पण दहा हजाराच्या आतल्या त्यांच्या मोबाईलची मुख्यत: स्क्रिन क्वालिटी खरच नाही आवडली मला…आणि हो पूर्ण समाधानी नको राहूस ,आयफोन-५ तुला खुणावतोय बघ … 🙂

 4. सॅमसंग,ऍपल ह्यांचा फिनिशिंग-क्लास निश्चितच चांगला आहे ह्यात वाद नाही पण त्यांच्या किंमतीमुळे ते घेता येत नसले तर त्याचा गुणगान गाऊन फायदा काय.+++111

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s