गेली दोन-तीन वर्ष मी अगदी मनसोक्त भटकंती करतोय, अगदी वेड्यासारखा फिर फिर फिरतोय. गेल्या दोन वर्षातील माझ्या सुट्ट्यांचे उच्चांक ह्याचे जिवंत साक्षीदार आहेत.मागे वळून पाहायाची सवय तर नाहीच आपल्याला पण कधी आयुष्याचा हिशोब लावायला गेल आणि त्यात जर ह्या सुट्ट्यांच्या/वेळेच्या बदली काय कमावल असा प्रश्न आला तर त्याच उत्तर असेल स्वीज बँकेतही सामावणार नाहीत असे अनेक अनमोल क्षण…आणि असे हे अनेक अनमोल क्षण परत जिवंत करण्याच ,ते फील परत एकदा देण्याच काम करतात ती मी काढलेली छायाचित्र.मेंदूच्या हार्डडिस्कमधून पुसून गेलेल्या अनेक आठवणी रिस्टोर करायचं कामही हि छायाचित्र करत असतात . म्हणूनच तर भटकंती म्हटलं कि त्यातला एक अविभाज्य घटक म्हणजे कॅमेरा .
१० वर्षापूर्वी नोकरीला लागलो आणि ट्रेनिंगसाठी दोन वर्ष राजस्थानला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या इच्छेखातर वडिलांनी माझ्यासाठी दोन महागड्या वस्तू विकत घेऊन दिलेल्या ..सोनीचा वॉकमन आणि कोडॅकचा कॅमेरा (रीळवाला)…तेव्हा रीळाचे आकडे पाहत जपून काढलेले फोटो ,आणि काढलेले फोटो धुवून येईपर्यंत असलेली उत्सुकता…काय दिवस होते यार … खरच त्या फीलची मजा आजच्या डीजीटल युगात नाही.तर जयपूर,अजमेर,पुष्कर,चित्तोड,दिल्ली ,आग्रा अश्या अनेक ठिकाणच्या तेव्हाच्या आठवणी आज माझ्याकडे तीन वेगवेगळ्या अल्बम्समध्ये जिवंत आहेत.पुढे बरीच वर्ष मोठ्या भावाने घेतलेला निकॉनचा डिजीटल कॅमेरा एल -१८ कर्नाटक,गुजरात,मध्यप्रदेश,सिक्कीम,गंगटोक,दिल्ली,आग्रा,मथुरा,वृंदावन,हरिद्वार,ऋषिकेश, मसुरी अश्या कितीतरी ठिकाणी नाचवत त्याच्यापेक्षा जास्त मीच वापरला.पण नंतर ट्रेकिंगचा किडा जास्तच वळवळायला लागल्यावर ‘ये दिल मांगे मोअर’ हे उमजून कोडॅकचा २६ एक्स झूम असलेला झेड-९८१ हा कॅमेरा विकत घेतला.खरतर तेव्हा डीएसएलआर घ्यायचा होता पण बर्याच फोरम्सवर वाचल्यावर जाणवलं कि सरळ तिथे वळणे योग्य नाही.
तेव्हापासून कळसूबाईच्या शिखरापासून अमरनाथच्या गुहेपर्यंत,काश्मीर ह्या जमीनीवरील नंदनवनापासून कासच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या पठारापर्यंत,गुजरातमधील डांग व कर्नाटकातील याना ह्या गर्द जंगलात ,पंढरपूर -अक्कलकोट-तुळजाभवानी -ज्योतिबा -महालक्ष्मी-मांढरदेवी ह्यांच दर्शन घेत राजस्थानातील सर्वात उंच शिखरावरील दत्तांच्या व जम्मूतील वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक होतांना ,सह्याद्रीच्या कड्याकपा-यातून तहानभूक विसरून भटकतांना,सोसाट्याचा वारा,उन- पाउस अंगावर झेलत कितीतरी गडमाथ्यांवर पोहोचल्याचा आनंद उपभोगताना माझ्या सावलीप्रमाणे मला साथ दिली ती ह्या कोडॅक झेड-९८१ ने ….
मी फिरताना तर काही लिहित नाही ,फोटोच्या साह्याने जस जस क्रमाक्रमाने आठवत तस ब्लॉगवर लिहतो.म्हणजेच दवबिंदु वर ज्या भटकंतीच्या पोस्ट लिहल्या त्या ह्या काढलेल्या छायाचित्रावरूनच…तसेच भटकंतीच्या पोस्टमध्ये नुसत लेखनात गुंतवून ठेवण्याइतक शब्दसामर्थ्य माझ्याकडे नसल्याने भटकंतीच्या पोस्ट आकर्षक बनवायचं आणि माझी भटकंती अधिक चांगल्या रितीने व्यक्त करण्याच काम ह्या छायाचित्रांनी केल.तेव्हा बघायला गेल तर दवबिंदुवर ह्या कोडॅक झेड-९८१चे खूप उपकार आहेत. आणि अस असतांना मी आज त्याची साथ सोडली आहे. 😦 तो माझा जीवाभावाचा सोबती आज माझ्याबरोबर नाहीये. आणि म्हणूनच त्याच्यासाठी ही पोस्ट लिहायला घेतली .आज तो प्रत्यक्ष माझ्याबरोबर नसला तरी त्याने टिपलेल्या असंख्य छायाचित्रातून तो नेहमीच माझ्या सोबत असणार आहे.त्यातली बरीचशी छायाचित्र तुम्ही दवबिंदुवरील भटकंतीच्या पोस्टमध्ये पाहिली असतीलच पण दवबिंदुवरील ड्राफ्टसच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे इथे प्रकट न झालेली काही छायाचित्र इथे जोडतो आहे.
कोडॅक झेड-९८१ ची सोबत सोडतांना मी कॅनॉन ११०० डी ह्या नव्या मित्राशी गट्टी जमवली आहे….डीएसएलआरच्या जगात शिरायची ही वेळ योग्य आहे कि माहीत नाही पण केव्हातरी शिरायचं होतच तर आता का नको…तेव्हा आता नव्या मित्राच्या सोबतीने परत इथे प्रगट होईनच…तब तक के लिये…..तरी जाताजाता म्हणावास वाटतेय…
कॅमेरा साथ है तो ,मुझे क्या कमी है …..
व्वा व्वा…अभिनंदन !!!
दवबिंदूवर माझी फोटोग्राफी असा वेगळा विभाग लवकरात लवकर हवाय 🙂 🙂
सुहास आभार रे …आपले बोल आदेशवजा मानून पाउले उचलू…. 🙂
nice chan ahe
मंडळ आभारी आहे… 🙂
रच्याक …. लय भारी. छायाचित्रण हा छंद देखील गिर्यारोहणा सारखाच आहे. नशीला आणि नाद लावणारा…. 😉
बाकी रिळाचा कॅमेरा मिस करतोय यार. कट टू कट लावलेली फिल्म आणि जेंव्हा ३६च्या जागी ३८-४० फोटो यायचे तेंव्हा उर अभिमानाने भरून जायचं.
खर आहे ,३६ च्या पुढे एक एक फोटो जास्त येत राहिला कि आनंद एकदम द्विगुणीत होत जायचा…. अजून तरी नाद लागला नाहीये छायाचित्रणाचा भटकंती सोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणूनच चालू आहे ,पण नाद लावणारी गोष्ट तर ही नक्कीच आहेच आणि माझ्यासारखा नाद्खुळा जास्त काळ अलिप्त नाही राहू शकत अश्या गोष्टीपासून… 🙂
Ek number re mitra….
आभार मित्रा…. 🙂
पोस्ट टायटल अगदी समर्पक,
जीवन के सफर में गुजर जाते है जो मकाम… क्यामेरा मुळे थोडे का होईना पण पुन्हा अनुभवता येतात… नवीन मित्र पण अशाच आठवणी ठेवेल … शुभेच्छा!
दवबिंदू जेवढा फिरतो तेवढ्या पोस्ट मात्र येत नाहीत हे वाचून खेद जाहला…
आभार रे….शक्य तेवढी गट्टी जमवायचा प्रयत्न करतोय नव्या मित्राबरोबर…बघुया काय होती ते ,मला तर खूप आशा आहेत ह्या मित्राकडून…मला किती खेद होत असेल विचार कर पण हा कंटाळाभाऊ आमची पाठ सोडत नाही त्याला काय करणार…. 🙂
अभिनंदन देचू.. पुढील क्लीकाक्लीकी ला शुभेच्छा!!!
धन्स साने … 🙂
मस्तच रे देवा….खरच एक फोटोग्राफी विभाग येउ दे ब्लॉगावर….
बाकि गौराक्कांना तो फोटोंमधला ’पोपट’ हवाय आणि त्या भारतात आल्या की मागणार आहेत तूला, ते कसे जमवशील बघ बाबा 🙂
>>>आणि जेंव्हा ३६च्या जागी ३८-४० फोटो यायचे तेंव्हा उर अभिमानाने भरून जायचं. ++++