माझ्याबद्दल …

बरेच ब्लॉग्स वाचून वाटल आपलाही असावा एखादा.म्हणतात ना एकदा पाण्यात पडल की आपोआप पोहायला येते  म्हणून टाकली उडी ब्लॉगच्या समुद्रात पाहुया पुढे काय होते ते.वाटल वेळ मिळेल तेव्हा मनाला वाटेल ते इथे लिहावे ( बघुया जमत का ते ) जरी कोणी नाहीच वाचले तर आपण तरी वाचू आपल मन या ब्लॉगद्वारे.ब्लॉग लिहायच तर पक्क झाल पण मग त्याला नाव काय दयायच हा यक्षप्रश्न पडला.आणि मला नेहमीच आकर्षण वाटणारया दवबिंदूचे नाव सुचले.आणि यूज़र आई डी बाबत नेहमी बॅड लक असलेल्या मला चक्क दवबिंदू नाव अवेलेबल मिळाल.असो देवाची कृपा.

“देवेनने देवाच्या देवळात दोन दिवस दिवा दाखवून ,दुर्वा देऊन देवाला दानपेटीत दान दिले , देवाने देवेंद्राला  ’दवबिंदु’  देवुन दानासाठी दाद दिली”

बर मी  देवेंद्र चुरी एक दवबिंदू …एक भटका,खादाड,पाउसवेडा,सिनेरसिक,आळशी, कधीतरी झटका आल्यावर चारोळ्या-कविता लिहणारा….आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगणे असा काहीसा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे(हर पल यहाँ जी भर जिओ,जो है समा कल हो ना हो..).हा दवबिंदू ठाणे जिल्ह्यातील  बोईसर मध्ये राहतो.तारापुर अणुशक्ति केन्द्रात प्रचालन विभागात तंत्रज्ञ म्हणून कामाला आहेमराठी पुस्तक वाचणे,गाणी ऐकणे,भटकणे आणि ब्लॉगवर काहीतरी खरडत राहणे, हे माझे मुख्य छंद…

दवबिंदु…ज्याला स्वत:च अस अस्तीत्व नसते…जीवन मिळते तेही क्षणभंगुर…तरीही तो असेपर्यंत चैतन्याची उधळणच करत असतो…आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक क्षणाला तो आनंद वाटत असतो…आकाशातील इंद्रधनुला साद घालतानाही आपली मातीची ओढ कायम ठेवतो…आणि म्हणुनच आपल्या अल्पश्या आयुष्यातही तो खुप जगतो आणि आपली आल्हाददायक छाप मागे सोडतो…मी हा असाच हया ब्लॉगविश्वातील एक ’ दवबिंदु ’  …..(बनण्याचा प्रयत्न  )

या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…!!

bi_th_07_sep_20_120512

Advertisements

91 thoughts on “माझ्याबद्दल …

 1. अरे खुपच छान आहे ब्लॉग
  या मधील कविता, चारोळ्या आणि अनेक काही गमती जमती त्यामुले अजुनच सुंदर
  पण तुझाबद्दल जो काही भावः यामधे दाखविला आहे तो तर अजुनच छान खुप छान प्रयत्न
  तुझ्यासाठी माझ्या कडून
  धन्यवाद

 2. @ चंद्रेश,मनाली ,रविन्द्र
  खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल…

  @ रविन्द्र
  मित्रा तू जे भाव: म्हणून लिहल आहे ते कळाल नाही.

 3. माझे नाव ‘रोहन चौधरी’ .. राहणारा ठाणे. मुळगाव केळवा.. आपल्या ब्लॉगबद्दल समजले म्हणुन ही ओळख. मी सुद्धा ‘मराठी ब्लॉग विश्व’ येथे ब्लोग्स लिंक केले आहेत.. आपण ते येथे बघू शकता.

  http://www.blogger.com/profile/02438552598999110493

 4. मित्रा तू इतक्या छान चारोळ्या आणी कविता लिह्तोस ..ब्लोग्वर टाक ना हे तुझ साहित्य बरेच वाचक आहेत इथे ..बर वाटते जास्तीत जास्त लोकांशी हे शेअर करायला..प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

  • अतुल प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद …
   वर्डप्रेसमध्ये लॉगीन केलस की माय डॅशबोर्ड मध्ये जा तिथे डाव्या बाजुला जे मेनु आहेत त्यामध्ये पॄष्ठे म्हणुन जो पर्याय आहे त्यात add new वर क्लिक कर.व पुढे तुला जस पेज बनवायच आहे तशी माहिती तिथे भर आणी सेव कर ते पेज आपोआप तुझ्या ब्लॉगवर टॅब मध्ये येइल.अधिक माहितीसाठी मला इथे भेट.सविस्तर बोलु.

  • ज्यो…
   तुझी प्रतिक्रिया पाहुन खरच खुप आनंद झाला…
   मला वाटते वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल तु ऑरकुट मधल अकाउंट डिलिट करुन तेव्हापासुन संपर्कच झाला न्वहता…
   आभार आणि अशीच भेट देत रहा दवबिंदुला….

  • सर्वप्रथम इतकया सुंदर प्रतिक्रियेबद्दल आपले आभार…अहो माझ्यासारख्या सामान्य आणि बहुतांशी आत्मकेंद्रीत पोस्ट टाकणारया ब्लॉगरच लिखाण आपल्याला आवडल हे वाचुन खरच आनंद झाला…बाकी अगदि मनापासुन सांगतो इथे माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले लिहणारे ब्लॉगर आहेत…

 5. देव,दवबिंदु हे नाव खरचं खुप सुंदर आहे..तु लिहिलेला प्रत्येक शब्द न शब्द मनाला भावला..तुझ्या ह्या ब्लॉगला माझ्या खुप खुप शुभेच्छा..असाच छान छान लिहित रहा….

 6. लंपनची ओळख आजच विशालच्या ब्लॉगवर (ऐसी अक्षरे मेळविन) झाली, मनात आले लंपनला जरा गुगलवर धुंडाळू, तर तुझ्या ब्लॉगचा दुवा मिळाला, ते वाचून तर आता लंपनला भेटायची जबरदस्त इच्छा झालीये, बाकी तुझा ब्लॉग पसारा मस्त आहे 🙂 Keep it up…

 7. अरे खुपच छान आहे ब्लॉग
  या मधील कविता, चारोळ्या आणि अनेक काही गमती जमती त्यामुले अजुनच सुंदर
  पण तुझाबद्दल जो काही भावः यामधे दाखविला आहे तो तर अजुनच छान खुप छान प्रयत्न
  तुझ्यासाठी माझ्या कडून धन्यवाद

 8. नमस्कार. आपला ब्लॉग आवडला. विषय बरेच असूनही सगळेच वाचावे वाटत आहे. मात्र आपल्या लिखाणाची फॉन्ट साईझ थोडी मोठी केलीत तर अधिक सहजपणे वाचता येइल. शुभेच्छा !!

  • संदीप ,दवबिंदुवर आपल स्वागत …सगळ्या पोस्टची फोन्ट साईज वाढवायला ब्लॉगची थीम बदलावी लागेल …सध्यातरी अद्ययावत पोस्ट मध्ये फोन्ट साईज वाढवली आहे .हळूहळू बदल करेन आधीच्या पोस्टमध्ये …आपण आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s