प्रेमात पडलो आहे मी…

आजकाल मी एकटा आहे कुठे

सोबत चालते आहे कोणी

तीची मला सवय होण्याची सवय आता झाली आहे

हे जे मिळाल आहे जेव्हापासुन तिची भेट झाली आहे

एक थोडया निरागसतेने हॄद्यावर हे संकट आल आहे

ऐक ना जरा…ऐक ना जरा…

हृद्याने सांगीतल आहे,तेवढच मला माहित ,

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना आता

हे काय मला झाल आहे…..

.

.

दवबिंदुच्या थेंबात तु आहेस

मिटलेल्या डोळ्यात  तु आहेस

दहाही दिशात तु आहेस

तु आहेस फ़क्त तुच आहेस

.

हृद्याच शहर तु आहेस

चांगली बातमी तु आहेस

मोकळेपणातल हसण तु आहेस

आयुष्यात कमी होती ती तु आहेस

.

तु आहेस माझी

तु आहेस माझी

काही माहित नाही मला

हेच फ़क्त ठाउक आहे मला

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना

हे काय मला झाल आहे…..

.

.

ढगांवर चालतो आहे मी

पडतो-सांभाळतो आहे मी

खुप इच्छा करतो आहे मी

हरवण्यापासुन घाबरतो आहे मी

.

जागलो ना झोपलो आहे मी

प्रवासी हरवलेला आहे मी

जरा डोक फ़िरलेला आहे मी

बुद्धु थोडासा आहे मी

.

हृद्याने काय करावे

हृद्याने काय करावे

तुझ्या विना…

एवढच मला माहित

प्रेमात पडलो आहे मी..प्रेमात पडलो आहे मी…

तुच सांग ना आता

हे काय मला झाल आहे…..

.

.

हा आहे ’वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सिनेमातल्या ’आय एम इन लव’ हया गाण्याचा अनुवाद.हे गाण चित्रपटात नाहीये.निदान मी बघीतला त्यात तरी नाही.शिवाय प्रोमोजमध्येही कधी ते दिसलेल नाही.पण गाण एकदम अव्वल आहे.ते तुम्हा सर्वांपर्यत पोहोचवाचा हा माझा प्रयत्न,तर जरुर एका.सीडीत ते केकेच्या आवाजात आहे आणि कार्तिकच्या आवाजातही आहे.दोघांनीही गाण्याला योग्य न्याय दिला आहे.कार्तिकचा आवाज खुप प्रॉमीसिंग वाटतो आहे. परत एकदा सांगतो हया गाण्याला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गाण खुप श्रवणीय आहे तेव्हा एकदा तरी ऐकाच…

(हा विडियो खरच एकदा तरी पहा…सुंदर आहे एकदम गाण्यासारखाच..मुबंइतल्याच विनीता दास नावाच्या १९ वर्षाच्या मुलीने तो तयार केलेला आहे.)

Advertisements

इमोसनल अत्याचार कंटीन्युज….

तुम्हाला माहित असेलच सध्या ब्लॉगजगतातील खोखो मध्ये काय चालु आहे ते.सध्या नेटची थोडी अडचण असल्याने मी आंतरजालावर जास्त वेळ उपलब्ध नव्हतो त्यामुळे तसा हया खोखो पासुन दुर होतो.पण आपल्या  ब्लॉगजगतातील न्यायाधीश श्री.हेरंब ओक हयांनी मी याआधी वाचकांवर केलेल्या अश्याच इमोसनल अत्याचाराची ( दुरावा,आनंदाचा ऋतु वैगेरे (पुर्वीच्या अत्याचाराचे प्रमोशन… 🙂 )) शिक्षा म्ह्णुन कि काय मला  तोच परत करुन लोकांच्या शिव्याशाप खाण्याची कठोर शिक्षा हया खो च्या स्वरुपात  ठोठावली. 🙂  मग काय आलिया भोगासी म्हणत कामाला लागलो.इंग्लीशवाली मावशी थोडी लांबची म्हणुन हिंदीच निवडली.पण मला नेहमी आवडत असलेली ही मावशी अचानक मा्झ्यावर का रुसली माहित नाही.कोणतही गाण घेतल कि त्यातले काही हिंदी-उर्दु शब्द मला वाकुल्या दाखवत नाचायचे.ते तर सोडाच  सोपे सोपे मराठी श्ब्द पण सुचेनासे झाले होते.कर्णाला परशुरामांनी जसा शाप दिला होता ना ’ जेव्हा तुला हया अस्त्रांची खरी गरज पडेल तेव्हा तुला ह्यांचा विसर पडॆल’ तसा मला तर कोणी दिला नाही ना ते आठवत दिवस काढले.मग बरयाच गाण्यांची चिरफ़ाड केल्यावर शेवटी हया इमोसनल अत्याचारासाठी एक ईमोसनलच गाण निवडल. ’बागबान’  चित्रपटातील गुलजारने लिहलेल्या अमिताभने गायलेल्या “मै यहा तु वहा ” हया विरहगीताचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.खालील अनुवाद वाचकांनी स्वत:च्या ’रिस्क’ वर वाचावा ही नम्र विनंती.चक्कर ,डोकेदुखी वैगेरे सुरु झाल्यास त्याला हा दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  🙂

मी इथे, तु तिथे

जीवन आहे कुठे

तु आणि तुच आहेस

पाह्तो मी जिथे

झोप येत नाही

आठवण जात नाही

तुझ्याविना आता जगताच येत नाही…

.

तुझा चेहरा आता एकही क्षण

का नजरेसमोरुन हटत नाही

रात्र-दिवस तर निघुन जातात

वय हे एकट सरत नाही

सांगायच असुन सुद्धा

सांगु शकत नाही तुला

ही वेदना व्यक्त करु कशी….

.

जेव्हा कधी कोणाची चाहुल लागते

मला वाटते कि तुच आलीस

सुगंधाच्या झोतासारखी

माझ्या श्वासात दरवळुन गेलीस

एक तो काळ होता

आपण नेहमी जवळ होतो

आता फ़क्त हा विरह आणि दुरावा…..

.

त्या क्षणांची आठवण येते

जेव्हा एकटा असतो ग मी

बोलते ही शांतता

लपुन एकटा रडतो ग मी

किती काळ लोटला मला हसुन

अश्रुत लोटलेली ही कहाणी…

तर मी खो देत आहे ते मैथीली (थिंक करुन काहीतरी चांगल लिहेल ही) आणि सेनापती रोहन ह्यांना… ( हया धुरंधरांना एका नवीन क्षेत्रात टॅलेन्ट दाखवायला संधी  🙂 )

आणि एक खास खो प्रमोद देव हयांना… ( आ्म्हाला विविध अंकासाठी लिहायला लावता त्याचा बदला… 🙂  )

आता इथवर आलाच आहात तर लक्षात घ्या तुम्हाला जर वाटत असेल हा अत्याचार करुन मी गप्प राहीन तर ते कदापी शक्य नाही.तसाही इथे दोन गाण्यांचे अनुवाद लिहणार होतो पण एकदाच तुम्हाला मारायचे नव्हते.अस अर्धमेल करुन सोडण्यात जास्त मजा आहे ना.  🙂