एमएलएम…

गेल्या आठवड्यात एका मित्राचा फ़ोन आला,म्हणाला ’तुझ्याकडॆ एक काम होत १५-२० मिनटे मिळतील का तुझी ? ’ नेहमी सहज मला येउन भेटणारया त्याने हयावेळी इतका फ़ोन करुन माझा वेळ मागीतला हा विचार करतच त्याला होकार कळवला आणि त्याची भेट घेतली.हा मित्र आमच्याच ऑफ़िसमधला माझ्या दीड वर्ष आधी त्याने ही कंपनी जॉइन केली आहे.हाय-हेल्लो औपचारिकता झाल्यावर तो मला अपेक्षीत असलेल्या मुद्द्यावर आला,म्ह्णाला ’माझ्याकडे एक स्किम आहे..’ त्याच्या डोळ्यात मला माझ्या डोक्यावर बकरयाची शिंग असलेली माझी छवी दिसल्याने मी हसतच म्हटल चल सांग लवकर. ’….कंपनी आहे,अमुक-तमुक….१० हजार टाकलेस कि वर्षभरात ४६००० मिळतील.कंपनी पोस्ट डेटेड चेक पण देत आहे. ’ मी त्याला म्हटल खरच ’तुला वाटते ही कंपनी इतके पैसे देइल ? ’ तो म्ह्णाला ’हो १००% गॅरंटी आहे यार’ मग त्याला म्हटल मग एक काम कर मी तुला पैसे देतो तु तुझ्या नावाने चेक दे मला,माझा त्या कंपनीवर विश्वास नाहीये.हयावर अरे ती कंपनीची स्किम आहे मी कसा देवु तुला चेक मी त्याला म्ह्टल तुला १०० % विश्वास आहे ना कंपनी वर म्ह्णुन चल मग मला फ़क्त २५००० दे वरचे तुझ्याकडेच ठेव.मग आमच्यात बरीच चर्चा झाली.आपणच एक एमएलएम सुरु करु इथपर्यंत त्याला घेवुन गेलो.त्यानंतर त्याने मला नमस्कार केला आणि गेले चार-पाच दिवस माझ्या आसपासही तो फ़िरकलेला नाही. 🙂

खरतर मी सुद्धा एमएलच्या हया चक्रव्युहात मागे अडकलो होतोच.तीन वर्षापुर्वी मी आरएमपी नावाची एक एमएलएम जॉइन केली होती.म्हणजे मला बचतीसाठी काही पैसे गुंतवायचे होतेच त्यात हया एमएलएमची हवा चालु होती,आणि ती जॉइनिंग म्हणुन बजाज अलायंजची पॉलीसी पर्याय म्ह्णुन देत होती.बाकी आमीष समोरच्याने दाखवली होतीच तेव्हा चला इथुनच काढुया पॉलीसी म्हणत जॉइन झालो.पण जेव्हा त्या पॉलिसीची कागदपत्र मला मिळाली तेव्हा मला धक्काच बसला माझ्या दहा हजारातील फ़क्त साडेतीन हजाराचे युनीटस मला मिळाले होते.मार्केटिंग तर कधी जमलच नाही पण इतर आकर्षणांना भुलुन दोन ठिकाणी हात शेकल्यावर मात्र मी हया एमएलएमचा थोडाफ़ार अभ्यास केला.एमएलएमच्या अश्या अनुभव आणि निरीक्षणानंतर मला कळलेले काही मुद्दे खाली लिहतो आहे.

-असाच एखादया दिवशी तुमचा मित्र किंवा नातेवाईक ’तुझा थोडासा वेळ हवा आहे’ किंवा ’एक बिजनेस/स्कीम आहे माझ्याकडॆ’ अस फ़ोनवर किंवा प्रत्यक्ष येवुन बोलतो.

-कधी कधी तर ही मंडळी आपल्याला त्या एमएलएमच्या सेमीनारलाच घेवुन जातात.नाहीतर एखाद्या हॉटेलात घेउन जातात.(जास्त खुश होवु नका, इथुन निघतांना बिल झालेल असत फ़क्त दोन चहाच 🙂 )

-तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल तुमच्या स्वप्नांबद्दल चर्चा होते.जन्माला गरीब/मध्यमवर्गीय आहे्स ह्यात तुमचा काही दोष नाही पण मरतांना पण तुम्ही तसेच राहिलात तर तो सर्वस्वी तुमचाच दोष आहे. ह्या प्रकारचे ’फ़ंडे’ देवुन इथेच तुम्हाला पटवुन दिले जाते कि तुमच्या हया नोकरीतुन तुम्ही तुमची स्वप्न पुर्ण नाही करु शकत त्यासाठी काहीतरी वेगळ करण्याची एखाद्या साईड बिजनेसची  खरच गरज आहे.

-मग पुढे सुरु होतो खरा खेळ,हयात सुरुवातीला तुम्हाला एखाद उत्पादन कारखान्यातुन तुमच्या हातात येइपर्यंत त्याची किमंत कशी वाढत जाते ते सांगीतल जात,बहुतेकवेळा १ रुपयाच कोल्ड्रिंक तुम्हाला १० रुपयाला कस विकल जाते त्याच उदाहरण देवुन हाच पैसा ही कंपनी तुम्हाला देते अस म्हणत सुरु होते कंपनीच प्रेजेंटॆशन.. बिजनेस प्लॅन… अमुक अमुक कंपनी आहे,सहामहिन्यात/वर्षात डबल,भारत सरकारच रेजिसट्रेशन, कित्येक लोक लखपती झालीत,ही सुरुवात आहे पुढे बघ,खाली दोन लोक आणली तर अमुक अमुक बोनस,डायरेक्ट रेफ़रल बोनस,पेअर/मॅच बोनस,स्टॅम्प पेपरवर करारनामा, पोस्ट डेटेड चेक्स,तु दोन लोकांना नाही सांगु शकत हे ते ही त्यांच्य चांगल्यासाठीच,नाहीतर मी आहेच ना तु फ़क्त जॉइन कर,तीन चार लोक तयार आहेतच ती लगेच टाकतो तुझ्याखाली…..अस पुराण सांगीतल जात.वेगवेगळी पेजेंटेशन्स दाखवली जातात. पण कंपनीच्या उत्पादनाबद्दल, बॅलेन्सशीट बद्दल काहीही सांगीतल जात नाही.

-त्या क्षणाला तुमच्यावर त्याच्या बोलण्याचा जबरदस्त प्रभाव पडलेला असतो,बस हीच आपल्या साठी एक संधी आहे वर यायची असे वाटुन तुम्ही त्याला लागलीच हो कळवता.त्याच्याकडॆ फ़ॉर्म तयार असतोच तो मासा गळा लागला हया आनंदात लगेच तो फ़ॉर्म तुमच्याकडून भरुन घेतो.

-बरीच लोक हया पेजेंटेशनच्या प्रभावाने लगेच ’देर ना हो जाये कही’ म्हणत जॉइनिंग करतात आणि काही तासातच त्यांची चुक त्यांच्या लक्षात येते.त्यातले काही मग तिथेच थंड पडतात तर काही स्वत:चे पैसे तरी वसुल करायला हवेत म्हणुन दोन बकरयांच्या शोध घ्यायला सुरुवात करतात.

-ह्यांच्या सेमीनारमध्ये गेलात तर तुमच कल्याण झाल अस समझाच,स्टेजवरच मोठ्या मोठ्या गाड्या (भाड्याने आणतात कि काय ठाउक नाही ) सुटाबुटात अनेक जण असतात.सगळे एक एक करुन मी हया कंपनीमुळे कसा यशस्वी झालो ते सांगतात,मला इतक्या लाखांचा फ़ायदा झाला,ठरवलेल्या प्रचंड टाळ्या(बहुतेक नवीन बकरे लवकरच कापले जातील हया खुशीत),तिथला एकुण थाटमाट,वातावरण बघुन त्यांची व्यक्तव्य ऐकुन भारावलेल्या तुमचा लगेच धुममधील उदय चोप्रा होतो. 🙂

-कितीही नाही म्हटल तरी प्रत्येकाच्या मनात कुठेना कुठे कमी जास्त प्रमाणात आहे त्यापेक्षा वर जायचा, झटपट पैसे मिळवण्याचा हव्यास असतो.तुमच्या हया लोभाचच रुपांतर हया कंपन्या त्यांच्या लाभात करत असतात.एकुणच एमएलएमचा बिजनेस माणसाच्या हया  नैसर्गिक प्रवॄत्तीवर,मानसिकतेवर आधारलेला आहे.

-सर्वात महत्वाच म्हणजे एमएलएमच्या फ़सवणुकीच्या अनेक बातम्या सातत्याने येउन सुद्धा नवीन एमएलएम आली की ती बातमी  वाचलेली तशीच आधी फ़सलेलेही काही लोक परत एकदम उत्साहात ती नवी एमएलएम जॉइन करतात.

-बहुतेक वेळा हया एमएलएम मधील अनेक ’कंडीशन्स’ तुम्हाला जॉइनिंग केल्यावर सांगीतल्या जातात.

-बरयाच कंपन्या सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी पदरचे पैसे घालुन काही महिने लोकांना नियमीत चेक पाठवतात.बरेच लोक ते चेक्स बघुन टॉप अप मारतात.स्वत:च्या नावाने परत एंट्री करतात.

-गुगलबाबांना विचारल तर तुम्हाला कळेलच भारतात किती एमएलएम म्हणजेच मल्टीलेवल मार्केटिग कंपन्या कार्यरत आहेत ते.सरासरी शेकड्यांनी अश्या कंपन्या आहेत.हयात नेहमी काही कंपन्या लुप्त होतात आणि काही नव्या येतात.मला तर वाटते.आधी डूबलेल्या एमएलएमचेच प्रमोटर्स ही नवी कंपनी घेवुन असावेत.

-अपवाद म्हणून ऍमवे सारख्या उत्पादनावर आधारित कंपन्या वर्षोनुवर्षे चालु आहेत,पण त्याच्या उत्पादनाच्या किमंती खरच परवडण्यासारख्या निश्चितच नाहीत.

-खरच उत्पादकांच्या प्रसारासाठी सुरु झालेल्या नगण्य कंपन्या सोडल्या तर बहुतेक एमएलएम हया लोकांच्या ईजी-मनी मिळवण्याच्या मानसिकतेचा फ़ायदा घेण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात.त्यांनी दाखवलेल प्रॉडक्ट फ़क्त  नावापुरती असते.

-हयांना दुसरया एमएलएमसबंधी विचारल असता आमची एमएलएम वेगळी आणि उत्कृष्ट आहे अस त्यांच म्हणण असत.

-बरयाच एमएलएम कंपन्यांमध्ये त्यात स्वदेशी,ग्लोबल वार्मींग किंवा काहीतरी देशसेवेसंबधीत उत्पादन असल्याचा आव आणुन तिला उगाच समाजसेवेच सोंगही दिल जात.

-परदेशात अश्या एमएलएम यश्स्वीरीत्या चालु आहेत कारण त्यासंबधी काही कायदे तिथे बनलेले आहेत.

-सर्वसाधारण आकडेमोडीनुसार हया एमएलएमच्या साखळीतील शेवटच्या दोन पातळीवरील लोकांची संख्या एकुण संख्येच्या ७५ %  असते.म्हणजे कोणत्याही क्षणी कंपनी डुबली की त्यातील ७५ %  लोकांच्या हातात एकही चेक आलेला नसतो.

-बरयाच कंपन्या अगदी दोन-तीन हजाराच्या योजनाही आणतात.लोक मग एक चान्स तर घेउन बघु गेले तर गेले म्हणत अश्या योजनात पैसे गुंतवतात.मार्केटमध्ये भाजी किंवा सामानखरेदीत एक-दोन रुपयांसाठी घासाघीस करणारी लोक हया कंपन्यांच्या प्रलोभनामुळे आंधळी होवुन दोन हजार रुपये चक्क जाउ दे म्हणतात.

-एमएलएम मध्ये अडकलेली लोक ही एमएलएमची पट्टी डोळ्यावर बांधुन जेव्हा काही लोक आपल्या नातेवाईकांच/मित्रांच भल करायला जातात 🙂 , तेव्हा त्यांच्याकडुन नकार  ऐकुन उगाच हयांना वाईट वाटते.’तुला एवढ फ़ायद्याच सांगतो आणि तु…’ अस म्हणत कधी कधी भांडणही होतात.कधी हयाच्यामुळे माझे पैसे बुडले हया भावनेनेही वाद उदभवतात.एकुण हया एमएलएम मुळे नात्याचे/मित्रांचे सबंध बिघडु शकतात.काही लोक हया एमएलएम वाल्यांना दुरुनच टाळतात तसेच सार्वजनिक गप्पांमध्ये ह्यांचे किस्से ऐकुन चांगलाच हशा पिकतो.एकुणच आपल्या लोकातील, समाजातील  आपली प्रतिमा बदलुन जाते.

-आपले पैसे वसुल करण्यासाठी नवीन जॉइनिंग व्हाव्या म्हणुन लोकांना लोभ दाखववण्यासाठी  आपल्याला हयातुन खुप लाभ होत आहे असे खोटही बोलाव लागते.

-हया एमएलएम कडे भाड्याची ऑफ़िसेस आणि वेबसाइट सोडुन इतर काहीही ऍसेट नसतात,म्हणजे कधीही गाशा गुंडाळालायला हयांना रान मोकळे असते.

-खरच हया एमएलएमच उत्पादन एवढच जर चांगल आहे तर पारंपारिक मार्गाने किंवा एखाद्या चांगल्या कंपनीशी करार करुन किंवा एखाद्या वित्तीय संस्थेला आपले मुद्दे पटवुन त्यांच्याकडुन सहाय्य घेउन ते ही उत्पादनांची विक्री का करत नाहीत.

-गुंतवणुकीवर आधारित असलेल्या कंपन्या ज्या वर्षभरात दुप्पट,तिप्पट पैसे करुन द्यायचे आत्मविश्वासाने सांगतात त्यांनी माझ्या मते त्यांचा जो चमत्कारिक प्लॅन आहे त्याबाबत टाटा-अंबानी किंवा आरबीआय लाच विश्वासात घेवुन त्यांचा पैसा दुप्पट-तिप्पट करावा.तुमच्याआमच्याकडुन  पाच-दहा हजार रुपये घेवुन ही लोक स्वत:च टँलेंट वाया घालवताहेत. 🙂

-हया एमएलएमच्या पिरॅमीडसदॄश्य संरचनेमुळे जेव्हा ती बंद पडते तेव्हा जास्तीत जास्त लोकांचा पैसा त्यात गुंतलेला असतो.एखादी बोलबच्चन व्यक्ती दहा-वीस लोकांना पटवुन दहावीस हजार कमीशन कमवतेही,पण त्यासाठी ओळखीच्या लोकांची किती रक्कम त्यांच्यामुळे असल्या फ़ुटकळ कंपनीकडे गुंतवली गेली आहे हे त्यांना समजत नाही.

-बहुतांशी सर्वच एमएलएम ह्या नवीन बकरयांच्या साखळीवर अवलंबुन असतात,उत्पादनाच त्यात काही देणघेण नसत.फ़क्त वितरकांची संख्या वाढवत जायच बस मग त्यांच्याच रकमेतील काही भाग त्यांच्या वरच्यांना देवुन उरलेला भाग कंपनीकडे पोहोचला जातो.नव्या जॉइनिंग बंद,कंपनी बंद.आमच्या इथे हया एमएलएमचे वारे खुप वाहत असतात.प्रत्येक दोनतीन महिन्यांनी नवी एमएलएम येत असते.जो ती घेउन येतो त्याला त्याच्या खालच्या  दोघातिघांना सोडुन कोणालाच त्यात फ़ायदा होत नाही.फ़ायदा तिघांचा,तोटा शेकडो लोकांचा आणि महिन्याभरातच कंपनीच नाव गुंतवलेल्या पैश्यासगट गुल.बाकी हया एमएलएम करणारया अनेक लोंकाच्या मोटीवेशनल स्कील्स बघुन मला तर अस वाटते,जिहाद वैगेरे सारख्या संघटना ब्रेनवॉशींगसाठी हया एमएलएममधलीच माणस रिक्रुट करत असावीत.

– सर्वसाधारणपणे गुंतवणुकदार कंपनीत पैसा गुंतवतो,कंपनीमालक कामगारांच्या साहाय्याने उत्पादन करुन ग्राहकांना वस्तु पुरवतात.हयात गुंतवणुकदारांना कंपनीच्या कामगिरीप्रमाणे रीटर्न्स मिळतात.कामगारांना रोजगार मिळतो,ग्राहकांना त्यांच्या वस्तु मिळतात.हे सर्व सांभाळुन कंपन्या नफ़ा कमावत असतात. याउलट एमएलएममध्ये आपण पैसे गुंतवतो.(गुंतवणूक)कंपनीच प्रॉडक्टस़च प्रमोशन करतो. (कामगार)प्रॉडक्टही विनापर्याय घ्याव लागत. (ग्राहक) पण हाती काहीच लागत नाही.

खरच पैसे मिळविण्यासाठी कोणताच झटपट मार्ग नाही.उगाच मेहनतीने कमवलेले पैसे हया लबाड लोकांच्या घशात का म्ह्णुन घालायचे.पैश्यांची रिस्कच घ्यायची असेल तर मार्केट खाली पडायची वाट बघुन दोन-चार ब्लूचिप कंपन्यात गुंतवणुक करावी.हया ब्लुचिप कंपन्या कधी ना कधी चांगले रिटर्न्स देतातच .संदर्भासाठी हे वाचुन पहा.नाहीतर मग करोडपती होण्यासाठी मी मागे एकदा माझ्या हया ब्लॉगवरच सांगीतलेली ही स्कीम जॉइन करा. 🙂

Advertisements

वाढता वाढता वाढे….

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणेच आमच कटट्यावरची सभा भरली होती.हो कटटयावरची लोकसभाच,आमच्या येथील बस स्टॉपचा हा कट्टा असाच कधी लोकसभेच सभागॄह तर कधी क्रिकेटच्या निवडसमीतीच बैठक स्थान अशी अनेक रुप घेत असतो.इथे अगदी सगळ आमच्या हातातच असल्याच्या आविर्भावात आम्ही विविध विषयावर चर्चा करीत असतो.मग इथे कधी संसदेतले नेते होवुन देशातील गहन प्रश्नावर,विविध धोरणांवर चर्चा,तर कधी निवड समीतीचे अध्यक्ष होवुन त्या खेळाडुला घ्यायला पाहिजे होत, हयाला काढुन टाकायला हव अशी चर्चा  तर कधी समीक्षक होवुन एखाद्या सिनेमाच विश्लेषण आमच्या बोलण्याने काही फ़रक पडत नाही हे माहित असुनसुदधा  रंगतच असत. तर  दोन दिवसापुर्वीच वर्तमानपत्रात सरकारने सरकारी कर्मचारयांचा महागाई भत्ता ८ % नी वाढवला,ही बातमी तुम्ही वाचली असेलच.हयावर आमच्या सभेतील खाजगी क्षेत्रात काम करणारा मा्झ्या  एका मित्राने ” मजा आहे बुवा तुमची “असे विधान केले.त्यावर आमच्यात झालेल्या चर्चेतील मी मांडलेले मुद्दे जसे आठवतील तसे या पोस्ट्मध्ये लिहतो.

मी त्याला म्हटल मित्रा आमचे हे वाढवलेले पैसे परत कसे घ्ययचे ते हयांना बरोबर माहित आहे आणि ते एखाद्या मार्गाने  हे वाढवलेल्या पैश्यांपेक्षा अधिक पैसे आमच्याकडुन कसे काढतील ते कळणार सुदधा नाही.आणि ही महागाई भत्ता वाढ म्हणजे अजुन पुढेही महागाई अशीच मारुतिच्या शेपटीसारखी वाढतच राहणार याचे इंडिकेशन आहे याची नोंद घ्यायला हवी.म्ह णुन मी म्हणतो हि महागाई भत्ता वाढ नको तर हया महागाईलाच कमी करा.कारण जरी दरडोई उत्पन वाढले असले तरी महागाई त्यापेक्षा कित्येक पटींनी वाढलेली आहे,जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडत आहेत, त्यामुळे मध्यमवर्गीयांनाच जगण कठिण झालेल असतांना गरीब बांधवांची तर गोष्टच करायला नको.महत्वाचे म्हणजे हि महागाई चैनीच्या गोष्टींबाबत कमी झालेली आहे तर जगण्य़ासाठी मुलभुत गरजा असलेल्या क्षेत्रात चांगलीच फ़ोफ़ावलेली आहे.मला कळत नाही दारु,तंबाखु,कार यांसारख्या चैनीच्या वस्तुंवर भाववाढ का केली जात नाहिये. अन्नधान्याच्या किमती आकाशाला भिडत असतांना त्याचा फ़ायदाही आपल्या शेतकरी बांधवांना  हो्तो आहे अस नाही तर शेतकर्यांकडुन माल जुन्या भावाला घेउन ग्राहकांना मात्र तोच माल अवास्तव दरात देउन उद्योजक-दलाल यात आपला खिसा भरत आहेत.हा असमतोल असाच वाढत राहिला तर सर्वसामन्यांनी जगायच तरी कस…?

आंतरजालावरुन...

हया महागाईचा परिणाम व्यक्तीच्या खाजगी तसेच सामाजिक जिवनावर होतो.बायका-मुलांच्या लहानमोठ्या गरजादेखील पूर्ण करणे अशक्य झाल्याने कौटुंबिक सौख्य लाभत नाही तर तणाव वाढतच जातो.मग आजवर इमानेतबारे काम करणार्या त्या व्यक्ती समोर दोनच मार्ग उरतात, आत्महत्या किंवा चोरी .यातील काही लोक पहिला मार्ग अवलंबतात तर काहीजण आजवर जपलेल्या आपल्याच चारित्र्याचा खुन करुन दुसरा मार्ग धरतात. यामुळे एकुणच  वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा नाश होतो आहे.कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने काही दे्श पेट्रोलला पर्याय म्हणून जैविक इंधन तयार करण्यासाठी धान्याचा उपयोग करत आहेत.आपल्याच देशात कित्येक लोकांना खायला अन्न नसतांना धान्यांपासून मद्यनिर्मिती करण्यास समंती मिळते आहे.कधी अतिवृष्टी ,कधी अनावृष्टी तर कधी अवेळी पाउस या बिघडलेल्या नैसर्गीक समतोलामुळे  धान्य उत्पादन घटत आहे.साठेबाजही आपली कामगिरी चोख बजावत आहेत. त्यामुळे एकुणच धान्यपुरवठा कमी पडून जगभरात धान्याच्या किमती वाढल्या आहेत.

आंतरजालावरुन.

तसेही गेली काही वर्षे आपल्या देशात शेती क्षेत्राकडे थोडे दुर्लक्ष झाले.क्रिकेटजगतातील बक्कळ पैसे देणारे क्षेत्र आपल्या कॄषीखात्याला अधिक महत्वाच न वाटल तर नवलच. त्यामुळेच बरयाच योजना फ़क्त कागदोपत्रीच आहेत.तर काही लागु होवुन सुदधा त्यांच मुळ ध्येय गाठण्यात अपयशीच ठरल्या आहेत.मंदीतही देशाची अर्थव्यवस्था समर्थपणे हाताळणारे मनमोहन सिंग सरकार इथे मात्र क्लीन बोल्ड झाले आहे.आता त्यांना कुठेही महागाईबाबत विचारल असता ते विकासदराच्याच गोष्टी करतांना दिसतात.असंख्य लोक भुकेने मरत असतांना,चांगल्या सामाजिक मुल्यांचा र्हास होत असतांना, काही मुठभर लोकांच भल करणारा विकासदर काय चाटायचा आहे.एका बाजुला आर्थिक विकास दर तसेच सेन्सेक़्स वाढतो आहे आणि त्या बरोबरच किंबहुना अधिक प्रमाणात महागाईमुळे लोकांतील असंतोष सुदधा वाढतो आहे.मला तर वाटते मनमोहन सिंग यांनी थोड बॅकफ़ुटवर येउन लोकांच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले पाहिजे.हा प्रश्न दिसतो तेवढा साधा नाहि याचे भान सरकारने ठेवायला हवे.कारण हा महागाईचा भस्मासुर जर असाच सातव्या आकाशाला भिडत राहिला तर पुढे त्याचे खुपच वाईट परिणाम दिसुन येतील हे काही वेगळ सांगायला नको.आधीच दहशतवाद, भ्रष्टाचार आणि इतर समस्यांनी ग्रासलेला समाज कधी पेटुन उठेल ते सांगता येत नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट अति होते, जिवावर उठते तेव्हा होते  क्रांती….

माझे विचार आमच्या सभेतील सदस्यांना तरी पटले…यावर तुमचे विचार आणि मत अवश्य कळवा…

(मागे या माहागाईची आरती वाचनात आली होती.छान आहे इथे भेट देउन पहा)