एंटरटेनमेंट के लिये कुछ भी करेगा

काल रात्री जेवतांना नेहमीप्रमाणे इडीयट बॉक्ससमोर बसलो होतो.कारण त्याच्याशी बहुतांशी जेवतांनाच संबध येतो.तर सोनी वर एंटरटेंमेंट के लिये कुछ भी करेगा लागल होत.अधुन मधुन पाहत असतो मी हा कार्यक्रम,तसा छान आहे.काल फ़रहाच्या जागी सिद्धु आला होता.म्हणजेच भारताच्या इतिहासातील दोन महान (? ) पकाउ शायर परीक्षणासाठी एकत्र बसले होते.तर झाल अस काल एक नवरा बायको त्यात आले होते.त्यात बायको कॉमेंट्री करत होती व नवरा त्याप्रमाणे वेगवेगळ्या हालचाली करत होता.म्हणजे  आता परत मी विडियोत पाहिल्यावर कळल त्या किती कठिण हालचाली होत्या ते.तर हया परफ़ोर्मन्सला अनु मलिकने मध्येच उभ राहुन फ़ुल स्टॉप करुन टाकल.तेव्हा त्या बाइने समजावल कि हे खरच सोप नाहिये,माइंड पॉवर कंट्रोल लागते हे करायला.पण मलिक साहेब आणि सिद्धु साहेब काही ऐकायला तयार होइनात.

(हयात ०२:२० पासुन पुढे बघा.नीट बघितल्यावर कळते त्याने केलेल खरच खुप कठिण आहे …)

मग त्या बाईने अनु मलिक आणि तिथल्या जनतेला पाय एकाच दिशेला फ़िरवत हाताने हवेत आठचा आकडा काढुन दाखवा असे चॅलेंज दिले .तिच्या पतिने तेव्हा तसे करुनही दाखवले.बघा तुम्ही प्रयत्न करुन खरच आपल्यासाठी अशक्य आहे ते.तिच्या हया चॅलेंजवर मलिक साहेबांनी उभ राहुन पाय फ़िरवत दोन्ही हातांनी हवेत पोहायची स्टाईल करुन त्या दांपत्याची खिल्ली उडवली.अनु मलिकच्या हया माकडचाळ्यांवर जनता ही खदखदुन हसली. अरे ते तुमचे अकरा हजार एकशे बारा रुपये नाही द्यायचे कोणाला तर ठिक पण त्यांच्या भावनांचा आदर तरी ठेवा. तिथे हे लोक फ़क्त त्या तुटपुंज्या रकमेसाठी येतात अस मला वाटत नाही ,ते येतात त्यांच टॅलेंट दाखवायला. ते थोड समजुन घ्यायला हव ना.त्यावेळी त्या दोघांचा झालेला तो अपमान पाहुन खरच खुप वाईट वाटत होत.हयात कधी कधी नुसत्या विचित्रपणाला किंवा प्रादेशिकतेच्या नावावर उगाच खुप वाहवा दिली जाते .याआधीचाच एक पंजाबी गाण्यावरचा नाच मला उगाच खुप डोक्यावर घेतल्यासारखा वाटला होता.असो मी नेहमी बघत नाही, पण काल तरी असच चित्र मला दिसल.आणि मला ते बिलकुल आवडल नाही, तेच मांडण्यासाठी ही छोटेखानी पोस्ट…तुम्हाला काय वाटते…

वंडरफुलम….

एक अफ्रीकन वंशाचा मनुष्य अगदी शुद्ध गुजरातीत ” केम थयु भाई” अस काहीस म्हणताना इडीअट बॉक्स वर बजाज डिस्कवर च्या जाहिरातीत मघाशी पाहिल.छान वाटली जाहिरात म्हणून लिहायला घेतल त्यावर…’एक लीटर पेट्रोलमे भारत की खोज’ अस म्हणत आपल्याला भारतातील ज़रा हटके जागांबददल  माहिती देणारी ही  बजाज डिसकवर ची जाहिरात पाहिली असेल ना तुम्ही.मानल पाहिजे त्या टीमला ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली.मी  तरी  हया मालिकेतील त्यांच्या तिन जाहिराती पाहिल्या आहेत तिन्ही मला खुप खुप आवडल्या.अगदी मस्त जुळवुन आणल्या आहेत हया जाहिराती हया लोकांनी म्हणजे गाडीच्या नावाप्रमाणे नविन जागा ‘डिस्कवर’ करून दाखवतात हे लोक तेहि गाडीच्या मायलेज ची माहिती देत.

बजाज च्या वेबसाइट वर त्यानी अजुन अश्या जागांबददल माहिती दिली आहे त्यांच्या जाहिराती येतीलच पुढे.यात झबुआ-गुलाल का स्वयंवर (येथील संस्कृति  महेंद्रजिनी ओल रेडी कवर केलि आहे त्यांच्या भगुरिया या लेखात), शनी शिंगणापुर-बिन दरवाजो का गाव ,निलांबुर-स्कुल ऑफ़ मैजिक या जागांचा समावेश आहे.याबाबत अधिक माहितीसाठी इथे भेट दया.चांगल्या होतील यांच्याही जाहिराती ह्याबाबत मला तरी काही शंका नाही.

 

‘इंडिया में एक लीटर पेट्रोल के साथ आप विदेश में जा सकते है’ अस म्हणत यांची एक जाहिरात बेतली आहे ती गुजरात मधील जूनागढ़ पासून १०० की.मी. अंतरावर (बजाज च्या भाषेत १ लीटर पेट्रोलच्या अंतरावर)असलेल्या जांबुर या गावावर.हया गावाच वैशिष्ट्य हे की गावात सुमारे ४००० अफ्रीकन वंशातील लोक राहतात.’इंडिया का अफ्रिका’ असा हया गावाचा उल्लेख केला जातो.जांबुरबद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.

.’इंडिया में एक लीटर पेट्रोल आपको एक ऐसी जगह ले जाएगा जहा पेट्रोल की कोई जरुरत नाही है’ अश्या दमदार थीम सह दुसरया एका जाहिरातीत लडाख मधील मेग्नेटिक हिल दाखवल आहे.हया जाहिरातीत तो बाईक चालव णारा बाईक बंद करतो मेग्नेटिक हिल जवळ आणी त्यानंतर बाईक आपोआप मेग्नेटिक फिल्ड मुले ळे चालु लगते .आपले एक ब्लॉग मित्र  रोहन हे  आताच लडाखची बाईक सफ़र करून आले आहेत त्याना या अनुभवाबाबत विचारायला हवे.’मेग्नेटिक हिल’ बद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.

 

‘इंडिया में एकल लीटर पेट्रोल आपको साडे तिन हज़ार साल पीछे ले जा सकता है ‘ या थीम वर आधारित तीसरी जाहिरात आहे ती मात्तुर या गावावर .कर्नाटकातील या गावाच वैशिष्ट्य हे की इथे आजही संस्कृत ही बोलीभाषा म्हणून वापरली जाते.मात्तुर बद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.विचार करा आजच्या  दैनदिन व्यवहारात संस्कृत.  आश्चर्यम ना…


म्हणुनच हया तिन्ही जाहिराती पाहिल्या की आपोआप तोंडातून उदगार बाहर पडतात “वंडरफुलम……”