इश्क मेरा , दर्द मेरा ….

त्याच  तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम होत.त्याने तिला तस सांगीतलही होत, पण तिला त्याच्यात काही विशेष रस नव्हता.त्याला मात्र कधी ना कधी ती आपल्याला हो म्हणेल अस वाटत होत .त्याच नाव रोहन राठोड आणि ती सुप्रिया , तसा तो ही काही वाया गेलेला रस्त्यावरचा मवाली  मुलगा वैगेरे  नव्हता तर  तो आयआयटी गुवाहाटी सारख्या नामांकित शिक्षणसंस्थेत अभियांत्रिकीच शिक्षण घेत होता.पण काय असते ना ह्या जगात प्रत्येकाच्या नशिबात प्रेम लिहलेलच असेल अस नाही ना.त्यात ह्याच दुर्दैव अस कि त्याला कर्करोग झालेला आहे  आणि तो आता उपचाराच्या बाहेर गेलाय हे त्याला कळते.त्याला मरणाची काही वाटत नाही पण आता आपण तिच्यापासून दूर होणार ही गोष्ट त्याला खूप हेलावून टाकते.त्यातच तो तिच्यासाठी एक गाण लिहतो आणि ते गाण जेव्हा तो गाऊन रेकॉर्ड करतो त्याच्या पंधरा दिवसांनी तो हे दुष्ट जग सोडून जातो.प्रेमाच्या शोधात…एका वेगळ्याच जगात….कधीही परत न् येण्यासाठी…मागे राहते ते फक्त त्याच गाण….तिच्यासाठी लिहलेल …

ते गाण…….

‘एम्प्टीनेस’

Ho love of mine..
with a song and a whine..
You’re harsh and divine..
like truths and a lie..

but the tale end’s not here..
I’ve nothing to fear..
for my love is yell of giving an hold on…
in the bright emptiness..
in the room full of it..
is a cruel mistress ho ho o…

I feel the sunrise..
that nest all hollowness..
for i have nowhere to go and im cold..

And i feel so lonely yea..
There’s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..
There’s a better place from this emptiness..

yeiyeiyeiya….
Aa..aa.. aa…..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा …..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा ….

आशिक तेरा ..
भीडमे खोया रेहता है
जाने जहा …
पुछो तो इतना केहता है..

And i feel so lonely yea..

There s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..

*******##***********##****************##***************##**********************##******************##****************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.त्याआधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्याने काही लोकांना ती गाणी पाठवली होती. पण त्याने अल्बम काढायच्या आधीच इंटरनेटवर त्यातील एक गाण एका वेगळ्याच हृदयस्पर्शी कथेसह अवतरल.ते तिथे कस आल ते त्याला कळत नव्हत आणि नेटवर ते दुसर्याच्या नावाने इतक प्रसिद्ध झाल होत कि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हत .तेव्हा त्याने लवकरात लवकर  तो अल्बम प्रदर्शित करायचं ठरवलं…

त्या अल्बममधील दुसर एक गाण ….

(खूप सुंदर आहे हे ‘एम्प्टीनेस’ सारखच ,विडीयो ह्या गाण्याचा नसला तरी चांगला ‘सिंक्रोनाइज’ झालाय ..जरूर पहा,ऐका … )

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , (वाचा ,वाचा ..बाय मिस्टेक दुसऱ्यांदा   नाहीये हे .. 🙂  )त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.गाणी तर छान होतीच पण खरच अल्बम काढला तर त्याची कोणी एवढी दखल घेईल का..शिवाय येणारा आर्थिक खर्च …आणि  कित्येक अल्बम असेच येऊन जातात… मग आता काय करायचं हा विचार करताना त्याच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली …….

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

काहीही असो , हे गाण खूप खूप सुंदर आहे आणि म्हणूनच  ते मला न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.मी ५-६  महिन्यापूर्वी परत  एकदा काही दिवस   गिटार  क्लासला गेलो होतो तेव्हा तिथे मी सर्वात पहिल्यांदा हे गाण ऐकल आणि ‘लव अॅट फर्स्ट साईट’ म्हणतात तस ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो .खरतर बरीच  गाणी काही वेळा ऐकल्यावर चांगली वाटायला लागतात पण ह्यासारखी काही गाणी असतात कि जी ऐकताक्षणीच आपल्याला आवडतात.त्यादिवशी घरी आल्यावर लगेच ते  गाण नेटवर मिळते का हे  बघण्यासाठी गुगलबाबाला विचारले असता ती वरील हृदयस्पर्शी आणि गाण्याचा ‘इम्पॅक्ट’ कितीतरी  अधिक पटीने वाढवणारी माहिती मिळाली.पण काही अजून लिंक्स पडताळल्यावर सत्य परिस्थिती समजली ,लाखो लोकांच्या हृदयाला हात घालणारा ‘रोहन राठोड’ कधीच अस्तित्वात नव्हता.

आयआयटी गुवाहाटीने असा कोणीही ‘रोहन राठोड’ त्यांच्या इथे कधीही नव्हता आणि वरील प्रसंग दुसर्या कोणाही मुलाबरोबर तिथे घडलेला नाही असे स्पष्ट केलेले असतांना देखील अजूनही  लाखो  लोक जाणूबुजून असो कि कसेही पण रोहन राठोडच्या अस्तीत्वाबाबतचे हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. कितीतरी लोकांनी त्याला समर्पित करून ह्या गाण्यांच पूर्ण हिंदी गाणही काढल आहे. तर रोहन गेल्यावर सुप्रियाची मनोव्यथा मांडणारीही कित्येक गाणी युट्युबवर सापडतात.त्यातील मला आवडलेल्या विडियो खाली जोडतो आहे.तो ही जरूर पहा,गाण तर सुंदर आहेच पण विडीयोही छान तयार केला आहे.

आजकाल चित्रपटाबाहेरील गाणी तितकीशी ऐकली जात नाहीत कारण अनेक हिंदी गाण्याचे अल्बम्स आजकाल नुसते येऊन जातात.जास्तीत जास्त थोडे रीमिक्स्चे अल्बम चालतात पण एक काळ होता , म्हणजेच माझ्या  लहानपणाचा 🙂 जेव्हा अनेक गायकांच्या चित्रपटातील गाण्यांबरोबरच त्यांच्या नवीन अल्बम्सचीही अगदी आतुरतेने वाट पाहिली जायची.तसेच इतरही नवीन गायकांचे अल्बम्स चांगले असल्यावर ठीकठाक खपत होते.पण आता अल्बम काढण बरचस सोप असल तरी ( पैसा बोलता है… 🙂 ) तरी त्याला लोकप्रियता मिळण खूप कठीण होऊन बसल आहे .ह्या गोष्टीचा ह्या प्रकरणावर  बराचसा प्रभाव असावा असे मला तरी वाटते .

हे गाण खर तर अजून सर्वासमोर आलेल नाहीये पण इंटरनेटशी ‘कनेक्ट’ असलेल्या लोकांमध्ये मात्र हे गाण भलतच लोकप्रिय आहे.फेसबुकवर ह्या गाण्याची जवळपास दोन लाख लोक असणारे एक आणि  तसेच अजून एक लाखावर लोक असणारे एक ‘फॅनपेज ‘ आहे. ह्या गाण्याच्या हजारो लोक असलेल्या ‘फॅनपेज ‘ चा तर खुपच सुळसुळाट आहे.नेटवरील माहितीनुसार सुमारे १५ लाखाहून जास्त दर्शक ह्या गाण्याला आतापर्यत मिळालेले आहेत.वेगवेगळ्या सिनेमातील दृश्ये ,छायाचित्रांचे स्लाईड शो वापरून तयार केलेले  ह्या गाण्याचे तब्बल ३०० हुन अधिक विडीयोज युट्युबवर आपल्याला पाहायला मिळतात.ह्या प्रकरणाची दखल हिंदुस्थान टाईम्समध्येही मागे घेतली गेली होती. मी सुद्धा ह्या गाण्याचा चांगलाच प्रसार करतो आहे , आतापर्यंत अनेक लोकांना मी हे गाण ऐकवलं आहे आणि  ज्यांना ज्यांना हे गाण ऐकवल आहे त्यातील कोणीच अजून ते आवडलं नाही अस म्हटलेलं नाही… 🙂

कधी अस्तीत्वात नसूनही अमर झालेल्या रोहन राठोडचा ‘एम्प्टीनेस’ तुमच्या आवडत्या गाण्याच्या यादीतील  एखादी जागा भरतो  का ते आता तुम्हीच बघा…

दिवाना ‘तुझसा’ नही ….

मी माझ्या आधीच्या एका पोस्टमध्ये लिहल होत, ‘भारतातील बहुसंख्य लोकांच्या रक्तात पाण्याबरोबरच अजून दोन महत्वाचे घटक मिसळलेले आहेत….ते म्हणजे क्रिकेट आणि सिनेमा’ … आणि माझ्या ह्या विधानाला मी सुद्धा अपवाद नाहीये. लहानपणापासून मी  क्रिकेटबरोबरच सिनेमासृष्टीवर अगदी मनापासून प्रेम केल.हिंदी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात मी दिलेल योगदान तुम्ही ‘सा रे ग म प‘ इथे वाचल असेलच.  🙂  तर माझ्या हिंदी सिनेमासृष्टीतील कारकिर्दीच्या  (प्रेक्षक म्हणून हो … 🙂 ) सुरुवातीच्या काळात  मी ज्यांचा मोठा पंखा होतो त्या ‘याहू मॅन’च चार दिवसांपूर्वीच वयाच्या ७९ व्या वर्षी  निधन झाल.त्यामुळे नेहमीच म्हटलं जात तस ‘चित्रपटसृष्टीच किती अपरिमीत नुकसान’ झाल ते माहित नाही पण माझ्यासाठी तरी तो मला माझ्या बालपणाशी जोडणारा एक ‘हिरो’ होता.  पृथ्वीवरील तो ‘गंधर्व’  इथल नश्वर शरीर सोडून आता देवाघरी गेला आहे . कदाचित स्वर्गातील चैतन्य कमी झाले असल्याने देवाने त्याला आपल्या जवळ  बोलावून घेतल असाव.तर माझ्या रक्तात सिनेमा हा घटक मिसळण्यासाठी सर्वात पहिल इंजेक्शन मी घेतलं  होत ते ह्या शम्मीसाहेबांच्याच नावाच. त्यांची गाणी,जुने चित्रपट बघतांना नेहमीच  मला लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवतात.म्हणूनच अश्या मला माझ्या बालपणाशी जोडणार्यां एका ‘हिरोची’  आठवण म्हणून हा छोटासा लेखप्रपंच.

त्यांचा नातू रणबीर कपूर याच्या ‘रॉकस्टार‘ या आगामी चित्रपटात ते आपल्याला शेवटचे दर्शन देणार आहेत.

खरतर ‘त्या’दिवशीच ही पोस्ट लिहायला घेतली होती पण पूर्ण करू शकलो नाही .मग  वर्तमानपत्रात अनेक लेख वाचायला मिळतीलच असे वाटून तो ड्राफ्ट तसाच सोडून दिला.पण सध्या घडत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे प्रसारमाध्यमांनी ह्या घटनेची हवी तशी दखल घेतली नाही.मटाने तर त्यांच्या खास प्रतिनिधीच्या बातमीत खुद्द शम्मी साहेबांनाच स्वत:चा शेवटचा  निरोप घ्यायला बाणगंगेपाशी पोहोचवले. असो तर काल  सुट्टी होती आणि त्यात सकाळीच अचानक ह्या बॉलीवूडच्या प्रिन्सची आठवण आली.मग काय तुनळीवर ‘याहू मॅन’ची  एका मागे एक अशी गाणी पाहत गेलो आणि त्यातच गुंग होऊन  एकदम नोस्टॅल्जिक होऊन गेलो आणि काहीतरी हरवल्याची जाणीव झाली  मग  नेहमीच्या  कंटाळ्याला  दूर भिरकावून ही पोस्ट पूर्ण करायला घेण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही .खरच काल इतका शम्मीमय होऊन गेलो होतो कि  जितक्या लोकांशी चॅटवर बोललो त्या सर्वांबरोबर शम्मीचा विषय काढल्याशिवाय राहिलो नाही .

शम्मी कपूर  म्हणजे चैतन्याच,उत्साहाच दुसर नाव…त्यांच खर नाव शमशेरराज कपूर होय.त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ ला मुंबईत कपूर घराण्यात झाला.आपल मेट्रिकपर्यंतच शिक्षण संपवून रुईया कॉलेजमध्ये थोडेसे दिवस भरल्यावर त्यांनी १९४८ ला वडिलांच्या  ‘पृथ्वी थियेटर्स’ मध्ये ५० रुपये मासिक पगारावर ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली.त्यांनी काम केलेल्या पहिल्या नाटकात खुद्द पृथ्वीराज कपूर ह्यांनी देखील काम केल होत.पाच वर्ष ‘पृथ्वी थियेटर्स’ मध्ये काम केल्यावर त्यांच्या ‘पठान’ नावाच नाटक बघून  महेश कौल ह्यांनी   १९५३ मध्ये ‘ जीवन ज्योती ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून पदार्पण करायची संधी दिली.पण तो चित्रपट काही चालला नाही. त्यानंतर तब्बल पाच वर्ष यश त्यांना हुलकावणीच देत राहिले.त्यांच्या एकामागोमाग एक चित्रपटांवर फ्लॉपचा शिक्का बसत गेला.ह्याच दरम्यान त्यांनी ‘मेमसाहिब’ ह्या किशोर कुमार आणि मीनाकुमारीबरोबरच्या सिनेमात खलनायकाचेही काम केले.१९५५ मध्ये त्यांनी  गीता बाली ह्या त्यांच्या एका सहअभिनेत्रीसह घरचा विरोध असल्याने बाहेर मंदिरात जाऊन नाटकीय पद्धतीने  लग्न केल.त्यांच्याकडूनच त्यांना पुढे आदित्यराज आणि कांचन ही दोन अपत्ये झाली. गीता बाली ह्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि दिलेल्या हिमंतीमुळेच आपण पुढे आलो नाहीतर सततच्या अपयशामुळे सिनेमाजगताचा  कायमचा निरोप घ्यायचं आपण ठरवलं होत, अस त्यांनी मागे एका मुलाखतीत सांगीतल होत. पुढे १९५७ साली नासिर हुसैनने काढलेल्या  ‘तुमसा नही देखा’  चित्रपटाने शम्मीला यशाची चव चाखवत सिनेमासृष्टीत एक  वेगळी ओळख निर्माण करून दिली.त्यानंतर मात्र ह्या बॉलीवूडच्या राजकुमाराने कधी मागे वळून पाहिले नाही.

१९६१ मध्ये त्यांचा ‘या~~~हू ‘ वाला  पहिला रंगीत सिनेमा ‘जंगली’ प्रदर्शित झाला आणि ते रातोरात सुपरस्टार झाले.खरतर त्यावेळी बॉलीवूडमध्ये राज-दिलीप-देव ह्या त्रिकुटाच साम्राज्य होत.(देवसाहेबही आपल्याला लहानपणी खूप आवडायचे ,बर का   🙂  ) ह्या दिग्गज तिघांना मजबूत टक्कर देत शम्मी कपूरने राजकुमार बनून आपल्या हटके स्टाईलने स्वत:च  वेगळ राज्य निर्माण केल आणि ते टिकवलेही … जंगली नंतर शम्मीनी प्रोफेसर,ब्लफमास्टर, चायना टाऊन,राजकुमार ,जानवर ,काश्मीर कि कली असे अनेक उत्तमोत्तम सिनेमे केले.पुढे  नासीर हुसैनच्या तिसरी मंझील ह्या चित्रपटातून देव आनंद बाहेर गेल्यावर जेव्हा शम्मींना हा चित्रपट ऑफर केला गेला.तेव्हा शम्मीनी त्याला सांगितलं जर देव आनंद स्वत: मला सांगेल कि ‘त्याने हा चित्रपट स्वत:च्या इच्छेने सोडला असून तो मी करण्यात त्याला काही आक्षेप नाही ‘ तरच मी हा चित्रपट करेन . मग देव आनंदशी बोलण झाल्यावरच त्यांनी हा सिनेमा स्वीकारला.

तिसरी मंजिलच शुटींग चालू असतांनाच १९६५ साली  त्यांच्या पत्नी गीता बाली यांचा देवी ह्या रोगाने  मृत्यू झाला.त्या देवीने दगावलेल्या भारतातल्या शेवटच्या अधिकृत रुग्ण आहेत.त्यांच्या मृत्युचा शम्मींनी खुपच धसका घेतला ते आतून खूप ढासळले.तश्या उध्वस्त मनस्थितीतच त्यांनी तिसरी मंजीलच शुटींग पूर्ण केल.त्यांच्या अतिशय प्रिय गीता बाली ह्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर सर्वात पहिलं चित्रित  केलेल गाण ‘तुमने मुझे देखा ‘ वर जोडलं आहे.ह्या माहितीसह एकदा जरूर बघा तो विडियो…त्याच्या डोळ्यात बघा…पुढे ह्या ‘तिसरी मंजील’ चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले आणि त्या यशानेच शम्मींना त्या मोठ्या धक्क्यातून सावरले.पुढे त्यांनी लाट साहब,पगला काही का, इव्हनिंग  इन पैरिस,ब्रम्हचारी ,तुमसे अच्छा कौन है ,प्रिन्स असे अनेक चित्रपट केले..ब्रम्हचारी या चित्रपटासाठी तर  त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ठ नायकाचा पुरस्कारही  मिळाला.१९६९ मध्ये ते भावनगरमधील राजघराण्यातील निलादेवी ह्यांच्याशी विवाह केला.१९७१ मध्ये त्यांनी राजेश खन्ना बरोबर केलेला ‘अंदाज’ हा त्यांचा अभिनेता म्हणून हिट झालेला शेवटचा चित्रपट.योगायोगाने हा शंकर-जयकिशनचा पण एकत्र काम केलेला शेवटचा सिनेमा.ह्यातील ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ हे गाण आपल्याला किशोर आणि रफी ह्या दोघांच्याही आवाजात ऐकण्याची अनमोल संधी मिळते. त्यानंतर ते आपल्या स्थूल शरीरामुळे चरित्र अभिनेते म्हणून काम करू लागले.दरम्यान त्यांनी दिग्दर्शक म्हणून  मनोरंजन व बंडलबाज हे दोन चित्रपट काढले पण ते तितकेसे चालले नाहीत.पण म्हणून ते बॉलीवूडपासून दूर झाले नाहीत.अगदी आताचेही  अनेक नवीन चित्रपट ते पाहत.कोणाचा अभिनय आवडल्यास स्वत: संपर्क करून त्याची प्रशंसा करत.

आमीर खान शम्मी साहेबांचा मोठा पंखा असून त्यांना तो खूप मानायचा  आपल्या  प्रत्येक सिनेमाच्या आधी शम्मी साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्याकडे  जायला  तो कधी चुकत नव्हता.

आयुष्याच्या पुढील प्रवासात त्यांना सिनेमाने जितक झपाटल होत तितकाच दुसऱ्या एका गोष्टीने झपाटल ते म्हणजे संगणक…त्याचं संगणकावरील प्रेम हे अगदी  ‘लव अॅट फर्स्ट साईट’ होत.त्यांनी संगणकावर अगदी मनापासून प्रेम केल.१९८८ ला  त्यांनी घेतलेल्या ८ एमबी रॅम मेमरी  असलेल्या संगणकाबद्दल ते कसे भरभरून बोलतात ते खालील विडीयोत पहा. त्यांनी संगणकाचा बराच अभ्यास करून त्याबाबत तांत्रिक ज्ञानही आत्मसात केल होत .संगणकाबद्दल भारतात इंटरनेटचा वापर  करणाऱ्या पहिल्या-वाहिल्या व्यक्तींमध्ये शम्मी कपूरच नाव घेतलं जात.१५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारतात VSNL ने    GIAS (Gateway Internet Access Service ) च्या माध्यमातून इंटरनेट आणल.पण शम्मी साहेबांकडे ह्याच्या खूप आधीच  बिटिश टेलिकॉम कडून VSNL च्या मार्फत मिळवलेल इंटरनेट कनेक्शन होत. ते इंटरनेट युजर्स कमुनिटी ऑफ इंडिया (आययूसीआय) या संस्थेचे संस्थापक-चालक होते.कपूर घराण्याची वेबसाईट शम्मीसाहेबच सांभाळत. ह्या संगणकाचा ‘माऊस’ हातात आला आणि माझी सिगारेट सुटली,ह्याची कबुली त्यांनी मागे दिली होती.’याहू’ ने भारतात पदार्पण करतांनाच्या कार्यक्रमात  शम्मी साहेबाना बोलावलं होत. त्यासंबधातील ही  बातमी वाचा. ते फेसबुक ,ट्विटर च्या माध्यमातून वयाच्या  ७९ व्या वर्षीही तरुण पिढीशी आपल नात जोडून चिरतरुण राहिले  होते.

त्याकाळच्या देव-दिलीप-राज च्या युगात त्यांना टिकता आल ते त्यांच्या खास अदाकारीमुळेच…… रफींचा आवाज आणि त्यांचा अंदाज ह्यांच्या संगमातून कितीतरी अजरामर गाणी त्यांनी बॉलीवूडला दिली. त्यांची आगळीवेगळी नृत्यशैली ,मान वाकडी करत चेहऱ्यावर भन्नाट भाव दाखवण, अतिशय बोलके असलेले  डोळे मध्येच अलगद बंद करण लोकांना वेड करत होत.तो चित्रपटात बेधुंद होऊन नाचत असे आणि तो नाच पाहतांना प्रेक्षकही तितकेच बेधुंद होऊन जात. बॉलीवूडमधील सोज्वळ,सालस अभिनेत्याच्या प्रतिमेला त्यांनीच सर्वप्रथम तडा दिला.आपल्या रांगड्या अभिनयाने,खास अश्या स्टाईलने बॉलीवूडमधील  हिरोला त्यांनी  एक वेगळेच मस्तीखोर,जंगली  अस रूप दिल.त्यानी पडद्यावर जे काही केल ते  त्यालाच शोभून दिसणार त्या ठिकाणी दुसर्या कोणाचा विचारही  करण कठीण आहे. मधुबाला,नूतन,आशा पारेख, साधना,शर्मिला टगोर अश्या त्यावेळच्या सगळ्याच टॉपच्या नायिकांसोबत त्यांनी काम केल.ते बॉलीवूडचे   Elvis Presley म्हणूनही ओळखले जात.बॉलीवूडमधील सर्वात रोमॅन्टिक हिरो कोण आहे ह्याला माझे उत्तर परवापर्यंत कदाचित वेगळ असत पण आता आणि ह्यापुढे सदैव ह्या प्रश्नाच एकच उत्तर असेल माझ्याकडे शम्मी आणि फक्त शम्मी…

खरतर दोन वर्षापुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती तेव्हा शम्मींवर काही लिहाव अस मनात आल होत पण ते भाग्य नाही लाभल मला…. तस बघायला गेल तर गेल्या कित्येक महिन्यात त्यांची छोटीशी  आठवणही कधी आली नव्हती.पण शाळेत असतांना  वर्षाच्या सुरुवातीला आपण एखादा धडा मन लावून वाचतो ,समजावून घेतो आणि पुढे वर्षभर त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही अगदी विसरून जातो  ते सगळ .मग वर्षाच्या शेवटी कधीतरी वाटते अरे हे वाचायला पाहिजे आता ,मग तुम्ही जशी त्यावर पहिली  नजर फिरवता तुमच्या लक्षात येत ,हे सगळ तर आपल्याला माहित आहे.तसाच काहीस काल शम्मींचे विडियो पाहतांना झाल.अनेक आठवणीना उजाळा मिळाला.परत एकदा शम्मीच्या प्रेमात पडलो मी…आमच्या काकाश्रीनी आणलेल्या ‘ बेस्ट ऑफ शम्मी कपूर’ ह्या कॅसेटमुळे,रविवारी सकाळी लागणार्या रंगोलीतील त्याच्या गाण्यांमुळे   व  डीडी-२ वर त्याकाळी दुपारी दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांमध्ये त्याचे अनेक चित्रपट पाहिल्यामुळे  त्यावेळी  तो माझा ‘हिरो’ झाला होता.त्याचा पडद्यावरील वावर खरच प्रसन्न करून जायचा.काल शम्मीमय असतांनाच संध्याकाळी मित्रांबरोबर असतांना अण्णांबद्दल महाचर्चा झाल्यावर मी  शम्मीचा विषय काढला तेव्हा त्याची अनेक गाणी माहिती असली तरी आमच्या पाचजणांमधील  मी सोडून  इतर कोणीही त्याचा एकही सिनेमा पाहिलेला  नव्हता .त्यांना त्याच काही वाटत नव्हत पण मला मात्र स्वत:चा खूप अभिमान वाटत होता.

तशी त्याची जवळ जवळ सगळीच गाणी आवडतात.त्यातली काही निवडक गाणी खालीलप्रमाणे आहेत ..

 •  एहसान तेरा होगा मुझ पर
 •  दीवाना मुझ सा नहीं
 •  चाहे कोई मुझे जंगली कहे
 •  तुमने मुझे देखा
 •  दिवाना हुआ बादल
 •  तुम मुझे यूँ भूला न पाओगे
 •   तुमसा नहीं देखा
 •   ऐ गुलबदन
 •   दिल देके देखो
 •   ओ हसिना जुल्फो वाली
 •   आजा आजा मै हू प्यार तेरा
 •   आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे
 •   गोविंदा आला रे
 •   आसमानसे आय फरिश्ता
 •   चांदसा रोशन चेहरा

आता तीन दिवसातच गोपाळकाला आहे, बॉलीवूडमध्ये गोपाळकाल्यावर अनेक गाणी चित्रित केली गेली आणि त्यातली बहुतांशी सर्वच गाजली पण ज्या पद्धतीने, ज्या एनर्जीने शम्मींनी  ‘गोविदा आला रे आला’ सादर केल त्याला खरच तोड नाही ….

बॉलीवूडमध्ये अनेक चांगले अभिनेते होते/आहेत ,निर्विवाद शम्मीपेक्षाही चांगलेही होते/ आहेत, पुढेही होतील पण…असा ‘जिंदादिल’, ‘हटके’ दुसरा ‘शम्मी’ होणे नाही …

(छायाचित्र गुगलवरून साभार )