लख-लख चंदेरी वाचकांची सारी किमया…..

लहानपणीचे शाळेत जातांना कधीकधी आठ आणे-रुपया हातावर मिळायचे ते दिवस… कधी कोणी आलेल्या पाहुण्याने जातांना,हवी असतानाही मी नको नको म्हणता म्हणता पाच-दहा रुपयांची नोट हातात टेकवल्यावर होणारा तो आनंद … तर अश्या त्यावेळी पुस्तकातून ओळख होण्याआधी ‘लक्ष’ किंवा ‘लाख’ ह्या शब्दाशी माझी ओळख झाली ती लॉटरीच्या तिकीटामुळे…नीटस आठवत नाही पण तेव्हाच एका वर किती शून्य वैगेरे अशी आकडेमोड करतांना त्या शब्दाची भव्यता मनात खोलवर कुठेतरी मुरली होती.अगदी आताही काही वर्षापूर्वीपर्यंत ती भव्यता मनात तशीच अबाधित होती.पण आता एका लाखात नैनो कार मिळायच्या दिवसात ते  शब्द माझ्यासाठी तितकेसे भव्य राहिले नव्हते.तरीही आज अचानक ते मला खुपच भव्य आणि जवळचेही वाटायला लागलेत कारण आज प्रजासत्ताक दिनाच्या आणि गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर दवबिंदुने एक लाख वाचकसंख्येचा टप्पा गाठला आहे.

‘किती सांगू मी सांगू कुणाला’ अस झालय नुसत मला..कोणाला माझ हे लिहण आत्मप्रौढीचही वाटेल पण  ते साहजिक आहे ह्याची जाणीव मला  आहे.कारण ब्लॉग तयार केला तेव्हा स्वप्नात ही कधी एवढ्या हिट्स मिळतील अस वाटल न्वहत.तसही ह्या ब्लॉगबरोबर  माझ खूप जिव्हाळयाच नात आहे.त्यामुळे त्याने असा मैलाचा एक दगड पादाक्रांत आनंद व्हायलाच हवा ना..

दवबिंदूच्या निर्मिती आणि सुरुवातीच्या प्रवासाबद्दल तुम्हाला इथे वाचता येईल …

सर्वात आधी दवबिंदुच्या समस्त वाचकांचे  लक्ष लक्ष  आभार. तुमच्या  दवबिंदुवरील प्रेमामुळेच आणि तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे  आजवरचा प्रवास घडला. यापुढेही तुमचा  ह्या ब्लॉगवरील लोभ , दवबिंदुशी जुडलेल नात असच कायम राहू द्या.

दवबिंदुला सर्वाधिक वाचक मिळवुन दिले ते मराठी ब्लॉग विश्वने.लाख वाचकांपैकी दहा हजाराहून अधिक वाचक मराठी ब्लॉग विश्वरूनच दवबिंदु वर आले आहेत.त्याबद्दल खरच त्यांचे मनापासून आभार.दवबिंदू जेव्हा जेव्हा सुस्तावला -कंटाळला  तेव्हा वेळोवेळी त्याला नवीन उर्जा देण्यात हेरंब ,तन्वीताई,महेंद्रजी,सुहास, अपर्णा,श्री ताई ,विद्याधर,सविताताई ह्यांसारख्या अनेक जणांची खूप मदत झाली त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. दवबिंदुवरील ही १२१ वी पोस्ट असून  ८३ जणांनी  दवबिंदुवरील लिखाण  इमेलने सबस्क्रायब केल आहे.दवबिंदूची गुगल पेजरँकही ४ वर स्थिर आहे. नोव्हेंबर महिन्यात फेसबुकवर अवतरलेल्या दवबिंदूच्या पानानेही ५९ जणांना  ‘लाईक ‘ बटण दाबण्यास भाग पाडलं आहे.

काही वैयक्तीक कारणांमुळे तसेच प्रत्यक्ष जीवनात  नेटचा थोडासा अतिरेक जाणवल्यामुळे नेट पासून बराच काळ दुरावलो होतो. खर तर ५ ऑक्टोबरला लिहलेल्या सदाशिवगडवाल्या पोस्टनंतर  दवबिंदुसाठी काहीच लिहिल नाहीये.(मॅड आणि घराच घरपण … दिवाळी अंकासाठी लिहिल होत. )  पण तरीही तुम्ही  दवबिंदुला भेट देत राहिलात  हे पाहून खरच खूप छान वाटलं.फेसबुकवर आणि मेलवर जवळच्या अनेकजणांनी ‘का लिहित नाहीये’ अशी विचारणा केलीच त्यामुळे बर वाटलच पण दवबिंदुवरील नवीन लिखाणाविषयी विचारणा करण्याबाबत  काही अनोळखी  लोकांचे आलेले मेल मला जास्तच सुखावून गेले. स्वत:साठी म्हणून सुरु केलेला ब्लॉग आज इतकी लोक वाचताहेत ही भावना मनाला जो आनंद देत आहे तो शब्दात मांडता येणारा नाहीच.

परत एकदा मी  दवबिंदुला भेट देणारया सर्व वाचकांचे अगदी मनापासुन आभार मानतो.हया दवबिंदुवर असाच लोभ असू दया…

Advertisements