मीच का देवा …?

geoff-arthur-ashe-and-trophy

यु.एस. मध्ये आर्थर रॉबर्ट एश नावाचा एक विख्यात टेनिस प्लेयर होउन गेला.५ ग्रैंडस्लेम त्याच्या नावावर आहेत.१९७६ मध्ये तो वर्ल्ड टेनिस रंकिंग मध्ये दुसरया क्रमांकावर होता.अश्या ह्या लिज़ंटरी खेळाडूला ऐड्स झाल्याचे निदान झाले.(१९८३ मध्ये झालेल्या हार्ट सर्जरीच्या वेळी त्याला जे रक्त देण्यात आले त्यामार्फत)तेव्हा त्याच्या जगभरातल्या असंख्य चाहत्यानी त्याला बरीच हळ्हळ आणी सहानुभूति व्यक्त करणारी पत्रे लिहली.त्यातील एका चाहत्याने लिहले होते …

“देवाने ह्या अश्या भयानक रोगासाठी तुझीच निवड का केलि …?”

तेव्हा आर्थरने त्याला पुढील उत्तर दिले ….
*************************************************************
प्रत्येक वर्षी जवळ्पास पन्नास लाख लोक टेनिस खेळण सुरु करतात ….
५ लाख लोक व्यावसायिक पातळीवर टेनिस शिकतात …
५० हज़ार लोक विभागीय स्तरावर चमकतात …
५ हज़ार लोक देशांतर्गत स्पर्धेत नाव मिळवतात…
५०० लोक ग्रैंडस्लेम पर्यंत पोहोचतात …
५० लोक विम्ब्ल्डन  गाठतात…
४ लोक सेमिमध्ये येतात …
२ जण फायनल मध्ये भिडतात …
आणी मी जेव्हा ती विम्बल्डनची ट्राफी जिंकुन हातात घेउन उंचावतो तेव्हा मी देवाला
कधीच विचारत नाही मीच का देवा ….?
मग आजच्या या क्षणी मी असा प्रश्न देवाला का करावा …
***********************************************************
आपणही बरयाच वेळा छोट्या मोठ्या संकटाच्या वेळी ‘देवा मीच का’ म्हणत देवालाच दोष देत असतो.पण देवाने भुतकाळात जे चांगले प्रसंग आपल्याला दिले होते त्याचा आपल्याला विसर पडतो.असो मला तर ही घटना खुपच प्रेरणादायी वाटली म्हणुनच मेल मध्ये आलेल्या ‘why me god’ चे ‘देवा मीच का’ म्हणून मराठीत अनुवाद  करून इथे शेयर केल.
.

आर्थर एश बद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया .

Advertisements