नात (भाग-२)

गरमागरम चहाचा आस्वाद घेत दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.दोघेही मनाने कितीतरी वर्ष मागे आले होते.अनेक जुन्या आठवणीना उजाळा देताना काही गंभीर प्रसंग स्मरत   दोघे भावुक  होत  होते  तर काही मिस्किल क्षण आठवून दोघेही मनसोक्त हसत होते.सहजच सुधाने टी वी चालु केला. न्यूज़ चैनल वर अमेरिकेतून भारतात येणारया विमानाला अपघात झाल्याची ब्रेकिंग न्यूज़ चालु होती.”बर झाल रे तू ज़रा आधीच इथे आलास नाहीतर ही बातमी बघून माझा जीवच गेला असता रे “सुधाच्या डोळ्यात आता पाणी  आले होते.ताई मी यावेळी नाही आलास तर तुझ माझ नात संपल अस तू म्हणाली होतीस ना मग मी इथे यायचा राहिलो असतो का ग “अस कारे म्हणतोस “सुधाने कळवळुन विचारले.”अग ताई,आईने मरायच्या आधी मला एक गोष्ट सांगीतली  होती ती म्हणजे “कितीही संकटे येवोत, तुमच बहिण भावाच ‘नात’ आयुष्यभर अगदी अबाधित ,अतूट अस ठेवा.”आणि दोघेही आईच्या आठवणीत हरवून गेले.इतक्यात मधल्या खोलीत टेलीफोनची रिंग वाजली.”आले ह मी” म्हणत ती आतल्या खोलीत गेली.

brother_and_sister
“हेल्लो” फोन उचलून सुधा म्हणाली ,
“मी सचिनचा मित्र संजय बोलतोय, माफ़ करा एक दुखद: बातामी आहे तुमच्यासाठी तुमचा भाऊ सचिन  भारतात ज्या विमानाने येत होता त्याला अपघात झाला.तो आता…. ताई सचिन आपल्याला सोडून गेला…”पलीकडून आवाज आला.
“काय …? तो तर इथे आहे.कोणी सांगितल तुम्हाला इतकी वाईट मस्करी करायला “सुधा  रागातच म्हणाली.
“ताई स्वत:ला सांभाळा,तुम्हाला भास झाला असेल.मी इकड़चे सगळे सोपस्कर पार पाडून लवकरात लवकर येतो तिथे सचिनचा मृतदेह घेउन …”यापुढे काही न बोलता त्याने फोन ठेउन दिला.

सुधाला खुप राग आला होता त्या माणसाचा आणि ती थोडी घाबरली ही होती.”अरे सचिन..” म्हणत ती लगबगीने  बाहेर आली. सचिन खुर्चीवर न्वहता.मग तिने घरात सगळी कड़े पाहिल पण सचिन कुठेच न्वहता.इतक्यात तीच लक्ष समोर चालु असलेल्या टी.वी. कड़े गेल.त्या अपघातातील मृतांची नाव खाली येत होती. त्यातल एक नाव पाहून ती जागच्या जागी थबकली आणि अगदी सुन्न मनाने टेबलवरील  चहाच्या खाली कप कड़े पाहात राहिली …

crying-man

नात

नुकताच घरातली काम उरकून सुधा वर्तमानपत्र चाळीत बसली होती.इतक्यात टिंग टोंग  दाराची बेल वाजली.आताच तर सतीश आणि त्याचे बाबा बाहेर पडले होते मार्केट मध्ये जाण्यासाठी  मग कोण आल असेल बर हा विचार करत तिने दुर्बिणिच्या छिद्रातुन बाहर पाहिल पाहाते तर काय बाहेर चक्क सचिन उभा होता.तिने तत्परतेने दरवाजा उघडला.आणिसचिनकडे पहातच राहिली. सचिनला प्रत्यक्ष भेटून ५ वर्ष उलटली होती.तिच्या डोळ्यापुढे ५ वर्षापूर्वी मायदेश सोडून अमेरिकेत नोकरीसाठी जातानाची त्याची मूर्ति समोर येत होती .  गेल्या आठवड्यातच त्यांच झालेल बोलण तिला आठवल तिने लटक्या रागातच सचिनला सुनावले होते “हे बघ सचिन जर हया दिवाळीला तू जर हया ताईला भेटायला आला नाहीस तर तुज माझ नात संपल म्हणून समझ… “हयावर सचिन अगदी लहान बाळा सारखा  काकूळतिला येउन म्हणाला होता “अस नको म्हणु ग ताई,हया दिवाळिला मी काहीही झाल तरी तुझ्याकडे येइनच…” त्याच्याकडे बघता बघता तिचे डोळे भरून आले.

“अग एव ताईडी असच  माझ्याकडे बघत राहशील की मला घरात पण येऊ देशील” या  सचिनच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली.”अरे ये आत ये हे काय तुला सांगायला हव होय ,आणि आता पाच वर्षानी तुला सवड मिळाली हो या ताईकडे यायला” ती हसतच उत्तरली.अगदी लहानपणापासुन दोघांच एकमेकांवर खुप प्रेम होत.”ए ताई तुला राग आला का ग माझा खरच मी …” तो अगदी भावुक होउन म्हणत होता, दोघानाही गहिवरून आल होत.त्याच बोलण मध्येच कापत सुधा म्हणाली “अरे इतका सेंटी का होत आहेस, मी कधी तुझ्यावर रागावणार आहे का रे ,चल पटकन हातपाय धुवून फ्रेश हो तोवर  मी तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते, सतीश आणि त्याचे बाबाही येतील इतक्यातच मग आपण मस्त गप्पा मारू” अस म्हणत सुधा स्वयंपाक घराकडे वळली.

क्रमश: