जगबुडी

आज १२/१२/१२ …आता तो दिवस जवळ येतोय …. हो तोच तो महाप्रलयाचा दिवस…कयामतका दिन…डूम्स-डे….दि जजमेंट डे…२१ डिसेंबर २०१२….

तर प्राचीन माया संस्कृतीच्या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ हा दिवस शेवटचा दिवस आहे. हजारो वर्षांच्या या कालगणनेमध्ये २१ डिसेंबर २०१२ नंतरची कालगणना दाखविलेली नाही.हिंदू,मुस्लिम,ख्रिश्चन अश्या जगातल्या जवळपास सर्वच धर्मात जगाचा अंत निश्चित मानलेला आहे.वैज्ञानिकदृष्ट्याही पृथ्वीवरील उष्णता आणि शीतलता ‘एक्स्ट्रीम’ वाढून पृथ्वीचा अंत निश्चित आहे.त्सुनामी आणि तत्सम नैसर्गिक आपत्त्याही अधून मधून तोंड बाहेर काढत आहेत.म्हणूनच ‘ ग्लोबल सीड वॉल्ट‘ सारखा आतिशय मोठा प्रकल्प नॉर्वे येथे राबवला जात आहे,ज्यात बिल गेटस सारख्या लोकांचा सहभाग आहे. तरी जगाचा अंत इतक्या लवकर होईल अस वाटत नाही.पण येत्या काही दिवसात मिडिया जड जड शब्द वापरून मोठ्या मोठ्या विशेषणांसह जगबुडी हा विषय चांगलाच चघळणार आहे.मला वाटते जगाला खरा धोका कसला आहे तर तो प्रचंड प्रमाणात केलेल्या वृक्षतोडीमुळे निर्माण झालेल्या असमतोल पर्यावरणाचा ,प्रदूषणाचा ,होऊ घातलेल्या अणुबॉम्बयुक्त महायुद्धाचा…

तर ही पोस्ट टाकण्यास कारण म्हणजे पन्हाळगडाच्या निमित्ताने कोल्हापूरला केलेला पहिलावहिला आणि झटपट एकदिवसीय दौरा.तुम्ही म्हणाल माझ्या कोल्हापूर दौऱ्याचा आणि जगबुडीचा काय संबध ?तर संबध आहे.मलाही हे रहस्य तिथे गेल्यावरच उलगडल.ते आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी हा लेखप्रपंच.तर भक्तजनहो नीट लक्ष देऊन वाचा, ही जगबुडी कधी होणार त्याची कहाणी.कोणत्याही शिवमंदिरात आपण जातो तर तिथे शिवलिंग मुख्य गाभार्यात व बाहेरील भागात नंदी पाहावयास मिळतो.पण कोल्हापुरातील रंकाळा तलावा किनारी असलेल्या मंदिरात नंदीची साधारण पाच ते  सहा  फूट उंचीची  मूर्ती मुख्य गाभार्यात आहे व शिवलिंग बाहेरील भागात आहे. तिथल्या एका व्यक्तीला ह्याबाबत विचारले असता त्याने सांगितले ,(…ढॅण टॅ णॅण… )कि हा नंदी  दरवर्षी गहूभर पुढे व तिळभर मागे सरकतो आणि हा सरकत सरकत जेव्हा रंकाळा तलावापर्यंत पोहोचेल तेव्हा जगबुडी होईल…युरेका …आहे कि नाही ‘तलाश’ सिनेमातील रहस्याहून जास्त धक्का देणार  रहस्य… 🙂 आणि आता निर्धास्त रहा कारण मी पाहीलय अजून तो नंदी तलावापर्यंत पोहोचण्यास बरच ‘मार्जिन ‘  आहे.

23

हेच ते मंदिर ….

तर काही कारणांनी कधी  जगबुडी झालीच तर ज्यांनी पन्हाळगडाला आजवर  भेट दिली नाहीये आणि समजा पुढेही तसा योग जुळून येणार नसेल  पण  त्यांनी इथे भेट दिली आहे त्यांना काही छायाचित्रांद्वारे पन्हाळगडासह कोल्हापूरची थोडक्यात सहल घडवण्याच्या प्रयत्न खाली करतोय…….

तर कोल्हापूर  शहराच्या वायव्येस सुमारे १८ किमी वर  समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर असणारा   पन्हाळा हा किल्ला म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील अनेक नाट्यपूर्ण घटनांचा जिवंत साक्षीदार.तसेच शिवाजी महाराज  आणि संभाजी  ह्यांचा आवडता किल्ला.दोन वेळा मराठ्यांची राजधानी म्हणून मान मिळालेला हा किल्ला.सलग चार महिने सिद्दी जोहारच्या वेढ्यात महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला.शिवाजी आणि संभाजी महाराजांबरोबरच बाजीप्रभू देशपांडे ,वीर शिवा काशीद,ताराराणी,कवी मोरोपंत,रामचंद्रपंत अमात्य अश्या अनेकांच्या आयुष्यातील  महत्वाच्या घटनांशी जुडलेला हा किल्ला. हा किल्ला शिलाहार वंशी राजा भोज दुसरा याने बांधला.पुढे अनेक राजसत्तांनी इथे राज्य केले हे तेथील दरवाज्यावर कोरलेल्या राजचिन्हातून दिसून येते.

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा  हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा...

वीर शिवा काशिद : सिद्दी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडतांना त्याला चकवण्यासाठी शिवाजींचे पेहराव धारण करणारा व वीरमरण पत्करणारा हुबेहूब शिवरायांसारखा दिसणारा मर्द मावळा…

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे ...

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत प्राणपणाने लढा देऊन आपल्या पवित्र रक्ताने घोडखिंडीची पावनखिंड बनवणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे …

तटबंदी

तटबंदी

4

दरवाजावर कोरलेली काही राजचिन्हे…

5

6 7

आजच एक चिन्ह .. 😦

9

10

11

8

14

अंबरखाना

13

कोठाराचा आतील भाग …

30

सज्जा कोठी : शिवाजी व संभाजी महाराजांची शेवटची भेट ह्याच ठिकाणी झाली होती .

15

सज्जा कोठीतून …

16

सज्जा कोठीतील नक्षी …

17

सज्जकोठीची गच्ची …

26

धनाजीराव वाकडे (धुमधडाका ) घर … 🙂

18

19

महालक्ष्मीआईच्या नावान चांगभल …

25

ज्योतिबाच्या नावान चांगभल …

21

येथे आत भिंतीवरील चित्र पाहण्यासारखी आहेत .अजिबात चुकवू नका.

24

22

कुस्तीच मैदान

20

न्यू पॅलेस व म्युझियम: अनमोल ऐतिहासिक वास्तूंबरोबरच आतील त्याकाळच्या दरबाराची मांडणी बघण्यासारखी आहे…

27

शालिनी पॅलेस…

28

रंकाळा

29

गुंग झालात ना पन्हाळा आणि कोल्हापूरची थोडीशी झलक पाहण्यात तर खरच आवर्जून आणि जास्त वेळ काढून भेट देण्यासारख हे ठिकाण आहे .तर आपण कुठे होतो … हा जगबुडी …भ्रष्टाचार आणि महागाईचा भस्मासुर कित्येकांना रोजच मरायला भाग पाडत आहे. त्या रोज रोज मरण्यापेक्षा एकदाच सर्वजण गेले तर बरच होईल,अस भारतातील बहुसंख्य लोकांच मत असेल.आणि समजा झालीच जगबुडी, तर काय बिघडणार आहे? आपण सगळेच नसणार तर चिंता कसली? तेव्हा जगबुडीला घाबरलेल्या किंवा मुळत:च उदासीन असलेल्या चिंतातुर जंतूनो किंवा स्वतःचा अकार्यक्षमतेपणा लपवण्यासाठी ह्या संकल्पनेच्या कुबड्यां घेणार्यांनो वेळेवर जागे व्हा.ह्या आणि असल्या संकल्पनांवर स्वत:चा फायदा करून घेणारेही आहेत.मी सुद्धा कं मुळे इतके दिवस बंद असलेल्या ‘दवबिंदू’वर पोस्ट टाकण्यासाठी ह्या संकल्पनेचा कसा वापर केला आहे ते बघा.तेव्हा   जगबुडी नाही झाली तर काय होईल हा विचार करा आणि आपापल्या कामाला लागा… 🙂

हर घड़ी बदल रही है रूप ज़िंदगी
छाव है कभी, कभी है धूप ज़िंदगी
हर पल यहाँ, जीभर जियो
जो है  समा, कल हो न  हो….

मिशन काश्मीर…

एप्रिलचा शेवटचा आठवडा …काश्मीरमधली एक रात्र…अगदी स्वप्नवत गेले होते मागचे काही दिवस, पण आता तिथून परतायच होत.बिछान्यावर पडलो खरा पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हत्या.सहज इडीयट बॉक्स चालू केला तर बहुतांशी वाहिन्यांवरून इम्रान हाश्मी ‘जन्नते कहा’ म्हणून ओरडत होता.(आजकाल असच आहे जो सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वाटेवर असतो, त्याच्या ‘ट्रेलर’चा सगळ्याच वाहिन्यावरून आपल्यावर  तुफान भडिमार होत असतो.) मी म्हटलं, “अरे ओरडतोस कशाला,इथे एकदा येउन बघ, भूतलावर कुठे ‘जन्नत’ आहे तर ती इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे.” (ह्याचा जहांगीरने म्हटलेल्या ‘अगर फिरदौस बर्रूए-जमीनस्तो, हमीनस्त, हमीनस्त, हमीनस्तो।’ शी काहीही सबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा. 🙂 )

तर लहानपणापासून असंख्य वेळा ज्याच वर्णन  ‘भूतलावरील स्वर्ग’ अस ऐकत आलो होतो.ज्या जागेबद्दल   लहानपणापासून मनात एक वेगळच कुतूहल,वेगळाच आकर्षण होत.जिथे जाण्यासाठीची  उत्सुकता शरीराच्या प्रत्येक अणुरेणूत अगदी ठासून भरली होती. ‘मिशन काश्मीर’ सिनेमात ‘मिशन’ दृष्टीपथात आल्यावर हिलाल कोहीस्तानी अल्ताफला विचारतो, “इस दिन का कितने सालोसे इंतझार किया था “. अल्ताफ अगदी सयंतपणे म्हणतो “एक हजार साल “. तसच मला कोणी ह्या दिवसांबद्दल विचारलं असत,तर माझ उत्तरही ‘एक हजार साल’ असत…कदाचित ‘एक लाख साल’… 🙂   तर अश्या ठिकाणी जायच भाग्य शेवटी ह्या एप्रिलमध्ये लाभल  आणि तिथे प्रत्यक्ष गेल्यावर  काश्मीरबद्दल ऐकलेल्या वर्णनातली सत्यता पुरेपूर अनुभवयाला मिळाली .

This slideshow requires JavaScript.

माझ्या ह्या काश्मीर दौऱ्याची सुरुवात खरतर अतिशय नाट्यमय झाली.केंद्र सरकारच्या सेवेत असल्यामुळे त्यांनी काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी जाहीर केलेल्या एलटीसीमार्फत माझा हा दौरा शक्य झाला. ह्या योजनेमार्फत श्रीनगर पर्यंतच विमान भाड सरकारकडून मिळाल होत.आम्ही चार-पाच जणांनी मिळून २३ एप्रिल ते २७ एप्रिल असा कार्यक्रम निश्चित केला.पण नंतर त्यातून एक एक जण वेगवेगळ्या कारणाने नाट्यमय रित्या बाहेर पडला आणि मी एकटाच राहिलो ..कहाणीत ट्वीस्ट.. पण मी मग ‘एकदा मी ठरवलं कि  मी माझपण ऐकत नाही ‘ हा पवित्रा घेत (तसही माझ तिकीट नॉनरिफंडेबल होत.. 🙂 ) जायचच अस ठरवलं आणि माझ्या सुदैवाने आमच्या कंपनीतलाच  २४ एप्रिलला तिथे जाणारा  अकरा जणांचा एक ग्रुप मला मिळाला.

२३ एप्रिलला सकाळी घर सोडलं.गरमी फुल फार्मात होती.विमानतळावर पोहोचेपर्यंत जीव नकोसा झाला होता.पण तिथून अवघ्या अडीच तासात अश्या  वातावरणात पोहोचलो कि अहाहा काय वर्णाव ! मुंबईत घामाच्या धारा वाहत होत्या आणि तिथे मस्त रिमझिम पाउस चालू होता.त्यात हवा अगदी थंडगार. बस्स तिथेच माझ  अगदी ‘लव ऍट फर्स्ट साईट’ म्हणतात ना तस झाल कारण इतक्या कमी कालावधीत मी हवामानात जो सुखद बदल अनुभवला तो त्यासाठी  पुरेसा होता.अतिशयोक्ती वाटेल पण अजून विश्वास बसत नव्हता मी काश्मीरमध्ये आहे ,खरच खूप छान वाटत होत.तिथून मग आमच्या रॉयलसफारीची टुर ऑपरेटर सुमैरा हिच्या सूचनांप्रमाणे हॉटेल  ब्रूकलँड गाठल. हॉटेल सुंदरच होत.हॉटेलसमोरच तबीयत अगदी खुश करणारा  सुंदर  फुलांचा बगीचा होता.

मघापासून हवेत असणारया मला खूप उशिरा जाणवलं कि  इथे आल्यापासून आनंद झाला असला तरी डोकही आतून खूप ठणकत होत.त्यामुळे मस्त गरम पाण्याने आंघोळ करून आराम करू अस ठरवलं.पण फ्रेश होऊन एक गरमागरम चहा घेतल्यावर मी कसला आराम करतोय.लागलीच चौकशी करून दल तलावाकडे मोर्चा वळवला.रस्त्यावर ठिकठिकाणी असलेली लष्करी जवानांची उपस्थिती मी काश्मीरला फिरायला आलोय ह्याची जाणीव करून देत होती.हॉटेलपासून चांगला  अर्धा तास पायपीट करून त्या स्वर्गीय तलावाकडे पोहोचलो. संधीप्रकाश ,तलावाच निळशार पाणी ,रिमझिम पाउस ,तलावात फिरत असलेल्या शिकारा(प्रवासी बोटी),मागे सुंदर डोंगररांगा,तलावाच्या किनारी असलेल्या असंख्य हाऊसबोटींची(निवास करावयाच्या बोटी) आणि  त्यावर असलेल्या विविध रंगाढंगाच्या लाईटची पाण्यातील  प्रतिबिंब अस अगदी मोहक दृश्य तिथे होत.एखाद  अप्रतिम , सुंदर चित्र आवडल्यामुळे ब्रम्हदेवाने ते इथे  प्रत्यक्षात निर्माण केल अस वाटत होत.

दल तलाव

दल तलाव

दल तलाव रात्री …

त्या अतिशय सुंदर नयनरम्य वातावरणाच्या पार्श्वभागावर काळोखाच्या साम्राज्याने दल तलावाला हळुवार आपल्या कवेत घेतल्याच्या घटनेचा साक्षीदार होत  तिथल्या त्या गर्दीतलाच  मी ‘एकटा’ दल तलावाच्या किनारी कितीतरी दुरवर कितीतरी वेळ ‘क्लीकाक्लीकी’ करत  भटकत राहिलो. खरच  आताही ते क्षण आठवले कि अतिशय छान वाटत.तिथे फिरतांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे अर्ध्याहून अधिक मराठी लोकच तिथे फिरत होती.तिथे मग एका ठिकाणी भेल खायला घेतली.त्या भेलवाल्याशी बोलतांना कळल तो बिहारचा होता ,आणि काही वर्षापूर्वी तिथे आला होता.मानल पाहिजे ह्या लोकांना ,कुठेही जाऊन कसेही ‘अॅडजस्ट’ होतात.आपण आपल्या देशाबाहेर जगात कुठेही रिअल इस्टेट प्रॉपर्टी घेऊ शकतो पण काश्मीरमध्ये नाही ,तसा कायदाच आहे. मराठी माणूस ही राज्याबाहेर जाऊन काम करतो नाही अस नाही पण खालच्या दर्जाची कामासाठी तरी तो नक्कीच राज्याबाहेर पडत नाही ,जरी पडत असला तरी ते प्रमाण जास्त नसावे.

शिकारा…

रात्रीच जेवण …

तर अश्या प्रकारे ती संध्याकाळ दल तलावाच्या नावे करून मी तिथून हॉटेलात परतलो.चिकनच्या  दोन वेगवेगवेगळ्या (नाव आता लक्षात नाही) डीश  आणि पनीर अस  रात्रीच जेवण एकदम जंगी झाल.थंडी चांगलीच बहरली होती ,जेवल्यावर तिचा ‘फील’ घेत बराच वेळ हॉटेलच्या आसपास घुटमळत राहिलो.पण नंतर चांगलाच गारठलो.आणि मग आयुष्यात पहिल्यांदाच बेड हिटर्सचा अनुभव घेत शांत  झोपी गेलो.सकाळी लवकरच फ्रेश होऊन काहीही पूर्वनियोजित कार्यक्रम न ठरवता दल तलावाकडे धाव घेतली.आज पाउसाचा काहीही लवलेश नव्हता,आकाश निरभ्र व वातावरण अगदी मोकळ होत.तिथे थोडस भटकल्यावर शालीमारबागेकडे जाणारया जीप मध्ये बसलो खरा पण तितक्यात दल तलावात फिरणाऱ्या शिकारानी मन वेधून घेतले.मग काय संध्याकाळी ‘प्लान’ मध्ये शिकारा असूनही   जीप सुरु व्हायच्या आतच त्यातून उतरून ८०० रु पासून सुरु होऊन ३५० रु. ला ‘यादगार’ ही डिलक्स शिकारा दोन तासासाठी बुक करून टाकली.एकट्यासाठी स्पेशल आणि सीजन असल्याने ही किमंत काही जास्त नव्हती.

दल तलावातील माल वाहतूक

अकबर फोर्ट

शंकराचार्य मंदीर

नेहरू गार्डन

हँगिंग गार्डन

‘यादगार’ झुंबर वैगेरेंनी मस्त सजवलेली होती आणि त्यातील गादी एकदम राजाच ‘फील’ देणारी होती.त्या कोवळ्या उन्हात आणि थंड वातावरणात  चकाकणाऱ्या दल तलावाच्या सोनेरी पृष्ठभागावरून आमची ‘यादगार’ शाही सफर चालली होती.शिकार्यात बसल्या बसल्याच शम्मी साहेबांची आठवण आली होती.मग काय  मी मोबाईलमध्ये ‘चांद सा रोशन चेहरा ‘ लावून त्यात अजून वातावरण निर्मिती केली आणि कोणी फुल विकणारी ‘चंपा’ कुठे दिसते का हे पाहू लागलो.चंपा शोधता शोधता डाव्या बाजूला दुरवर  अकबर फोर्ट व उजवीकडे दुरवर  शंकराचार्यांच मंदीर व मिशन काश्मीर फेम टॉवर ह्यांच दर्शन घडल.मी आजवर अनेक ठिकाणी बोटिंगचा आनंद घेतला आहे पण खर सांगतो दल तलावातील शिकाराविहाराची सर त्यांना  नव्हती.भाजी,फळावळ, फुले, दागदागिने,केशर,किराणा माल अशी अनेक गोष्टींची  शिकारातील चालती फिरती दुकान आजूबाजूला दिसत होती.शिकारातून मग दल तलावातील छोटेसे बेटवजा  नेहरू गार्डन येथील फुलांच्या बागेला व हँगिंग गार्डनला भेट दिली.तिथे  मनसोक्त हिंडून झाल्यावर ‘यादगार’ चा निरोप घेतला व ट्युलिप गार्डन कडे कुच केल.

ट्युलिप्स

सरोज खान ट्युलिप गार्डन मध्ये…

ट्युलिप गार्डन

ट्युलिप गार्डन

ट्युलिप गार्डनमध्ये ट्युलिप बरोबरच इतरही कितीतरी वेगवेगळी रंगीबेरंगी फुल हसत खेळत होती.मागे पसरलेल्या डोंगररांगा आणि ते समोरील वेगवेगळ्या रंगाचे फुलांचे गालीचे खरच मन प्रसन्न करून टाकणारे होते.तिथे एका ठिकाणी विडियो शुटींग चालू होत.जवळ जाऊन पाहिलं तर आपल्या सरोज खान बाई तिथे दिसल्या.तिथून मग तशीच निशांत बाग व शालीमार बाग येथील विविध फुलांची भेट घेतली.शालीमार बागेतील पाण्याची कारंजेही पाहण्यासारखी आहेत.दरम्यान माझी क्लीकाक्लीकी चालू होतीच पण अस्मादिक तिथ गेल्याचा पुरावा ठेवण्यासाठी तेथील अनेक जणांना फोटोग्राफी करायची संधी मी दिली होती. 🙂  शालीमार बागेतून निघून मग मी हॉटेलात परतलो आणि माझा ‘एकला चालो रे’ चा प्रवास संपवत आताच तिथे पोहोचलेल्या आमच्या गँगमध्ये सामील झालो.

शालीमार बाग

निशांत बाग

निशांत बाग

निशांत बाग बाहेरून

गँगबरोबर नंतर केलेल  हाउसबोटीतील वास्तव्य ,हजरतबल ,चश्मेशाही,तसेच सौंदर्याची खाण असलेल्या गुलमर्ग व पेहेलगाम  सारख्या ठिकाणांची सफारी,गोंडालातील प्रवास,बर्फातील मस्ती  अश्या अनेक अनुभवांमुळे स्वर्ग आहे तर इथेच ह्यावर मी  शिक्कामोर्तब केल. ह्या अनुभवांवर पुढील भागात लिहेनच.

तर आयुष्यात एकदा तरी काश्‍मीरला जावे, असे म्हटले जाते.माझीही लहानपणापासून तशी इच्छा होती आणि ती ह्या एप्रिलमध्ये पूर्णही झाली.पण आता महादेवाच्या बोलवण्यामुळे  अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने माझ्या आयुष्यात मला  एकाच वर्षात दुसऱ्यांदा  तेही फक्त तीन महिन्यांच्या फरकाने ह्या स्वर्गात परत जायला मिळत आहे. त्याबद्दल मी स्वत:ला खरच खूप भाग्यवान समजतो.तर मित्रांनो मी आज अमरनाथ यात्रेसाठी घराबाहेर पडत आहे.तेथील वातावरणामुळे मार्ग खडतर आहेच पण तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच …

हर हर महादेव…….